याला काय म्हणावे?

१,८८,८२,८६२.०० रुपये स्टेट बँकेच्या खात्यांमध्ये.

२३,२०,०००.०० रुपये बॉण्डमध्ये.

५,३५,८१४.०० रुपये टपाल खात्याच्या बचत योजनेत.

(एकूण दोन कोटी सतरा लाख अडुतीस हजार सहाशे शहाहत्तर रुपयांची रोख गुंतवणूक.)

याशिवाय अनुक्रमे ९० लाख रुपये बाजारभावाचं घर, ८८,६७,००० रुपये बाजारभावाची अपार्टमेण्ट आणि एक मारुती-८०० गाडी (१९९६ सालाची).

पंतप्रधान मनमोहनसिंग यांची ही मालमत्ता आहे.

मुक्त अर्थव्यवस्थेचे जनक, शेअर बाजारात जनतेनं पैसे गुंतवावेत असं सांगणारे अर्थवेत्ते असणाऱ्या मनमोहनसिंग यांच्या एकूण दोन कोटी सतरा लाख अडुतीस हजार सहाशे शहाहत्तर रुपयांच्या रोख गुंतवणुकीतील एकही पैसा शेअरमध्ये का असू नये?

उपक्रमींना काय वाटते?

(माझ्या परिचयात असणाऱ्या एका ज्येष्ठ पत्रकाराने हा मुद्दा टिपला आहे.)

लेखनविषय: दुवे:

Comments

याला प्रतारणा म्हणावे

कागद आणि वास्तव यात किती बृहद् अंतर असते हे उपक्रमींना सांगणे न लगे.
प्रकाश घाटपांडे

कॉन्फ्लिक्ट ऑफ इन्टरेस्ट कसा काय?

पण मग याच न्यायाने बँकेतील खातेदारांचे व बाँड मार्केटमधील खेळाडूंचे प्रश्न हे समभाग बाजारातील गुंतवणूकदारांच्या प्रश्नांपेक्षा मनमोहनसाहेब जास्त प्राधान्याने सोडवतील असे मानावे का?



येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

पटले नाही.

रिलायन्स वा तत्सम कंपनीने प्रतिवर्षी ३० टक्के फायदा मिळवला तर त्या फायद्यावर ती कंपनी जो कर भरते त्याने देशाचा फायदाच होत नाही का? मात्र सलग २-३ वर्षे तोट्यात चालणार्‍या सरकारी ब्यांका देशाच्या अर्थव्यवस्थेला कशी काय मदत करतात हे कळले नाही.

ह्या ब्यांकेपेक्षा खाजगी ब्यांकिंग करणारी एचडीएफसी ब्यांक ही गेले ५ वर्षे प्रत्येक तिमाहीमध्ये २५ टक्क्यापेक्षा जास्त वाढ आपल्या फायद्यात दाखवत आहे. पर्यायाने प्रत्येक तिमाहीला त्यांचा सरकारी करभरणा हा २५ टक्क्यांनी वाढतो. येथे देशाचा फायदा होत नाही का?



येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

मुत्सद्देगिरी

परंतु कुठल्याही आस्थापनेत प्रत्यक्ष गुंतवणुकीपेक्षा नैतिक दृष्ट्या प्रत्यक्षरीत्या राष्ट्रीय व्यवसायात पैसे गुंतवणे देशाच्या पंतप्रधानाला जास्त शोभते, असे आम्हाला वाटते.

ही मुत्सद्देगिरी आहे. वास्तव काय असेल् कुणास् ठाउक?

प्रकाश घाटपांडे

नफा

'क्ष' कडून दिल्या जाणार्‍या नफ्याच्या टक्केवरीत (३८%?) कराहून, 'स' चा नफाच सरकारी तिजोरीत जमा होणे (आणी पुढे त्याचा विधायक कामासाठी व्यय) अधिक श्रेयस्कर. नाही का?

(अर्थात 'स' चा फायदा होत असेल तर!)

अवांतर: रिलायन्स मध्ये एखाद्याने (२ कोटी!) गुंतवणूक केल्याने तिचा नफा व पर्यायाने कर कसा वाढेल हे फारसे कळले नाही. तुलनेने सरकारी बँकेची कर्ज देण्याची क्षमता मात्र वाढलेली समजल्यासारखी वाटली.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

एक मत

भारतातील अनेक कंपन्यांना ब्याकांकडून कर्ज घेऊन भांडवल उभारण्यापेक्षा ते जनतेकडून उभारणे अधिक सोयीचे व स्वस्त झाले आहे. आपल्या पापपुण्यात जनतेलाही सहभागी करुन घेतल्यामुले नंतर कंपन्यांचा होणारा वाल्मिकीही टळू शकेल का?

भांडवल उभारणी करण्याचे कारण भविष्यातील विस्तारयोजनांसाठी अर्थपुरवठ्याची व्यवस्था करुन ठेवणे असा असू शकतो. हा विस्तार झाल्यानंतर कंपनीचा फायदा व पर्यायाने करभरणा वाढणे अपेक्षित आहे.

गेल्या अनेक वर्षांमध्ये आलेल्या प्राथमिक समभाग विक्रीचे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस पाहिले असता त्यात समभाग विक्री करण्याचे कारण स्पष्ट देणे सेबीने बंधनकारक केले आहे.



येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

अयोग्य

महागाईचा दर ६.५ टक्क्याच्या आसपास असताना स्टेट बँकेमधील दरसाल तीन ते आठ टक्के इतके कमी व करपात्र व्याज देणार्‍या खात्यांमध्ये १,८८,८२,८६२.०० इतकी रक्कम ठेवणे हे मनमोहनरावांच्या आर्थिक आरोग्यासाठी अयोग्य आहे.



येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

मनमोहनरावांना शिव्याशाप नाही

भारतातील बर्‍याच राष्ट्रीयीकृत ब्यांकांचे एनपीए (नॉन परफॉर्मिंग असेट) हे दोन टक्क्यांपर्यंत असते. हे पैसे असेच पडून राहतात व कोणत्याच कामासाठी वापरले जात नाहीत. येथे मनमोहन यांनी वैयक्तिक व देशाचा फायदा व तोटा याचा विचार करण्याऐवजी कमी धोका पत्करला आहे असे फार तर म्हणता येईल.

१. राष्ट्रीयीकृत उदा. देना बँकेत पैसे ठेवून त्यावर ३ टक्के व्याज मिळवणे व ते पैसे देना ब्यांकेत दहा वर्षं तसेच पडून राहणे त्यांनीही ते कोणाला कर्जाऊ न देणे.
२. व भारत हेवी इलेक्ट्रीकल्स/एनटीपीसी यांच्या प्राथमिक भागविक्रीस प्रतिसाद देऊन त्यांना भांडवल उभारणीसाठी मदत करणे

या दोन गोष्टींमध्ये (असलीच तर) कोणती गोष्ट अधिक देशसेवा करणारी आहे असे आपणास वाटते?

--नेट ऐवजी नॉन अशी दुरुस्ती केली आहे.


येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

सहमत/फंडा क्लीअर नाही.

याचसाठी त्यांनी स्वतंत्र विश्वस्त मंडळ स्थापून त्यांना गुंतवणूक करण्यास सांगणे हिताचे आहे.

जर शेअरबाजारात त्यांची अजिबात गुंतवणूक नसेल तर त्यात गुंतवणूक करणार्‍यांचे पर्यायाने स्वतःचे नसलेले हित ते अजिबात सांभाळणार नाहीत असा आरोप आम्ही करु शकत नाही का?

येथे ममोसिं रावांबद्दल आमच्या मनात अतिशय आदर आहे हे स्पष्ट करतो. पण कॉन्फ्लिक्ट ऑफ इन्टरेस्ट चा फंडा आम्हाला अजून क्लीअर झालेला नाही.



येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

खरे काय?

तुमच्या पत्रकार स्नेह्यांचे निरीक्षण दाद देण्यासारखे आहे. इतरांना पुढे व्हा असे सांगून मनमोहन सिंह पुढे आलेच नाहीत असा अर्थ काढता येऊ शकेल.

कॉन्फ्लिक्ट ऑफ इण्टरेस्ट टाळण्यासाठी मनमोहन सिंगांनी स्वतःच्या नफ्याचा विचार केलेला नाही, हे योग्यच आहे.

युयुत्सु यांचे म्हणणेही पटण्यासारखे आहे. जर मनमोहन सिंहांनी समभाग बाजारात गुंतवणूक केली असती तर स्वतःचे पैसे अडकलेले आहेत मग यांचे मत हे पक्षपाती म्हणजे बायस्ड आहे असे म्हणता येऊ शकेल. खरे काय ते कसे कळावे बरे?

आपला
(सत्यान्वेषी) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत:। ~

चांगला पर्याय!

अमेरिकेत जेव्हा एखादी व्यक्ती अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवते, तेव्हा, कॉन्फ्लिक्ट ऑफ ईंटरेस्ट च्या रगाड्यात येऊ नये, म्हणून एक विश्वस्त संस्था स्थापन करून त्यांच्या ताब्यात आपली सर्व मिळकत देते. त्यांचा गुंतवणूकीचा निर्णय स्वतःच्या अखत्यारीत येऊ नये म्हणून.

हा चांगला पर्याय आहे. पण शेवटी त्या नेतृत्वाच्या नैतिकतेवर सगळे अवलंबून आहे. मनमोहनरावांसारखे स्वच्छ चारित्र्याचे नेते भारतात व जगातही दुर्मिळ दिसतात.



येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

नाही पटले.

ममसिं ह्यांनी आपले स्वच्छ चारित्र्यच त्यांच्या पोर्टफ्ओलियो वरून दर्शवले आहे

पण जनतेला शेअरबाजारात गुंतवणूक करा असा सल्ला देणारे ममोसिंराव स्वतः मात्र या साधनांत प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष गुंतवणूक करत नाहीत हे पाहून आम्हाला "लोकां सांगे ब्रह्मज्ञान... " ची आठवण झाली.



येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

तर...

कॉन्फ्लिक्ट ऑफ इण्टरेस्ट टाळण्यासाठी मनमोहन सिंगांनी स्वतःच्या नफ्याचा विचार केलेला नाही, हे योग्यच आहे.

तसं असेल तर (म्हणजे कॉन्फ्लिक्ट ऑफ इण्टरेस्ट असेल तर) त्यांचं निम्मं मंत्रिमंडळ गारद होइल, असं नाही वाटत? किंवा मग त्यांना ती विश्वस्त ही कल्पना राबवावी लागेल अथवा आपल्या गुंतवणुकीची निर्गुंतवणूक करावी लागेल ना?

मुद्दा टिपणं आणि...

मुद्दा टिपणं आणि प्रश्न उपस्थित करणं वेगळं. त्या स्नेह्यांनी फक्त मुद्दा टिपला, तो असा, `यांची शेअरबाजारात काहीही गुंतवणूक नाही.' त्याआधारे तयार झालेला प्रश्न मुक्त अर्थव्यवस्थेचे जनक, शेअर बाजारात जनतेनं पैसे गुंतवावेत असं सांगणारे अर्थवेत्ते असणाऱ्या मनमोहनसिंग यांच्या एकूण दोन कोटी सतरा लाख अडुतीस हजार सहाशे शहाहत्तर रुपयांच्या रोख गुंतवणुकीतील एकही पैसा शेअरमध्ये का असू नये? हा माझ्या मनातील.
ही बाब मी माझ्या लेखनात स्पष्ट करणं आवश्यक होतं, ती न केल्याबद्दल दिलगीर आहे.
या (माझ्याकडून दिल्या गेलेल्या) अपुर्‍या माहितीच्या आधारे

...ममसीघांनीही असाच मार्ग अवलंबिला असता तर मोडकांच्या पत्रकार सहकार्‍याला सदर प्रश्न पडला नसता.
पण खेदाने सांगावेसे वाटते, की मोडकांच्या पत्रकार स्नेह्याचे जागतिक अर्थव्यवस्थेविषयी आणि राजकारणातील स्वच्छतेविषयी ज्ञान तोकडे आहे.
त्यांना अधिक अभ्यास करण्याचा सल्ला द्यावासा वाटतो.

अशी टिप्पणी झाल्यानं हा खुलासा आवश्यक आहे.
हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाल्यानं ``जागतिक अर्थव्यवस्थेविषयी आणि राजकारणातील स्वच्छतेविषयी ज्ञान तोकडे'' असेल तर ते माझेच. असो.

जाता जाता: शेअर बाजारात स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर आहे, अशी आमची (अल्प)मति आहे. राष्ट्रियीकृत म्हटल्या जाणार्‍या अन्य काही उपक्रमांचे शेअरही आहेत, असं आम्हाला शेअर बाजारविषयक ओझरत्या वाचनावरून दिसलं आहे. अर्थात, आमची मति अल्पच असल्यानं या ज्ञानाविषयीही तज्ञांनी अधिक प्रकाश टाकला तर आम्ही उपकृत होऊ.

इतकेच नव्हे

शेअर बाजारात स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर आहे, अशी आमची (अल्प)मति आहे.

इतकेच नव्हे तर काही कंपन्याचे सहभाग देखील लक्षणीय संख्येने खुद्द स्टेट बँक ऑफ इंडियाकडे आहेत. :)

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

ही उघड केलेली मालमत्ता!

पण बेनामी मालमत्ताही असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण ह्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे वेगळे असू शकतात.
आणि आपण जे म्हणतो(म्हणजे शेअर बाजारात गुंतवणूक करा वगैरे) त्याप्रमाणे स्वत: करत नसू तर त्याचा अर्थ काय होतो? म्हणजे आपण निवांतपणे बिछान्यावर पडून राहायचे आणि दुसर्‍यांना म्हणायचे मार उडी(पुराच्या पाण्यात). निदान ममोसिंना हे शोभत नाही.

हीच मुत्सद्देगिरि

स्वामी अज्ञानानंद
यालाच आम्ही मुत्स्द्देगिरि म्हणतो. तत्वतः ती लबाडीच असते.
प्रकाश घाटपांडे

सावळा गोंधळ

मनमोहनसिंगानी शेअर्समध्ये गुंतवणूक केली नाही आणि सर्वसामान्यांना शेअर्समध्ये गुंतवणूक करावे असे आवाहन यांत मला विसंगती दिसत नाही.

  • लोकांना भरवसा वाटावा असे आर्थिक वातावरण निर्माण करण्यासाठीचे सरकारचे प्रयत्न जर ढिले पडत असतील, दलाली/ व्याजदर आणि भ्रष्ट पद्धतींना आळा घालण्यात त्यांचे विरुद्ध दिशेने वर्तन होत असेल तर गोष्ट वेगळी आहे.
    निमंत्रण द्यायचे आणि कुलूप लावून निघून जायचे अशी ही विसंगती ठरेल.
  • स्वतः शेअर्समध्ये गुंतवणूक न करण्यामागे त्यांचे काही व्यक्तिगत आडाखे, कारणे (वय, सांपत्तिक परिस्थिती, गरजा, करबचत, राजकारण) असतील. शेअर्सचा मार्ग सर्वांनाचा सर्वही काळ रुचतोच असे नाही.
    निमंत्रितांसाठी सामिष जेवणाची जय्यत तयारी करून स्वतः शाकाहारी भोजन करणार आहोत असे सांगितले तर त्यात गैर वाटण्यासारखे काही नसावे.
  • तसेच इतर कोणी पंतप्रधान किंवा अन्य पदाधिकारी यांची कायदेशीरपणे शेअर्समध्ये गुंतवणूक असेल तर त्यात "कॉन्फ्लिक्ट ऑफ इण्टरेस्ट"चा उगाच बाऊ करण्यातही हशील नाही.
    अन्यथा शाकाहारी असणे एखाद्याच्या प्रकृतीला योग्य आहे इतपत न राहता शाकाहारी नसणे म्हणजे जणू काही पाप करणे ही भावना पसरविण्यासारखे होईल.

अवांतर - शेअर्स मार्केट हे बॉन्ड मार्केटपेक्षा छोटे आणि सरळसोट आहे.

(फिक्सड् इन्कमची महती मानणारा) एकलव्य

 
^ वर