एथिक्स म्हणजे काय रे भाऊ?

एथिक्स म्हणजे काय रे भाऊ? हा प्रश्न विचारावासा वाटला कारण नानवटी यांच्या तंत्रज्ञान विषयीच्या धाग्यात या बाबत काही चर्चा झाली व अनेक वर्षापूर्वी मसूरी येथे लाल बहादूर शास्त्री National Academy of Administration येथे Foundations of Administration या अभ्यासक्रमात झालेल्या काही चर्चेची व त्या नंतर सरकारी नोकरीत असताना उपस्थित झालेल्या अनेक प्रश्नांची आठवण झाली.

अभ्यासक्रमात प्रख्यात जल अभियंता मोक्शगुण्डम विश्वेशवरैय्या यांची एक आठवण होती. विश्वेशवरैय्या यांची कमालीचे प्रामाणिक व एथिकल अशी ख्याती होती. विश्वेशवरैय्या यांना धरण कालवे इत्यादी planning करता अनेकदा site वर रहावे लागत असे. डाक बंगल्यात सन्ध्याकाळी पण उशीरा पर्यंत चर्चा चालत असे. त्या काळी वीज नसे व मेणबत्तीच्या प्रकाशात सर्व कामे होत असत. जेवणाची वेळ झाली कि विश्वेशवरैय्या सरकारी पैश्यानी घेतलेल्या मेणबत्या विझवून आपल्या पैश्यानी घेतलेल्या मेणबत्या लावीत असत. कारण त्यांच्या दृष्टीने जेवण ही खाजगी बाब होती व त्या करता सरकारी मेणबत्या वापरणे unethical होते. जेवण झाल्यावर जर सहकार्यांबरोबर अजून चर्चा बाकी असेल तर परत खाजगी मेणबत्या विझवून सरकारी मेणबत्या लावीत व त्या नंतर झोपण्या आधी काही पुस्तक वगैरे वाचण्या करता परत सरकारी मेणबत्या विझवून खाजगी मेणबत्या लावीत.

मला काही हे पटले नाही. व जरा sarcastic स्वभाव असल्याने मी विचारले कि खाजगी मेणबत्या लावण्या करता खाजगी काडेपेटी असे का सरकारी काडेपेटीतील काडी वापरून खाजगी मेणबत्या लावीत? या वर वर्गात बराच गदारोळ झाला. पण नंतर
"ethics" वर चर्चा करताना पुन्हा एकदा हाच प्रश्न प्राध्यापकांनीच उपस्थित केला.

मला ऑफिसला जाण्या येण्या करता सरकारी गाडी allowed आहे. आता खालील पैकी काय एथिकल आहे व काय नाही?

१: माझ्या मुलाची शाळा ऑफिसच्या रस्त्याला लागूनच आहे. तर मी त्याला माझ्या गाडीतून घेऊन जातो व वाटेत शाळेत सोडतो.
२: माझ्या मुलाची शाळा ऑफिसच्या रस्त्यात फक्त शंभर मीटर आत आहे. तर मी त्याला माझ्या गाडीतून घेऊन जातो व किंचित आत जाउन शाळेत सोडतो.
३: माझ्या मुलाची शाळा ऑफिसच्या रस्त्याला लागूनच आहे. तर मी त्याला माझ्या गाडीतून घेऊन जातो व वाटेत शाळेत सोडतो. तसे करता यावे म्हणून मी शक्यतो सकाळी ऑफिसच्या बाहेर कुठली मीटिंग ठेवत नाही. आधी सरळ ऑफिस, मग कुठेही मीटिंग.
४ : माझ्या मुलाची शाळा ऑफिसच्या रस्त्याला लागूनच आहे, पण वेळ पंधरा मिनिटे (फक्त) उशिराची आहे. तर त्याला माझ्या गाडीतून शाळेत सोडता यावे म्हणून मी म्हणून मी पण पंधरा मिनिटे (फक्त) उशीराने निघतो. मला त्यात काहीच चूक वाटत नाही कारण मी एकटा वेळेवर पोहोचून काय होणार? इतर लोक पण पंधरा मिनिटे उशीरानेच येतात. आणी मी रोज दोन तास तरी उशीरा पर्यंत काम करतोच कि, आणी राजपत्रित अधिकरी असल्याने मला काही "ओवर टाइम" वगैरे पण नसतो, त्याचे काय?

या वर अजून बरेच काही लिहिण्या सारखे आहे, व पुढचा टप्पा "भ्रश्टाचार म्हणजे काय रे भाऊ?" वर पोहोचतो. पण त्या आधी उपक्रमींची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल.

चेतन पन्डित

लेखनविषय: दुवे:

Comments

एथिक्स

तुम्हाला कोणत्या काळातले एथिक्स हवे आहे? ते सांगितले तर जर विस्कटून बोलता येईल.

वर्तमानपत्राची किंमत

मी ज्या सरकारी कार्यालयात होतो तिथे कार्यालयात वर्तमान पत्र येत असे. रविवारी सुट्टी असल्याने ती वर्तमान पत्रे शासकीय गाडी वापरुन उच्च अधिकार्‍याच्या घरी जात असत. अंतर साधारण १२ किमि. ड्रायव्हर ती वर्तमान पत्रे टाकून परत हेडक्वार्टरला हजर. करा हिशोब वर्तमानपत्राचा?

सध्याच्या

सध्याच्या काळातले. पण गम्भीर पणाने चर्चा करण्या करता ethics व morals यातला फरक लक्षात घ्यावा लागेल. मी जी दोन उदाहरणे दिली त्यात हा फरक पाळला गेला नव्हता. आमच्या प्राध्याप्रकानी "सरकारी मेणबत्ती च्या प्रकाशात जेवण करणे unethical होते" असे म्हंटले तेंव्हा बहुतेक त्यांना immoral हा अर्थ अभिप्रेत होता. पण त्यांनी चुकीचा शब्द वापरला (व मी तोच पुढे चालू ठेवला). by the way, मराठीत ethics व morals यांना दोन वेगळे शब्द काय आहेत? "नैतिक" हा एकच शब्द वापरण्यात येतो व माझ्या समजुती प्रमाणे मराठीत जेंव्हा "नैतिक" हा शब्द वापरतात तेंव्हा त्याला ethical किंवा moral असा कोणता ही अर्थ असू शकतो. पण या दोन पूर्णपणे वेगळ्या सन्कलपना आहेत. पण तुम्हाला एथिक्स म्हणजे काय अभिप्रेत आहे हे तुम्हि सांगा व "विस्कटून" बोला.

नैतिकता आणि विवेक

तुम्हाला नैतिकता आणि विवेक असा काही म्हणायचे आहे का?
अनैतिक आणि अविवेकी असा वापर होतो अनेकदा वेगवेगळा. तुम्ही दिलेली उदाहरणे आजच्या काळात हास्यास्पद ठरू शकतात. आजची उदाहरणे दिल्यास चर्चा आजच्या काळाला धरुन करता येईल.

हम्म...

जेवणाची वेळ झाली कि विश्वेशवरैय्या सरकारी पैश्यानी घेतलेल्या मेणबत्या विझवून आपल्या पैश्यानी घेतलेल्या मेणबत्या लावीत असत. कारण त्यांच्या दृष्टीने जेवण ही खाजगी बाब होती व त्या करता सरकारी मेणबत्या वापरणे unethical होते. जेवण झाल्यावर जर सहकार्यांबरोबर अजून चर्चा बाकी असेल तर परत खाजगी मेणबत्या विझवून सरकारी मेणबत्या लावीत व त्या नंतर झोपण्या आधी काही पुस्तक वगैरे वाचण्या करता परत सरकारी मेणबत्या विझवून खाजगी मेणबत्या लावीत.

मी हीच गोष्ट चाणक्याबाबत वाचली आहे.

मला काही हे पटले नाही. व जरा sarcastic स्वभाव असल्याने मी विचारले कि खाजगी मेणबत्या लावण्या करता खाजगी काडेपेटी असे का सरकारी काडेपेटीतील काडी वापरून खाजगी मेणबत्या लावीत?

बरोबर. एथिक्समध्ये सुद्धा ग्रे शेड्स असावेत. कुठल्याश्या टुकार चित्रपटामधल्या संवाद होता. 'हर कोई बिकाउ होता है. बस किमत अलग अलग होती है.' बाकी नानावटींनी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे खुपच स्वस्ताई आहे. तुम्ही दिलेल्या उदाहरणात चार पैकी काहीही एथिकल नाही. आपल्याकडे त्या गाडीतून रोजच मुलाला शाळेत नेतील आणि दुसरीकडे मुलाची बस चुकली आणि पर्यायी व्यवस्था करणं खूपच अवघड आहे त्यावेळी त्या वाहनाचा कधितरी उपयोग केला जाईल.

आजच एका फिल्ड अ‍ॅप्लिकेशन इंजिनीअर बरोबर बाहेर जेवायला गेलो होतो. त्याने जेवण झाल्यावर एक डेझर्ट घेतलं आणि त्याचं वेगळ बील मागवलं कारण विचारल्यावर, त्याची कंपनी फक्त जेवणावर खर्च करते त्यानंतरच्या डेझर्टवर नाही असं तो म्हणाला. आणि त्याच्यामते ते एथिकल नव्हतं. आणि मागच्याच आठवड्यात एका सहकार्‍याने हॉटेलचं बील मुद्दाम आठवणीनं ठेउन घेतलं. त्या बीलाचे पैसे 'बिझनेस एक्सपेन्सेस' म्हणून परत मिळतील असं म्हणाला. सो, यू कॅनॉट पूट एव्हरीथींग इन ब्लॅक अँड वाईट. तुम्ही जे काय करताय ते तुमच्या मनाला माहीत असतं. दुसर्‍यांना त्याचं जस्टीफिकेशन द्यायला हजारो युक्तीवाद करता येतात.

१ ठीक, २ बहुधा, ३ कार्यावर अवलंबून, ४ अयोग्य

१ ठीक

२ बहुधा ठीक. साधारणपणे कार्यालयीन वस्तूंचा बारीकसारीक वैयक्तिक वापर करू देण्याचे कार्यालयांचे धोरण असते. उदाहरणार्थ कार्यालयीन संगणकावर वैयक्तिक ईमेल, कार्यालयीन दूरध्वनीवर छोटे आणि थोडे वैयक्तिक संवाद, वगैरे. "बारीकसारीक" काय? त्याबाबत व्यवस्थापक निर्णय करतात.

३. कार्यालयातील अपेक्षित कामकाजावर अवलंबून आहे. त्या वेळात ऑफिसवेगळ्या ठिकाणी मीटिंग न ठेवल्यामुळे सुरळित आणि वक्तशीर कामकाजात अडथळा येतो का? अडथळा येत असल्यास अयोग्य. अडथळा येतो की नाही, हा निर्णय मी न करता वरिष्ठाने/व्यवस्थापकाने करावा.

४. अयोग्य. जर नोकरीच्या कंत्राटात बसत असेल, किंवा वरिष्ठाशी/व्यवस्थापकाशी ठरवता येत असेल, तर १५ मिनिटे उशीरा येऊन १५ मिनिटे उशीरापर्यंत काम करायचे असे काहीतरी करता येईल.

---
आमच्या कार्यालयाच्या व्यवस्थापनचौकटीच्या अनुसार नोकरांचे दोन वर्ग आहेत : (१) कंत्राटानुसार कार्यालयीन तासांनी बद्ध "नॉन-एक्झेम्प्ट" आणि (२) कंत्राटानुसार कुठल्या विवक्षित तासांनी बद्ध नाही, पण दिलेले कार्य सुरळित पूर्ण करण्यास बद्ध "एक्झेम्प्ट"

एक्झेम्प्ट नोकर साधारणपणे व्यवस्थापक/वरिष्ठ वगैरे असतात. कार्य पुरे करायला अधिक वेळ लागत असेल, तर अधिक वेळ काम करतात. त्यांना अतिरिक्त (ओव्हरटाईम) मोबदला मिळत नाही. कार्यात अडथळा येत नसेल, तर स्वतःपुरते वेळापत्रक मागे-पुढे करायची मुभा असते.

नॉन-एक्झेम्प्ट नोकरांना कंत्राटात सांगतात तितके तास काम करावे लागते, आणि वेळापत्रक पाळावे लागते. पण त्याहून अधिक काम असल्यास त्यांना अतिरिक्त (ओव्हरटाईम) मोबदला मिळतो.

सोपे उत्तर.

अमुक करा, अमुक करू नका.
असे नियम किंवा 'यम'नियम असतात. हे 'धर्म' म्हणजेच समाजाने कसे वागायचे, हे ठरवणारे 'कायदे' ठरवत असतात.

कायदा = समाजात रहाण्याचे फायदे मला उपभोगता यावेत म्हणून "मी" या प्रत्येकाने, समाज घटक म्हणून स्वतःवर लादून घेतलेली किमान बंधने. ही पाळली नाहीत तर अमुक शिक्षा होईल असे सर्व मेंब्रांनी मान्य केलेले असते. पण हे जरा ढोबळ असते. याला "समाजाने" स्वीकारलेली बंधने, असे म्हणता येईल. एकाद्या शरीराने स्वीकारलेली बंधने, असे म्हणता येईल.

या पलिकडे असता ते एथिक्स.

ही व्यक्तीने स्वतःकरता ठरविलेली व पाळलेली बंधने असे म्हणता येईल.

सहसा, व्यक्तीसापेक्ष असलेत, तरी एथिक्स हे एकाद्या व्यवसायाने पाळायचे असतात. अशी जनरल समजूत आहे. उदा. वैद्यकिय व्यावसायिकांचे एथिक्स, वकीलांचे एथिक्स इ. म्हणजे शरीराने नाही, तर एकाद्या अवयवाने. उदा, पचनसंस्थेने नीट पचन करावे असे बंधन पाळणे ;) किंवा डॉक्टरांनी आजाराची तीव्रता जास्त भासवून पेशंटला लुटणे हे निषिद्ध आहे. हे एथिकल बंधन आहे. प्रत्यक्षात कोणताही आजार, अगदी सर्दी देखिल जीवघेणी ठरू शकते हे सत्य आहे, मग त्यासाठी मी पेशंटच्या हजार तपासण्या करणे कायद्याने चुकीचे नाहीच, तर बंधनकारकही आहे..

या पलिकडे एथिक्सचे मायक्रो रूप असते. ते व्यक्तिगत. शरीर हे उदाहरण पुढे चालवायचे तर अगदी पेशी पातळीवर. हे अगदीच व्यक्तीसापेक्ष असते. याचे फारच सोपे अन साधे रूप करायचे, तर माझ्यापुरते एथिक्स हे आहे :
"मी माझ्या जगण्यासाठी इतर कुणालाही हेतुपुरःसर त्रास होईल असे वर्तन करणार नाही." "I shall try not to make my existence a burden on anybody or anything"

*

"अमुक एक गृहस्थ फारच आदर्शवादी होते हो.. स्वातंत्र्यचळवळीत झोकून दिले. घरादाराची, मुलाबाळांची काहीच चिंता नाही. काय उपयोग आदर्शांचा? त्याने पोट भरत नाही! "
असे उद्गार, अगदी मो.क. यांचेबद्दलही निघू शकतात. पण तरीही तसे ते अनेकांनी पाळले, ते मायक्रो एथिक्स..

*

सो, अल्टिमेटली,
सकाळी उठल्या उठल्या, आरशात तोंड पाहून काल पर्यंत मी जे काही केले, त्याबद्दल मला आरशातल्या चेहर्‍याबद्दल घृणा वाटू नये म्हणून मी जे काही करतो, वागतो, ते 'एथिक्स'.. यातून पळवाट काढणे मला शक्य नसते :)

पहा जमलिये का व्याख्या?

ऑफिसच्या तासांत

ऑफिसच्या तासांत कितीजण जालावर, मराठी संकेतस्थळे, सोशल नेटवर्किंग साइट्स वर फेरफटका मारतात वगैरेचा आढावा घेतला तरी एथिक्स वगैरे बद्दल समजून घेता येईल.

+

धनंजय यांच्या एकूण प्रतिसादाशी सहमत आहे.

बहुतेक कार्यालये सुविधांचा अल्प खाजगी वापर करू देतात यामागे आर्थिक कारणदेखील असते. तातडीचा फोन करायचा आहे म्हणून कर्मचारी कार्यालयाबाहेर सार्वजनिक टेलिफोन केंद्रावर गेल्यास जो वेळेचा अपव्यय होईल त्यापेक्षा फोन करू देण्याचा खर्च कमी असेल. शिवाय खाजगी फोन केल्यास त्या फोनचे बिल कर्मचार्‍याने कार्यालयाला द्यावे असा नियम केला तरी त्या नियमाच्या अंमलबजावणीचा खर्च कदाचित मूळ फोन बिलापेक्षा जास्त होईल.
(कार्यालयातील कागद वापरणे अथवा कार्यालयातील यंत्रावर फोटोकॉपी काढणे यासाठीही हेच लागू होईल).

मी आधी ज्या कंपनीत काम करीत असे तेथे फ्लेक्सिबल टायमिंग होती. सामान्य कामकाजाच्या वेळेत (ग्राहक कार्यालयात येण्याची शक्यता असलेला वेळ सोडून मागचा पुढचा वेळ कर्मचारी स्वतः ठरवू शके. १० ते ५ या वेळात प्रत्येकाने कार्यालयात असावे. तो काळ सोडून कर्मचारी ९ वाजता येऊन ५ वाहता जाऊ शके किंवा १० वाजता येऊन ६ वाजता जाऊ शके.

 
^ वर