विनोबा भावे

कालच आदरणीय निर्मला देशपांडे लिखित व इंडिया बुक ट्रस्ट तर्फे प्रकाशित "विनोबा" हे विनोबा भावे यांचे चरित्र वाचून झाले. मी हे चरित्र गेले दोन आठवडे वाचत होतो. विनोबा भावे यांच्या भूदान चळवळींमध्ये शामिल होऊन ४० हजार किलोमीटर पदयात्रा करणाऱ्या आदरणीय निर्मल देशपांडे या महान व्यक्तिमत्वास प्रणाम !

महात्मा गांधी यांचे निस्सीम भक्त म्हणजेच विनोबा भावे! गांधीजींनि अस्पृश्यतेला नेहमीच विरोध केला होता. आणि ते आचरणही केले केले होते. साबर्माति मध्ये असताना गांधीच्या सोबत त्यांचे अनेक अनुयायी शामिल होते. अनेक धर्माचे आणि पंथाचे लोक तेथे त्यांच्यासोबत वास्तव करत होते. प्रत्येक जन साबरमती मध्ये असताना स्वावलंबन अनुकरण करीत आपापले काम स्वतःच करीत असे. साबरमती मध्ये असताना अस्पृश्यता निवारणाचाच एक भाग म्हणून भंग्यांचे काम प्रत्येकाने विभागून प्रत्येक दिवशी करण्याचे गांधीजीनी ठरवले. भंगी म्हणून असलेले लोक केवळ हे काम करीत असत. गांधीजीनी हि प्रथा बंद करण्याचे ठरवले. स्वतःसह प्रत्येकाने एकेका दिवशी हे काम स्वीकारावे व पार पाडावे. असे त्यांनी सांगितले. तेव्हा बहुतांश ब्राह्मण असलेले त्यांच्या अनुयायांनी व याला विरोध केला. तेव्हा याप्रसंगी साबरमती सोडण्याची तयारी काही ब्राह्मणांनी केली व ते सोडून गेले. परंतु विनोबांनी मात्र याला विरोध केला नाही. त्यांना गांधीजी ची अस्पृश्यता निवारण करण्याची व सर्वसमावेशक अशी विचारशैली खूप आवडली. त्यांनी अत्यंत नम्रपणे या गोष्टीचा स्वीकार केला. याप्रसंगी त्यांना सनातनी ब्राह्मण असलेले लोकांनी कान भरले व धर्म भ्रष्ट करीत आहात असे सांगितले. तरीही त्यांच्या स्वतःच्या विचारापासून ते डगमगले नाहीत. आपल्या निर्नायाप्रती ठाम असे होते आपले विनोबा भावे ! ( संदर्भ: निर्मल देशपांडे लिखित "विनोबा") महाराष्ट्रात आपण संताना तुकोबा, ज्ञानोबा असे आदराने म्हणतो त्यांच्याच पंगतीमध्ये विनोबा बसतात म्हणून त्यांना आदराने " विनोबा" असे संबोधले जाते हे लक्षात घ्यावे.

त्याकाळी भारतवर्षामध्ये अत्यंत घाणेरडा प्रकार त्या काळी होता तो म्हणजे " अस्पृश्यता". याला तडा देण्यासाठी गांधीजींसह महामानव डॉ आंबेडकरांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे आहे. विनोबा भावे यांचेही योगदान अत्यंत महत्वाचे आहे. अशा महापुरुषास कोटी कोटी प्रणाम! !

लेखनविषय: दुवे:

Comments

ब्राम्हणांवर विनाकरण टीका

तेव्हा बहुतांश ब्राह्मण असलेले त्यांच्या अनुयायांनी व याला विरोध केला. तेव्हा याप्रसंगी साबरमती सोडण्याची तयारी काही ब्राह्मणांनी केली व ते सोडून गेले. परंतु विनोबांनी मात्र याला विरोध केला नाही. त्यांना गांधीजी ची अस्पृश्यता निवारण करण्याची व सर्वसमावेशक अशी विचारशैली खूप आवडली. त्यांनी अत्यंत नम्रपणे या गोष्टीचा स्वीकार केला. याप्रसंगी त्यांना सनातनी ब्राह्मण असलेले लोकांनी कान भरले व धर्म भ्रष्ट करीत आहात असे सांगितले.

आपण केलेल्या वरील विधानांचे संदर्भ देणे गरजेचे आहे. अथवा ही विधाने बेछूट आणि पूर्वग्रह दुषित आहेत असेच म्हणणे भाग पडेल.

संदर्भ

चंद्रशेखर : लेख जरा व्यवस्थित वाचण्याची तसदी घ्या. वरचा शेंडा आणि शेवाटचे बुड खुद्न्यात काहीच अर्थ नाही. तरीही खास तुमच्यासाठी संदर्भ देतो संदर्भ : निर्मला देशपांडे लिखित " विनोबा"

सर्वमान्य गोष्टींवर वाद कशाला?

जातिप्रथा वाईट होती,तिच्यामुळे अनेक समाजघटकांवर अन्याय झाला हे आम्हा सर्वांस मान्यच आहे. तेच चर्वितचर्वण करून आता काय साधणार आहे? काही नवीन असले तर लिहा.

अर्थात ब्राह्मण-अब्राह्मण आणि असलेच अन्य वाद जळत ठेवायचे असल्यास जरूर असले निरर्थक लिहीत रहा. आम्हाला त्यात काडीमात्र स्वारस्य नाही असे मी माझ्यापुरते म्हणतो.

(शंकर माने ह्यांना -अनाहूत - सल्ला. येथील पूर्वीचे लिखाण चाळा म्हणजे कशा प्रकारच्या लिखाणाला येथे साक्षेपी वाचक मिळतात ते कळेल.)

सहमत आहे

कोल्हटकरांशी सहमत आहे.

पूर्वीचे लिखाण

येथील पूर्वीचे लिखाण चाळा म्हणजे कशा प्रकारच्या लिखाणाला येथे साक्षेपी वाचक मिळतात ते कळेल.

+१००

विनोबांच्या लेखनाविषयी ............

सर्वांना नमस्कार,
मला स्वत:ला एक लेखक म्हणून विनोबा खूप आवडतात. इथे खरंतर निर्मल देशपांडे लिखित विनोबा या पुस्तकाबद्दल चर्चा चालले आहे.विनोबांबद्दल पुस्तक लिहलेलं माझ्या वाचनात अजून आलं नाही. मिळालं तर नक्की वाचीन. पण विनोबांनी लिहलेलं प्रा. राम शेवाळकर यांनी संपादीत केलेलं एक पुस्तक काही वर्षापूर्वी माझ्या वाचनात आलं. त्याचं नाव आहे शिक्षण: विचार. या पुस्तकात विनोबांनी शिक्षणाबाबत अत्यंत परखड विचार मांडले आहेत. मिळालं तर जरूर वाचा.

वेळेचा सदुपयोग

विनोबांनी वेळेचा सदुपयोग केला .ते भारतीय दहा आणि परकीय चार भाषा शिकले .हे मला फार आवडले .भूदानासाठी ते प्रसिध्द आहेतच .

 
^ वर