दत्ताराम वाडकर

दत्ताराम वाडकर
रीदम किंग दत्ताराम वाडकर आपल्यातुन निघुन गेले. स्नेहल भाटकर यांच्या नंतर बसलेला हा दुसरा झटका!
संगितकार शंकर [जयकिशन] यानी संगित क्षेत्राला दिलेले एक अनमोल रत्न म्हणजे दताराम! पंढरीनाथ नागेशकरांकडे तबल्याचे शिक्षण घेतानाच , समर्थ व्यायाम शाळेत शंकरची आणि दतारामची ओळख झाली. शंकरने त्याच्यावर तबल्याचे संस्कार केले. राज कपूरने त्याच्यातील कलागुण हेरले. आणि तयार झाला रीदम माश्टर दत्ताराम .
शंकर - जयकीशन, सलिल चौधरी , एस्.डि.बर्मन,आर्. डि. बर्मन, ई. अनेक नामवंत संगितकारांकडे रीदम सांभाळण्याचे काम चोख पणे त्याने बजावले.
' मस्तीभरा है समा...' , 'मिठी मिठी बातोंसे बचना जरा...' ई. गाण्यांना जो ठेका आहे त्याला ' दत्तुका ठेका' असेच म्हणत.
आयुश्याची अखेर लोकांपासुन दूर , एकांतवासात -गोव्यात- काढ्लेला हा रीदम किंग अपल्यातून कायमचा गेला तरीपण संगित रसिकांच्या कानात तो ठेका कायम राहिल.

लेखनविषय: दुवे:

Comments

आदरांजली..

लयतालावर हुकुमत असलेल्या या अवलिया कलाकाराला विनम्र आदरांजली..

आपला,
(नतमस्तक) तात्या.

आश्चर्य!

माहिती आणि विचारांच्या (!) या जमान्यात ज्यांनी रंगतदार साथसंगत करून अनेक उत्तमोत्तम गाण्यांना साज चढवला त्या दत्तारामांना लिखित स्वरुपात अवघ्या दोन ओळींचे अभिवादनही कुणी करू नये याचे आश्चर्य वाटते!

आपण जी 'विचारांची' देवाणघेवाण करतो, किंबहुना निदान तसं दाखवतो तरी, तेव्हा खरंच ज्याला 'विचार' म्हणावे असे काही आपण खरोखरंच exchange करतो का?

की 'विचारांच्या' देवाणघेवाणीची आपण नुसतीच बेगडी वरपांगी झूल पांघरतो?

आपल्या आयुष्यातील दोन घटका सुखाची करणारी गाणी आपण आवडीने ऐकतो पण त्या गाण्यांत काहीएक मोलाचा वाटा असणार्‍या दत्तारामांबाबत, 'कोण कुठला दत्ताराम?' असं म्हणून आदरांजलीपर अवघ्या दोन शब्दांचेही आपण देणं लागत नसल्याचा येथे फक्त 'सूज्ञ विचारच' दिसतो आहे! (५१ वाचनांनंतर!)

खरंच माहिती आणि विचारांच्या या बेगडी देवाणघेवाणीच्या रेट्यात आपण एवढे आत्मकेन्द्री झालो आहोत का? हा विचार करायची वेळ आली आहे!

केशवराव, दत्तारामांवर दोन शब्द आदरांजली आपण पूर्णतः चुकीच्या फोरमवर मांडली आहे असे वाटते! हे महिती आणि 'विचारांच्या(?)' देवाणघेवाणीचे स्थान आहे. इथे भावनांना थारा नाही!

असो!

तात्या.

श्रद्धांजली

मा. दत्ताराम वाडकर यांना विनम्र श्रद्धांजली!

श्रद्धांजली

मा. दत्ताराम वाडकर यांना विनम्र श्रद्धांजली!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
 
^ वर