कसाब आणि अफ़जल.... काँग्रेस आणि भाजपा

कसाबच्या शिक्षेच्या निमित्ताने काँग्रेस भाजपापेक्षा कितीतरी पटीने कार्यक्षम आहे हेच सिद्ध झाले आहे.

काँग्रेसच्या कारकिर्दीत कसाबचा हल्ला झाला. एका परदेशी नागरिकाने केलेल्या हल्ल्याची पूर्ण चौकशी, शिक्षा आणि प्रत्यक्ष फाशी हे सगळं काँग्रेस सरकारने ४ वर्षात पूर्ण करुन प्रकरण संपवलेदेखील.

आणि हे भाजप सरकार! १९९९ ते २००४ हे संसदेत होते. २००१ साली यांच्यावर संसदेत अफजलगुरुने- एका भारतीय माणसाने बाँब टाकला. पुढचे तीन वर्षे हेच भाजपावाले सत्तेत होते. पण यांच्या कारकिर्दीत ना तपासणी पूर्ण झाली ना शिक्षा.

पुढे २००६ साली काँग्रेस सरकारच्याच काळात त्याला फाशी सुनावली गेली.

आणि हेच भाजपावाले अफजलला अजून का शिक्षा दिली नाही, म्हणून काँग्रेसच्या नावाने गळे काढून स्फुंदून स्फुंदून रडत असतात.. तुम्ही तीन वर्षात का हो त्याला शिक्षा दिली नाहीत?

लेखनविषय: दुवे:

Comments

चांगला धागा

चांगला धागा आहे. बरिच करमणूक होईल अशी आशा आहे. :)
अरे हो आणखी एक लिहायचे राहिलातच. हल्ला झाला तेंव्हा "बडे बडे शहरोमें ऐसे छोटे छोटे हादसे होते रहते है!!" असे मराठमोळ्या हिंदीत सांगणारे आर आर पाटीलच पर गृहमंत्री आहेत हा योगायोग नसून ते कितीतरी पटीने कार्यक्षम आहेत हे सिद्ध केले गेले आहे हे लिहायचे विसरलात काय? हा दिवस पहायला बाळासाहेब आणि विलासराव नाहीत या बद्दल आपले मत सांगितलेत तर चर्चा आणखी माहितीपूर्ण होईल.

बाय द वे, सरकारची कार्यक्षमता सिद्ध होण्याचे निकष कोणाला माहित आहेत का? सांगितल्यास माहितीमध्ये भर पडेल अथवा हा एक निर्णय कार्यक्षमता सिद्ध करणार असतो बाकी काहीच नाही असे आम्ही समजायचे का?

सुशि

गृहमंत्री म्हणतात की पंतप्रधानांना सुद्धा माहित नव्हते या सगळ्या प्रकरणा बद्दल. देशाच्या पंतप्रधानाला देशाच्या सुरक्षे बद्दलच्या निर्णयाची काही एक माहिती नव्हते या बद्दल कोणावर विश्वास ठेवायचा? अरे माफ करा... याला कार्यक्षमता म्हणतात नाही का. चुकलो बरं का...

?

मी नाही वाचली अशी बातमी.. दुवा प्लीज

दुवा

आभार!

ही बातमी (सत्य असल्यास) धक्कादायक आहे.

इतर माध्यमांत श्रीमती गआंधींना कल्पना नव्हती असे म्हटल्याचे वाचले होते (जे मला योग्यही वाटले होते). पंतप्रधानांना कल्पना नसेल तर हे संचिंत करणारे आहे.

दुव्याबद्दल आभार!

विनोद

कोण विश्वास ठेवणार? देशाचे पंतप्रधान आणि त्यांच्या हाय कमांडला माहित नाही यावर कोण विश्वास ठेवणार? आणि पंतप्रधानांनाच माहित नसेल तर ते नेतृत्व कोणाचे करतात हा सुद्धा एक प्रश्न आहेच ना? मग त्यांनी स्वतःला मंत्रिमंडळाचा मुख्य का म्हणावे? अगदी असे मानून चालू की एका आरोपीची फाशी हा गृह मंत्रालयाचा मामला आहे. पण हे सुद्धा ठळक सत्य आहे कि हा निर्णय आंतराष्ट्रीय आणि राष्ट्रीय राजकारण डोळ्यासमोर ठेवून घेतला आहे. असे असल्यास सुद्धा या दोघांना माहित नाही हा सुद्धा चर्चेचा मुद्दा आहेच.

+/-

श्रीमती गांधींना माहित नसेल तर ते मला योग्य वाटते (त्या गृहखातेच काय पण एकूणच मंत्रीमंडळात नाहीत, प्रशासनात नाहीत तेव्हा त्यांना माहिती असण्याची गरज तर नाहीच.. उलट तसे माहित असणे धोकादायक आहे असे वाटते).

त्याच वेळी पंतप्रधानांना माहित नसणे अयोग्य आणि धोकादायक वाटते व तो चर्चेचा मुद्दा हवा याच्याशी +१ (ज्याची कारणे वर तुमच्या प्रतिसादात आली आहेतच).

योग्य अयोग्य

श्रीमती गांधींना माहित नसेल तर ते मला योग्य वाटते (त्या गृहखातेच काय पण एकूणच मंत्रीमंडळात नाहीत, प्रशासनात नाहीत तेव्हा त्यांना माहिती असण्याची गरज तर नाहीच.. उलट तसे माहित असणे धोकादायक आहे असे वाटते).

पण हिच व्यक्ति राष्ट्रपती कोण असेल ते ठरवते. आपले गृहमंत्री तर त्यांचे इतके गोडवे गातात की त्यांना विचारल्याशिवाय कोणता निर्णय घेत असतील असे माझ्या सामान्य माणसाला सुद्धा वाटत नाही. जर त्या गृहखातेच काय पण एकूणच मंत्रीमंडळात नाहीत, प्रशासनात नाहीत तर मग आपले गृहमंत्री त्यांना माहित नव्हते असे का सांगतात? किंबहुना त्यांना सांगण्याचे कारणच काय?

कारण असे की..

किंबहुना त्यांना सांगण्याचे कारणच काय?

कारण प्रसारमाध्यमांनी त्यांना हा प्रश्न विचारला होता. हा प्रश्नच असा आहे की ज्याचे उत्तर काहीही असो बातमी मोठी मिळणार

कुठल्याही पक्षाच्या प्रचारासाठी हे व्यासपिठ नको.

क्रुपया उपक्रमाचा वापर कुठल्याही पक्षाच्या प्रचारा साठी करु नका.
सर्व पक्ष एकाच माळेचे मणी आहेत.

कॉंग्रेस आणि भाजप मधील प्रमुख फरक.

कॉंग्रेस हा पक्ष सत्तेच्या अनुभवातून शहाणा झालेला आहे. भाजप कडे सत्तेचा अनुभव नाहीये त्यामुळे ते तोंडघशी पडतात.

जसे भाजप चे अडवाणी. त्यांनी जैन डायरी प्रकारात नाव आल्याबरोबर राजीनामा दिला आणि घरी बसले. त्यामुले लोकांना असे वाटले कि त्यांनी भ्रष्टाचार केला.

त्याचप्रकारे बंगारू लक्ष्मण ह्यांना भाजप ने राजीनामा द्यायला लावला. ते बिचारे पक्ष प्रमुख होते आणि मिळालेली देणगी मोजून घेत होते. लोकांची खात्री पटली त्यांनी पैसे खाल्लेच.

गडकरी ह्यांच्या बाबतीत तसेच घडत होते पण ह्या वेळी पक्षाला थोडीशी अक्कल आलेली दिसते.

कॉंग्रेस चे लोक कधीच मान्य करत नाहीत कि त्यांनी भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे ते उजळ मध्याने फिरू शकतात आणि काही काळाने लोक विसरून त्यांचा उदो उदो करतात.

जसे, राजीव गांधी, शीला दीक्षित, सुरेश कलमाडी, वढेरा, आणि इतर असंख्य नेते.

घटनाक्रम

>>जसे भाजप चे अडवाणी. त्यांनी जैन डायरी प्रकारात नाव आल्याबरोबर राजीनामा दिला आणि घरी बसले. त्यामुले लोकांना असे वाटले कि त्यांनी भ्रष्टाचार केला.

त्यांनी राजीनामा दिला त्याबरोबर मदनलाल खुराणांनी सुद्धा राजीनामा दिला होता. नंतर अडवाणींच पुनर्वसन होऊन ते गृहमंत्री झाले आणि त्यांनी बाबरी प्रकरणातून स्वतःला मोकळे करून घेतले. खुराणांचं मात्र पुनर्वसन झालं नाही.

हे फक्त घटनांची आठवण करून देण्यापुरतं. काँग्रेसचं सरकार कार्यक्षम आहे वगैरे दाव्याविषयी काही म्हणणे नाही.

 
^ वर