कोणिही साहित्य सम्मेंलनाचे अध्यक्ष होउ शकते

ज्यांन्नी ह. मो. मराठे चे साहित्य वाचले आहे, ते नक्किच ह्या कोणि कोत्तापल्ले माणसाच्या निवडी मुळे हळहळले असतील. ह. मो. न्नी कितितरी चांगल्या दर्जाचे साहित्य लिहिले आहे आणि त्यांचे साहित्य हे वेगळ्या वाटा शोधणारे आहे. मला स्वताला त्यांच्या मुळे जगाची जास्त ओळख झाली.

जातियते मुळे डोळे बन्द करुन चांगले ते नाकारायचे एव्हडेच भारतीय समाजाला समजते.

ह. मो. ची ही पुस्तके नक्की वाचा.

१. काळे शार पाणी
२. बाल काण्ड
३. आजच्या नायिका
४. घोडा
५. मधले पान
६. ईतिव्रुत्त

लेखनविषय: दुवे:

Comments

नक्की काय म्हणायचे आहे?

तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे? काही कळले नाही बुवा. जर मनमोहन सिंग पंतप्रधान होऊ शकतात तर साहित्य संमेलनच्या अध्यक्ष व्हायला काय हवे असते?

मक्तेदारी

साहित्यातील मक्तेदारी कधीच संपली आहे महाशय. ज्यांना मते मिळणार तेच अध्यक्ष होणार. मराठे यांनीच जातीयवादी प्रचार केला आणि त्याचे फळ त्यांना मिळाले.

हा वेगळा न्याय का?

इथे मक्तेदारीचा प्रश्न येतोच कुठे?जे चांगले लिहीतात,त्यांचं वाचलं जातं? मराठे यांनी जातीय-प्रचार केला म्हणून त्यांच्या नावाने तुम्ही बोंब मारताय? आणि बाकी जातीय गोष्टींवर मिळवणारे राजकारणी दिसत नाहीत तुम्हाला.मग ह.मो.मराठ्यांसाठी वेगळा न्याय का? ह.मो.मराठ्यांनी तसे केले तर त्यांच्यावर लगेच खटला.आणि खटला भरणारे कोण? -ज्यांना साहित्यामधला 'स' ही माहित नाही. त्यांनी दिलेले निवेदन तुम्ही स्वतः वाचलेले आहे काय?जरका ते वाचले असेल तर त्यात कुठेही तसा स्पष्ट उल्लेख नाही,हे तुम्हालाही कळून येईल.
अजून एक...जरका हेच मरठ्यांची जात वेगळी असती,तर इतक्या तीव्रतेने तुम्ही मत मांडले असते?

साहित्य परिषद

मराठ्यांच्या जातीचा येथे काही संबंध नाही. मराठे वाईट लिहीतात असे मी म्हटलेले नाही. मी एवढेच म्हटले की ज्यांना जास्त मते पडली ते अध्यक्ष होणार.

ह्या कोणि कोत्तापल्ले माणसाच्या निवडी मुळे हळहळले असतील.

याचा अर्थ काय? कोतापल्ले चांगले लिहीत नाहीत का? प्रस्तुत चर्चाप्रस्तावकाला कोतापल्ले यांच्याबाबत काहीच माहीत नाही हे यातून दिसते. मग मराठे यांची निवड झाली नाही म्हणून पोटदुखी होण्याचे कारण काय?

साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत मी ब्राम्हणांच्या बाजूने कसा लढलो/तो हे सूचकपणे सांगण्याची मराठे यांना काही गरज नव्हती. मराठ्यांची जात कोणतीही असती तरी मी हेच मत मांडले असते. मुळात साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्री. ठाले पाटील यांनाही साहित्यातले काही माहीत आहे असे दिसत नाही. त्यामुळे खटला भरणाऱ्यांना ते माहीत नसण्यात फारसे आश्चर्यकारक काही नाही.

कळीचा मुद्दा ?

जातियते मुळे डोळे बन्द करुन चांगले ते नाकारायचे एव्हडेच भारतीय समाजाला समजते.

लेखकाचे हे वाक्य सत्य आणि लेखातील विचार पाहता अतिशय मजेशीर वाटले.
बाकी मराठे अध्यक्ष झाले नाही म्हणून हळहळायचे सोडून कोत्तापल्ले अध्यक्ष झाल्याने हळहळणे म्हणजे संशयाचे धुके वाढवणारेच ठरते.

आणि (फक्त) मराठे यांच्या लेखनातून जर कुणाला जगाची ओळख झालेली असेल तर ही ओळख खुपच मर्यादित असणार याचा धडधडीत पूरावा खुद्द हा लेखच ठरतो.

मराठे अध्यक्ष झाले तर संमेलन होऊ देणार नाही असे आंदोलन झाले असे ऐकीवात आहे पण जणू काही कोत्तापल्ले अध्यक्ष झाले नाही तर संमेलन होऊ देणार नाही असेच ते झाल्याचे लेखकाचे मत दिसते.

एकूण कळीचा मुद्दा दूसराच दिसतो.

निकष

निवडून देताना त्याने भूतकाळात लिहिलेले साहित्य हा निकष ठेवायचा असतो की त्याचा भविष्यासाठी असलेला अजेंडा?? हमोनी पुस्तके असतील लिहिली चांगली आणि क्षणभर समजून चालू की कोतापल्ले अगदी रद्दड लिहितात, तरीही हमोना निवडून द्यायचा हा निकष होऊ शकत नाही... हे म्हणजे आमदारकीच्या उमेदवाराचा निकष त्याने शाळेत लिहिलेल्या निबंधावरुन करण्यासारखे नाही का? लिखाण हे तो एक साहित्यिक आहे, याचा केवळ एक पुरावा म्हणून काम करते.

भूतकाळात काय लिहिले आहे, याच्यापेक्षा भविष्यकाळातील त्यांचा अजेंडा याला मतदार अधिक पसंती देतात.

हे तुमच्या लक्षात येणारच नाही, कारण कधीकाळी लिहिलेली जुनी पोथी काखोटीला मारून तीच प्रत्येकवेळी वाचून चार दमड्या मिळवणे, यांचीच तुम्हाला सवय असणार.. साहित्य सम्मेलनातील अध्यक्षपद असे जुन्या पोथ्यांच्या इतिहासावर चालत नाही.

निवडणुकीला साधारण ९०० मतदान झाले म्हणे. ( ९०० लोक की मते माहीत नाही. ) साडेतीन टक्केंच्या हिशोबाने हमोना ४० - ५० मते पडायला हवी होती. पण प्रत्यक्षात त्याना १५० मते मिळाली.. हे नक्कीच चिंताजनक आहे.. बहुजनांमध्ये साहित्य अजून पसरायला हवे, त्यांचे लोक अजुन वाढायला हवेत. तरच हमोसारख्यांना साडेतीन टक्क्यावरच रोखता येईल. त्यापेक्षा एकही मत अशा लोकाना अधिक मिळू नये.

ख..

खणखणीत आणि खणखणाटी प्रतिसाद.
अवांतर. मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह मार्ग बदलतो आहे; आतापर्यंतची चिंचोळी अशी तथाकथित सुजलाम सुफलाम भूमि सोडून विस्तीर्ण अशा (तथाकथितच) माळरानातून वाहू लागला आहे;[जिथले लोक या साहित्यजलासाठी अत्यंत आसुसलेले होते] याची दखल घेणे कधी सुरू होणार आहे?>

ह. मो. ची ही पुस्तके नक्की वाचा.

अजिबात वाचणार नाही. जातीयतेला पैसे द्यायला आमचे पैसे वर आलेले नाहीत.

 
^ वर