आमच्या गावातील एक आश्चर्य

आमच्या गावात एक बाबू देवरुखकर म्हणून व्यक्ती आहे, वय ४५ . तसा मंदबुद्धीच आहे, गावात हमाली ,पेपर टाकणे वगैरे उद्योग तो करतो. पण त्याची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे .

लहानपणी शाळेत असताना त्याला मारकुटे मास्तर होते .त्यांच्या माराच्या भीतीने हा बाबू सगळी पुस्तके तोंडपाठ करून टाकी .म्हणजे अमुक धडा वाच,असे सांगितल्यावर पुस्तक नुसते समोर धरून तोंडपाठ धडा घडाघड म्हणून दाखवी.पण धड्यावरील प्रश्न विचारले असता त्यांची उत्तरे त्याला येत नसत ..............साहजिकच सतत नापास होत असल्याने चौथीतून त्याला शाळा सोडावी लागली.

पण गणितात मात्र प्रचंड हुशार! त्याला १ पासून कितीही संख्येचा पाढा विचार, क्षणात उत्तर तयार. १२८७ /१५४८९४ चा पाढा विचारा/, लगेच म्हणून दाखवणार. कितीही संख्येची बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार,वर्गमूळ, वर्ग ,इत्यादी सगळे क्षणात उत्तर तयार. तुम्ही कॅल्क्युलेटर घेवून बसलात तरी तुम्ही कॅल्क्युलेटरवर गणित करण्या आधी त्याचे उत्तर तयार असते.

तुम्ही प्रश्न विचारल्यावर तो एक सेकन्दभर नजर आकाशाकडे करून बघतो. आणि उत्तर सांगतो. संख्या फार मोठी असेल तर फक्त तो आकडे म्हणून दाखवतो. उदा.२५ कोटी १२ लाख ७८ हजार ३९८ ही संख्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर असेल तर तो २५१२७८३९८ असे एकेक आकडे सांगतो. तो जेव्हा आकाशाकडे बघतो, तेव्हा त्याला प्रश्नाचे उत्तर नजरेसमोर दिसते ,असे तो सांगतो.

"स्टार माझा " वाहिनीचे रत्नागिरी प्रतीनिधी सचिन देसाई यांनी नोव्हेंबर २००८ मध्ये या बाबू च्या अचाट आणि अतर्क्य चमत्कारावर आधारित एक मुलाखत घेऊन ती प्रसिद्ध केली होती. "स्टार माझा "वर ती प्रसारित ही झाली होती. त्यापूर्वी विविध स्थानिक वृत्तपत्रातून सुद्धा बाबू बद्दल माहिती प्रसिद्ध झालेली आहे

आधुनिक मेंदू-विज्ञानाला आव्हान ठरू शकणार्या आणि अतींद्रिय शक्तीच्या अभ्यासकांना एक चमत्कार म्हणून अभ्यास करण्यासारखे या बाबुकडे नक्की काहीतरी आहे. गरज आहे ती त्याची दाखल घेण्याची! नाहीतर गेली ४०-४५ वर्षे गावकरी त्याला वेडसर म्हणून दुर्लक्ष करत आहेतच!पण खरेच त्याच्यामध्ये संशोधन करण्यासारखे काही असेल,तर संशोधन व्हायला हवे,असे वाटते...................!धन्यवाद!

शिरीष चव्हाण उर्फ बाबू देवरुखकर
मु.पो.चोरवणे ,व्हाया-पाली
नाणीज जवळ- (रत्नागिरी -कोल्हापूर हायवे.)
ता.संगमेश्वर,जिल्हा-रत्नागिरी.

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तर

>>आधुनिक मेंदू-विज्ञानाला आव्हान ठरू शकणार्या आणि अतींद्रिय शक्तीच्या अभ्यासकांना एक चमत्कार म्हणून अभ्यास करण्यासारखे या बाबुकडे नक्की काहीतरी आहे. गरज आहे ती त्याची दाखल घेण्याची! नाहीतर गेली ४०-४५ वर्षे गावकरी त्याला वेडसर म्हणून दुर्लक्ष करत आहेतच!पण खरेच त्याच्यामध्ये संशोधन करण्यासारखे काही असेल,तर संशोधन व्हायला हवे,असे वाटते...................!धन्यवाद!

वेदांमध्ये याचं उत्तर आधीच लिहिलेलं नाहीये का?

रेन मॅन

असा एक पिक्चर आहे म्हणे ;)

शकुन्तला देवी

६०-६१ साली फर्गसन महाविद्यालयात आम्ही विद्यार्थ्यांनी त्याकेळी अशाच अकल्पनीय मानसिक क्षमता असलेल्या शकुन्तला देवींना कार्यक्रमासाठी बोलावले होते त्याची आठवण झाली. गुंतागुंतीची अंकगणितातील गणिते आम्ही आधीच तयार करून ठेवली होती. अशा कोठलाहि प्रश्न त्यांच्याकडे टाकला की त्या क्षणभर डोळे बंद करीत आणि गणिताचे उत्तर द्यायला सुरुवात करीत, जे आम्ही फळ्यावर उतरून घेत होतो. सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांनी बिनचूक दिली. तसेच तारीख सांगितली की वार आणि उलटे असेहि त्यांनी करून दाखविले.

दोनेक वर्षांखाली 'Sixty Minutes' मध्ये असाच एक अनोखा प्रकार पाहिला. आलेल्या पाहुण्या बाईंच्यामध्ये अशी एक शक्ति होती की त्यांच्या आयुष्यातील कोणत्याहि दिवशी हवा कशी होती हे त्या केवळ स्मरणाने सांगू शकत होत्या, तसेच त्या दिवशीच्या महत्त्वाच्या बातम्याहि त्यांना आठवत होत्या आणि त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात त्या दिवशी काय घडले हेहि त्या सांगू शकत होत्या.

ज्योतिषी

शकुंतला देवी ज्योतिषी पण आहेत. त्यांनी ज्योतिषावर कुठलेतरी पुस्तक पण लिहिले आहे.

सर्व ज्ञान वेदांत एकवटलेले आहे

वेदांमध्ये याचं उत्तर आधीच लिहिलेलं नाहीये का?
असणारच. मी वेद वाचलेले नाहीत, पण असणारच. कारण सर्व ज्ञान वेदांत एकवटलेले आहे असा आपला पक्का समज आहे.

विज्ञान जगात एक conundrum आहे. समजा एकाद्या विषयात संशोधन करत करत मानव त्या विषयाच्या खरोखरीच्या अंतिम ज्ञान पर्यंत पोहोचला, तर कसे समजायचे कि आपल्याला त्या विषयातले अंतिम ज्ञान भेटले? उदाहरणार्थ, सध्या आपल्याला 118 elements माहिती आहेत. तर अस्तित्वात असलेली सर्व elements आपल्याला सापडली? का अजून काही सापडणे बाकी आहेत? वैज्ञानिकांच्या मते या प्रश्नाचे उत्तर कधीच मिळणार नाही. जेव्हां सर्व elements सापडतील तेव्हां काही आकाशवाणी होणार नाही, कि "बा मानवा, आता तुला सर्व elements सापडलेली आहेत. म्हणून आता आणखीन elements हुडकण्यात वेळ घालवू नकोस", व वैज्ञानिकांचा आणखीन elelments चा शोध चालूच राहील.

आधुनिक विज्ञानाच्या या ज्ञानाच्या हावरटपणावर उत्तर फक्त आपल्या संस्कृतीत आहे. व्यासोत्छीष्टम जगत सर्वं. जे काही ज्ञान आहे ते सर्व वेद इत्यादी पुस्तकात लिहिलेले आहे. उगाच इतर जग फिजिक्स, केमिस्ट्री, गणित, व इतर काहीच्याबाही वाचण्यात वेळ वाया घालवत असतात. फक्त वेद वाचावेत, कि सर्व ज्ञान "मुठ्ठी मे". एवढेच नव्हे तर "शिरीष चव्हाण उर्फ बाबू देवरुखकर मु.पो.चोरवणे" यांच्या बद्दल सविस्तर माहिती भृगु संहितेत किंवा लाल किताब मध्ये असणारच.

टीप : "पण गणितात मात्र प्रचंड हुशार! " या ऐवजी पण अंकगणितात मात्र प्रचंड हुशार! असे हवे होते. गणित व अंकगणित, खू. . .प मोठा फरक आहे.

प्रेत्न केला.

कदाचित २-३ दिवसांनी हसू येईल. अत्ता तरी फारसे विनोदी वाटले नाही.
पुलेशु

सध्या काळजी नसावी

माझा प्रतिसाद "सर्व ज्ञान वेद पुराणात आहे" या, व त्या अनुशंगाने "सर्व ज्ञान" असे काही असते या, दोन समजुतींवर एक टीकात्मक शेरा होता, थोडा sarcastic. विनोद नव्हता. तेव्हां हसू आले नाही या बाबत सध्या काळजी नसावी. मात्र - दोन तीन दिवसानन्तर हसू येण्याची अपेक्शा, म्हणजे जो विनोद नाही त्यावर हसू यावे, व ते सुद्धा "लेट रिअक्शन", हा काळजीचा विषय असू शकतो.

पुन्हा एकदा वाचून पाहिले.

आपल्या लिखाणातून तसे ध्वनित झाले नाही.
व जसे तुमचा सार्कॅझम मला ध्यानी आला नाही तद्वत तुम्हालाही माझे औपरोधिक बोलणे समजले नसावेसे दिसते.
तेव्हा टेन्शन टेक नॉट. आपण दोघे एकाच टीम मधे आहोत

शकुन्तला देवी - ज्योतिषी?

'शकुंतला देवी ज्योतिषी पण आहेत. त्यांनी ज्योतिषावर कुठलेतरी पुस्तक पण लिहिले आहे.' - प्रकाश घाटपांडे.

अलीकडे मीहि शकुन्तला देवींचे नाव ज्योतिषाच्या संदर्भात बरेच ठिकाणी वाचले आहे. त्याबद्दल मला काय वाटते ते लिहितो. अर्थात ते बरोबर आहे का नाही हे शकुंतला देवी स्वतःच सांगू शकतील अथवा त्यांना अगदी जवळून ओळखणारे कोणी सांगू शकतील. मी केवळ तर्क करीत आहे.

आम्ही जेव्हा त्यांना कार्यक्रमास बोलावले होते तेव्हा त्यांच्यामागे केवळ संख्यांवरच्या प्रभुत्वाचेचे वलय होते आणि तेवढ्याच कारणाने आम्ही त्यांना बोलावले होते. मी वर लिहिल्याप्रमाणे त्यांनी माझ्यासकट सर्व चिकित्साखोर लोकांना थक्क करून सोडले होते.

त्यांच्या ज्योतिषीपणाचा बोलबाला केव्हातरी नंतर सुरू झाला. माझा असा तर्क आहे की नुसते संख्यांचे खेळ करून नियमित उत्पन्न मिळविणे त्यांना अवघड दिसू लागले असावे आणि म्हणून ज्योतिषाचा अंगीकार त्यांनी केला असावा कारण संख्यांचे अचाट खेळ दाखवू शकणारी व्यक्ति भविष्यहि ओळखू शकेल असे सर्वसामान्य माणसाला सहज पटणार आहे.

त्यांच्या एकूण जीवनाविषयी जालावर जवळजवळ काहीच माहिती उपलब्ध नाही. तोच तोच मजकूर पुनःपुनः सर्वत्र फिरतांना दिसतो. त्यांच्या नावाच्या www.shakuntaladevi.com ह्या संस्थळावर एकहि शब्द उपलब्ध नाही. त्यांचा विवाह झालेला नसावा तसेच कौटुंबिक आधारहि त्यांच्यामागे दिसत नाही. ह्यावरून मला से वाटते की नुसत्या संख्यांच्या खेळावर पोट भरत नाही असे दिसल्यावर त्यांनी हा ज्योतिषीपणा सुरू केला असावा.

अशी माणसं

अशी माणसं आपल्या पाहण्यात आली की आपल्याला नवल वाटतं. पण अशा पद्धतीनं चालणारे अलौकिक मेंदू पूर्वापार मानवाने पाहिलेले, त्यातले काही नोंदवलेले आहेत.
अशा अनेकानेक अवलियांची यादी "गणितातल्या गमतीजमती" ह्या जयंत नारळीकर ह्यांच्या पुस्तकात व इतर लिखाणात सापडेल.
त्यांनी अगदि रामानुजम पासून ते गाउस वगैरेंचे अंकगणीती नि इतर "चमत्कार" दिलेले आहेत. पोलिश्,स्वीडिश्,जर्मन अशी अनेक नावे त्यात सापडतात. भारतीय नावे तुलनेने कमी आहेत.(भारतीयांची उदासीनता वगैरे स्वतंत्र विषय, तो सोडून देउया.)
बाकीचे फुरसतीत.

 
^ वर