रितुपर्णो घोषची मराठी चित्रपटांविषयीची जळजळ

रितुपर्णो घोष या माणसाचे नाव आपण ऐकले असेलच. बर्फी या चित्रपटाचे ऑस्करसाठी नामांकन झाल्यामुळे प्रादेशिक चित्रपटांवर अन्याय झाल्याची त्याची भावना झाली असावी. आपल्याला झालेली मळमळ ट्विटरवर व्यक्त करण्याच्या सध्याच्या प्रथेला अनुसरून पोटदुखीतून तो खालीलप्रमाणे 'मोकळा झाला'

Wht I'd like to point out is that all Indian Oscar nominations hv come frm Bollywood, barring a few "politically perforced" Marathi films.

https://twitter.com/RITUPARNOGHOSH/status/250412168783212544

  1. बॉलिवूडबद्दलचा राग व्यक्त करताना मराठी चित्रपटांना टपली मारण्याची काय गरज होती?
  2. 'श्वास' आणि 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' या चित्रपटांच्या गुणवत्तेवर शेलकी टिप्पणी करण्याची सदर माणसाची खरेच पात्रता आहे की ही फक्त जळजळ आहे?
  3. की यामागे बंगाल्यांची holier-than-thou वृत्ती आहे? (हे ह.घ्या.)

ह. घ्या. २ - बहुतेक सर्व प्रांतातल्या लोकांनी स्वतःच्या क्षमतांविषयी पूर्वग्रह तयार करून ते जतन करण्याचे काम हुषारीने केले आहे. बंगाली लोकांमध्ये कलात्मकता उपजतच असते असे संपूर्ण देशाला पटवून देण्यात ते नक्कीच यशस्वी झाले आहेत. (मला स्वतःला हे कित्येक वर्षे खरे वाटत होते. प्रॉपॅगंडाचा परिणाम बघा.) "कष्टाळू बिहारी", "जुगाडू भैय्ये", "हुषार दाक्षिणात्य" वगैरे असेच पूर्वग्रह. अमराठी लोकांचा मराठी लोकांविषयीचा (खाजगीतला) पूर्वग्रह म्हणजे "आळशी आणि कर्तृत्त्वशून्य" असा आहे असे वाटते. तुम्हाला काय वाटते? पूर्वग्रह बदलण्यासाठी आपण काय करू शकतो? (काही करावे का? :))

Comments

महत्त्वाचे आहेत काय?

ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साइटवरून केलेली टिवटिव लक्षात घेण्याइतपत रितुपर्णो घोष महत्त्वाचे आहेत काय?

असो.

"कष्टाळू बिहारी", "जुगाडू भैय्ये", "हुषार दाक्षिणात्य" वगैरे असेच पूर्वग्रह. अमराठी लोकांचा मराठी लोकांविषयीचा (खाजगीतला) पूर्वग्रह म्हणजे "आळशी आणि कर्तृत्त्वशून्य" असा आहे असे वाटते. तुम्हाला काय वाटते?

फार मागे माझ्या एका मित्रांकडून बंगाली "आळशी आणि कर्तृत्त्वशून्य" असतात म्हणून तेथे मोठे उद्योगधंदे जम बसवू शकत नाहीत असे ऐकले होते.

 
^ वर