उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
वोह कौन थी?
धूमकेतू
July 29, 2012 - 11:38 am
"वोह कौन थी?" म्हंजेच "ही बया कोन?" असा प्रश्न सर्वांना गेले १-२ दिवस पडला आहे. इंटरनेटवर मिळालेलं हे चित्र टाकतो त्यामुळे तुम्हालाही उलगडा होईल.
![]() |
या बाईंचा पत्ता ना संचालकांना, ना भारतीय मंत्रालयाला, ना भारतीय टीमला. संपूर्ण टीम पीतांबर ल्याली असता लाल-निळ्या कपड्यांत सर्वांपुढे दिमाखाने हसत चालणार्या या बाई सर्वांच्या डोळ्यांत खुपल्या असं बातम्यांत म्हटले जाते आहे. या बाईंचा पत्ता लागला का? ऑलिम्पिक व्यवस्थापनाची ऐशी की तैशी करणार्या या बाई कोन? त्यांच्यावर कोणती कार्यवाही होऊ शकते?
दुवे:
Comments
अतिउत्तेजित नर्तिका
या महिलेचे नाव "मधुरा नागेन्द्रा' आहे असे कळते. ती अतिउत्तेजित ('ओव्हर-एक्साइटेड') होती असे म्हणून संयोजकांनी सारवासारव केली आहे. उद्घाटन समारंभामध्ये नाचणार्यांपैकी एक आहे असे कळले.
http://timesofindia.indiatimes.com/sports/london-olympics-2012/news/Olym... इथल्या कॉमेंट्स वाचण्यासारख्या आहेत :)
अतिउत्तेजित नर्तिका अतिउत्तेजित नर्तिका अतिउत्तेजित नर्तिका अतिउत्तेजित नर्तिका अतिउत्तेजित नर्तिका अतिउत्तेजित नर्तिका अतिउत्तेजित नर्तिका अतिउत्तेजित नर्तिका अतिउत्तेजित नर्तिका अतिउत्तेजित नर्तिका अतिउत्तेजित नर्तिका अतिउत्तेजित नर्तिका अतिउत्तेजित नर्तिका अतिउत्तेजित नर्तिका अतिउत्तेजित नर्तिका अतिउत्तेजित नर्तिका अतिउत्तेजित नर्तिका अतिउत्तेजित नर्तिका
अतिउत्तेजित
हाहाहा. हा शब्द वाचून हसू आले. कुठले स्टेरॉइड्स घेतले होते तिने? पण एकूणच हा प्रकार भोंगळपणाचा नमुना म्हणता येईल.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
हिम्मत
जर या मुलीला कोणी तेथे अपॉइंट केले नव्हते तर संपूर्ण जगासमोर अशाप्रकारे समोर येण्यास जी हिम्मत लागते ती तिने कुठून आणली असावी? माझ्यामते या प्रकरणी लंडन ऑलिम्पिक समितीला जाब विचारणे गरजेचे आहे. जे झाले ते त्यांच्या कृपेने झालेले आहे.
ही काही पहिली वेळ नाही
ही या मुलीचे असे काही करायची पहिली वेळ नाही असे कळते. इंटरनेटवरवरून मिळालेले एक प्रकाशचित्र बघा:
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
आय वुइल डू वंडर्स इन माय होमलँड
मधुरातैंनी भारत आणि भारतवासीयांची क्षमा मागितली आहे. त्याचा विडिओ इथे बघा. http://news.yahoo.com/video#video=30173000
पण गोग्गोड आवाजात "आय वुइल डू वंडर्स इन माय होमलँड" असं त्यांना म्हणताना पाहून थरकाप उडाला. या बाई आता कुठे कुठे पोहोचतील? वर चंद्रावर पोहोचल्या आहेतच आता भारताची सुरक्षाही धोक्यात दिसते.
कोणी केले असावे हे???
या मुलीबद्दल काही माहिती नाही पण कदाचित ह्या समाराम्भानंतरच तिचे फोटो काही टवाळ नेटकरांनी नेटवर टाकले असण्याची शक्यता आहे. कारण तिने जर ते आधी केले असते तर एका तरी चित्रामध्ये तिची वेशभूषा आणि चालण्याची ढब थोडीतरी वेगळी असायला हवी होती. सारया चित्रात एकच चित्र सुपर इम्पोज केले गेले आहे.
सॉलिड !
काय प्वाईंट मांडलाय राव.. आमच्या लक्षातच आले नव्हते हे !