सत्यमेव जयते आणि......

'तो' रविवारचा स्पेशल एपिसोड झाल्यानंतर फेसबुकवर म्हणजे स्टेटस,लाइक्स आणि कमेंटचा ओघ सुरु झाला.हे बरोबर नाही,इन्टर-कास्ट मॅरेज,ही परिस्थितीच नाहीये वगैरे वगैरे.....पण मला या सगळ्यातुन एकच असं वाटलं की कुणीही यावं आणि टपलीत मारुन जावं असा प्रकार आपल्याकडे घडायला लागलाय. एकच विचारते, 'सत्यमेव जयते'चे यु-ट्युबवरचे हीट्स पाहिलेत? आपल्या भावना ह्या मार्केटींग आणि टीआरपीसाठी इतक्या उपयुक्त असतील हे माहित नव्हतं. हाच विषय जरका पहिल्या किंवा दुसर्‍या एपिसोडला मांडला असता ना तर कदाचित सत्यमेव... हा कार्यक्रम चाललाच नसता. तो ही वस्ताद! बरोबर टीआरपी मिळायला लागल्यावर ज्वलंत आणि भडकवणार्‍या प्रश्नांची जुळवा जुळवा करायला घेतली.मला तरी एकच वाटतं की दुसर्‍याचा बळी बनणं सोडायला हवं. आपल्याला पर्याय दाखवणारे जगण्यासाठी मदतीचा हात देणार नाहीत मग ते पुरात असो नाहीतर अतिरेकी हल्ल्यात. ह्या जमिनीवर आपलं घरटं शाबुत रहावं असं वाटत असेल तर एकमेकांचा हात धरणे,एवढेच आपल्या हाती आहे. आपापल्यात अशा गप्पा ठीक आहेत,पण बाहेर ही माहिती नक्कीच उपयोगाला नाही येत.निदान मुंबई-पूण्याला रहाणार्‍या लोकांसाठी तर नाहीच नाही. टॅलेन्टचा, हुशारीचा आदर व्हावा एवढच मला वाटतं अगदी कोणासाठीही!तुम्हाला काय वाटतं?

लेखनविषय: दुवे:

Comments

?

काहीच कळलं नाही. :-(

नितिन थत्ते

मला ही

कोणी प्रकाश टाकेल का

टपली मारून जावं

.....पण मला या सगळ्यातुन एकच असं वाटलं की कुणीही यावं आणि टपलीत मारुन जावं असा प्रकार आपल्याकडे घडायला लागलाय.

खरं आहे. आंतरजालावरचे लेखनही त्यातलाच प्रकार. ही चर्चा एक उदाहरण म्हणून पाहता यावं.

मधुलेखाताई, तुम्हाला काय सांगायचं आहे ते फारसं कळलं नाही. अधिक खुलासा करावा.

सत्यमेव जयते

ह्या कार्यक्रमात सांगितलेले अनुभव नक्कीच विचार करायला लावणारे आहेत. अगदी सामान्य नागरिकापासून सामाजिक/राजकिय नेत्यांपर्यंत, सर्वांनांच.
परंतु, प्रत्यक्ष कृतीत येण्यास बराच काळ जाईल.

अभंग देशपांडे.

?

?
(लेखन "सत्यमेव जयते" कार्यक्रमाच्या विरोधात असावे असे वाटते. पण खात्री नाही. अधिक काही कळले नाही.)

टॅलन्ट, आदरबिदर

टॅलन्ट, आदरबिदर सगळे ठीक पण एकंदरच अजूनही मध्यमवर्ग जातीयवादाचे सूक्ष्म समर्थन करताना दिसतो. घाईत एवढेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सूक्ष्म नव्हे

सूक्ष्म काय चांगलेच उघड समर्थन करताना दिसतो. फेसबुकावर तर असे संदर्भ सर्वत्र विखुरलेले आहेत. ब्राह्मण असल्याचा अभिमान मराठा असल्याचा अभिमान इ. नुसते ओसंडुन वहात आहे. त्यात सूक्ष्म काहीच नाही. स्वतःच्या जातीची टिमकी वाजवणे हे मी जातीयवादाचे समर्थनच मानतो. सत्यमेव जयतेच्या ह्या भागात जस्टिस धर्माधिकारींनी चांगले कोरडे ओढले आहेत.

आम्हाला उच्चवर्णिय असल्याचा अभिमान आहे असे आजही उघडपणे मराठी आंतरजालावरही लिहिले जाते आणि काही तथाकथित हुच्चभ्रुही त्याचे हास्यास्पद समर्थनही करतात.

समर्थन गंमतीदार आहे

हाच प्रतिवाद पुढे वाढवून आत्ताच्या जर्मन लोकांना नाझी असल्याचा अभिमान बाळगता येईल का या विचारात पडलो आहे.

हा हा हा

उच्चवर्णीय अभिमानाच्या प्रवृत्तीचे उदाहरण म्हणून जे दोन् दुवे कोट केले आहेत ते वाचल्यावर मला मराठी भाषा मुळापासून पुन्हा शिकायला लागणार असे वाटू लागले आहे.

नितिन थत्ते

+१

उदाहरणे पटली नाहीत.

------

बाकी, धागाकर्तीचा हा धागा पाहिला तर त्या सूक्ष्म समर्थन वगैरे करण्याच्या भानगडीत न पडता "जंगी समर्थन" करतात असे दिसते. त्यामुळे धम्मकलाडूंचे प्राथमिक निदान ;-) ठीक आहे.

काय पटले नाही?

नक्की काय पटले नाही? उदाहरणांमधे जातीय समर्थन चालले आहे हे पटले नाही?

उपहास

माझ्यामते दोन्ही प्रतिसाद उपहास आणि त्यातून वास्तविकता दर्शवतात. अशी विधाने सरळसोट घेण्याची गरज वाटत नाही. चू.भू.द्या. घ्या.

उपहास

मला तरी दोन्ही प्रतिसादात उपहास दिसला नाही. उपहास असे वा नसो, 'आपल्या जातीचा अभिमान असणे वाईट नाही' हा मथितार्थ दोन्ही प्रतिसादांमधे स्पष्ट आहे.

मराठी

थत्ते, ह्या लोकांचे मराठी धन्य आहेच. पण ह्यांना मराठीचा अभिमानही आहे बरंका!

असेल असेल

मला तरी प्रियाली म्हणतात तसा उपहासच वाटला, पण तुम्ही म्हणता तसे ते प्रतिसाद जातीय अभिमानाचे निदर्शक असतीलही. म्हणून मला मराठी पुन्हा शिकावे लागणार असे वाटले.

नितिन थत्ते

काम साधलेले दिसते

तुम्ही किंवा कोबेश्वर म्हणतात ते प्रतिसाद जातीय अभिमानाचे निदर्शक असतीलही वा नसतीलही. पण तो मुद्दाच नाही. कोब्या ह्यांनी आपले काम साधलेले दिसते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हुच्चभ्रू वकिली

खरे तर मला धागाकर्त्याचे लेखन सूक्ष्मपणे जातीयवादी किंवा त्याचे समर्थन करणारे वाटते असे म्हणायचे होते. पण म्हटले कशाला थेट लिहायचे. हा त्यांचा बहुधा पहिलाच धागा आहे.1 असो. बाकी तुम्ही म्हणता ते योग्यच आहे. अपघाताने लाभलेल्या जातीचा/धर्माचा अभिमान बाळगणे मूर्खपणाच आहे. पण असा मूर्खपणा करणाऱ्यांपेक्षा किंवा सटकणाऱ्यांपेक्षा त्याचे तुम्ही म्हणता तसे हुच्चभ्रू वकिली/समर्थन जादा खटकते. असो. कंपूबाजीपायी माणसाचे किती अधःपतन होते नाही. नको त्या खुळचट गोष्टींचे समर्थन करणे. जिथे बोलायला हवे तिथे मूग गिळून गप्प बसणे वगैरे वगैरे. असोच.

आणि आजकाल इंटरनेटावर जवळपास सगळेच उच्चवर्णीय समूह (ब्राह्मण, मराठा वगैरे वगैरे) आपला वर्णाभिमान, जात्याभिमान वगैरेंचे प्रदर्शन करण्यासाठी बॅन्डविड्थ उधळताना दिसतात. जरा फेसबुक, ओर्कुटवर, ब्लॉगजगतात थोडी सैर केली की जातीधर्मावरवर आधारित किती आणि कशाप्रकारचे समुदाय आहेत ते कळते आणि आपण आणखी मागे जात आहोत असे वाटायला लागते. उच्चवर्णीयांना शिव्याशाप देणारेही बरेच ग्रूप आहेत ते वेगळेच. असो. हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे.

1. मधुलेखा ह्यांची वाटचाल बघितल्यावर कळले की हा त्यांचा पहिला धागा नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सहमत

जरा फेसबुक, ओर्कुटवर, ब्लॉगजगतात थोडी सैर केली की जातीधर्मावरवर आधारित किती आणि कशाप्रकारचे समुदाय आहेत ते कळते आणि आपण आणखी मागे जात आहोत असे वाटायला लागते. उच्चवर्णीयांना शिव्याशाप देणारेही बरेच ग्रूप आहेत ते वेगळेच. असो. हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे.

दोन्हीकडे अतिरेक आहे. एकिकडे दलित नेते गैरफायदा घेणारे आहेत तर सगळी निवडणुक जिंकण्याची कलाच जातीवर आधारलेली आहे. मग त्यात आरक्षण आले आणि त्यासोबत येणारे सगळे क्लिष्ट प्रश्न. सगळा न संपणारा गुंता. ऍट्रॉसिटीच्या भितीने न बोलणारे आहेत आणि त्याचा गैरफायदा घेणारे सुद्धा आहेत. दोन्ही बाजूचा अतिरेक आपल्याला सर्वांनाच रसातळाला नेणारा आहे. आधी तुम्ही केले म्हणून आता आम्ही. आता तुम्ही करता म्हणून मग पुढे आम्ही. हे चालत राहणारच. भारतात म्हणायला विविधता पण स्वतःचा धर्म/जात न सोडणारे सगळेच. आधिच्यांच्या अतिरेकाने प्रगती झाली नाही. आत्ताच्या अतिरेकाने सुद्धा ती होणार नाही. शेवटी आमच्यातल्या या प्रकाराचा फायदा बाहेरचे घेणार हे नक्की.






 
^ वर