ब्राह्मणांबद्दल एवढा राग का?

आत्ताच पानिपतच्या लढाईला २५० वर्ष पूर्ण झाली.त्याचा एकंदर एतिहास आणि त्या वरती पानिपत हे निघालेलं पुस्तक ह्याबद्दल सगळी कडे विश्वास पाटिल ह्यांची मुलाखत चालु होती.त्यात त्यांनी सांगितल म्हणे माझ्यावरती आरोप झाले की ब्राह्मणांना मोठ करण्यासाठी हे पुस्तक छापलेल आहे.त्यावेळी वाटल की ब्राह्मणांबद्दलच इतका राग मनात का?त्यांच्या पूर्वजांनी अस्पृश्यांना छळल मान्य पण त्याच बरोबर त्यातुन अस्पृश्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुद्धा केले.गरज पडली त्यावेळेला शस्त्र सुद्धा हातात घेतल आहे.मागच्या महिन्या पासुन दादोजी कोंडदेव,नथुराम गोडसे ह्यांच्यावर ताशेरे ओढले जात आहेत.तो इतिहास आहे ह्यात ब्राह्मण आणि इतर हा संबधच येत नाही आणि मुळात जोडावा का?आता तर त्यांनी जणु व्रतच केलेल आहे की काहीही होऊ दे ते मध्ये पडणार नाहीत पण ह्या गोष्टीमुळे त्यांच महत्त्व कमी होत नाही,उलट वाढतच आहे.उदाहरण दाखल द्यायचं झालं तर पूर्वी अस्पृश्यांना सवर्णांकडुन(सवर्ण असं मुद्दाऊन म्हटल कारण त्यात सगळेच येतात) बराच त्रास झाला पण आजच्या घडीला टारगेट फक्त ब्राह्मणांना केलं जातय.तुम्ही आम्हाला त्रास दिला हे म्हणतान फक्त ब्राह्मण एवढ्यापुरतच ते मर्यादित ठेवलं आहे.कदाचित ब्राह्मणांनी ते एका कानाने एकुन दुसर्‍या कानाने सोडुनही देत असतील पण त्याचं प्रत्युतर त्यांनी आपल्या प्रगतीमधुन दिलेल आहे आणि देत रहाणार आहेत हेच खरं!

लेखनविषय: दुवे:

Comments

पटण्यासारखं आहे. :)

>>>कदाचित ब्राह्मणांनी ते एका कानाने एकुन दुसर्‍या कानाने सोडुनही देत असतील पण त्याचं प्रत्युतर त्यांनी आपल्या प्रगतीमधुन दिलेल आहे आणि देत रहाणार आहेत हेच खरं!

सहमत आहे. अहो, प्रगतीचं काय म्हणता ! माझं तर अस्सं म्हन्नं आहे की, इतर समाजापेक्षा ब्राह्मण समाज आजही कमीत कमी इतर समाजापेक्ष २० वर्ष पुढेच आहे. [विदा नाही पण अंदाजे] आता ते कसं मला कै सांगता येणार नाही, पण आहे. :)

-दिलीप बिरुटे

विधान जनरीक झाले

अंगठा कापुन टाकायला सांगणे, किंवा मांडीत भुंगा घुसला तरी गुरुची झोपमोड होइल म्हणून वेदना सहन करणारा ब्राह्मण असु शकत नाही म्हणून गुरुकुलातून हाकलून देणे ह्याला कित्येक शतके झाली आहेत. त्यामुळे इतरेजनांना शिक्षणापासुन वंचित ठेवणे अशा कारवाया इतिहासातील ह्या उघड झालेल्या उदाहरणावरुन दिसतात. इतक्या वर्षांपासुन हा समाज पुढे आहे; आता ह्या काळात २० वर्षांनीच पुढे असणे ही प्रगती नव्हे.

मला कित्येक बावळट ब्राह्मण माहीती आहेत व कित्येक हुशार नॉन-ब्राह्मण माहीती आहेत. त्यावरुन असे म्हणेन की, एखादा समाज २० वर्षांनी पुढे आहे हे विधान सरसकट- जनरीक झाले.

असो..

दादोजी कोंडदेव ह्यांच्या असलेल्या किंवा नसलेल्या गुरुपदावरून घातलेला वाद पुरोगामी महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणा आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे बहुधा संभाजी ब्रिगेडसारख्या तालिबानी संघटना फोफावतात का? शेतकरी-शेतमजूर-कातकरी-कामगार ह्यांच्या प्रश्नांबाबत असे कुणी का भडकत नाही? असो. नेहरूंच्या काळात राजकारणात ब्राह्मणांची चलती होती. त्यानंतर देशमुख-मराठा-कुणबी (डीएमके) ह्या ज्ञातिसंकुलाचे वर्चस्व प्रस्थापित झाले. पुढे जाऊन बहुधा एखादे नवे समीकरण उदयास येईल. असो.

नथुराम गोडसे हे नाव किंवा प्रवृत्ती ब्राह्मणांचे प्रतिनिधित्व करीत नाही. नथुरामाचे समर्थन करणाऱ्या काही बिनडोक ब्राह्मणांबद्दल * किंवा काही बिनडोक ब्राह्मणेतरांबद्दल काय बोलायचे.

*समर्थन करणारे ते बिनडोक बरं का.

तूर्तास एवढेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मुर्ख? हा...हा....हा...

नथुराम गोडसे ह्या माणसाने कदाचित चुक केले असेलही पण त्याच्या किंवा त्याने लिहिलेल्या साहित्याबद्दल बोलताना त्याने केलेल्या कृत्याचा संबंध जोडणे चुक आहे असे मला वाटते.कदाचित तो विचारवंत होता म्हंणुन त्याच्याबद्द्ल उणे दुणे शब्द काढले जातात,तो माथेफिरु असता तर कदाचित त्याचा संदर्भ आलाच नसता.हा माझा विचार आहे म्हणा!

नथुराम

>>कदाचित तो विचारवंत होता म्हंणुन त्याच्याबद्द्ल उणे दुणे शब्द काढले जातात,

राग का आहे याचे कारण स्पष्ट दिसते आहे....

नितिन थत्ते

विचारवंत

नथुराम गोडसे ह्या माणसाने कदाचित चुक केले असेलही

हाहाहा! मनुष्यहत्या हा अपराध नाही यावर न्यायालयात याचिका दाखल करावी. तसे पास झाले तर वर 'कदाचित चूक केले' हे शब्दही वापरावे लागणार नाही. ;-)

कदाचित तो विचारवंत होता म्हंणुन त्याच्याबद्द्ल उणे दुणे शब्द काढले जातात,तो माथेफिरु असता तर कदाचित त्याचा संदर्भ आलाच नसता.

अय्या! फक्त विचारवंत.... :-(

यशवंत कीतिर्वंत। सार्मथ्यवंत वरदवंद।
पुण्यवंत नीतिवंत। जाणता द्रष्टा

असे काही लिहिले असते तर भरून पावलो असतो आम्ही उपक्रमी. कसें?

खरे लढवय्ये कोण्?

स्वतः ला लढवय्ये म्हणवणारे आणि ब्राम्हणाना "वरण् भात्" म्हणुन् हिणवणारे हेच् का ते जे स्वतः (शिंदे , होळकर्) रणांगणातुन् पळाले आणि सदशिवराव् भाउ आणि विश्वासराव् ह्यानि लढुन् देह् ठेवला.

खरे लढवय्ये

स्वतः ला लढवय्ये म्हणवणारे आणि ब्राम्हणाना "वरण् भात्" म्हणुन् हिणवणारे हेच् का ते जे स्वतः (शिंदे , होळकर्) रणांगणातुन् पळाले आणि सदशिवराव् भाउ आणि विश्वासराव् ह्यानि लढुन् देह् ठेवला.

खरे लढवय्ये आपण सर्वच. तो अहमदशाह अब्दाली २५० वर्षांपूर्वी अफगाणिस्तानातून येऊन आमच्या-तुमच्या भूमीवर लढाई लढून परत गेला आणि आम्ही त्याचे उमाळे काढून आजही आपापसात भांडतो आहोत.

बाकी चालू द्या.

धम्मकलाडूंच्या प्रतिसादाशी बरीचशी सहमत आहे.

निदान बिन्डोकपणा तरी कुणा एका जातीची मक्तेदारी नाही हे वाचून त्यातल्या त्यात आनंद झाला. ;-)

हं, चालू द्या

वाद नेमका आहे तरी काय, यामागील कारणदेखील बहुतेकांना अद्याप माहिती नाही. ;) (मलादेखील अद्याप उमगलेले नाही, तरीदेखील फुकटात मनोरंजन होते आहे.)
प्रियाली यांच्या मताप्रमाणे, "बाकी चालू द्या." असेच म्हणेन.
---
अवांतर: त्यातल्या त्यात एका ब्राह्मण कवीची कविता आज वाचनात आली.

कंटाळा

या विषयाचा जबरदस्त कंटाळा आला आहे. तूर्त हा संदर्भ देतो. बाकी ब्राह्मण- ब्राह्मणेतर आपापल्या कर्माने जगोत व मरोत!
सन्जोप राव

ब्राह्मण हे सॉफ्ट टारगेट...

किमान महाराष्ट्रात तरी ब्राह्मण समाज अल्पसंख्य म्हणजे दोन-अडीच टक्क्यांच्या आसपास असल्याने अल्पसंख्य आहे. त्यातून हा समाज नेहमीच वैचारिक आणि प्रत्यक्ष हल्ल्यांसाठीचे सॉफ्ट टार्गेट राहिला आहे. ही स्थिती पुढे बदलेल, अशी अपेक्षा करणे भाबडेपणाचे आहे. (कारण अनेकांची दुकाने त्याच दारुगोळ्यावर चालतात)

@ मधुलेखा
विश्वास पाटील यांनी स्वतःबाबत सांगितलेला अनुभव रणजित देसाईंनाही आल्याचे ऐकिवात आहे. खरे-खोटे माहित नाही, पण 'स्वामी' कादंबरी गाजल्यानंतर 'रणजित! किती कवतुक मांडलय त्या बामनांच?' असे एका सवर्ण मंत्र्याने त्यांना खडसावले होते. म्हणून मग रणजित देसाईंनी 'श्रीमान योगी' लिहिली आणि त्या नेत्यांचा राग शांत झाला.

बामन??????

अद्वैत दादरकरची एकांकिका आहे हाफ पॅन्ट ( मानाची असलेल्या सवाईत ती पहिली आली आहे आणि अद्वैत दादरकर म्हणजे शुभं करोती मधला शशांक) त्यात ब्राह्मणाच्या तोंडी वाक्य आहे की ज्यांना ब्राह्मण हा शब्दच उच्चारता येत नाही अरे मग त्यांना बोलुन तरी काय उपयोग?परत एकदा इथे हेच दिसले की रणजित देसाईंनी त्या मंत्र्याला चोख प्रत्युतर दिले म्हणायचे.

उच्चार आणि विचार यांचा काय संबंध?

असही ब्राह्मण हि जात आहे, आणि बामन हि प्रवृत्ती आहे...जी कोणत्याही जातीत असू शकते.

ज्यांना ब्राह्मण हा शब्दच उच्चारता येत नाही अरे मग त्यांना बोलुन तरी काय उपयोग?

उच्चार आणि विचार यांचा काय संबंध?

उच्चार आणि विचार

उच्चार आणि विचार यांचा काय संबंध?

उच्चार आणि विचार यांचा काहीएक संबंध नाही. तो लावणार्‍या लोकांचा इतरांनी रागराग केला तर चुकते असे म्हणता येणार नाही. बहिणाबाईच्या बोलीभाषेतील (सोकॉल्ड अशुद्धभाषा) कविता उच्चारांसह उच्चप्रतीच्या वाटतात.

परंतु,

बामन हि प्रवृत्ती आहे...जी कोणत्याही जातीत असू शकते.

हे कळले नाही. विशद करावे.

उदाहरण

पूर्वी अस्पृश्यांना सवर्णांकडुन(सवर्ण असं मुद्दाऊन म्हटल कारण त्यात सगळेच येतात) बराच त्रास झाला पण आजच्या घडीला टारगेट फक्त ब्राह्मणांना केलं जातय.

मांग जमातीची घरे नामांतर चळवळीदरम्यानच्या जाळपोळीतून वगळली जात. तेथे असूया महार या जातीविषयी नसून उन्नती करणार्‍यांविषयी होती असे वाटते. ब्राह्मणांविषयीही असेच झाले असावे, अस्पृश्यांना त्रास देणार्‍यांमध्ये बहुतेक मराठे असले तरी बहुतेक मराठे असे उन्नत अवस्थेत नसावेत असे वाटते, तसे असल्यामुळे पूर्ण जातीविषयी राग उत्पन्न झाला नाही असे वाटते.

कालच चंद्रावरून...

कालच चंद्रावरून पुन्हा एकदा जाउन परत आलेले आमचे अमेरिका वासी मित्र निळूभाउ भुजबळ यांच्याशी बोलणे झाले. चंद्रावर बरीच प्रगती झाली आहे म्हणाले. भारतातून तिथे गेलेल्या लोकांचे त्यांनी विषेश कौतुक केले. सांगत होते की सरदारजी लोकांचा ट्रान्सपोर्ट चा धंदा जोरात सुरु आहे, गुजराती मारवाडी मंडळीनी व्यापार करून् भरपूर पैसा जोडला आहे,मद्राशी बंगाली अन युपी बिहारचे भय्ये आपल्या इडलीवडा/ भेळपूरी वगैरे सोबतच एम ए एस् ( आय ए एस् सारखे मून ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस् !) होऊन नोकरशाही हाकत आहेत.
आणि हो, काही लोक तिथे "दादोजी का कोणी तरी शिवाजी का कोणाचे तरी गुरु व्हते का न व्हते त्यांचा पुतळा हवा का नको " 'नथुराम चे बरोबर का चूक, तो माथेफिरु होता का विचारवंत होता? " या सारख्या विषयांवर तावातावाने बोलत होते असेही म्हणाले.

खणखणीत!

:-) मस्त! खणखणीत!

प्रतिसाद

ह्या धाग्याला अजुन् प्रतिसाद येत आहेत हे पाहुन डोकावलो, इतकेच. बाकी काही दम नाही. ऊंटावरन हाकना-यांचा प्रतिसाद पुर्णविराम मानायला हवा.

प्रतिसाद संपादित

प्रतिसाद संपादित. संकेतस्थळावर लिहिताना व्यक्तिगत रोखाची वाक्ये लिहिली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. सदस्यांवर आरोप न करता त्यांच्या प्रतिसादाचा अर्थ समजावून घेणे योग्य ठरते.- संपादक मंडळ.

 
^ वर