मराठी संस्थळांवर व्यनी किती सुरक्षित? (रिंगिंग द बेल)

आज उपक्रम या संस्थळावर मी एका घटनेचा साक्षीदार होतो. ज्यामुळे मला माझ्याच व्यनीची यादी थेट संपादकांच्या खरडवहीत दिसू लागली. एरवी मी प्रशासनाकडे तक्रार केली असती मात्र या घटनेआधी काही गोष्टी अशा घडल्या आहेत ज्यामुळे सर्वांना सावध करणे मी माझे कर्तव्य समजतो. सुरवातीपासून सुरवात करतो ज्यामुळे या प्रकाराचे गांभीर्य लक्षात यावे
१. दिनांक 06/22/2012 रोजी खबरदार या आयडीने इथे आईची जात हा चर्चा विषय सुरू केला. या चर्चाविषयाचे शीर्षक मी ऐसीअक्षरेवर सुरू केलेल्या चर्चेचेच असल्याने काही व्यक्तींनी व्यनीतून माझ्याशी संपर्क साधून विचारणा केली की खबरदार हा आयडी माझा आहे का?
२. त्या धाग्यावरच्या प्रतिसादात मी खबरदार हा माझा आयडी नसल्याचे जाहीर केले. असे जाहीर करणे उपक्रमाच्या धोरणांविरुद्ध असल्याने/वाटल्याने ती घोषणा संपादकांनी संपादित केली (ज्याबद्दल माझी तक्रार नाही) व चर्चेचे शीर्षकही संपादित केले
३. 'निखिल जोशी' यांना मात्र मला असे व्यनी आले आहेत हे खरे वाटत नव्हते. त्यांनी मला खरड करून असा आरोप केला की मी खोटे बोलतो आहे व खरेच व्यनी आले आहेत का अशी पृच्छा केली. मात्र मी व्यक्तीगत निरोप हे 'व्यक्तीगत' असल्याने ते जाहीर करण्यास नकार दिला व सांगितले की

प्रतिसाद संपादित आहे.
तरीही हट्टाने कोणी व्यनी केले ते मी जाहीर करणे मला गरजेचे वाटत नाही

शिवाय सदर प्रतिसाद नियमबाह्य असल्याचे संपादकांनी लिहिल्याने संबंधीत खरडी उडवल्या
४. खरडी उडवल्यावर निखिल जोशी यांनी पुन्हा खरड टाकली

इतरांना आलेल्या व्यनिंची यादी मिळविणारे स्क्रिप्ट बनविण्यास मला तीनचारच तास लागतील असा आत्मविश्वास वाटतो. जर तसे स्क्रिप्ट बनविणे शक्य झाले तर ते ज्याच्या खवमध्ये चिकटविण्यात येईल त्या व्यक्तीच्या व्यनिंची यादी स्क्रिप्ट पाठविणार्‍याच्या खवमध्ये/व्यनिमध्ये उमटेल अशी योजना शक्य असेल. बायदवे, तुम्ही माझ्या खरडी उडविल्यात म्हणून कुतूहल म्हणून चौकशी करतो आहे "तुम्ही खबरदार आहात काय" असे विचारणारे 'अनेक' लोकांचे व्यनि तुम्ही जपले आहेत की उडविले आहेत?

५. माझे व्यनी पूर्णपणे व्यक्तीगत आहेत तेव्हा त्याबद्दल माहिती देणे मला बंधनकारक नाही. तसेच मला आलेले व्यनी उपक्रमावरच आले होते का इतर कुठे हेही सांगणे बंधनकारक नाही. त्यामुळे मी त्यांना कळवले

तुमचे कुतूहल शमविण्याचे मला कारण दिसत नाही.

६. त्यावर त्यांनी उत्तर दिले:

आता मला स्वतःचे कुतूहलशमन शक्य असल्यामुळे तुमच्याकडे चौकशी करण्याची आवश्यकता संपलेली आहे. शिवाय, मुळात मी तुमच्यावर खोटारडेपणाचा आरोप केला तेव्हा तुम्ही माझी खरड उडविलीत म्हणून सोम, 06/25/2012 - 17:55 ही खरड द्यावी लागली. आता माझ्या खरडी उडविणे तुम्ही बंद केलेले दिसत असल्यामुळे माझा मूळ कार्यभाग उरकला आहेच. पुन्हा भेटूच.

७. त्यानंतर मला संपादक२ आणि वसंत सुधाकर लिमये यांच्या खरडवह्यांमध्ये धम्मकलाडू, चाणक्य आणि खुद्द माझ्या व्यक्तीगत निरोपांची यादी प्रकाशित झालेली दिसली. मी प्रशासनाकडे तक्रार करे पर्यंत ती उडालेली असली तरी मी त्यापैकी खरडीत प्रकाशित झालेल्या काही यादीचे स्क्रीन शॉट घेऊन ठेवले आहेत. (धम्मकलाडू / चाणक्य यांची परवानगी असल्यास ते इथेही प्रकाशित करू शकतो)
८. याचा अर्थ किमान माझे खाते 'कोणीतरी' हॅक केले होते व माझ्या व्यनीची यादी मिळवली होती. जे माझ्यासाठी धक्कादायक आहे

निखिल जोशी यांनी अशी स्क्रिप्ट बनविली की नाही याची मला कल्पना नाही ते स्पष्ट करतील अशी आशा आहे.
प्रश्न स्क्रिप्ट कोणी बनविली हा नसून अशी स्क्रिप्ट बनणे शक्य आहे हा आहे. जर अशी स्क्रिप्ट बनविणे एखाद्याला काही दिवसांत जमू शकते तर मराठी संस्थळाचे व्यनी कितपत सुरक्षित आहेत / राहतील असा प्रश्न मला पडला आहे.

यानिमित्ताने चर्चेसाठी पुढील प्रश्न ठेवत आहे
१. असे करणे केवळ उपक्रमावर शक्य असावे की सगळ्या मराठी संस्थळांवर हे शक्य आहे?
२. ही ड्रुपलमधील त्रुटी आहे का?
३. ड्रुपलवर हे शक्य असल्यास त्यावर काय उपाय करता येतील?
४. सर्व संस्थळांनी एकत्र येऊन या प्रश्नावर उपार शोधला पाहिजे असे वाटते का?

मी याविषयातला तंत्रज्ञ नाही. माझी भिती किती खरी होऊ शकते मी जाणत नाही. मात्र सदर प्रसंगानंतर गप्प बसून रहाणे मला धोक्याचे वाटतले. त्यामुळे माझ्यावर होऊ शकणार्‍या संभाव्य आरोपांना/व्यक्तीगत टिपण्यांना लक्षात घेऊनही मी इतरांना सावध करणे माझे कर्तव्य समजतो.

टीपः सदर धाग्याचा हेतू कोणतेही संस्थळ अथवा आयडीची बदनामी/आरोप करण्याचा नसून एकूणच ड्रुपल आधारीत मराठी संस्थळांवरच्या सदस्यांनी योग्य तो बोध घेऊन सावध राहावे म्हणून हा धागा काढला आहे. रिंगिंग द बेल इतका आणि इतकाच हेतू यामागे आहे. उपक्रमावर पाहिलेल्या या घटनेमुळे जास्तीत जास्त मंडळी सावध व्हावीत म्हणून हा धागा अनेक ड्रुपल आधारीत मराठी संस्थळांवर टाकत आहे.

तरीही प्रशासनास अयोग्य वाटत असेल तर हा धागा उडवू शकतात

सदर धाग्यावर पुरेशी चर्चा झाल्याने धागा वाचनमात्र केला आहे याची नोंद घ्यावी. - संपादन मंडळ.

लेखनविषय:

Comments

उपक्रमाच्या धोरणांत न बसणारे लेखन

हे लेखन इतर संकेतस्थळांवर आढळल्याने उपक्रमाची बदनामी करणार्‍या या लेखावर उपक्रमींच्या प्रतिक्रिया याव्यात यासाठी ही चर्चा पुन्हा प्रकाशित केली आहे याची नोंद घ्यावी.

एक शंका

गूगल व फेसबुक सदस्यांचा सर्व डेटा (ते लॉग्ड इन नसतानाही) गोळा करतात व जाहिरातबाजी वा इतर कॉर्पोरेटच्या फायद्यासाठी वापरतात. गूगल/फेसबुक पासून ते अगदी ब्यांकिंग साईटपर्यंत सर्वत्र घोळ, ह्याकिंगचे प्रकार झाले आहेत. उपक्रम हे यापेक्षा वेगळे आहे का? ते वेगळे असावे अशी अपेक्षा का आहे? (ते मिपा किंवा ऐसीअक्षरे नसण्याव्यतिरिक्तचे निकष सांगावेत)

निरसन

ह्या प्रश्नाचे उत्तर ऐसीअक्षरेचे संपादक/प्रवक्ते ऋषिकेश ह्यांनी द्यावे.

अनावश्यक

अनावश्यक, चुकीच्या माहितीच्या आधारे लिहिलेली "महामूर्ख" चर्चा.

बाकी चालू द्या! उपक्रमाविषयी काहीही बरळायचे आणि मग इथे येणारी गर्दी वाढवायची हे तर नेहमीचेच. ही चर्चा इतर अनेक संकेतस्थळांवर ज्या प्रकारे मांडली आहे ते अयोग्य वाटले.

इतर स्थळांवर

अशी गर्दी तिकडेही येनकेन प्रकारे वाढावी हा उद्देश असण्याचीच शक्यता असावी. एवढ्याश्या हौशी स्थळांच्या दुनियेत किती हा बाजरुपणा असे मला नेहमीच वाटते.

सर्किटरावांची आठवण झाली

संपादकांनी ही चर्चा पुन्हा प्रकाशित केले हे बरे केले. नाहीतर.. जाऊ द्या.

आज आदरणीय सर्किटरावांची प्रकाशरावांची प्रकर्षाने आठवण झाली. त्यांनी इंटरनेट सेक्युरिटीबाबत मराठी आंतरजालावर फार मौलिक विधाने केली आहेत. ती वचने पुन्हा वाचायला हवीत. असो. ड्रूपल म्हणा किंवा कुठलीही कन्टेन्ट मॅनेजमेन्ट सिस्टिम (सीएमएस) पूर्णपणे सुरक्षित कधी होईलसे वाटत नाही. किडे (बग्ज) निघत असतात. सुधारणा होत असतात. शिवाय कस्टम मोड्युलांमधल्या सुरक्षा त्रुटी, उणिवा वेगळ्या. सिक्युरिटी वल्नरेबिलिटी हेरून हल्ले करण्याचे प्रकार सर्वत्र होत असतात. एका संकेतस्थळावर काही वर्षांपूर्वी गमभनकार ओंकार जोशींनी अशीच सिक्युरिटी वल्नरेबिलिटी दाखवून दिली होती हे आठवले. एका सदस्याने, बहुधा आदरणीय टग्या, आपल्या खवच्या मजकुरात जावास्क्रिप्ट टाकून इतरांना खव बघता येणार नाही ह्याची तरतूद केल्याचेही आठवते. असो.

सीएमस आणि कस्टम मोड्युले सतत अपडेट करत राहायला हवी. उपक्रम अद्याप ड्रूपल 5 वर आहे, हे येथे लक्षात घ्यायला हवे.जावास्क्रिप्ट चालू नये म्हणून एचटीएमएल करेक्टर सारखे फिल्टर इनपुट फॉरमॅटांसोबत वापरले तर हे हल्ले कमी करता येतील. खरड लिहिताना, निरोप लिहिताना किंवा कुठलाही मजकूर टाकताना जावास्क्रिप्ट टाकून असे हल्ले करता येतात.

मी याविषयातला तंत्रज्ञ नाही.
हं. ह्यातच सर्व आले. असला आततायी धागा टाकण्यापूर्वी धाग्याकर्त्याने किमान थोडे गुगलून पाहिले असते तरे झाले असते. असो. तूर्तास एवढेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

बहुतांश सहमत आहे

आज आदरणीय सर्किटरावांची प्रकाशरावांची प्रकर्षाने आठवण झाली.

मलाही झाली.
चर्चेचा उद्देश असे होऊ शकते हे ज्यांना माहित नव्हते / माहित असूनही दुर्लक्ष करत होते किंवा माहित होते परंतु काळाबरोबर सावधानता कमी झाली होती त्यांना सावध करणे हाच आहे. (रिंगिंग द बेल असे शीर्षकात म्हटले आहेच)
या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या व्यनीला किती खाजगी समजावे हे शिकण्यासारखे आहेच.

शिवाय मराठी संस्थळांच्या प्रशासकांनीही यातून योग्य तो बोध घेऊन संस्थळांना अधिक सुरक्षित बनविण्याचे प्रय्त्न करणे मला गरजेचे वाटते.

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

चर्चेच्या मांडणीवरून

चर्चेचा उद्देश असे होऊ शकते हे ज्यांना माहित नव्हते / माहित असूनही दुर्लक्ष करत होते किंवा माहित होते परंतु काळाबरोबर सावधानता कमी झाली होती त्यांना सावध करणे हाच आहे. (रिंगिंग द बेल असे शीर्षकात म्हटले आहेच)
या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या व्यनीला किती खाजगी समजावे हे शिकण्यासारखे आहेच.

शिवाय मराठी संस्थळांच्या प्रशासकांनीही यातून योग्य तो बोध घेऊन संस्थळांना अधिक सुरक्षित बनविण्याचे प्रय्त्न करणे मला गरजेचे वाटते.

हे सगळे ठीक आहे. पण तुमचा हेतू एवढा उदात्त होता हे चर्चेच्या मांडणीवरून वाटत नाही. केवळ सुरक्षेभोवती ही चर्चा गुंफता आली असती. माझा अकाउंट हॅक झाला आहे वगैरे वगैरे रूदन अनावश्यक वाटते. तुमचा अकाउंट हॅक झाला असे तुम्हाला वाटल्यावर तुम्ही तक्रार केली का तशी? असो. दोन मुलांचे भांडण होते. त्यातील लागलेल्या निकालाने दुसऱ्याने घायाळ होऊन चर्चा टाकतो, तसा हा प्रकार वाटतो आहे.

आणि आव्हानावरून आठवले की निखिल जोशींनी ह्यापूर्वीही 10 टक्के रोमन अक्षरांच्या नियमावर एक हॅक उपक्रमावर टाकली होती. आणि अऩेक जण ती अगदी मजेत वापरताहेत.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हेतु साध्य

तुमचा अकाउंट हॅक झाला असे तुम्हाला वाटल्यावर तुम्ही तक्रार केली का तशी?

होय तक्रार केली होती. खाली प्रियाली यांच्या प्रतिसादात बघा
शिवाय हॅक झाल्याबद्द्ल तक्रार होती ती केलीच. प्त्पण्ण त्तिथेच थांबलो नाही, झाला प्रकार सांगुन इतरांना सावध करण्यासाठी धागा काढण्यावाचून दुसरा पर्याय मला सुचला नाही.
अनेकांच्या प्रतिक्रीया/खरडी/व्यनी यातून क्जाणवते आहे की काही व्यक्ती आधीच सावध होत्या, मात्र अनेक जण आता सावध झाले आहेत. तेव्हा बेल रिंग करण्याचा हेतु साध्य झाला आहे असे दिसते

बाकी,

पण तुमचा हेतू एवढा उदात्त होता हे चर्चेच्या मांडणीवरून वाटत नाही.

तुम्हाला चर्चेतून काय वाटावे हे मी कसे ठरवावे?.. जे वाटते आहे ते लखलाभ! सत्य हेतु आहे तो मी सांगितला त्यावर विश्वास ठेवणे न ठेवणे हा वैयक्तीक चॉईस झाला. त्यात मी लुडबुड करणे योग्य होणार नाही

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

हलो!!

तुमची आयडी हॅक वगैरे झालेली नाही हे तेव्हाच ताबडतोब कळवले होते ना! मग हे उफराटे उद्योग का केले?

सकाळी ८:०७ वाजता मी व्यनि पाठवला होता -

उपक्रमावर व्यनि वाचले जात नाहीत. व्यनिंची लिस्ट देण्याची स्क्रिप्ट मी करून दाखवतो असे निजोने चॅलेंज केले होते. ते त्याने करून दाखवले. मी ते टेस्ट करत असता तू माझ्या खरडवहीत आलास. ती क्षणिक टेस्ट त्याचा दावा खरा की खोटा हे जाणून घेण्यासाठी होती. असे काहीही उपक्रमावर करायचे नाही अशी तंबी त्याला दिली आहे. त्याने फक्त जावास्क्रिप्ट लिहिले आहे. जावास्क्रिप्टला बाउजरवर बंद केले तर तो काहीही करू शकत नाही. व्यनि वाचण्यासाठी सर्वर ऍक्सेस लागतो. तो तो मिळवू शकत नाही.

तसेही, व्यनि वाचण्यासाठी सिक्युरिटी लागते ती उपक्रमावर उपलब्ध आहे. त्यामुळे लिस्ट दिसली म्हणून व्यनि वाचता येत नाहीत.

-----------------

वरील व्यनि सकाळी घाईत लिहिल्याने काही वाक्ये घाईत गेली आहे. असे काही मी करून दाखवू शकतो असा दावा (चॅलेंज म्हणणे योग्य नसावे कारण मला चॅलेंज करण्यासारखे काही झाले नव्हते) निजोंनी केला होता. दुसरे म्हणजे ती स्क्रिप्ट कशी काम करते हे लक्षात आले नव्हते. मला वाटले की ऋषिकेशनी माझ्या खरडवहीवर क्लिक केले पण त्यांनी इतरत्र क्लिक केले होते.

-------------

अनेकांच्या प्रतिक्रीया/खरडी/व्यनी यातून क्जाणवते आहे की काही व्यक्ती आधीच सावध होत्या, मात्र अनेक जण आता सावध झाले आहेत. तेव्हा बेल रिंग करण्याचा हेतु साध्य झाला आहे असे दिसते

कोणाच्या खरडींतून काय दिसते आहे? तुम्ही मनाला येईल ते लिहिलेत. त्या वर हा उद्योग तुम्ही केला सर्व संकेतस्थळांवर आणि काही लोकांना इथे आणलेत. त्यांच्याकडून सकारात्मक असे काहीच मिळणार नाही.

ही असली चुकीची माहिती पसरवल्याबद्दल करावा तितका निषेध थोडा आहे. असो.

खुलासा

तंबी नव्हे. स्क्रिप्ट वापरणार नाही असे मी आधीच सांगितले होते.
व्यनिसुद्धा वाचता येतील, अजून तीनचार तास कोड लिहिल्यास तेही जमेल असे वाटते, पण तसे स्क्रिप्ट लिहिण्याचा माझा मानस नाही.

लांडगा आला रे!

व्यनिसुद्धा वाचता येतील, अजून तीनचार तास कोड लिहिल्यास तेही जमेल असे वाटते, पण तसे स्क्रिप्ट लिहिण्याचा माझा मानस नाही.

मागे लांडगा आला होता तेव्हा दुसर्‍या एका संकेतस्थळावर अनेकांना बर्‍यापैकी "मीट" मिळाले होते आणि इतरांनी "मिट"क्या मारत खाल्ले होते. पण त्यावेळी उपक्रम सुरक्षित असल्याबद्दल ऐकले होते. अर्थातच, कोणतीही सुरक्षा ही तात्पुरती असते म्हणूनच आपल्या सुरक्षिततेची काळजी सतत घ्यावी हे उत्तम.

तुमचा मानस नाही यात आनंद आहे. तूर्तास विश्वास ठेवते.

असो

पण तुमचा हेतू एवढा उदात्त होता हे चर्चेच्या मांडणीवरून वाटत नाही.

तुम्हाला चर्चेतून काय वाटावे हे मी कसे ठरवावे?.. जे वाटते आहे ते लखलाभ! सत्य हेतु आहे तो मी सांगितला त्यावर विश्वास ठेवणे न ठेवणे हा वैयक्तीक चॉईस झाला. त्यात मी लुडबुड करणे योग्य होणार नाही

मांडणी योग्य न वाटल्यामुळेच बहुधा तुमची चर्चा अन्य एका संकेतस्थळावर, जिथे तुम्ही नुकतेच मॉडरेटर झाला आहात (अभिनंदन बरं का), संपादित करून प्रकाशित करण्यात आली. असो. स्पेन आणि पोर्तुगाल म्याच आहे. ती बघावी म्हणतो.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अच्छा!

जिथे तुम्ही नुकतेच मॉडरेटर झाला आहात (अभिनंदन बरं का)

अच्छा असे आहे होय. म्हणजे ते बुडित खाते वर काढायचा हा नविन मार्ग दिसतो.
कोयलों की दलाली में हाथ काले। दुसरे काय?

न धरी शस्त्र करि मी

सदर प्रतिसाद नियमबाह्य असल्याचे संपादकांनी लिहिल्याने संबंधीत खरडी उडवल्या

प्रतिसाद नियमबाह्य होता, खरडी नियमबाह्य नव्हत्या. किंबहुना, व्यक्तिगत लेखनासाठी खव/व्यनि वापरण्याचा सल्ला प्रशासनच देते.

  1. मी स्क्रिप्ट बनविले.
  2. स्क्रिप्टचा वापर मी चाणक्य, ऋषिकेश, किंवा इतर कोणाहीवर केलेला नाही. वापर करण्याची धमकी किंवा उद्देशही मी जाहीर केलेला नाही.

मी स्क्रिप्ट का बनविले?

ऋषिकेश यांना मी व्यनिविषयी प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी उत्तर टाळले. तो त्यांचा हक्कच असला तरी उत्तर टाळणे आणि जाब (हा विचारण्याचा माझा काहीही हक्क नसला तरी) विचारणार्‍या खरडी उडविणे हा माझा अपमान होता. तेव्हा मी त्यांना मला उपलब्ध इतर मार्गांच्या संभाव्यतेची माहिती दिली. आता ते जो आकांत करीत आहेत तो तेव्हाच करून त्यांनी धोका, धक्का, भीती, अवैधता, इ. शब्द वापरून शेपूट घालावे अशी माझी अपेक्षा होती. माझ्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी माझ्या स्क्रिप्टक्षमतेवर अविश्वास व्यक्त केला.
मी स्क्रिप्ट कोणाकोणाला दिली त्याची माहिती जाहीर करू इच्छित नाही.

सदस्यत्वाच्या अटींमध्ये

"Upakram management" cannot be held responsible for any hacking attempt that may lead to the data being compromised.

हे विधान आहे आणि त्यामुळे धक्का बसल्याचा दावा अडाणीपणाचा आहे.

द्रुपल ६ असो वा ७, कॅपचा सोय नसताना हा प्रकार अडविणे अवघड ठरेल असे मला वाटते. स्क्रिप्टे बंद केल्यास किंवा एचटीएमएल गाळल्यास यूट्यूब विडियोही चालणार नाहीत असेही वाटते.

"माझ्या खवमध्ये येताना जावास्क्रिप्ट सुरू ठेवून आलात तर तुम्हाला त्या जावास्क्रिप्टला रन होण्याची अनुमती देण्याची इच्छा आहे असे मी समजेन" असा डिस्क्लेमर दिल्यास अशी स्क्रिप्टे बेकायदेशीर ठरणार नाहीत असेही मला वाटते.

'जो जे वांछिल तो ते लाहो'
- अदनान खाशोगी

धन्यवाद

या सर्व प्रकरणात माझा सहभाग असा

१. ऋषिकेश आणि निखिल जोशी यांचा खरडसंवाद थोडा हाताबाहेर गेल्यावर ऋषिकेश यांनी माझ्याकडे तक्रार केली.
२. मी याबाबत निखिल यांना विचारले. ते अशी स्क्रिप्ट लिहू शकतात असे त्यांनी कळवले. या सुमारास खरडवही युद्ध सुरू होते पण काही महत्त्वाच्या खरडी ऋषिकेश यांनी उडवल्या.
३. निखिल जोशी यांनी मला स्क्रिप्ट लिहून पाठवली आणि ती टेस्ट करा असे सुचवले.
४. मी ती माझ्या दोन आयडींच्या आधारे टेस्ट करत होते. तेवढ्यात आमचे परममित्र ;-) श्री. चाणक्य माझ्या खरडवहीवर गेले आणि मला माझ्या व्यनिंची लिस्ट दिसण्याआधीच चाणक्यांची लिस्ट दिसली. (लिस्ट दिसली, मॅटर नाही. इतकी माहिती आणि जाणीव आयटीवाल्यांना हवी)
५. स्क्रिप्ट टेस्ट झाली. जोशींनी सांगितल्याप्रमाणे चालली तरी एक बग होता. त्यापुढे मला त्यात इंटरेस्ट नव्हता.
६. चाणक्यनी आश्चर्य व्यक्त केलं त्यांना मी प्रकार सांगितला.
७. निखिल जोशींनी या स्क्रिप्टचा वापर उपक्रमावर करू नये असे त्यांना सांगितले. त्यांनी त्यांना वापर करायचा नाही असे कळवले.
८. ही स्क्रिप्ट मी ऐसी अक्षरेच्या एका मालकांना तुम्हीही वापरून बघा म्हणून दिली. ते टेस्ट करतीलच. ती दिली आहे असे निखिल जोशींना कळवले. त्यांची ना नव्हती.
९. ऋषिकेशला व्यनितून काय झाले याची कल्पना दिली होती. सोबत निखिल जोशींनी या स्क्रिप्टचा वापर करू नये असे सांगितले आहे हे ही कळवले होते.

-----------------

माझे मत - ब्राउजरसाइड स्क्रिप्ट, डेटाबेस सिक्युरिटी, सर्वरसाइड सिक्युरिटी या फार वेगळ्या गोष्टी आहेत. नेटावर काहीही सुरक्षित नसते. आपण कसे वागतो, कसे आणि काय लिहितो त्याचे जबाबदार आपण असतो. ऋषिकेश यांनी "आईची जात" या चर्चेत विचित्र सूर काढला नसता तर गोष्टी चिघळल्या नसत्या.

---------------
ही स्क्रिप्ट माझ्याकडे आहे. इतर संकेतस्थळ चालकांना टेस्ट करून पाहायची झाल्यास कळवावे.

कॅपचाबाबत सहमत

द्रुपल ६ असो वा ७, कॅपचा सोय नसताना हा प्रकार अडविणे अवघड ठरेल असे मला वाटते. स्क्रिप्टे बंद केल्यास किंवा एचटीएमएल गाळल्यास यूट्यूब विडियोही चालणार नाहीत असेही वाटते.
सहमत आहे. जोपर्यंत स्क्रिप्टला कुठल्याही प्रकारची परवानगी आहे तोपर्यंत ही गोष्ट थांबवणे पूर्णपणे शक्य नाही. म्हणूनच केवळ ऍडमिनला किंवा संपादकांना स्क्रिप्ट चालविण्याची मुभा असावी.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

भली मोठी जांभई.

हे नक्की काय सुरू आहे?
कुणाचीही खरड/व्यनी/विपू परवानगीशिवाय वाचणे, हे कुणाचाही पत्रव्यवहार चोरून वाचण्याइतकेच असभ्यपणाचे आहे असे माझे मत आहे.
उपक्रमावर तरी सभ्यतेची किमान पातळी सुरक्षीत राहील असे वाटत होते. इतर संस्थळांचा दर्जा पहाता उपक्रम मला नेहेमीच उजवे वाटते, हे इथे नमूद करतो.

सहमत

खरड ही सार्वजनिक असते, उघड असते. त्यामुळे ती वाचण्यासाठी वेगळी परवानगी घेण्याची गरज आहे असे वाटत नाही. आता राहिली व्यनिची गोष्ट. वरील चर्चा आणि प्रतिसाद बघता फक्त व्यनिंची यादी एका स्क्रिप्टद्वारे एक्सट्रॅक्ट केली आहे असे दिसते. व्यक्तिगत निरोप वाचता आलेले नाहीत असे दिसते आहे. धागाकर्ते सदस्य दुसऱ्या एका सदस्याशी झालेल्या भांडणामुळे व्यथित होऊन तथ्यापासून भरकटले आहेत. ह्या दोन सदस्यांच्या मानापमानाच्या खाजगी युद्धात उपक्रमाला आणायला नको.

उपक्रमावर तरी सभ्यतेची किमान पातळी सुरक्षीत राहील असे वाटत होते. इतर संस्थळांचा दर्जा पहाता उपक्रम मला नेहेमीच उजवे वाटते, हे इथे नमूद करतो.
नक्कीच. सहमत आहे. उपक्रमावर सभ्यतेची पातळी सुरक्षित आहे असे वाटते. पण धागा काढणाऱ्याने रागाच्या भरात नव्हे तर व्यनिंच्या सुरक्षिततेच्या काळजीपायी स्थळीस्थळी ही चर्चा टाकली आहे, असे कुण्या दूधखुळ्या मुलालाही न वाटल्यास नवल नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

खरड

कुणाचीही खरड/व्यनी/विपू परवानगीशिवाय वाचणे, हे कुणाचाही पत्रव्यवहार चोरून वाचण्याइतकेच असभ्यपणाचे आहे असे माझे मत आहे.

विपू म्हणजे काय समजले नाही. पण खरड वाचण्यास परवानगीची गरज नसावी. खरड हा सार्वजनिकच मामला आहे. व्यनि चोरुन वाचणारा मात्र असभ्य आहे. एका फाजील जालिय यात्रेकरुने हा आचरटपणा पूर्वी केला होता ते आठवले. अधिक माहितीसाठी व्यनि करावा. (आणि तो निखील जोशींनी फोडू नये किंवा ॠषिकेश ह्यांना वाचायला देऊ नये नाहीतर मी संपादक असलेल्या एका स्थळावर त्यांची ऐशीतैशी केली जाईल)

विपू परवानगीशिवाय वाचणे

विपू म्हणजे काय समजले नाही.

कदाचित विना पूर्व परवानगी म्हणायचे असेल. :)






विपू.

विपू = विचारपूस. मायबोली नावाच्या साईटवर खरडीला विपू म्हणतात. तिथे व्यनी प्रकारच नाही. सरळ मेल जाते.

अजून मुद्दे

बकर्‍याचा युफेमिजम साक्षीदार असतो तर!
----

निखिल जोशी यांनी अशी स्क्रिप्ट बनविली की नाही याची मला कल्पना नाही ते स्पष्ट करतील अशी आशा आहे.

परंतु लगेचच पुढे तुम्ही लिहिता

प्रश्न स्क्रिप्ट कोणी बनविली हा नसून अशी स्क्रिप्ट बनणे शक्य आहे हा आहे.

तर मग तिचे लेखक निखिल जोशी आहेत की नाही ते जाणून घेण्याची आशा ठेवण्याचे कारण उरत नाही.

फालतूपणा

जी चर्चा उपक्रम व्यवस्थापनाशी खाजगीत व्हायला हवी ती चर्चा सार्वजनिक आणि तेही इतर स्थळांवर पाहून चकित झालो आहे. हे पाहिल्यावर माझे मत आडकित्ता ह्यांच्यासारखेच आहे. हे नक्की काय सुरू आहे?

इतर स्थळांवर अशा कुजकट प्रतिक्रिया टाकण्याचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करणे हा ह्या चर्चेचा उद्देश आहे की काय असेही मनात आले. तसे असेल तर सवंगपणाची ही हद्द आहे.

इतर संस्थळांचा दर्जा पहाता उपक्रम मला नेहेमीच उजवे वाटते, हे इथे मलाही नमूद करावेसे वाटते.

मनातले लिहिलेत

चर्चा प्रस्तावकासारखा +१ असा प्रतिसाद द्यायचा विचार होता. पण राहवले नाही. व्यवस्थापनाशी खाजगीत व्हायला हवी ती चर्चा सार्वजनिक आणि तेही इतर स्थळांवर हे खरच सभ्यपणाचे लक्षण नाही. यामागे बदनामी शिवाय काहीच दिसत नाही. उगाच निरागसतेचा बुरखा पांघरला आहे असे वाटते.





कॉंग्रेसी कांगावा

मला सदर चर्चा म्हणजे एक कॉंग्रेसी कांगावा वाटतो. जसे काँग्रेसवाले म्हणतात ना की आम्हीच भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई करतो आहोत. त्या थाटात मी बेल वाजवतो आहे असे सांगितले जात आहे. असो.
सुदैवाने/दुर्दैवाने हा प्रकार झाला तेंव्हा म्ही उपक्रमावर उपस्थित होतो. चर्चा विषयात आणि प्रतिसादात माझे नाव आल्याने मी माझे मत व्यक्त करतो आहे. मुळात मी प्रियालीला सोशलनेटवर्किंग बद्दल मटा मधल्या एका बातमीचा दुवा खरडला होता. त्याला कारण तिने सुरु केलेली एक चर्चा होती. ज्यांना रस असेल त्यांनी ती खरड आणि तिचे चर्चा विषय पहावेत. दुवे देऊन मी लै भारी असे मला दाखवण्यात रस नाही. तर, काहीच मिनीटांनी मी तिची खरडवही परत पाहताच मला माझ्या व्य.नि. ची यादी दिसली. ती यादी तिच्या खरडवही मध्ये दिसल्याने सहाजिकच मी विचारले आणि तिने तत्काळ स्पष्टीकरण दिले जे मला समाधानकारक वाटले. कदाचित सापेक्ष संगणक साक्षरता हा मुद्दा सुद्धा असु शकेल. ज्यामुळे मला ते पटले. मुळ धागाच सोशलनेटवर्किंगचा असल्याने हि सुद्धा चर्चा झाली कि इंटरनेटवर सावधानता बाळगणे आणि जास्त माहिती शेअर न करणे किती गरजेचे आहे. सांगायचा मुद्दा हाच की इंटरनेटवर काही एक खाजगी नाही. हा एखादा सुरक्षेचा लेअर असु शकतो पण तस सगळंच उघडं.

१. असे करणे केवळ उपक्रमावर शक्य असावे की सगळ्या मराठी संस्थळांवर हे शक्य आहे?

येथे उगाच संकेतस्थळाची जात आणणे गरजेचे नाही. हे इंटरनेटवर सहज शक्य असावे. एका संकेतस्थळाच्या संपादकाकडून असे प्रश्न आणि कृती अपेक्षित नाही. किंबहुना मला असे वाटते कि संपादकांचे किमान स्किल्स काय असावेत यावर चर्चा व्हायला हवी. मला उपक्रमाचे नाव एका दुसर्‍या संकेतस्थळाच्या संपादकाकडून घेणे हे उपक्रमाच्या बदनामीचे घातलेले घाट वाटतात. मग उगाच टीप देऊन सभ्यतेचा आव आणायची गरज काय?

२. ही ड्रुपलमधील त्रुटी आहे का?
३. ड्रुपलवर हे शक्य असल्यास त्यावर काय उपाय करता येतील?
४. सर्व संस्थळांनी एकत्र येऊन या प्रश्नावर उपार शोधला पाहिजे असे वाटते का?

पहिल्या दोन प्रश्नांची उत्तरे मिळण्याचे हे व्यासपीठ नव्हे. ते ड्रुपलवर विचारा अथवा योग्य तांत्रिक ज्ञान असलेल्या लोकांना. सर्वसामान्य सदस्य याचे उत्तर थोडेच देणार आहेत? शेवटचा प्रश्न परत काँग्रेसी काव्यासारखे आहे. संपादक आहात ना? मग इतर संकेतस्थळांच्या संपादक मंडळांना गाठा आणि विचारा. सामान्य सदस्य काय करणार?

मी याविषयातला तंत्रज्ञ नाही. माझी भिती किती खरी होऊ शकते मी जाणत नाही. मात्र सदर प्रसंगानंतर गप्प बसून रहाणे मला धोक्याचे वाटतले. त्यामुळे माझ्यावर होऊ शकणार्‍या संभाव्य आरोपांना/व्यक्तीगत टिपण्यांना लक्षात घेऊनही मी इतरांना सावध करणे माझे कर्तव्य समजतो.

मला सर्व प्रकार मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली असा प्रकार वाटतो. जर काळजी वाटली तर योग्य लोकांना आधी सांगा. गरज भासल्यास संपादक मंडळाला निवेदन करायला सांगा. त्यांना सुद्धा काळजी आहेच उपक्रमाची आणि मराठी संकेतस्थळांची. जे केले ते मला अतातायीपणा वाटतो.

जाता जाता, हाच चर्चा विषय कोणाची नावे न घेता सुद्धा टाकला आला असता. मध्ये मी सदस्य नसलेल्या एका संकेतस्थळावर माझे सदस्य नाम वापरुन गैरप्रकार झाले होते. पण मी दुर्लक्ष केले होते कारण तो एकतर मला भडकविण्याचा प्रकार होता आणि सदस्यनामाचे कॉपिराईट काही मी घेतले नव्हते.

संकेतस्थळांच्या उभारणीत काही टेस्ट होत असल्यास गैर नसावे. तसेच गमभनच्या उभारणीमध्ये सुद्धा असाच अनेकांनी भाग घेतला आहे. अनेक मराटी संकेतस्थळांच्या उभारणीत सुद्धा अनेकांनी सक्रिय (तांत्रिक नव्हे) सहभाग अनेकांनी घेतला असेल. त्यामुळे या प्रकाराचा बाऊ करण्याची गरज नाही. गरज वाटल्यास मालक/संपादक मंडळ यांना तक्रार करा. पुरावा म्हणून तांत्रिक माहिती द्या. तरच काहीतरी फायदा होईल. अथवा एका संकेतस्थळाचे संपादक म्हणून जबाबदारीने वावरा.

सध्या आवरते घेतो. चर्चा अप्रकाशित न करता सुरु ठेवल्या बद्दल उपक्रमाच्या संपादकांचे आभार. कदाचित हाच संकेतस्थळांच्या परिपक्वतेचा फरक असावा.






भुमिका, धोके पुरेसे स्पष्ट

सर्वप्रथम मी उपक्रमावर संपादक नाही. इथे मी केवळ एक सदस्य आहे. आणि त्याच नात्याने चर्चा टाकली आहे. इतर कोणत्याही संस्थळावर मी काय आहे त्याने इथे फरक पडू नये. तरिही तसेच समजायचा हट्ट असेल तर माझा नाईलाज आहे. तुमचे गैरसमज तुम्हाला लखलाभ!

जर मला एखादी गोष्ट आढळली व ती संपादकांना तक्रार केल्यावर त्यांनी सांगितलं की मीच तसे टेस्टिंग करत आहे तर मग कोणाकडे तक्रार करायची? एखादी व्यक्ती वैयक्तीक जिद्दीपोटी हॅकिंग करू शकतो अशी तक्रार केल्यानंतरही संपादक सदर सदस्यावर कारवाई/समज देण्याऐवजी स्वतःच टेस्टिंग करत बसले असतील, त्यात सामील होत असतील तर त्यांच्याकडे केलेली तक्रार किती गांभिर्याने घेतली जाईल? केवळ "आता नाही हं तो तसे करणार" इतक्या समजुतीवर ज्यांचे समाधान होत असेल त्यांचे होवो, माझे होत नाही. तेव्हा अश्याही गोष्टी होऊ शकतात असे बहुसंख्यांना कळावे व त्यांनी सजग व्हावे म्हणून जाहिर धाग्यावाचून गत्यंतर दिसत नाही.

इतकेच नाही तर वरती निखिल यांनी 'प्रयत्न केल्यास मी व्यनीही वाचु शकेन' हे स्पष्ट केल्यानंतरही, इतर सदस्यांनी त्यापासून वाचण्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन केलेले आढळत नाही.

चर्चा अप्रकाशित न करता सुरु ठेवल्या बद्दल उपक्रमाच्या संपादकांचे आभार. कदाचित हाच संकेतस्थळांच्या परिपक्वतेचा फरक असावा.

सहमत आहे. फरक पडलेला दिसतो आहे. आणि तो स्वागतार्ह आहे!

यानिमित्ताने अनेक भुमिका, धोके पुरेशा स्पष्ट झालेल्या आहेत. त्यावरचे उपाय माझ्यासारख्या सामान्य सदस्यांना कळले असते तर अधिक बरे वाटले असते (केवळ निखिल यांनीच एक उपाय सुचवला आहे - ब्राऊझरमधे जावा स्क्रीप्ट चालु न देण्याचे सेटिंग करण्याचा.) तशा माहितीपर प्रतिसादांची अधिक गरज आहे असे वाटते.

असो. सदर विषयावर मी इथेच थांबतो.

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

हं

कितीही लांबड..बरं एक सांगा ते 'खबरदार' म्हणजे तुम्हीच का?

सोप्पय्

हॉहॉहॉ! विनोदी चर्चा.

इतकेच नाही तर वरती निखिल यांनी 'प्रयत्न केल्यास मी व्यनीही वाचु शकेन' हे स्पष्ट केल्यानंतरही, इतर सदस्यांनी त्यापासून वाचण्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन केलेले आढळत नाही.

सोप्पं आहे. इतर सदस्यांनी "ऐसी अक्षरे" गिरवावी.

तुमचे हे प्रयत्न यासाठीच होते का?

प्रवक्ता

एका राजकिय पक्षाचा प्रवक्ता (कि संकेतस्थळाचा?) असल्या सारखा प्रतिसाद आहे हा.

सर्वप्रथम मी उपक्रमावर संपादक नाही. इथे मी केवळ एक सदस्य आहे. आणि त्याच नात्याने चर्चा टाकली आहे. इतर कोणत्याही संस्थळावर मी काय आहे त्याने इथे फरक पडू नये. तरिही तसेच समजायचा हट्ट असेल तर माझा नाईलाज आहे. तुमचे गैरसमज तुम्हाला लखलाभ!

एवढा माज करायची गरज नाही. तु कुठे काय आहेस आणि तिथे काय करतोस याने मला काहीच फरक पडत नाही. सभ्यतेचा बुरखा घालुन तु उपक्रमाला बदनाम करतो आहेस. माझ्या समज गैरसमजाबद्दल तु काळजी करु नकोस अथवा मला काय लखलाभ असावे आणि नसावे याची काळजी तु करु नकोस. जर प्रश्न उपक्रमाचा होता तर तो या स्थळावर सोडवून चर्चा करुन पहायला हवा होता. त्याला उगाच सर्व मराठी संकेतस्थळे धोक्यात असा आव आणायची गरज नाही आणि नव्हती. यावरुनच तु उपक्रमाची निंदानालस्ती करायचा प्रयत्न करतो आहेस हे उघड होते आहे.






प्रवक्ता

जर मला एखादी गोष्ट आढळली व ती संपादकांना तक्रार केल्यावर त्यांनी सांगितलं की मीच तसे टेस्टिंग करत आहे तर मग कोणाकडे तक्रार करायची? एखादी व्यक्ती वैयक्तीक जिद्दीपोटी हॅकिंग करू शकतो अशी तक्रार केल्यानंतरही संपादक सदर सदस्यावर कारवाई/समज देण्याऐवजी स्वतःच टेस्टिंग करत बसले असतील, त्यात सामील होत असतील तर त्यांच्याकडे केलेली तक्रार किती गांभिर्याने घेतली जाईल? केवळ "आता नाही हं तो तसे करणार" इतक्या समजुतीवर ज्यांचे समाधान होत असेल त्यांचे होवो, माझे होत नाही. तेव्हा अश्याही गोष्टी होऊ शकतात असे बहुसंख्यांना कळावे व त्यांनी सजग व्हावे म्हणून जाहिर धाग्यावाचून गत्यंतर दिसत नाही.

हाहाहा... भयंकर विनोदी प्रकार आहे हा.
सदर संपादक बरं!! पाहतो हं काय झालंय आणि तुला सांगतो असा पवित्रापण घेऊ शकला असता. तुझ्या लेखना प्रमाणे संपादकाने पारदर्शकता ठेवून तुला सांगितले जे काही होते ते. त्याने तुझे समाधान झाले नाही हा तुझ्या मनाचा कोतेपणा आहे. किंबहुन असे सुद्धा म्हणता येऊ शकते कि तु आणि फक्त या चर्चेवर प्रतिसाद देण्यासाठी येणारे देवलोकं फक्त काही लोकांची बदनामी करण्यासाठी हे सर्व करत आहेत. थोडक्यात हे संकेतस्थळ आणि इथले सक्रिय सभासद यांना बदनाम करण्याचाच सभ्य प्रयत्न आहे. पण मी व्यक्तिशः असे म्हणणार नाही कारण कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. असो.
बाकी आपल्या नकळत जालावर अनेक गैरप्रकार होत असतात आणि जालावर काही काळ वावरल्यावर प्रत्येकाला त्याची जाणीव येते. त्यासाठी एखादा लेख आला असता माहितीपुर्ण तर त्याचे सर्वांनीच जोरदार स्वागत केले असते. त्याचे भरभरुन कौतुक सुद्धा केले असते. ज्या दोन व्यक्तिंनीमध्ये हा मामला झाला आहे त्यांनी हा पुढाकार घ्यायला हवा होता. किंबहुन तुला शिकण्याची चांगली संधी होती.

इतकेच नाही तर वरती निखिल यांनी 'प्रयत्न केल्यास मी व्यनीही वाचु शकेन' हे स्पष्ट केल्यानंतरही, इतर सदस्यांनी त्यापासून वाचण्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन केलेले आढळत नाही.

मार्गदर्शन कोणी करणे अपेक्षीत आहे? संपादकांनी? तु संपादक म्हणून असे करतोस का? तर अशी अपेक्षा कर. हा निखीलनेच सांगितले तर ठिक आहे. किंबहुना मी तांत्रिक ज्ञान अधिक असलेल्या सदस्यांना आवाहन करतो की सर्वसामान्य सदस्यांना धोके आणि उपाय सांगावेत. माझ्या माहिती प्रमाणे उपक्रमावर काही मान्यवर सदस्यांनी हे काम केले आहे. त्यांचे उल्लेख येथे आहेतच.

असो. सदर विषयावर मी इथेच थांबतो.

अपेक्षा करतो की तुझ्या शब्दांचा तुच मान राखशील आणि यापुढे कांगावेखोर प्रतिसाद या चर्चेवर देणार नाहीस.






अरेरे!

याला काय म्हणावं? हे सर्व मुद्दाम सुरू आहे की समजच मर्यादित आहे?

जर मला एखादी गोष्ट आढळली व ती संपादकांना तक्रार केल्यावर त्यांनी सांगितलं की मीच तसे टेस्टिंग करत आहे तर मग कोणाकडे तक्रार करायची? एखादी व्यक्ती वैयक्तीक जिद्दीपोटी हॅकिंग करू शकतो अशी तक्रार केल्यानंतरही संपादक सदर सदस्यावर कारवाई/समज देण्याऐवजी स्वतःच टेस्टिंग करत बसले असतील, त्यात सामील होत असतील तर त्यांच्याकडे केलेली तक्रार किती गांभिर्याने घेतली जाईल? केवळ "आता नाही हं तो तसे करणार" इतक्या समजुतीवर ज्यांचे समाधान होत असेल त्यांचे होवो, माझे होत नाही. तेव्हा अश्याही गोष्टी होऊ शकतात असे बहुसंख्यांना कळावे व त्यांनी सजग व्हावे म्हणून जाहिर धाग्यावाचून गत्यंतर दिसत नाही.

तुम्ही तक्रार फार पूर्वीच केली होती. त्याविषयी चौकशी सुरू होती. याला अनेक सदस्य होकार देतील. विविध प्रसंगी त्यांना तुमच्या विषयी आणि निखिल जोशींविषयी विचारणा केली होती. निखिल जोशी यांनी हॅकिंग केलेले नाही. त्यांनी स्क्रिप्ट लिहिली आणि ती संबंधित व्यक्तिंच्या हवाली केली. स्क्रिप्ट लिहिण्याचे कारणही तुम्हा दोघांतील खरडवही संवाद आहे. तिचा वापर त्यांनी केलेला नाही हे संपादनास माहित आहे. कुठलीही स्क्रिप्ट लिहून दिली म्हणून तडकाफडकी त्यांच्यावर कार्यवाही कशासाठी व्हावी? आणि टेस्टिंग केल्याशिवाय हे कसे कळावे की बोलण्यात तथ्य आहे की नाही ते. ही टेस्ट सुरु असता चाणक्य ज्यांच्या या प्रकारात काहीच संबंध नव्हता, दुर्दैवाने ते सापडले परंतु आयटीतील त्यांच्या पार्श्वभूमीमुळे जे होते आहे त्याचा अर्थ त्यांना समजला. तुम्हाला तो अजूनही समजत नाही याचे आश्चर्य वाटते.

स्क्रिप्ट लिहिणे हा दोष किंवा गुन्हा नाही. त्यांनी संपादनाला न कळवता त्याचा वापर केला असता तर प्रश्न वेगळा असता. संपादनाने अशा टेस्ट करणे शक्य आहे. एकदा टेस्ट म्हटले की ती फेल होणे किंवा बग निघणे हेही आले. त्याची जबाबदारी संपादन घेते. यावेळीही घेतलेली आहे. टेस्ट ऋषिकेश आणि चाणक्य दोघांवरही केलेली नव्हती. तुम्हाला आणि चाणक्य यांना काय झाले याची योग्य माहिती तत्काळ पुरवली होती. परंतु तुम्ही हा चान्स घेऊन उपक्रमाची बदनामी इतर संकेतस्थळांवर केलीत.

इतकेच नाही तर वरती निखिल यांनी 'प्रयत्न केल्यास मी व्यनीही वाचु शकेन' हे स्पष्ट केल्यानंतरही, इतर सदस्यांनी त्यापासून वाचण्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन केलेले आढळत नाही.

तुम्ही इतर संकेतस्थळांवर ही चर्चा सुरू केलीत. तिथे मार्गदर्शन मिळाले का? अशा मार्गदर्शनासाठी किंवा योग्य कार्यवाही, उपायांसाठी वेळ लागू शकतो ही जाणीव तुम्हाला नाही याचे वैषम्य वाटते.

ही चर्चा केवळ धूळफेक आहे याचा खेद वाटतो आहे. ऐसी अक्षरे आणि मनोगत यांनी या चर्चेला दिलेले योग्य वळण कौतुकास्पद आहे.

असो.

योग्य कार्यवाही, उपायांसाठी वेळ लागू शकतो

- उपायांची वाट पहात आहे.

उपाय

उपाय या चर्चेतच आहेत बहुधा. उपक्रम अपग्रेड करणे हा एक उपाय आहे परंतु त्यासाठी तंत्रज्ञ हवेत आणि वेळही द्यायला हवा आणि ही संपादकांचीच जबाबदारी आहे असे काही नाही. सर्वसामान्य सदस्यही पुढाकार घेऊ शकतात.

तुम्ही मदत करू शकता काय?

तुम्ही मदत करू शकता काय?

माझ्याकडून कोणत्या मदतीची अपेक्षा आहे? मला ते काम जमत असेल तर जरूर करेन.

धन्यवाद!

उपक्रम अपग्रेड करायला हवे ही जुनी ओरड आहे. प्रत्यक्षात तसे होत नाही हे ही सत्य आहे. मी चौकशी करून मग व्यनि* पाठवते.

* उपक्रमावर व्यनि सुरक्षित आहेत. ते हॅकिंग सॉफ्टवेअर बनवायला थोडा वेळ लागेल म्हणत होते जोशी. ;-)

मर्यादा

वापरावर स्वतःच्या मर्यादा हा सर्वोत्तम उपाय वाटतो. जालावर होणारे गुन्हे पाहता कोणती माहिती, किती, कुठे, कशा करिता इत्यादीचा विचार केला जावा असे वाटते. सरसकट बसल्या जागेवरुन किडे करता येतात म्हणून काहीही करु नये हे माझे वैयक्तिक मत आहे.

आजच कार्यालयात एका मित्राने किस्सा सांगितला. कॉलेजातल्या लॅबमध्ये जाऊन एकजण रात्री नकोत्या गोष्टी पहायचा. या पहाणार्‍याला हिस्ट्री सेव्ह होते हे माहित नव्हते. हे झाले अ़ज्ञान. पण त्याच माणसाने उद्या बोंब मारली कि माझा खाजगी वावर इतरांना कळतो, तर तो मुर्खपण समजवा कि बिचारा अज्ञानी होता म्हणून माफ करावे? उपायांची जबाबदारी प्रत्येकाची आहे.






ऋषीकेश

हा प्रस्ताव खरंच इतका निष्पाप होता तर तुम्ही संपादक असलेल्या स्थळावरच का बरे संपादित झाला? ह्याचे प्रामाणिक उत्तर द्या.

मूळ मुद्दा

ज्यामुळे मला माझ्याच व्यनीची यादी थेट संपादकांच्या खरडवहीत दिसू लागली.

आता इतके सगळे झालेच आहे तर कुणी सांगु शकेल का, की खरेच ऋषीकेश ह्यांचा उपक्रमावर असे व्यनि आले होते का?

चर्चा सुरूच आहे तर..

मला दुसर्‍या एका संकेतस्थळावर येण्यासाठी काही विवक्षीत सदस्यांचे व्यनि यायचे. (मी काही गेलो नाही हा भाग वेगळा) ते ही आता सर्वांना दिसतील का?

महाजालावर सुरक्षित असे काहीच नाही...

ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे ऋषिकेशसारख्या महाजालावर मुरलेल्या व्यक्त्तीला असा प्रश्न पडावा हेच दूर्दैव आहे.
धन्यवाद!

प्रतिसाद संपादित.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

काकस्पर्श

दूर्दैव कसले? तुमच्या सारख्या ज्येष्ठ उपक्रमींचा लेखन उपास सोडणे हाच तर त्यांचा उद्देश नसावा?
बाकी हा लेख आल्यापासून आणखीही काही कावळे इकडे घिरट्या घालत आहेत त्यांचाही आत्मा ह्या निमित्ताने थंड व्हावा.

मजा नाय आली

स्क्रिप्ट तयार करण्यात तशी फारशी मजा नाही, कारण ते असल्यास व्यनी वाचून गॉसीप करण्यापेक्षा 'ते मी लिहू शकतो' हे सिद्ध करणे लिहिणारास अधिक महत्वाचे ठरेल, असे असल्यास इथे ऋषिकेश ह्यांनी तो हेतू सफल करुन दिला आहे, अर्थात त्यानेही फारसे काही हाती लागत नाहीच, शस्त्र असून वापरता न येणे (वापरण्याचे स्वातंत्र्य वेगळे) ह्यात मजा नाय.

ह्या निमित्ताने स्क्रिप्टने अजून काय काय साध्य करता येते हे निखिल जोशींनी सांगावे(लेख वैगरे लिहावा, चर्चा करावी), किंवा मनोरंजक चर्चा हवी असल्यास, फोडलेले व्यनी लेखात मांडून पंचनामा करावा.

बेल ऐकली.

आता पुढे मी काय करावे याबद्दल काहीच कल्पना नसल्याने तूर्तास नुसताच बसून आहे.

बेल वाजवल्याबद्दल धन्यवाद

सदस्य ऋषिकेश हे इतर संकेतस्थळांसाठी काय करतात?- त्याच्याशी काही देणेघेणे नाही. त्यांनी ही चर्चा येथे केल्याने असे काही होऊ शकते याची तरी जाणीव झाली. त्याबद्दल त्यांना धन्यवाद.
अबक यांनी अशी स्क्रिप्ट लिहिली, क्षयज्ञ यांनी ती चालवून बघितली हे दोन्ही चूक आहे. व्यक्ती कोण आणि संस्थळ कोणते हे गौण आहे. उद्या इथे नाही तर तिथे, यांनी नाहीतर त्यांनी अश्या स्क्रिप्ट्स लिहून खासगी माहिती मिळवायला कोण बंदी करणार? संस्थळांच्या थंड्या युद्धांमध्ये असे हल्ले होऊ शकतात. या गोष्टींचे कोणतेही समर्थन योग्य नाही. एखाद्या सदस्याला संकेतस्थळामधील तांत्रिक त्रुटींची माहिती नाही म्हणून त्याच्या नकळत त्याची खासगी माहिती (मग ती कितीही क्षुल्लक असो) मिळवणे आणि त्या तांत्रिक त्रुटींची माहिती त्याला नाही म्हणून मूर्ख बनवणे हे लांच्छनास्पद आहे. उपक्रमावर आज दिसणार्‍या डिस्क्लेमर आणि प्रायव्हसी पॉलिसीमध्ये अशा त्रुटींचा कोणताही उल्लेख नाही. आणि इतर संस्थळांवर डिस्क्लेमर/प्रायव्हसी पॉलिसीजमध्ये असा उल्लेख कदाचित असला तरी अशा चोरीची जबाबदारी संस्थळांवर आहेच. एखाद्या बँकेने सेफ डिपॉझिट लॉकर सुविधा द्यायची आणि जर त्यातल्या तुमच्या वस्तूंची चोरी झाली तर आमची जबाबदारी नाही असे कुठेतरी बारीक अक्षरात लिहायचे हे योग्य ठरेल काय? जर एखादी सुविधा संस्थळ-सदस्याला उपलब्ध असेल तर त्यातल्या त्रुटींची जबाबदारी संस्थळ चालकांचीच आहे हे नि:संशय. अन्यथा अशा सुविधा बंद करून टाकाव्यात.

परंतु ही एकप्रकारे इष्टापत्तीच ठरू शकेल.

१. अशी ब्राऊजरसाईड स्क्रिप्ट लिहून आपल्या ख.व. ला भेट देणार्‍या प्रत्येकाची संस्थळाच्या सर्व्हरवर असलेली माहिती कोणी मिळवू शकत असेल तर खरडवही ही सुविधा कायमची बंद करून टाकावी अथवा फक्त खरडवहीत कोणतीही जावा स्क्रिप्ट चालणार नाही असे बदल करवून घ्यावेत. काही ड्रुपल सॉफ्टवेअर तज्ञांना ते करणे शक्य होईल असे वाटते. (कदाचित स्वतः निखिल जोशीच ते करू शकतील.) - हे होऊ शकते का ते मला माहित नाही.
२. असा मूळ ड्रुपलमधील बदल कोणी केल्यास आणि तो सर्वांनाच उपलब्ध करून दिल्यास मराठी संस्थळांचे वापरकर्ते सदस्य त्याचे कायमचे ऋणी राहतील. (जसे - गमभनकारांचे)
३. असे झाले नाही तरी, यापुढे इतर कोणाच्या खरडवहीत लिहीताना "सावधान, इथे स्क्रिप्ट आहे" असा संदेश आपोआप दिसावा अशी काही तरतूद सुचवावी.

****
या प्रकारच्या चर्चेवर मी फक्त उपक्रमावरच प्रतिसाद देत आहे. संपादक मंडळास तो अयोग्य वाटल्यास उडवण्यास काहीच हरकत नाही. धन्यवाद.

नैतिक उच्चासन

अबक यांनी अशी स्क्रिप्ट लिहिली, क्षयज्ञ यांनी ती चालवून बघितली हे दोन्ही चूक आहे... ...एखाद्या सदस्याला संकेतस्थळामधील तांत्रिक त्रुटींची माहिती नाही म्हणून त्याच्या नकळत त्याची खासगी माहिती (मग ती कितीही क्षुल्लक असो) मिळवणे आणि त्या तांत्रिक त्रुटींची माहिती त्याला नाही म्हणून मूर्ख बनवणे हे लांच्छनास्पद आहे.

1. अबक आणि क्षयज्ञ ह्यांनी कुठलीही गोष्ट लपविलेली नाही. त्यामुळे कुणाच्या तरी सांत्वनासाठी नैतिक उच्चासनावर बसून फैसला सुनावण्याला तसा अर्थ नाही. तुम्ही प्रेमळ आहात. पण कुणाला उगी उगी करण्याने परिस्थिती बदलणार आहे काय?

2. आणि मुख्य मुद्दा हा आहे की धागा काढणाऱ्याने जो आततायीपणा आणि तारतम्याचा अभाव दाखवला त्यावरून सदर संकेतस्थळाची बदनामी करण्याच्या हेतू स्पष्ट दिसतो आहे. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल?

3. फक्त ऋषिकेश ह्यांच्या व्यनिंची यादी काबीज झालेली नाही. इतर कुणी का बरे रडारड किंवा आदळआपट केली नाही? ह्याचे ऐतिहासिक कारण शोधायला हवे.

4. जालावर सुरक्षित कसे वावरावे हे गूगलबाबांना विचारल्यास ते लगेच उत्तर देतील. उपक्रमावर वावरणारी मंडळी नक्कीच तितकी साक्षर आहेत असे वाटले होते. असो. आता एखादा मूर्ख बनला तर बनला. त्यासाठी मराठी आंतरजालाच्या ह्या छोट्ट्याश्या डबक्यांमधे किती खळबळ, खळबळ! बहुधा छोट्ट्या डबक्यांना अशाच चोल्लर घटनांची मधूनमधून गरज असते. त्याशिवाय सागराचे आभास कसे होणार?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

नैतिक उच्चासन आणि फैसला?

१. इथे निखिल जोशी आणि प्रियाली ह्यांनी कुठलीही गोष्ट लपविलेली नाही, हे मान्य. पण इतर कुणी इतरत्र (किंवा इथेही) न सांगता असे केलेच नसेल/करणारच नाही का? किंवा करूनही नंतर मान्य केले म्हणून ते योग्य ठरावे का? हे व्यक्तीसापेक्ष नसावे असे मला वाटते. कुणाचे सांत्वन करण्याची मुळात मला तरी गरज नाही. इतक्या साध्या सरळ बाबीत 'नैतिक उच्चासन'- 'फैसला' असले मोठे शब्द वापरण्याची गरजच नाही. मी यत्र-तत्र-सर्वत्र एक सामान्य सदस्य आहे.
२. विविक्षित संस्थळाची बदनामी किंवा कसे याबाबत मला काहीच म्हणायचे नाही. हा धागा ऋषिकेश यांनी इतरत्र या संस्थळाच्या नावानिशी का काढला? त्याचे उत्तर तेच देतील. ड्रुपलच्या त्रुटीबद्दल इन्-जनरल/संस्थळाचे नाव न घेता ते बोलू शकले असते हे मान्य आहे. त्यांचा हेतू त्यांनी मला तरी कळवलेला नाही.
३. ऐतिहासिक कारण - हम्म. तो प्रांत फारच रिसोर्स-हॉगिंग आहे. मागे एकदा कुठेतरी असे व्यनि फुटत असल्याची चर्चा झाली होती. पण त्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते. इथे दिले. इथेच का दिले? त्याबद्दल वाचकांकडून योग्य विचार होईल ही अपेक्षा.
४. एखादा मूर्ख बनला तर बनला असे जनरली म्हणता येणार नाही. निदान मराठी संस्थळांवर जिथे आठरापगड प्रकृतींचे सदस्य येतात त्या सर्वांकडून अशी नेटसाक्षरतेची अपेक्षा सर्वसाधारणपणे बाळगता येणार नाही.... डबके-सागर-नद्या - हे कुठेतरी वाचल्यासारखे वाटते खरे पण लक्षात ठेवण्याजोगे वाटले नाही.

बाकी माझे मत व्यक्त केले, इतकेच. थोडीशी खळबळ कदाचित.

मराठी संस्थळांवर

मराठी संस्थळांवर येणारा सदस्य हा खरंतर थोडा ऍडव्हान्स्ड युजर म्हणायला हवा. एकतर संगणकाचे जुजबी ज्ञान तरी हवे. मग मराठी मध्ये लिहिण्याचे. असो, सदर सदस्य 4 वर्षे 38 आठवडे एवढा जुना आहे उपक्रमावर. आता हे समजायला काही रॉकेट सायन्स लागत नाही. हा कालावधी मला वाटतं बर्‍यापैकी मोठा आहे.





करणार नाही.

इंटरनेटवर "करणार नाही" या शब्दांना फारसे महत्त्व नाही. हॉटमेल हॅकिंगचे सॉफ्टवेअर फारा वर्षांपूवी माझ्या ऑफिसमध्ये लोक बिनधास्त वापरत. फेसबुकही हॅक होऊ शकते तिथे ही लहान-सहान मुक्तस्रोतावर आधारित मराठी स्थळे किस झाड की पत्ती असावी. (हा मराठी साइट्सचा अपमान नाही)

हे कोण करते?

हे कोण करते आहे? त्याकडे लक्ष ठेवून त्याची कृत्ये सदस्यनाम, ईमेल आयडी, आयपी ऍड्रेससह जाहीर करणे हे तरी 'लहान-सहान' मराठी संस्थळावर शक्य असावे. अशा सदस्याला ते संस्थळ निष्कासित करू शकेल.
निदान इथेतरी...? आता माझ्याकडून पुरे.

 
^ वर