भारतीय अभियंत्यांचे सर्वेक्षण

एका पिशवीमधे २० केळी आहेत आणि आणखी कुठलेही फळ नाही. राजीवने त्यातील एक फळ काढल्यास ते फळ केळे असण्याची शक्यता किती?

ह्या अतिसुलभ प्रश्नाचे उत्तर भारतातील ३०% अभियंत्यांनी चुकवले. त्याच बरोबर मोठ्या प्रमाणात अतिसामान्य गणित आणि भाषाविषयक प्रश्नांची अचुक उत्तरे अभियंत्यांना देता आली नाहीत. इंग्रजीचे सोपे शब्द ह्या अभियंत्याना माहित नाहीत. ही माहिती नुकत्याच इंडिया टुडेने छापलेल्या स्टडीमधे देण्यात आली आहे.

जगभरात अभियंते निर्माण करण्यामधे भारत हा आघाडीवर आहे असे समजले जाते. अशावेळेस ही माहिती डोळे उघडणारी आहे. भारतात नुसत्याच डिग्र्या छापल्या जात आहेत आणि दर्जाहीन अभियंते निर्माण केले जात आहेत का? उपक्रमी अभियंत्याचे ह्यावर काय मत? वरिल आकडेवारी त्यांना अपेक्षीत वाटते की धक्कादायक?

इंडीया टुडेचा संपूर्ण लेख इथे वाचा.

लेखनविषय: दुवे:

Comments

अपेक्षित

प्रतिबंधात्मक आणि सामाजिक वैद्यकाच्या तोंडी परीक्षेत माझ्या मित्राने भारताची लोकसंख्या १ करोड सांगितली होती.

दर्जाहीन

teh = the
i = I
u = you
there = their
then = than ex - greater then previous result

हे काही विविक्षित इंजिनिअर्सकडून वापरले जाणारे शब्द आणि स्पेलिंग. हे टायपो नाहीत. चॅट् विन्डो आणि कामाकाजाचे निरोप हे दोन वेगळे फॉर्म्स आहेत, कामकाजाच्या इमेल्स लिहिताना तिथे स्पेलचेकचा वापर करता येतो इतके तरी या इंजिनिअरना कळले तर त्यांच्या भाषेचे ३०-४०% प्रश्न सुटतील असे वाटते.

माझा स्वतःचा अनुभव सांगायचा तर मध्यंतरी उपलब्ध डेट्याच्या वर्गमूळ+१ डेटा टेस्टिंगसाठी वापरायचा असे ठरवले होते. नंतर लक्षात आले की तोंडी सांगितलेले हे प्रमाण अनेकांना कळलेच नव्हते असे वापरताना लक्षात आले. प्रत्यक्ष काम करणार्‍यांना त्याचा अर्थ उदाहरण घेऊन (म्हणजे टेबलवर काउंट स्टार मारा रे....) १ पेक्षा अधिकवेळा समजावून द्यावा लागला.

भारतात सर्वत्र नाही पण नक्कीच अशी डिग्र्या छापण्याची मशीन्स कॉलेजेस आहेत असे वाटते.

अपेक्षितच

आजकाल काही आंतरजालिय गुर्जींचे लेखन वाचुन मला भारतीय अभियंत्याविषयी हे अपेक्षितच वाटले.

कळले नाही

आजकाल काही आंतरजालिय गुर्जींचे लेखन वाचुन मला भारतीय अभियंत्याविषयी हे अपेक्षितच वाटले.
काही संदर्भ लागला नाही. कृपया समजावून सांगावे. कारण गुर्जी म्हटले इतरांपेक्षा थोडे अधिकच येत असणे अपेक्षित असते. असो. बाकी सुमारीकरणाच्या बाबतीत सन्जोप रावांशी सहमत. सगळीकडेच सुमारपणा आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

गुर्जी

विनायक रावांचा रोख ज्यावर आहे असे वाटते तोच असेल तर त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. काही ठीकाणी थोडे जास्तच सुमारीकरण झाले आहे असे वाटते. (ते बुडाचे हाड वगैरे वाचले नाहीत काय?). जाऊ दे, इकडेही त्यांचा कळप फिरत असतो, पुन्हा मागे लागायचे.

अन्वय-संदिग्धता, हा तर प्राचीन विश्लेषणाचा विषय

वरील संदर्भ मला ठीक कळला असल्यास...

"वाक्यातील पदांची अन्वय-संदिग्धता असू शकते काय आणि ती शब्दांच्या क्रमाने कमी-अधिक होऊ शकते काय?" हा तर प्राचीन आणि अर्वाचीन विश्लेषणाचा विषय आहे. यात विशेष सुमार असे काय आहे?

सुमार

त्यासाठी निवडलेले वाक्य,विषयाची मांडणी आणि ओढून ताणून केलेली विनोद निर्मिती किंवा करण्याचा प्रयत्न हा मला अतिसुमारपणा वाटतो. विशेषतः उच्चभ्रुपणाचा आव आणुन काढलेल्या मंचावर. (अर्थात त्यातही सहभाग घेणारे आहेतच) सॅम्स क्लब वगैरे तत्सम ठिकाणी फिरल्याने मळमळायला लागते.. मग वॅन् गॉची चित्रे बघुन शांत होतो असे लिहिणार्‍या उच्चभ्रु प्रतिभेसमोर हे अतिसुमारच आहे.

(बाकी तो प्रकार सुमार आहे का? ही शंका तुम्हाला यावी याचे मात्र आश्चर्य वाटले. असो माझीच काहीतरी गफलत झालेली दिसते, फारंच दर्जेदार प्रकार असावा.)

त्या धाग्यात मी प्रतिसाद दिलेला आहे

त्या "मौजमजा" धाग्यात मी प्रतिसाद दिलेला आहे. इतकेच काय, त्या धाग्याचे मूळ अन्य (बिगरमौजमजा) धाग्यातील एक अभावित वाक्य-पद-क्रम-प्रमाद आहे.

अभावित आणि विनोदी वाक्य-पद-क्रम-प्रमाद हा "पार्सिंग एरर/संदिग्धता" चर्चेसाठी सुयोग्य मूळ आहे, असे माझे मत आहे. पद-क्रम-संदिग्धतेबाबत मौजमजेची चर्चा मला सुमार वाटत नाही, असे मी वर म्हटलेच आहे.

त्या धाग्यातील माझ्या प्रतिसादावरून पद-क्रम-संदिग्धतेबाबत माझे गंभीर मतही कळून यावे. (मौजमजेचा धागा आल्यामुळे प्रतिसादात फक्त उदाहरण दिलेले आहे, विस्तृत विश्लेषण दिलेले नाही.)

ठीक

मौजमजा म्हणून धागे काढायलाही काही हरकत नाही. वाक्य-पद-क्रम-प्रमादातुन विनोद करायलाही हरकत नाही. पण सदर उदाहरणातील मौजमजा मला काही दर्जेदार वाटली नाही. ज्यांना आवडली त्यांनी त्याचा लुत्फ अवश्य घ्यावा. (मला स्वतःला सटायर हा विनोदी प्रकार भयंकर आवडतो, पण म्हणून सुमार दर्जाचे रटाळ सटायरही केवळ ते सटायर आहे ह्या निकषावर आवडणार नाही. थोडक्यात, 'मौजमजा आहे', 'वाक्य-पद-क्रम-प्रमाद आहे', वगैरे सबबीखाली मुळचे सुमारपण नाहीसे होणार नाही.)

एक निरिक्षण

कोब्याजी,
ती चर्चा व ते वाक्य्, इतर चर्चेतील प्रतिसादात (संपूर्णपणे वेगळ्याच संदर्भात) अनवधानाने लिहिले गेले होते. त्या वाक्याची, एका तीक्ष्ण निरिक्षण अन् विनोदबुद्धी असलेल्या इतर सदस्याने विरामचिन्हांची जागा बदलून टोपी उडविल्याने उपचर्चा सुरू झाली होती. त्यावरून बुडाचे हाड् अशा शीर्शकाची चर्चा आली. चर्चेसाठी वा शीर्षकासाठीही ते वाक्य अभिरुचीहीन आहे असे मलाही प्रथमदर्शनी वाटले होते, पण मूळ वाक्य कुठून आले ते वाचल्या नंतर माझा ग्रह बदलला.

बुडत्याला बुडाचा आधार

नुकतेच वाचले. हाहा. मजेदार. बुडत्याला बुडाचा आधार. दुसरे काय. हाहा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अनुभव

हे फक्त अभियंत्यांच्या बाबतीत आहे असे नाही. सुमारीकरणाचा हा अनुभव सगळीकडेच येतो आहे.
सन्जोप राव
हम तुझे वली समझते, जो ना वादाखार होता

+१

सहमत आहे. केवळ अभियंतेच नाही तर डॉक्टर्स, शिक्षक(!) वगैरे क्षेत्रातही अश्याच प्रकारची स्थिती आहे.
इतकेच नव्हे तर केवळ भारतात नाही तर इंग्रजीच्या जन्मभुमीतही असे होत असतेच.

माझ्याबरेच वर्षे अमेरिकेत राहिलेल्या आणि आता तेथील नागरीक असणार्‍या एका परिचिताचे (अनुभवसिद्ध) मत आहे की भारतापेक्षा इंग्लंड किंवा अमेरिकेत 'तयार' झालेल्या अभियंत्यांचे प्रेझेंटेशन स्किल व अन्य 'सॉफ्ट' स्किल्स अधिक चांगली असली तरी इंग्रजी भारतीय विद्यार्थ्यांपेक्षा व्याकरणाच्या दृष्टीने अगदीच सुमार असते.

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

गणिताच्या सुमारीकरणाचा आलेख!

(थोडेसे अवांतर -)

गेल्या 50 वर्षात शाळेतील गणित शिकविण्याच्या पद्धतीत फार मोठा बदल झाला आहे हे आपल्याला मान्य करावे लागेल. एका सोप्या प्रश्नातून हा बदल कसा होत गेला हे आपल्या लक्षात येईल:

1960 साली: एक शेतकरी 100 रुपयाला आपली भाजी बाजारात आणून विकतो. त्याच्यात 4/5 वाटा त्याच्या श्रमाचा आहे. त्याला किती फायदा झाला?

1970 साली: एक शेतकरी 100 रुपयाला आपली भाजी बाजारात आणून विकतो. त्याच्यात 4/5 वाटा त्याच्या श्रमाचा आहे. म्हणजे 80 रुपये. त्याला झालेला फायदा:
अ) 0 रुपये, आ) 100 रुपये, इ) 20 रुपये?

1980 साली: एक शेतकरी 'क्ष' रुपयाला आपली भाजी बाजारात आणून विकतो. व 'क्ष' चे मूल्य 100 असल्यास तेवढे बिंदू दाखवून त्याचा आरेखन करा. त्यात 'य' मूल्य त्याच्या श्रमासाठीचे आहेत व 'य', 'क्ष' पेक्षा 20 बिंदूने कमी आहे. 'क्ष' मधून 'य' वजा केल्यास 'ज्ञ' हा त्या शेतकऱ्याचा फायदा असेल. 'ज्ञ' चे मूल्य किती?

1990 साली: एक शेतकरी 100 रुपयाला आपली भाजी बाजारात आणून विकतो. त्यात त्याचे श्रम मूल्य 80 रुपये व फायदा 20 रुपये. संगणकातील FARMER हा प्रोग्रॅम वापरून 20 रुपये फायदा बरोबर की चूक हे शोधून काढा. (तुम्हाला FARMER प्रोग्रॅम वापरायला अडचणी येतात का?)

2000 साली: एक शेतकरी 100 रुपयाला आपली भाजी बाजारात आणून विकतो. त्याचे श्रममूल्य 120 रुपये आहे. क्रिएटिव्ह अकौंटिग्स पद्धत वापरून त्याला 50 रुपये फायदा झाला असे दाखवा.

2010 साली: एक शेतकरी (एका दुसऱ्या शेतकऱ्याची) भाजी विकण्यासाठी बाजारात जातो. विकल्यानंतरचे सर्व पैसे स्वत:च्या चैनीसाठी उडवण्याचा बेत करतो. अशा स्वार्थी शेतकऱ्याला कसा धडा शिकवावा? थंड डोक्यानी विचार करून उत्तर द्यावे.

हाहाहा!

सकाळी सकाळी चांगला विनोद वाचला. ;-) जेथे गणिताचेच सुमारीकरण झाले आहे तेथे विद्यार्थ्यांनाच दोष का बरे द्यावा!!

+१

:)

मस्त

हाहाहा.
या विनोदाच्या अमेरिकन आवृत्त्यासुद्धा छान आहेत, उदा. The Evolution of Teaching Math, History of Math Word Problems, इ.

लाकूडतोडयाचे गणित

वरील लाकूडतोडयाच्या गणिताचे सर्वात अलीकडील स्वरूप मी वाचलेले होते ते स्मरणामधून देतो.

एक लाकूडतोडया लाकडे तोडण्यासाठी जंगलात गेला.. तेथे त्याने दोन झाडे तोडली आणि त्यांची जळणासाठी लाकडे करून ती बाजारात विकली. ह्यामुळे जंगलातील अश्राप पशुपक्ष्यांच्या जीवनपद्धतीचा विनाश झाला, पर्यावरणाला कायमची इजा झाली आणि लाकडे जाळण्यामुळे कर्ब वायु वाढून जागतिक हवामानावर विपरीत परिणाम झाला. लाकडे विकून लाकूडतोडयाने ५० डॉलर्सची कमाई केली.

वर वर्णिलेले अपाय आणि ५० डॉलर्स ह्यांची तुलना करून हा व्यवहार लाभदायक ठरेल का ह्याबद्दल तुम्हास काय वाटते? तुम्ही स्वत: असे कराल का?

(टीपः उत्तर न सुचल्यास आर्थर अँडरसनचा सल्ला घ्या.)

सुमारीकरण

सुमारीकरण झाले आहे हे मान्य आहे. पण तरीही ३०% हा आकडा इतक्या सोप्या प्रश्नासाठी धक्कादायक नाही तरी आश्चर्यकारक तरी वाटतो.

माझं मत

चर्चा प्रस्ताव मांडताना कोणतीही कल्पकता, स्वतःचे कसलेही इनपुट्स न घालता सोबत दिलेल्या दुव्यावरील बातमीचा केवळ अनुवाद करण्यात आलेला आहे. असो!

एका छोट्याशा उदाहरणावरून भारतीय अभियंत्यांना / विद्यार्थ्यांना कमी लेखण्याचा केलेला प्रयत्न अयोग्य वाटतो.

माणसाचा मेंदू संगणकासारखाच काम करतो. जसे संगणकात विशिश्ट हेतू ध्यानात ठेवून बनवलेल्या कॅलक्यूलेटर, नोटपॅड, स्प्रेडशीट, पावरपाँईंट, पीडीएफ फाईल ह्या सारख्या वेगवेगळ्या प्रणाली कार्यरत असतात. एका सॉफ्टवेअर मधून दुसर्‍या सॉफ्टवेअर जाणं, केलेलं काम घेवून रुपांतरीत करणं सोपं असतं तसं मात्र प्रत्येक वेळी मेंदूच्या बाबतीत होत नाही, सहजपणे होत नाही. भाशा, गणीत इत्यादी गोश्टी करायच्या झाल्या तर आधी त्या-त्या अवस्था मेंदूत व्हायला हव्यात. लगेच स्वीच-ऑफ-स्वीच-ऑन होणं काहिसं जिकरीचं असतं.

वर उल्लेखलेल्या बातमीमध्ये माझ्या मते घातलेलं कोणतेही कोडं सोडवण्यापूर्वी कोणताही माणूस कळत-नकळतपणे अगोदर ते कसे मांडले आहे हे पाहतो. गणीताची वर्णचिन्ह त्यात आहेत कां? गणीतीपद्धतीने असेल तर ते कशाप्रकारे सूत्रबद्ध आहे? किंवा त्या कोड्यात भाशेशी संबंधित वर्णचिन्ह आहेत कां? हे पाहिलं जात असावं. गणीती चिन्हांमध्ये देखील वर्गवारी असते. भाशेशी संबंधित रचना देखील गद्य व पद्य अशी ढोबळपणे आहे का ते पाहिले जात असावे. जी व्यक्ती गणीताशी जास्त संबंध ठेवून असते तीच्यासाठी भाशेतील रचना किंवा भाशेशी संबंधित व्यक्तीला गणीताशी संबंधित रचना काला अक्शर भैंस बराबर वाटत असावे. ह्याला काहि अपवाद असू शकतात. (हे जे अपवाद असतील ती मंडळी ते कोडं लवकर सोडवतील किंवा सोडवण्याचा प्रयत्न करतील.)

पण जे लिहीलेलं वा म्हटलेलं आहे ते समजून घेण्यापूर्वी समोरची व्यक्ती आपल्याला फसवू तर पाहत नाही नां? असा उदाहरण म्हणून विचार वाचणार्‍याचा वा ऐकणार्‍याच्या मनात येवू शकतो. ह्या प्रकारेच जो कोणताही पहिला विचार मनात येतो तो वैचारीक स्तरावरील पुढील घटनांना आकार देत जातो/ जात असावा. हाऊ वुई पअरसीव सब्जेक्ट फर्स्ट दॅट मे शेप द अल्टीमेट आऊटपूट ऑफ द मॅटर.

याचसाठी भाशेची शिक्शा (प्रचलितः शिक्शण) शाळेत देताना विद्यार्थ्यांना तर्कशास्त्राची, मनोव्यापाराबाबतची माहिती देखील दिली जायला हवी. तसे झाले तर लहानपणापासूनच एखादी गोश्ट आकळण्यापूर्वी मेंदूरूपी संगणकातील कोणता प्रोग्रॅम कधी चालू करायचा आहे? त्याबाबतचा स्वीच-ऑन-स्वीच-ऑफचा सराव होवू शकेल.

सुमारीकरण आणि अचूकतेचा अनाग्रह

हाऊ वुई पअरसीव सब्जेक्ट फर्स्ट दॅट मे शेप द अल्टीमेट आऊटपूट ऑफ द मॅटर.इइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइ इइइइइ इइइइ इइइइ इइइइ इ
How we first perceive the subject may shape the ultimate output of the matter.

प्रतिसाद

अरे वा! माणसं कशी सोयीनुसार शब्दांचे अर्थ बदलत असतात!

याच संकेतस्थळावर एका विशयात* अचूकतेबाबत आग्रह धरला असता, पाश्चात्यांच्या सोयीनुसार असलेल्या व्यवस्थेची भलामण करीत तेच कसे योग्य आहे असे सांगितले जाते. * (वर्श, महिना ह्यांचे कालमापन जर पृथ्वीच्या सूर्यप्रदक्शिणेशी संबंधित असते तर सार्वजनिक सुट्टी देखील चंद्राच्या पृथ्वीप्रदक्शिणेशी संबंधित कां बरे असू नये? ह्या बाबत तर्कसुसंगत विचाराबाबत)

मजकूर संपादित. उपक्रमावर लिहिताना विषयांतर होणार नाही आणि सदस्यांच्या व्यक्तिगत माहितीचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्यावी.

अपेक्षित

>>एका पिशवीमधे २० केळी आहेत आणि आणखी कुठलेही फळ नाही. राजीवने त्यातील एक फळ काढल्यास ते फळ केळे असण्याची शक्यता किती?

>>ह्या अतिसुलभ प्रश्नाचे उत्तर भारतातील ३०% अभियंत्यांनी चुकवले.

शाळेत हाच प्रश्न विचारल्यास साधारण एवढीच मुले चकतील, त्यामूळे आश्चर्य वाटले नाही.

आश्चर्य

शाळेतील मुले = इंजिनियर्स अशी अवस्था सध्या असेल तर विषयच संपला.

होय

>>शाळेतील मुले = इंजिनियर्स
चूकण्याच्या(चकण्याच्या) प्रमाणात, होय.

?

म्हणजे इंजिनियर्सचे गणिताचे ज्ञान, प्रॉब्लेम सॉल्विंग स्कील वगैरे शाळकरी मुलांइतकेच असते का? मग कशाला हवी इंजिनियरिंगची डिग्री?

सर्वेक्षण

>>म्हणजे इंजिनियर्सचे गणिताचे ज्ञान, प्रॉब्लेम सॉल्विंग स्कील वगैरे शाळकरी मुलांइतकेच असते का?<<
वरील सर्वेक्षणातील ३०% अभियंत्यांचे तरी तसेच दिसते खरे.

>>मग कशाला हवी इंजिनियरिंगची डिग्री? <<
हा प्रश्न वेगळा आणि महत्वाचा.

प्रति

वरील सर्वेक्षणातील ३०% अभियंत्यांचे तरी तसेच दिसते खरे.

म्हणुनच ते आश्चर्यकारक वाटले. इंजिनियर्स=शाळेतील मुले म्हणून हे अपेक्षित आहे असे तुमचे विधान होते. माझ्या मते इंजिनियर्स आणि शाळकरी मुलांमधे फरक असावा, तो नसल्यास माझ्यासाठी ते 'अपेक्षित' नसेल.

भारतीय अभियन्ता परीक्शा.

एकन्दर सर्वच विद्यार्थ्यान्ची हीच परिस्थिती आहे.

भारतीय अभियंत्यांचे सर्वेक्षण

"एकन्दर सर्वच विद्यार्थ्यान्ची हीच परिस्थिती आहे" प्रतिसादाशी सहमत आहे.

जनभारती

 
^ वर