देशद्रोह नक्की कशास म्हणावे?

पाकिस्तानातील न्यायालयाने नुकतीच डॉ. शकील अफ्रिडी ह्या व्यक्तीस देशद्रोहाच्या आरोपाखाली दोषी ठरवून ३३ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.

डॉ अफ्रिडी याच्यावरील आरोप - त्यांनी अबोटाबाद येथे लसीकरणाची मोहीम चालवली. जिचा मूळ उद्देश मात्र वेगळा होता. लसीकरणाचे निमित्त साधून ओसामा बिन लादेन ह्याच्या घरात प्रवेश करायचा आणि त्याचे रक्ताचे नमुने CIA ला पाठवायचे. त्या अधारावर अमेरिकेला DNA टेस्ट करून तो ओसामाच आहे याचे खात्री करायची होती. अमेरिकेच्या ह्या कटात सामील होऊन त्यांनी पाकिस्तानशी देशद्रोह केला, असे न्यायालयाने मान्य केले आहे.

ह्यात डॉ अफ्रिडी देशद्रोही आहेत असे उपक्रमींना वाटते काय? किंबहुना देशद्रोह नक्की कशास म्हणावे?

असा विचार करता येईल की - अल कायद्याविरुद्धच्या अमेरिकेच्या लढ्यात पाकिस्तान अधिकृतपणे सामील होता. अशा वेळी, डॉ अफ्रिडी यांनी अल कायद्याच्या विरोधात केलेले कृत्य देशद्रोहाचे का ठरावे?

शिवाय असाही विचार करता येईल की - कारण काहीही असो, तुमच्या देशात राहणार्‍या व्यक्तीची (तोपर्यंत ती व्यक्ती ओसामाच आहे, हे निर्विवादपणे सिद्ध झालेले नव्हते) माहिती परक्या देशाच्या गुप्तहेर संघतनेला देणे, हा देशद्रोहच आहे. समजा तो ओसामा निघाला नसता तर?

उपक्रमींचे विचार जाणून घ्यायला आवडतील.

लेखनविषय: दुवे:

Comments

देशद्रोह म्हणता यावे

पाकिस्तानचा दुटप्पीपणा, अमेरिकेचे बोटचेपे धोरण बाजूला ठेवून मत देते की या गोष्टीला देशद्रोह म्हणता यावे.

असा विचार करता येईल की - अल कायद्याविरुद्धच्या अमेरिकेच्या लढ्यात पाकिस्तान अधिकृतपणे सामील होता. अशा वेळी, डॉ अफ्रिडी यांनी अल कायद्याच्या विरोधात केलेले कृत्य देशद्रोहाचे का ठरावे?

जर लसीकरणाच्या माध्यमातून इतर बातम्या काढण्यासाठी आफ्रिदींची नेमणूक सरकारने केली असती किंवा आफ्रिदींना ओसामाचा पत्ता लागल्यावर त्यांनी पाकिस्तान सरकारला त्याबाबत कळवले असते तर याला देशद्रोह म्हणता येवू नये. परंतु असे झाले नसल्यास त्यांनी डायरेक्ट सीआयएला गाठले असल्यास, सरकारच्या लेखी हा देशद्रोह असावा.

चांगली माहिती

माहिती आवडली. त्यात चर्चा करण्यासारखे काय आहे हे कळलं नाही.
तुम्ही मांडलेल्या प्रस्तावातील शेवटून दुसर्‍या परिच्छेदातच देशद्रोह कशाला म्हणायचे, याचे उत्तर देवून ठेवले आहे. - कारण काहीही असो, तुमच्या देशात राहणार्‍या व्यक्तीची (तोपर्यंत ती व्यक्ती ओसामाच आहे, हे निर्विवादपणे सिद्ध झालेले नव्हते) माहिती परक्या देशाच्या गुप्तहेर संघटनेला देणे, हा देशद्रोहच आहे.

पण खरंच अमेरिकी गुप्तचर यंत्रणेच्या कल्पकबुद्धीचं कौतुक वाटलं. एखाद्या शहरात मोहिमेअंतर्गत संशयित व्यक्तीला हुडकून काढण्याहेतूने रक्ताचे नमुने मिळवण्यासाठी थेट सरकारी व्यक्तीलाच (असा माझा समज होतोय) गाठायचे व एखाद्या इच्छित व्यक्तीचा रक्तनमुना मिळवणं ही कल्पना छान आहे.

कारण

सदर डॉक्टरने पाकिस्तानी संघटनांना अंधारात ठेवले होते. त्यासाठी त्यांना देशद्रोही ठरवले आहे. (असे समजतो) सीआयए मदत म्हणून नव्हे!

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

देशद्रोह -

ज्या कृत्याने देशाची अब्रू चव्हाट्यावर येते , देशाचे आर्थीक नुक्सान होते, देशातील जनतेची फसवनूक होऊन त्यांना त्रास होतो
त्या कृत्याला देशद्रोह म्हन्ता येयील (ढोबळ मानाने).

ओसामाच्या बाबतीत - त्या डॉक्टरने आपल्या देशातील देशद्रोह्याला हुडकून काढन्यासाठी अमेरीकेला मदत केली (त्यासाठी त्याला तिथले कानूनकायदे मोडावे लागले).

माझ्या मते डॉक्टर हा देशद्रोही नाही (जर ओसामा हा पाकीस्तान्च्या दृष्टीने देशद्रोही असेल तर).

त्या डॉक्टरच्या कृत्याने फक्त अमेरीकेलाच नव्हे तर पाकीस्तानला देखील फायदा झाला आहे त्यामुळे तो डॉ. देशद्रोही नाही.

---------------------
-धनंजय कुलकर्णी

स्थलकालसापेक्ष

देशद्रोह् ही स्थलकालसापेक्ष कल्पना आहे. त्यामुळे स्थळाचे वा काळाचे संदर्भ बदलले तर देशद्रोहाची व्याख्यादेखिल बदलते.

आदिलशहाच्या दृष्टीने शिवाजी हा देशद्रोहीच होता किंवा ब्रिटिशांच्या दृष्टीने अनेक क्रांतीकारकही देशद्रोहीच होते.

त्यामुळे, आज पाकिस्तानच्या दृष्टीने डॉ अफ्रिडी देशद्रोही आहेत्, हे मान्य्. आणि म्हणूनच त्यांना झालेली शिक्षा त्यांनी भोगणे हेदेखिल योग्यच. परंतु, व्यापक जागतिक दृष्टीकोनातून् पाहिले तर्, उद्या त्यांना तसे कोणी देशद्रोही मानणार नाही.

(आणि आता ही बातमी जाहीर झाल्यानंतर तर, ते बाहेर असण्यापेक्षा आतच जास्त सुरक्षित राहतील!!)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

व्यक्ती तितकी मते

सुनील-जी,
हा विषयच असा आहे कीं त्याला "व्यक्ती तितकी मते" हाच नियम लागू करावा लागेल.
माझ्या मते डॉ. अफ्रीदींच्यावर खटला भरण्याआधी स्वतःची खुर्ची टिकविण्यासाठी "वॉर ऑन टेरर"मध्ये पाकिस्तानला गुंतवून, दुतोंडी धोरण हाकणार्‍या मुशर्रफला न्यायालयात खेचायला हवे आहे. त्याच्या पाठोपाठ त्यांच्या फौजेमधल्या/ISIमधल्या अधिकार्‍यांचा नंबर लागेल व सर्वात शेवटी डॉ. अफ्रीदी!
एका पाकिस्तानी खासदाराचे एक वेगळेच मत इथे वाचा.
http://www.thenews.com.pk/Todays-News-9-110393-Treason-and-small-change-...
सुधीर काळे

मुशर्रफ सोडा

मुशर्रफ सोडा. सध्या शिक्षा झालेले डॉ अफ्रिडी आहेत. त्यांनी देशद्रोह केला किंवा नाही? यावर तुमचे मत काय, ते सांगा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

बलवान लोकांना सोडून बलहीन लोकांच्या मागे लागायचे हे चुकीचे आहे

बलवान लोकांना सोडून बलहीन लोकांच्या मागे लागायचे हेच मला चुकीचे वाटते.
मुशर्रफ यांनीच ओसामाला ती जागा दिली असावी असे मला वाटते कारण त्यावेळी मुशर्रफ सर्वेसर्वा होते. त्यांच्या निवडक "चमच्यां"नासुद्धा (यात कयानी आणि पाशा हेसुद्धा त्यात असण्याची शक्यता आहे) ही गोष्ट माहीत असणारच! मग देशद्रोही कोण?
आज मुशर्रफ परत आले तर त्यांना अटक होईल असे समजले जाते. याची शहानिशा कयानींच्याकडे करूनच जानेवारीत एकाद्या वीरासारखे पाकिस्तानला परतायचे बेत त्यांनी बदलले. मग बिचार्‍या अफ्रीदीला कशाला छ्ळायचे?
इथेही गमतीची गोष्ट अशी कीं कयानी आज जरदारी/गिलानींना रिपोर्ट करतात (कागदावर) मग मुशर्रफ यांना सल्ला दिल्याबद्दल त्यांच्यावरही कोर्टमार्शल नको का व्हायला?
अफ्रीदी हे एक प्यादे आहे. त्याची कशाला चर्चा करायची? वजीर किंवा राजाला पकडायला नको कां?
विषयांतर करायचे म्हणून मी हे लिहीत नाहींय्. या मुद्द्याचा विचार होणे आवश्यक आहे!
एक देश या नात्याने पाकिस्तान जर ओसामाला गुन्हेगार मानतो (मुशर्रफच्या काळापासून) तर त्याच्याबद्दल माहिती दिली तर तो देशद्रोह कसा? त्यांना तर मेडल द्यायला हवे असे मला वाटते. जे पाकिस्तानी फौजेला जमले नाहीं ते या डॉक्टरने करून नाहीं का दाखविले? मग मेडल का नको?
----------------
सुधीर काळे

पाकिस्तानकडून काय अपेक्षा ठेवायच्या

डॉ. आफ्रिदी देशद्रोही वाटत नाहीत. पाकिस्तान हे राष्ट्र सुसाइडबॉम्बरच्या मोडमध्ये आहे. आता त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

होय

पाक कायदा माहीत नाही, पण देशद्रोह कशाला म्हणायचा याचा तार्कीक विचार केल्यास डॉ. शकील अफ्रिडी हा देशद्रोही आहे असेच वाटते. कारण काही झाले तरी त्याने परकीय गुप्तहेर संघटनेस मदत केली होती. ती देखील जर लसीकरणाच्या मोहीमेच्या नावाखाली केली असेल तर सरकारी अनुदान* मिळालेले असणार. म्हणजे सरकारी पैसा वापरून इतर देशाच्या गुप्तहेर संघटनेस मदत केली... (*आता ते कदाचीत युएसएड / अमेरीकन अनुदान असण्याची शक्यता जास्त आहे हा वेगळा भाग झाला.)

पण त्याने जे केले ते अतिरेक्याला पकडून देण्यासाठी केले होते, ज्याच्या विरुद्ध चाललेल्या अमेरीकन युद्धास पाकीस्तानचा पाठींबा आहे. इतकेच नव्हे तर त्यासाठी बर्‍याचदा पाकीस्तानने स्वतःच्या हद्दीत, स्वतःच्या (अगदी निष्पापसुद्धा) लोकांच्या विरोधात वापरल्या गेलेल्या अमेरीकन द्रोण अस्त्रांकडे पण दुर्लक्ष केले आहे, तसे वापरणे मान्य केले आहे. अर्थात डॉ. शकील अफ्रिडी ज्या न्यायाने देशद्रोही ठरतात त्याच न्यायाने पाकसरकार देखील देशद्रोही ठरते...

मुशर्रफ ते अफ्रीदी अशा सार्‍यांना 'लायनी'त शिक्षा व्हायला हवी

विकास-जी,
मीही हेच म्हणत आहे. राजा-वझीराला सोडून प्याद्यावर कशाला आधी खटला भरायचा आणि त्याला कशाला आधीच शिक्षा सुनवायची? सार्‍या देशद्रोह्यांना (मुशर्रफ ते अफ्रीदी अशा सार्‍यांना) 'मानापमाना'नुसार क्रमाने शिक्षा व्हायला हवी!
----------------
सुधीर काळे

खटला आणि शिक्षा

परत, पाकीस्तानातले माहीत नाही, पण (कदाचीत अपवाद सोडल्यास) कोर्ट आपणहून कुणावर खटला भरत नाही... येथे सरकारने खटला भरला आणि कोर्टाने कायद्यानुसार शिक्षा केली... पाक जनतेस/संघटनेस सरकार विरोधात असाच खटला भरायचा हक्क असू शकेल कदाचीत, पण ते तो वापरणार आहेत का?

मुशर्रफ यांना अटक करण्यासाठी वॉरंटही काढलेले आहे....

सध्या सत्तेवर असलेल्या सरकारला मुशर्रफ सारख्या पदच्च्युत अध्यक्षांवर तसेच कयानी-पाशासारख्या सेनाधिकार्‍यांवर खटला भरायचा हक्क आहे. बेनझीरच्या हत्त्येला कारणीभूत असल्याबद्दल मुशर्रफ यांना अटक करण्यासाठी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने वॉरंटही काढलेले आहे....
----------------
सुधीर काळे

वेगळे कारण पुढे

डॉ. आफ्रिदीच्या देशद्रोहाचे वेगळे/नवे कारण पुढे आलेले/केलेले दिसते. डॉ. आफ्रिदीने लष्करे इस्लाम ह्या प्रतिबंधित संघटनेला 20 लाख रुपयांची मदत केली म्हणून त्यांना ही शिक्षा झालेली/केलेली आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आफ्रिदी देश्द्रोही आहेत?

पाकिस्तानातील कायद्याप्रमाणे असावेत.पण त्यानी एक चान्गले काम केले.

हा दुवा वाचा!

हा दुवा वाचा!

http://www.thenews.com.pk/Todays-News-9-111770-Our-capacity-for-manufact...
----------------
सुधीर काळे

 
^ वर