ब्लूम बॉक्स

ऊर्जानिर्मिति क्षेत्रातील शास्त्राचे काहीच ज्ञान नसलेल्या चौकस व्यक्तीची शंका म्हणून तज्ज्ञांकडून पुढील समस्येचे काही स्पष्टीकरण मिळेल अशी अपेक्षा आहे.

गेले दोन-अडीच वर्षे के.आर.श्रीधरन ह्या मूळ भारतीय संशोधकाने निर्माण केलेल्या ब्लूमबॉक्स तंत्राचा बराच बोलबाला ऐकू येत आहे. वाळू-सिलिकापासून तयार केलेल्या सेल्समधून ब्लूमबॉक्स संच वापरून घरच्याघरी पुरेशी वीज निर्माण करता येते असा ह्या तंत्राचा दावा आहे एव्हढे मला कळले. 60 Minutes, Fortune Magazine अशा दादा प्रकारच्या प्रसारमाध्यमांमधून त्याचे कौतुक झाले आहे. गूगल, वॉलमार्ट सारख्या बडया कंपन्या ते तंत्र वापरत आहेत असेहि दिसते.

हे सर्व जर खरे असले तर एव्हांना ह्या तंत्राने जगात हलकल्लोळ माजवायला हवा होता कारण जगापुढच्या ऊर्जासमस्येवर तो रामबाण उपाय दिसतो. ह्याउलट तंत्रात काही घोटाळा असला अथवा ते व्यापारी तत्त्वावर वापरता न येण्यासारखे असले तर ती गोष्टहि पुढे यायला हवी होती. पण ह्या दोनांपैकी काहीच अजून घडलेले नाही. असे का?

जालावर बर्‍याच ठिकाणी ह्याची माहिती दिसते. त्यावरचा विकिपीडियामधील लेख येथे आहे आणि श्रीधरन ह्यांचे विवेचन यूटयूबवर येथे आहे. तरीहि वरील साध्या पण obvious प्रश्नाचे उत्तर मात्र कोठेच दिसत नाही. हे कोडे मला उलगडत नाही.

लेखनविषय: दुवे:

Comments

जुनी चर्चा

येथे या विषयावरील एक धागा आहे.

आर्थिक आवाका

त्यांच्या संकेतस्थळावर सर्व्हर् विकायला ठेवले आहे पण् त्यांची किंमत दिलेली नाही. मला वाटते कि ते खुप महाग असावेत् आणि ते सर्वसामान्यांच्या आवाक्यात् येई पर्यंत् थोडा वेळ् लागु शकेल्.

म्हणुन् मला असे वाटते कि जगापुढच्या ऊर्जासमस्येवर तो रामबाण उपाय आहे पण् सर्वसामान्यांच्या आवाक्यात् नाही :(

अभिजीत राजवाडे

 
^ वर