ब्लुम उर्जा

एका भारतीय शास्त्रज्ञाने शोधलेला हा उर्जा पर्याय सर्वांनी निश्चितच विचार करण्यासारखा आहे.
त्याच्याबद्दल यु ट्यूब वरील माहिती इथे मिळेल.अणु उर्जा,जपान मधील अपघात, जैतापूर प्रकल्पानिमित्ताने सरकारने जनतेची चालवलेली नाडणूक आणि फसवणूक यावर चर्चा सुरु असतांनाच हा दुवा सापडला.
http://www.youtube.com/results?search_query=bloomenergy+60+minutes&aq=0
त्यांची वेब साईट इथे आहे.
http://www.bloomenergy.com/

लेखनविषय: दुवे:

Comments

अहो पण

त्याला पण पेट्रोल किन्वा डिझेल लागतच ना!!

टू अर्ली टू कमेण्ट

येथे याची माहिती मिळाली.

Bloom Energy representatives assert that it is at least as efficient as a traditional large-scale coal power station.

यावरून तरी काय मजा नाय आली. जर पेट्रोल/डिझेल वापरून कोळश्याच्या पॉवर प्लॅण्ट एवढीच कार्यक्षमता मिळणार असेल तर काय उपयोग?

डिझेलचे कंबाईन्ड सायकल गॅस टर्बाईन बरीच जास्त कार्यक्षमता देते असे वाटते.

तसेच एमिशनचे प्रश्न तसेच राहतील असे वाटते.

नितिन थत्ते

+१

सहमत आहे.
--
वल्गना जुन्याच आहेत. दोन/अडीच वर्षांपूर्वी गूगलशी स्वतःचे नाव जोडून त्यांनी प्रसिद्धी मिळविली होती. आता गूगलच थंडावल्यासारखे वाटते आहे.
दावे जितके आश्चर्यकारक असतात तितकीच त्यांच्या सत्यतेची शक्यता कमी असते असे मला वाटते.

+१

रामार पिल्ले आठवला.

नितिन थत्ते

एक पर्याय.

सगळ्या घरांमध्ये सायकलींग उपकरण ठेवले जावे . ते एका सेंट्रल सिस्टिम ला जोडुन टर्बाइन्स् चा शाफ्ट फिरवण्यासाठी वापरता यावे . जेणे करुन लोकांचा विजेचा आणि आरोग्याचा प्रश्न सुटेल. घरातल्या सर्वांनी सायकलिंग करावी.

तसेच सुनामीच्या लाटांच्या उर्जेपासुनही विद्युत उर्जा निर्माण केल्या जाऊ शकते. त्यावर सद्ध्या मी रिसर्च करत आहे. लवकरंच श्री चिदंबरम यांना पत्र लिहुन मी अहवाल सादर करीन.

- त्सुनामी

काही खर नाही.

काही खर दिसत नाहीय्
किती नाटकीय पध्दतिनी तो बोलतोय.
फायनानसरच टेन्शन त्याच्या चेहर्‍या वर स्पष्ट दिसतय.

डोक्यात पाणी

बरोबर आहे. तो नाटकीय बोलतोय आणि वालमार्ट, इ- बे , गुगल, यांच्या मालकांच्या डोक्यात पाणी झाले आहे. स्पष्टच दिसतेय. काही खरं नाही.
मराठीमाणूस

 
^ वर