काहीच्या बाही प्रश्नोत्तरे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवू वैभवाच्या शिरी|
इंग्रजीतील पुढील प्रश्नोत्तरे पहा:
...प्र.व्हाय इज व्हिस्परिंग प्रोहिबिटेड?
...उ..बिकॉज इट इज नॉट अलाऊड.
...प्र..टू इज अ कंपनी, थ्री इज अ क्राऊड, देन व्हाट इज फोर अयांड फाइव्ह?
...उ.नाईन !
...प्र..व्हेन वॉज अडॅम क्रीयेटेड?
...उ..अ लिटल बिफोर ईव्ह !
...प्र..व्हाय डिडंट द पिगलेटस् लिसन टु देअर फादर?
...उ..बिकॉज हि वॉज सच बोअर !(बी ओ ए र)
अशी अनेकानेक प्रश्नोत्तरे तुम्ही कदाचित वाचली असतील. तशा प्रकारची मराठीत लिहिण्याचा हा प्रयत्न.
***प्र.:- आपल्या ज्ञातिबांधवांना सदैव पाण्यात कोण पहातो?
***उ.:- मासा.
***प्र.:- कलेचा कोणता भाग पैशांसाठी देऊन टाकला?
***उ.:- विकला.
***प्र.:-करुणाष्टके म्हणणारा रामभक्त आणि क्रिकेट खेळणारा धोनी या दोघांत कोणते साम्य दिसते?
***उ.:- दोघेही धावा करतात!
***प्र. काचेच्या वस्तूने स्वधर्म सोडला असे कधी म्हणता येईल?
***उ.:-ती बाटली असली तर!
***प्रः-एक हजार तीनशे बासष्ट या संख्येतील एक आणि दोन यांचे एकमेकांशी का पटत नाही?
***उ.:- कारण दोघांमध्ये छत्तीसाचा आ़कडा आहे!
***प्र.:- (१,८,२७,६४...)अशा संख्या एकत्र येऊन एकदम ओरडल्या तर त्या आवाजाला काय म्हणता येईल?
***उ.:- घनगर्जना.
***प्र.: गणितात विशेष गती असलेला चंदू जातायेता एका चिंचेच्या झाडाकडे टक लावून पहात असतो . त्याचे कारण काय?
***उ.:-कारण त्या झाडावर त्याला आकडे दिसतात!
***प्र.:-भर दरबारात कृष्ण आणि बलराम यांनी दुष्ट मामाला धरून मरेपर्यंत बुकलले, तेव्हा तेथे उपस्थित असलेले मल्ल आपल्या राजाला का वाचवू शकले नाहीत?
***उ.:- गणित कच्चे असल्याने त्यांना कंस सोडविता येईना!
..........यनावाला.

लेखनविषय: दुवे:

Comments

झक्कास.

यनावाला साहेब,
काहीबाही प्रश्नोत्तरे मस्त हं !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हेच..

म्हणतो! ;)

तात्या.

--
धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)

आवडले!

यनावाला साहेब,
आवडले आपले प्रश्न!
मजा आली वाचायला... :)

आपला
गुंडोपंत

मजा आली

प्रश्नोत्तरे आवडली. मासा, बाटली, आकडे, छत्तीसचा आकडा, घनगर्जना, सगळेच वाचून मजा आली.

मस्त

विकला, बाटली आणि घनगर्जना विशेष आवडले.

कंस

कंस, बाटली खास.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

अजून

असले तर अजून येऊ देत असे प्रश्न!
आपला
गुंडो.

बाटली

आवडली.



येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.
 
^ वर