वाल्मीकी एक,की दोन.

लोकांना लूटनारा वालमीकी अन रामायन लिहीणारा वालमीकी एकच आहेत का ? रामायण लिहील्यानंतर रामायण् घडले का ?लव-कूशांनी राज्य चालवीले का? पूढे दोनहजार सात मधे त्यांचे कोनी वारस आहेत् का ?रामायण हा इतिहास की वालमीकी नावाच्या लेखकाचा कल्पनाविलास ?

लेखनविषय: दुवे:

Comments

वॉलमिकी

अमेरिकेतील आणि इतरत्र असणारे प्रसिद्ध दुकान वॉलमार्टात विकायला ठेवलेल्या मिकी माऊसला वॉलमिकी म्हणतात असे एक मित्र सांगत होता. दुसरा सांगत होता की त्याने मिकी माऊसला भिंतीवर डकवले आहे आणि त्याला तो वालमिकी म्हणतो.

हेच ते दोन वालमिकी असणार.

-राजीव.

---
हॅहॅहॅ! नको तर हाहाहा! कसं वाटतं.
खोडसाळपणा करणं सर्वांनाच सोपं असतं.

बाळ राजीव.आणि वाल्मिकी.

मजकूर संपादित. कृपया व्यक्तिगत स्वरूपाची टीकाटिप्पणी करू नये.

रामायनाची काही माहिती असेल तर सांगा.

वाल्मिकी हा भिल्ल, की त्या जमातीत वाढलेला होता म्हणून तसा झाला.आणि वाल्मिकी सुमती नावाच्या ब्राम्हनाचा मूलगा होता असा एक विचार आहे.त्या बद्दल चर्चा झाली पाहिजे.

वाल्या कोळी/वाल्मिकी

वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला, सीतेला जेव्हा लक्ष्मणाने रामाच्या आज्ञेवरून वनात सोडले तेव्हा ती वाल्मिकींच्या आश्रमात राहिली, तिच्या जुळ्या मुलांना त्यांनी रामचरित्र गीतांतून शिकवले व रामापुढे गाण्यास सांगितले.

वाल्मीकी

वाल्मीकी दोन नाहीत तर पाच.
१. एक व्याकरणकार.
२. एक गरुडवंशीय विष्णुभक्त.
३.कृष्णद्वैपायनांपूर्वी होऊन गेलेला एक व्यास.
४. महाभारतातील एक शिवभक्त.
५.आदिकवी वाल्मीकी.
--वाचक्‍नवी

वाल्मीकी एक की दोन

एका अतिशय जीर्ण रामायणाच्या प्रस्तावनेत ही माहिती होती. आणखीही दोन वाल्मीकी होते, पण पान फाटके असल्याने नीट वाचता आले नाहीत.--वाचक्‍नवी

अजीर्ण रामायण

एका अतिशय जीर्ण रामायणाच्या प्रस्तावनेत ही माहिती होती. आणखीही दोन वाल्मीकी होते,

आता मात्र हे अजीर्ण रामायण झाले हं ! दोन दोन राम,दोन दोन सीता, दोन दोन रावण
(डुप्लीकेट)
प्रकाश घाटपांडे

दोन वाल् मिकी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
दोन वॉल् मिकीं वरचे राजीव८२ यांचे कोटिभाष्य छानच आहे! मला आवडले.
.........यनावाला.

वर्तकी रामायण

पुण्यात वर्तकी तपकीरिच्या कारखान्याजवळ रहाणारे वर्तक यांनी "वर्तकी रामायण" लिहिले आहे. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत ते म्हणतात
"आजपासून हजारो वर्षानी पुण्याच्या उत्खननात जेंव्हा हे रामायण सापडेल तेंव्हा हे रामायण खरे की वाल्मिकीने लिहिलेले रामायण खरे असा प्रश्न तेंव्हाच्या इतिहास तज्ञांना पडेल. तो पडू नये म्हणून मी कोण आणि वाल्मिकी कोण याचा पूर्ण उल्लेख मी करतो आहे."

इतका द्र्ष्टेपणा त्या वाल्मिकीकडे असता तर हा प्रश्न तुम्हाला आज पडला नसता. !

:-))

इतका द्र्ष्टेपणा त्या वाल्मिकीकडे असता तर हा प्रश्न तुम्हाला आज पडला नसता. !

तुमच्या प्रतिसादातच उत्तर दडलेलं आहे.

पुण्यात वर्तकी तपकीरिच्या कारखान्याजवळ रहाणारे वर्तक

तो पहिला वाल्मिकी काही पुण्यातला नव्हता.

पुणेरी अभिजित

प वि वर्तक आणि दिव्य दृष्टी

डॉ. प वि वर्तक हे सूक्ष्मलिंगदेहाने मंगळावर गेले होते,व्हायकिंग यानाने टिपलेल्या गोष्टी व वर्तकांनी या अध्यात्मिक अनुभवावर केलेले लेखन हे एकच आहे अशी भाविक लोकांची श्रद्धा आहे. त्यावेळी वर्तकांनी सूक्ष्मलिंगदेहाने शेजार्च्या बंद केलेल्या खोलीत जाउन त्यातील वस्तू ओळ्खून दाखवाव्यात असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान दिले होते.
प्रकाश घाटपांडे

बापरे!

त्यावेळी वर्तकांनी सूक्ष्मलिंगदेहाने शेजार्च्या बंद केलेल्या खोलीत जाउन त्यातील वस्तू ओळ्खून दाखवाव्यात असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान दिले होते.

बापरे! कुठल्याही विवाहीत स्त्रीपुरुषांना वर्तकांचा शेजार तसा धोकादायकच म्हणावा लागेल! कारण वर्तकसाहेब सूक्ष्मलिंगदेहाने कधी कुठे अचानक प्रवेशतील याची ग्यारंटी नाही! ;)

--ता.द्वै. व्यास.

तात्या म्हणजे तात्या!

हा हा हा!
(तात्या म्हणजे तात्या आहेत!)
तात्याबा तुम्ही पण जपुनच रहात जा बरं!
वर्तकबुवा उपक्रमावर पण असायचे! ;)

म्हणजे वर्तकांच्या राज्यात कुठे 'जाण्याची' सोय राहिली नाही तर!

आपला (जपुनच असलेला)
गुंडोपंत

पुढे काय झाले?

त्यावेळी वर्तकांनी सूक्ष्मलिंगदेहाने शेजार्च्या बंद केलेल्या खोलीत जाउन त्यातील वस्तू ओळ्खून दाखवाव्यात असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान दिले होते.

मग पुढे काय झाले?

(स्थुल देही)
गुंडोपंत

आव्हान प्रतिक्रिया

आतापर्यंत आव्हान प्रक्रिया ही प्रत्यक्ष पार पाडली गेलीच नाही. अतिंद्रिय सामर्थ्याचे अस्तित्व व अनुभव हा वर्तकांचा जिव्हाळ्याचा विषय असल्याने अंनिस (अंधश्रद्धा निर्मूलन समिती ) व वर्तक हे शीतयुद्ध होत असते. ते मनोरंजक असते. गोडबाबा प्रकरणात त्यांनी गोडबाबाची बाजू घेतली होती. डॉं नरेंद्र दाभोलकरांच्या श्रद्धा अंधश्रद्धा, भ्रम आणि निरास इ, पुस्तकांत सर्व बाबींची सखोल चर्चा आहे.
प्रकाश घाटपांडे

गोडबाबा प्रकरण?

आतापर्यंत आव्हान प्रक्रिया ही प्रत्यक्ष पार पाडली गेलीच नाही.

अनिस कडून की वर्तकांकडून?

शीतयुद्ध होत असते. ते मनोरंजक असते.
निश्चितच असणार बरं का! मजा येत असणार...

आणी हे गोडबाबा प्रकरण काय आहे?
यात कुणाची काय बाजू?
क्षमा करा, एकातून एक प्रश्न निघत आहेत.
पण जरा माहिती नाही म्हणून...

(आवांतरः दाभोलकर की दाभोळकर?)

आपला
गुंडोपंत

गोडवावा-अंधश्रद्धा

गोडबाबा प्रकरण काय आहे?

गोडबाबा हा भानुदास गायवाड नावाचा बारामती चा तरुण होता. १९८८ ते १९९५ या काळात त्याने प्रस्थ माजवले होते. त्याने ज्या वस्तूला हात लावला असेल ती वस्तू चवीला गोड लागत असे. "दत्तकृपा झाली अंगी गोडी आली" अशी हवा पसरवून तो "गोडबाबा" झाला. दैवी शक्तीचे लोकांना आकर्षण असते. काहींना सुप्त तर् काहींना उघड. त्यामुळेच बाबा-बुवांचे प्रस्थ माजले आहे. वर्तकांसारखे लोक अंधश्रद्धांना वैज्ञानिक मुलामा लावतात.वैज्ञानिक तपासणीत त्याने गोड केलेल्या पाण्यात चक्क सॅकरीन सापडलं,तरी लोकांना तो दैवी चमत्कार वाटला होता. गोडबाबाची अधिक माहिती वर उल्लेख केलेल्या दाभोल(ळ्)करांच्यापुस्तकात मिळेल.
अंनिस बाबत माहिती इथे मिळेल.
प्रकाश घाटपांडे

भानुदास गायकवाड - गोडबाबा - मनोगत

या गोडबाबावर मनोगतावर काही दिवसांपूर्वी एक लेख टाकण्यात आला होता.

तो इच्छुकांनी येथे वाचावा. चमत्कार, अंधश्रद्धा आणि विज्ञान

वर्तकांनी या गोडबाबाची बाजू घेऊन तो चमत्कारी असल्याचा दावा केला होता त्यावेळेस त्यांच्यावर वर्तमानपत्रांतून झोड उठली होती ती आठवते.

जाणं येणं असेलच!

वर्तकांनी या गोडबाबाची बाजू घेऊन तो चमत्कारी असल्याचा दावा केला होता

बरोबर आहे. वर्तकसाहेब गोडबाबाचीच बाजू घेणार! बहुधा वर्तकसाहेबांचं सूक्ष्मलिंगदेह धारण करून गोडबाबाच्या घरी जाणंयेणंही असेल!

असो,

तात्या.

रोशनी भाग दोन प्रसिद्ध झाला! कृपया येथे वाचा.

धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)

छान.

मजा येत् आहे.चर्चा थांबवू नका.

हे बरंय!

हे बरंय!
उद्या मी पण म्हणेन माझ्या हाताचे पाणी आंबट!
मग मी आंबट बाबा!
आणी माझे भक्तगण माझे फॅन असल्याने "आंबट शौकीन"
शिवाय उगाच अनिस ला थोडे फार छेडले की ते अव्हान देणारच. (कोण घेतो ते आव्हान...) पण तेव्हढेच प्रसिद्ध व्हायचा मार्ग मोकळा!
शिवाय २-३ पेड रायटर पण ठेवायचे आपल्यावर 'दोन्ही बाजूंनी' लेख लिहायला.
आंबट पाण्याचा मुद्दा अंगावर आलाच तर म्हणायला मी मोकळा आहेच "मी कधी म्हणालो? हे तर 'इतर' लोक म्हणतात!" माझा असा काही दावा नाहीच! (शिवाय आंघोळ नाहीच केली, तर असेही येईलच आंबट पाणी त्यात काय! ;) )

एकदा शिष्य गोळा झाले की राजकारणी पण येणारच! मग पहा हा गुंडोपंत कसा पावरफुल 'चंद्रगुंडापंतस्वामी आंबट महाराज' बनतो की नाही
शिवाय ५ वर्षात एखादे मोक्यावर मंदिर पण टाकता येईलच. (ओ कोनाला म्हनु र्‍हायले अतिक्रमन... त्याच्या आयला पाहा रे त्याला...) ते मंदिराला लागुन 'भक्तनिवास' प्रसादाचे लाडू दुकान वगैरे ते वेगळे हो!
शिवाय शाळा; झालेच तर मेडिकल नाही तर इंजिनियरिंग कॉलेज पण काढू.
बोला आंबटबाबा की जय!
आपला
आंबटबाबा

(आमचे येथे, आंबटबाबा मंदिरात, सर्व देणग्यांची पावती दिली जाते!)

आंबटबाबा

ब्रह्म तेथे माया
वृक्ष तेथे छाया
आणि बुवा तेथे बाया

एकदा शिष्य गोळा झाले की राजकारणी पण येणारच! मग पहा हा गुंडोपंत कसा पावरफुल 'चंद्रगुंडापंतस्वामी आंबट महाराज' बनतो की नाही
शिवाय ५ वर्षात एखादे मोक्यावर मंदिर पण टाकता येईलच. (ओ कोनाला म्हनु र्‍हायले अतिक्रमन... त्याच्या आयला पाहा रे त्याला...) ते मंदिराला लागुन 'भक्तनिवास' प्रसादाचे लाडू दुकान वगैरे ते वेगळे हो!

नरेन्द्र महाराज हे प्रस्थ याच प्रकारे तयार झाले. अगोदर तो तलाठी कि ग्रामसेवक होता. लाच प्रकरणात तो निलंबित झाला होता. "तुम्ही जगा,इतरांना जगवा" अशी स्लोगन तयार केली. रत्नागिरी जिल्ह्यात नाणीज येथे पीठाधिपती झालेत.
गुंडोपंत आंबटबाबा झालेवर आंबट या चवीला देखिल प्रतिष्ठा प्राप्त होईल.
अनंतकोटी ब्रम्हांड नायक आंबटबाबा कि जय !

प्रकाश घाटपांडे

क्या बात है!

अनंतकोटी ब्रम्हांड नायक आंबटबाबा कि जय !
हे चांगले आहे.
पण आम्हाला असा दृष्टांत झाला की चांगली स्लोगन हवी!
(खरंतर 'स्लो'गन नको. फास्टगन पाहिजे!) तेंव्हा सर्व आंबटशौकिनांनी आंबट बाबांसाठी एक स्लोगन शोधायला मदत द्यावी.
आपला
अनंतकोटी ब्रम्हांड नायक वगैरे वगैरे
'चंद्रगुंडापंतस्वामी आंबट महाराज'

आंबटबाबा का करो तुम ध्यान

आंबटबाबा का करो तुम ध्यान
ही स्लोगन आज पासून लागू....
गुरुवर्य मुनिश्री ब्र. को. ना वगैरे वगैरे आंबटबाबा महाराज वारल्यानंतर, त्यांचा सर्व कार्यभार
त्यांचे परम शिष्य मिनि गुरुवर्य मिनि मुनिश्री मिनि ब्र. को. ना लघुआंबटबाबा हे सांभाळतील. या सोहळ्याचे बूकिन्ग चालू आहे.
सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा. (१००० चे तिकिटे संपली!) तेंव्हा सर्व देणग्यां घाटपांडे साहेब याच्याकडे द्याव्यात. पावती पाहिजे असणारांनी तात्यांना भेटावे.
बोला....
आंबटबाबा की जय!

तुम्ही जगा,इतरांना जगवा,कठीणच आहे.

नरेन्द्र महाराज हे प्रस्थ याच प्रकारे तयार झाले. अगोदर तो तलाठी कि ग्रामसेवक होता. लाच प्रकरणात तो निलंबित झाला होता. "तुम्ही जगा,इतरांना जगवा" अशी स्लोगन तयार केली. रत्नागिरी जिल्ह्यात नाणीज येथे पीठाधिपती झालेत.

सर्वात कहर म्हणजे जगद्गूरु ही पदवी वापरतात.कोणी दिली कूणास ठाऊक,कोणाच्या भावना दूखावतील पण बोलल्याशिवाय होत नाही.संप्रदाय स्थापनेसाठी काही एक विचारांची बैठक असावी लागते,ती सुद्धा नाही.अहो एक मूलगा मेंदूच्या कोणत्या तरी आजाराने ग्रासलेला,पालक शिक्षीत,अन या गुरूंनी हात त्याच्याकडे केला म्हणाले ठीक होऊन जाईल,पालक समाधानी(पण हताश)त्याही पेक्षा मीच देव आहे,हा विचार म्हणजे सर्वात कळस आहे.कठीणच आहे,आंबटबाबा की जय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बोलल्याशिवाय होत नाही

कोणाच्या भावना दूखावतील पण बोलल्याशिवाय होत नाही तुम्ही बोला हो बिरुटेसाहेब, आमच्या भावना भरभक्कम पक्क्या आहेत. आणी दुखावल्या तर दुखावल्या...

आवांतरः त्यातले
त्याही पेक्षा मीच देव आहे,हा विचार
हा विचार मानणारा एक वर्ग वारकरी संप्रदायात (व इतरही) आहे. मात्र त्यांच्या विचारांची बैठक पूर्णपणे वेगळी आहे. साधना करतांना काही जण द्वैत मानतात काही अद्वैत. अद्वैत म्हणाल तर मीच देव आहे हा विचार येतो.
त्यात विठोबा नि मी वेगळा नाही. आम्ही दोघे एकच हे एकदा साधले की मग ब्रह्मानंद! मात्र हे फक्त साधले तर ते फक्त त्यांनाच, ज्यांनी मग पसायदान लिहिले.
आणी त्यांना कोणत्याही पीठाचे स्वामी व्हावे लागले नाही की भक्तांना पटवावे लागले नाही.

आपला
गुंडोपंत

 
^ वर