उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
गोंधळलेला पुरुष
कोब्या
March 16, 2012 - 1:36 am
महिला दिनानिमित्त स्त्री-पुरूष समानतेवर अनेक चर्चांची गुर्हाळे अनेक स्थळांवर सुरू आहेत/होती. त्याचवेळेस ही रोचक बातमी वाचायला मिळाली:
http://blog.sfgate.com/sfmoms/2012/03/13/huggies-insults-dads-with-new-a...
हगीज नावाच्या डायपर बनवणार्या कंपनीची जाहिरात पुरुषांना अपमानित करणारी आहे असे अनेक 'बाप' लोकांचे मत पडले. ह्या बाप लोकांच्या निषेधाला घाबरुन हगीजने जाहिरात बंद करण्याचे वचन दिले आहे.
पुरुष(बाप) लोकांनी असे अपमानित होऊन जाहिरातीवर निषेध वगैरे नोंदवणे म्हणजे स्त्री-पुरूष समानतेकडे पहिले पाऊल असे मला वाटते.
ह्यावर उपक्रमींचे मत काय?
हगीजची जाहिरातः
दुवे:
Comments
मूढमती
गोंधळण्याचा हक्क केवळ स्त्रियांचा नाही हे एकदा मान्य केले की गोंधळलेले पुरुषही मान्य होतील. ;-) गोंधळण्यातही समानता हवीच ना.
ही तर हगीजची जाहिरातबाजी
ही तर हगीजची जाहिरातबाजी आहे. अप्रतिम मांडणी वगैरे वगैरे म्हणून असले धागे वाचण्यासाठीच उपक्रमावर येतो असा प्रतिसाद दिल्यास आणि कंपूबाजीचा खाट उठल्यास नवल नाही. असो. हा धागा वाचनमात्र करावा, असे संपादकांस सुचवतो.
हाहाहा. असे फुसके निषेध नोंदवत वॉकाउट करण्यापेक्षा आपल्या लहान मुला/मुलीसाठी बापांनी लगेच लोकरकाम-विणकाम शिकायला सुरुवात केल्यास बरे राहील असे सुचवावेसे वाटते. काय?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
सहमत
विणकामाचा केवळ पावलाशीच नव्हे तर π शीही संबंध आहे.
बाळाचे
दुपटे बदलता येत नाही हा 'पुरुषार्थ' म्हणावा काय्?