मराठी इंटरनेट साइट्सवर स्त्रियांचे प्रमाण कमी का?
जागतिक महिला दिनाच्या सर्व वाचक स्त्री-पुरुषांना शुभेच्छा.
महिला दिनाला साधारण १०० वर्षांचा इतिहास आहे. स्त्रीमुक्तीची चळवळ आणि महिला दिन साजरा करण्याचा संबंध घनिष्ठ आहे. महिलांना मतदानाचा हक्क मिळावा, निवडणूका लढवण्याचा हक्क मिळावा, समान वेतन, समान वागणूक मिळावी इत्यादी मागण्यांमुळे स्त्री चळवळ सुरू झाली आणि वाढली. बहुसंख्य देशांमधे या मागण्यांबाबत गेल्या शतकात मोठी प्रगती झालेली दिसते. तरीही स्त्री-समानता संपूर्णतः आलेली आहे असे आम्हांस वाटत नाही. मोठ्या प्रमाणावार मुलींनी शिकायला सुरूवात केलेली असली तरीही अजूनही सुशिक्षितांमध्ये स्त्री-पुरुषांचे प्रमाण समसमान नाही. नोकऱ्यांमध्येही अजून उच्चपदावर पुरुष अधिक संख्येने दिसतात.
कदाचित असे म्हणता येईल की वीस-तीस वर्षांपूर्वी जे सुशिक्षित झाले त्यांचेच प्रमाण उच्चपदस्थांत अधिक दिसेल. हाच युक्तिवाद थोडाफार एकंदरीत सुशिक्षितांच्या संख्येला लागू होतो. थोडक्यात पंचवीस तीस वर्षांपूर्वी जे खूपच अधिक संख्येने पुरुष शिकले ते व त्यांच्याबरोबर न शिकलेल्या स्त्रिया अजूनही लोकसंख्येमध्ये दिसतात. कदाचित आजची पिढी घेतली तर हे प्रमाण अधिक समसमान दिसेल. महाराष्ट्र हे भारतातले पुरोगामी राज्य. तेव्हा सध्याच्या मराठी पिढीत चित्र वेगळे दिसते का? ते शोधण्यासाठी मराठी इंटरनेट साइटवर असलेल्या स्त्री-पुरुष प्रमाणाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला.
आम्हाला असे दिसले की मराठी इंटरनेटवर स्त्रिया आणि स्त्री-आयडींचे प्रमाण खूप कमी दिसते. पुराव्यादाखल अलेक्सा.कॉम वरून घेतलेले हे स्टॅटिस्टिक्स पहा.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मनोगतावर दिसणारे स्त्री-पुरूषांचे प्रमाण एकूणच इंटरनेटवर दिसणार्या प्रमाणासारखेच आहे. मायबोलीवर पुरूषांचे प्रमाण माफक प्रमाणात जास्त (over-represented) आहे. मिसळपाव, उपक्रम आणि मीमराठीवर स्त्रियांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात कमी (greatly under-represented) आहे. ऐसी अक्षरेचे (हा न्यू किड ऑन द ब्लॉक असल्यामुळे) स्टॅट्स उपलब्ध नाही. पण ऐसीवरचे प्रमाण मायबोली किंवा मनोगताप्रमाणे असावे असे वाटते. या स्टॅट्सपैकी मायबोलीच्या स्टॅट्समधे Confidence: medium असं आहे तर इतर स्टॅट्सबद्दल Confidence: low आहे. पण या साईट्सवर पाहिल्यास लॉगिन केलेल्या पुरूषांची संख्या जास्त आणि स्त्रियांची संख्या कमी हे दिसतेच.
मराठी इंटरनेट वापरणारे लोक महाराष्ट्र किंवा भारताच्या शहरी भागातले, आणि परदेशात असणारे बहुसंख्येने असणार. या लोकांमधे शिक्षण, समृद्धी, इंटरनेटची उपलब्धता या अडचणी नसाव्यात. तरीही इंटरनेटवर व्यक्त होण्यात स्त्रियांचे प्रमाण कमी का असावे? गेल्या काही दिवसांतच पुरुषप्रधान लेखनाबद्दल तक्रारी वेगवेगळ्या साइट्सवर दिसून आल्या. मराठी इंटरनेट साइट्स पुरुषप्रधान मनोवृत्तीच्या आहेत का?
Comments
इंटरनेटची दुनिया युनिसेक्स
एवढी प्रस्तावना कशाला. सरळ जागतिक महिला दिनानिमित्त 'मराठी इंटरनेट साइटवर असलेल्या स्त्री-पुरुष प्रमाणाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला' असे थोडक्यात चालले असते की. असो.
स्त्रिया वावरतायत की पुरूष की शेंबडी पोरे की रावले हे न बघता आम्ही तर प्रतिसाद बघत असतो. (हो सारी दुनिया एक तरफ और रावले एक तरफ) मग तो संख्या असलेला आयडी असो किंवा सरगमातले काही सुर घेतलेले कर्कश हॅन्डल असो, आजकाल स्त्री आणि पुरुष ह्यांत इंटरनेटवर तरी भेद करणे कठीण आहे. किंबहुना पुरुषांपेक्षा असली हॅन्डले जरा जादाच भारी आहेत. असो. माझ्यामते इंटरनेटची दुनिया युनिसेक्स आहे. स्त्रीनावाने फिरणारे काही पुरुषांप्रमाणेच पुरुषनावे घेऊन हिंडणाऱ्या काही स्त्रियाही आंतरजालावर असाव्यात, किंबहुना आहेतच. तूर्तास एवढेच.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
ठीक
रोचक विधान.
कृपया संपादकांनी धम्मकलाडू यांनी सुचवलेली सुधारणा करावी. संपूर्ण लेखन हीच प्रस्तावना समजावी का कसे हे त्यांच्याकडूनच समजेल.
लेखन संपादनाबद्दल संपादकांचे अग्रीम आभार.
हंहं..
हा भाग मला पाल्हाळीक वाटला. पण तुम्ही सावित्रीबाई फुलेंपासून सुरवात करून पूर्ण इतिहास सांगितला नाही ह्याबद्दल आभारी आहे. असो. जालावर एकविसाव्या शतकातही स्त्रीपुरुष समानतेबाबत लेक्चरबाजी करावीशी वाटते हे दुर्दैवच नाही का?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
धन्यवाद
खरंतर १३ अब्ज वर्षांपूर्वी इतिहास सुरू झाला. तिथपासून सुरूवात करायची तर बहुदा तोपर्यंत समानता येईल म्हणून थांबले.
सहमत आहे. "मी कामाशिवाय पर-स्त्रियांशी बोलत नाही" अशी वाक्य डोळ्यांना खड्यासारखी टोचतात. ती ज्या संस्थळावर येतात तिथे नकोशी वाटली तरी पर्याय नसतो.
एचटीएमेल फॉरमॅटींग दुरूस्त करण्याबद्दल् आभार.
अप्रतिम
अप्रतिम संकलन आणि मांडणी! असे लेखन इथे येत असल्याने अजूनही उपक्रमावर येतो त्याचे सार्थक होते.
उपक्रमींच्या या विषयावरच्या (यापुढील) मतांच्या प्रतिक्षेत आहे
ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये
मामुली, बाळबोध
कुठलीही भर न टाकणारे कंपूबाज किंवा 'अप्रतिम', 'छान माहिती'छाप बाळबोध प्रतिसादच टाकायचे असल्यास उपक्रमवर कशाला यायला हवे आणि प्रतिसाद द्यायला हवे. असेच प्रतिसाद इतर संकेतस्थळावरही देता येतात. उदा. मायबोली, ऐसीअक्षरे वगैरे वगैरे. असो. असले प्रतिसाद उपक्रमावर फारसे नसतात म्हणून उपक्रमावर येण्याचे सार्थक होते.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
जिथे तिथे पाठ खाजवणे कशाला?
ह्यात काय डोंबलाचे अप्रतिम? इकडून तिकडून काहीतरी गोळा करुन त्याला महिला दिनाचा मुलामा चढवुन काहीतरी मोठे विचार मांडल्याचा आव आणला आहे. त्यात अप्रतिम काय? ह्यापेक्षा बरे संकलन तुमच्या पोरकट (म्हणजे त्या लहान मुलांच्या) लेखांमधे असते.
अवांतरः जाहीर निषेध दर्शवते
[संपादित. वैयक्तिक टीकाटिप्पणीसाठी खरडवही, व्यक्तिगत निरोप या सुविधांचा वापर करावा. -- संपादन मंडळ.]
हे विधान आक्षेपार्ह वाटले. उपक्रमावर सध्या प्रथम पानावर नानावटी, मुखेडकर, कोल्हटकर यांचे उत्तम लेख आहेत. त्या लेखांवर काहीही टिप्पणी न करता वरील चर्चाप्रकाराला अप्रतिम म्हणणे (पुन्हा अप्रतिम म्हणायला हरकत नाही. व्यक्तिगत आवड आहे.) आणि त्यासाठी अजूनही उपक्रमावर येतो त्याचे सार्थक होते असे म्हणणे हास्यास्पद आहे. किमान या लेखासाठी तरी उपक्रमावर येण्याची गरज भासू नये. वरील लेखन इतर मराठी संकेतस्थळांवर मिळेल.
एकमेकांवर कुरघोडी करताना आपण विनाकारण संकेतस्थळ आणि त्यावरील इतर सदस्यांचा/ लेखकांचा अपमान करतो का हे कृपया तपासून पाहावे.
* धोपटा या शब्दावरून मलाच आता.
मूळ चर्चेवर प्रतिसाद देतेच.
भावना पोचल्या
भावना पोहोचल्या. मी मूळ प्रतिसादात जे लिहिले ते प्रामाणिक मत आहे. उपक्रमावर बायका कमी असल्या तर चालेल. पण इतर संकेतस्थळांवरून येणारी कंपूबाजी तरी नको.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
चांगला विषय
[संपादित. वैयक्तिक टीकाटिप्पणीसाठी खरडवही, व्यक्तिगत निरोप या सुविधांचा वापर करावा. -- संपादन मंडळ.]
आता जरा गंभीरपणे.
वरती मांडलेला विदा हा डोळे उघडणारा आहे. मराठी संस्थळांवर येणाऱ्या लेखन-चर्चा-प्रतिसादांत स्त्रियांचा सहभाग कमी दिसतो हे वास्तव आहे. उपक्रम आणि मिसळपाववर हे विशेष जाणवतं. ट्रॅकरचं कुठचंही पान उघडलं तरी स्त्री आयडींनी लिहिलेले लेख पंचविसात एखाद दोन, फारतर तीन दिसतात. स्त्रियांच्या या असहभागामध्ये काय कारणं आहेत हे तपासून पहाणं महत्त्वाचं आहे.
घाटपांडेंनी मांडलेलं कारण अंशतः पटतं. विशेषतः वय वर्षे ४५ च्या वरच्या वयोगटातल्या स्त्रियांना तर कॉंप्युटर या प्रकाराविषयी एक प्रकारचा गंड आहे. लहानपणापासूनच 'मुलींनी घरकाम करावं, मुलांनी बाहेरच्या गोष्टी बघाव्यात' अशी शिकवण मिळाल्यामुळे स्त्रियांचं विश्व लाकडी खोक्यात बांधलेल्या पायासारखं कोतं राहिलेलं आहे. त्यामुळे स्त्री-पुरुष समानतेशी या विद्याचा निश्चितच संबंध आहे.
पण त्याहीपलिकडे, संस्थळांवरचं वातावरण एखाद्या जंटलमन्स क्लब सारखं पुरुषी आहे का? तसं असल्यास, त्यामुळे स्त्रियांना तिथे मज्जाव नसला तरी तिथे वावरावंसं वाटत नाही का? माझ्या मते थोड्याफार प्रमाणात आहे. इतरांचे विचार जाणून घ्यायला उत्सुक आहे.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
जंटलमन्स क्लब?
ठीक. ऑफर लेटर पाठवून देऊ तुम्हाला. ;-)
उपक्रमाचं वातावरण मला जंटलमन्स क्लबसारखं कधीही वाटलेलं नाही. इतर संकेतस्थळांविषयी कल्पना नाही आणि काही पुरुषांना जंटलमन्स क्लबची ऍलर्जी असेल तरीही कल्पना नाही.
जर विषय गोल फिरून स्त्री-पुरुष समानतेशीच येणार होता तर मग खाली दुवे मागितले त्यांची गरज नाही. बायका गाडी नीट का चालवत नाहीत? बायकांना इलेक्ट्रिक काम का जमत नाही? अशा चर्चा शोधून पाहाव्या. कदाचित तेथील प्रतिसाद थोडेफार शब्द बदलून या या चर्चेतही टाकता येतील.
जंटलमन्स क्लब??
मराठी स्थळे आणि जंटलमन्स् क्लब? ऐअवर नविन काय..या सदरामधे एक पोल आणि आजची खादाडी/बायडी वगैरे सुरू करणार आहात की काय? काही कामातुर जंतू त्यातही कला वगैरे दाखवतीलच.
संपादक मंडळाला विनंती - संपादकांचे आभार
१. ऋषिकेश हे माझे सदस्यनाम आहे.
२. असे लेखन आणि हे लेखन यांत फरक आहे हे समजल्यास वरील प्रतिसाद गैरलागू ठरतो. समजला नसल्यास असे लेखन म्हणजे अशासारखे लेखन (त्यात इतरही अनेक लेख अर्थातच आले)
३. वरील प्रतिसादात माझ्यावर व धम्मकलाडू या सदस्यानामावर अनावश्यक वैयक्तिक टिपणी असल्याने संपादित व्हावा अशी उपक्रमच्या संपादक मंडळाला जाहिर विनंती संपादकांचे आभार!
ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये
ठीक
अशुद्धलेखनाच्या चुकीबद्दल माफी मागते.
शब्दच्छल मलाही करता येतो पण त्याची गरज वाटत नाही कारण येथे काय झाले आणि काय करण्याचा प्रयत्न होता हे अनेकांच्या लक्षात आले आहे. असो.
प्रतिसाद संपादित होणार होताच पण भावना पोहोचल्या असत्या तर बरे वाटले असते. :-( असो.
प्रतिसाद
ऍलेक्साला स्त्री की पुरुष हे कसे कळले कोणजाणे पण सध्यापुरता हा प्रश्न गौण ठरवते. तरीही, मिसळपाव, मी मराठीवर स्त्रियांचे प्रमाण खूप कमी असावे असे वाटत नाही. मी मराठीवर मी नसते पण मिसळपाव हे वैचारिक चर्चा करायचे ठिकाण नाही असे खुद्द तेथील मालकांनी सांगितल्याने आणि सतत फालतूगिरी करत राहण्याची माझी इच्छा नसल्याने, तसेच, एकंदरीत मिसळपावचा सध्याचा दर्जा पाहता मला व्यक्ती आणि स्त्री म्हणून तेथे राहण्यात रुची वाटत नाही.
किंबहुना, पाककृती, स्फुटे (बालपणीचा रम्य काळ वगैरे), कविता इ. जेथे प्रकाशित करता येते त्या ठिकाणी स्त्रियांचा सहभाग कमी का असावा याची कारणे सर्वसाधारण असावी. सर्वसाधारण म्हणजे इंजिनिअरिंगला मुली मुलांपेक्षा कमी का? व्यावसायिक क्षेत्रात मुली कमी का? स्त्रियांना आरक्षण का लागते? वगैरे प्रमाणेच. या अनुषंगाने मराठी संकेतस्थळे वेगळी वाटत नाहीत. हे बहुचर्चित विषय आणि त्यांची उत्तरे माहित असल्याने अधिक खोलात शिरत नाही.
राहता राहिला प्रश्न उपक्रमाचा. ऐसीवर त्याविषयी म्हणून झाले आहेच. "उपक्रमावर ज्या स्त्रिया आहेत त्या इतरांना पुरून उरणार्या आहेत" (ही अतिशयोक्ती आहे याची नोंद घ्यावी.)
बाकी, चर्चेतील प्रश्नांची खरी उत्तरे फक्त आणि फक्त पुरुष देऊ शकतील असा माझा अंदाज आहे. विशेषतः
वगैरे विषयांवर समरसून चर्चा करणारे पुरूष, आपल्या घरातील स्त्रिया इंटरनेटवर लिहिण्यास अनुत्सुक का आहेत या विषयी अधिक उत्तमरित्या सांगू शकतील. मी त्यांच्या प्रतिसादांची वाट बघते.
उत्तर
संगणक साक्षरतेचे पुरुषांचे प्रमाण हे स्त्रियांपेक्षा अधिक आहे म्हणून मराठी इंटरनेटवर वावरणार्या स्त्रियांचे प्रमाण कमी आहे. सोप्पे! हव तर ऐसी अक्षरेवर रमाबाई कुरसुंदीकरांना विचारा!
प्रकाश घाटपांडे
व्हेअर इज द् स्मोकिंग गन?
तुमचा स्टडी टिचभर मराठी आंतरजालावर अवलंबुन आहे. इथल्या तिथल्या डझनभर आयडींना अंदाजपंचे पुरूष स्त्री ठरवुन काहीतरी विदा फेकलेला आहे. असला सो कॉल्ड स्टडी प्रकाशित करण्याआधी, प्रोबॅबिलिटी डीस्ट्रीब्युशन फेम घासकडवींचे कन्सलटेशन तरी घ्यायचेत. त्यांनी तुम्हाला लॉ ऑफ स्मॉल नंबर्स वगैरे समजावुन सांगुन, 'व्हेअर इज द स्मोकिंग गन?' असे विचारले असते. की हे सगळे न्यू किड ऑन द ब्लॉकची लिंकसहित जाहिरात करण्यासाठी योजलेले आहे? तसे असेल तर प्रश्नच मिटला.
काही उत्तरे
मिपावरचे काही स्त्री आयडींचे प्रतिसाद रोचक वाटावेत. एक (अशी तक्रार तिथे तीन स्त्री आयडींनी केलेली आहे), दोन (या मतांशी मी सहमत नाही, पण विविधता दाखवण्याच्या दृष्टीने प्रतिसाद दाखवावेसे वाटले.)
घाटपांडे यांचा सुशिक्षिततेचा मुद्दा काही अंशी मान्य आहे. काही अंशी अशा अर्थाने, इंटरनेट वापरकर्त्यांमधे तरूण (वाय-टू-के च्या सुमारास संगणक शिक्षित आणि त्यांच्यापेक्षा लहान असे सगळे तरूण आणि त्यांच्यापेक्षा मोठे ते वयस्कर) लोकांत जेंडर बायस फार दिसत नाही. आंजा सुशिक्षितता आणि उपलब्धता ही मोठी अडचण नाही. पण वयस्कर लोकांना, विशेषतः स्त्रियांना नवीन यंत्र-तंत्रांची काहीशी भीती वाटणं मी पाहिलेलं आहे.
उपक्रमावर किंवा इतरही संस्थळांवर पुरूष विरूद्ध स्त्रिया (किंवा व्यक्तीनामधारी वि. शब्दनामधारी सदस्य) अशा मारामार्या लावण्याचा उद्देश नसल्यामुळे अतिशयोक्ती आहे असं मानलं तरी विनोद समजला नाही. आणि हा विनोद नसल्यास चुकीच्या ठिकाणी आल्याबद्दल क्षमस्व.
निदान बुद्धी, तर्क यांचा गर्व बाळगणार्या संस्थळावर, एकूणच मराठी आंतरजालावर स्त्रिया कमी आहेत ही बाब गंभीर वाटेल अशी अपेक्षा होती. असो.
खुलासा
मारामार्या लावण्याचा तुमचा उद्देश आहे असे इतरांना वाटावे असे का बरे वाटले? मला तरी असे काही वाटलेले नाही. वाक्य सहज लिहिले होते आणि त्याला पूर्वीच्या कधीच्या चर्चेची पार्श्वभूमी आहे. हेच वाक्य ऐसीवर लिहिलेले आढळले म्हणून रिपिट केले इतकेच. विनोद वाया गेला असल्यास हरकत नाही. तसाही पीजेच होता. :-)
मला वाटतं या विषयी अनेक चर्चा झाल्या आहेत. त्यात बायकांना आर्थिक क्षेत्रात, इंजिनिअरिंग क्षेत्रात रुची नसते वगैरे पासून अनेकदा अनेक ठिकाणी उहापोह झाले आहेत. तेव्हा कारणे तिच आहेत, बदललेली नाहीत. उपक्रमावर पाककृती, स्फुटे वगैरे असते तर निश्चितच अधिक बायका रेंगाळल्या असत्या.
कारणे नक्की कुठची?
मी या चर्चा वाचलेल्या नाहीत. एखाद दोन दुवे दिल्यास आवडेल. कारण तीच म्हणजे नक्की कुठची हे इथे स्पष्ट होत नाही.
स्त्रियांना मूलतःच तर्क, चर्चा यामध्ये कमी रस असतो असं तुम्हाला सुचवायचं आहे का? कारण उपक्रमाचा तो वेगळेपणा असला तरीही वरील विद्यानुसार मिसळपाव व मीमराठी, जिथे पाककृती व स्फुटे असतात, त्यांपेक्षा उपक्रमावर स्त्रियांचे प्रमाण भिन्न नाही. त्यामुळे सकृद्दर्शनी हे तितकंसं पटत नाही.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
क्षमस्व!
क्षमस्व! मला दुवे शोधून देण्या इतपत वेळ नाही. (हे गंभीरपणे लिहिले आहे) आपण गूगल सर्च मारावी. किंवा मला वेळ झालाच तर अवश्य देईन पण सध्या शक्य नाही. या चर्चा अनेकवेळा मनोगतापासून थोड्याफार वेगळ्या संदर्भाने येत-जात होत्या हे खरे.
मला वरील विदाच पटलेला नाही. तसेही त्या चित्रांवरून फारसे काही स्पष्ट झालेले नाही. मराठी संकेतस्थळांवर स्त्रियांचे प्रमाण कमी आहे हे खरे पण मग भारतात कुठे विपर्यस्त परिस्थिती दिसते? ३३% आरक्षणापासून इतर अनेक ठिकाणी स्त्रियांचा सहभाग पुरुषांपेक्षा कमी दिसतो. उपक्रमावर तो अगदी नगण्य आहे.
नाही मला असे सुचवायचे नाही पण मला तशी शंका अवश्य आहे.
गळेकाढू
गळेकाढू वाक्य वाचून हसू आले. तुमच्या कंपूसकट ऐअवर व्यवस्थित चर्चा चालू आहे ना. मग कशाला हे रूदन. असो. महिला दिनाचे नेहमीचे पाल्हाळ आणि इकडून-तिकडून घेतलेल्या विद्यावर आधारित सामान्य टीआरपीबाज, जाहिरातबाज चर्चाप्रस्ताव टाकून भल्यामोठ्या अपेक्षा ठेवण्याचा भंपकपणा इथल्या बुद्धी, तर्क यांचा गर्व बाळगणार्या सदस्यांना बहुधा अपेक्षित नसावा.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
भारताच्या साधारण स्थितीसारखे, मराठी संस्थळ हे वैशिष्ट्य नव्हे
अलेक्सावर म्हटलेले आहे, की स्त्री-पुरुष यांचे "जनरल इन्टर्नेट यूझर्स" हे प्रमाण मानून मग त्या मानाने स्त्री-उपभोक्ते प्रमाणापेक्षा कमी की अधिक, हे सांगितलेले आहे. पण हे प्रमाण भारताकरिता (किंवा मराठी आंतरजाल वापरकर्त्यांकरिता) किती आहे, हेसुद्धा प्रमाण आपण वापरू शकतो. (जर भारत-विशेष संस्थळांमध्ये सर्वांतच स्त्रियांचा सहभाग कमी असेल, तर चर्चा मराठी संकेतस्थळांकरिता खास असणार नाही. भारतातील वापरकर्त्यांकरिता सामायिक असेल. भारतातील वापरकर्ते जागतिक वापरकर्त्यांत १०%पेक्षा कमी आहेत (विकिपेडियाच्या मते ७.५%). त्यामुळे जगाभरातल्या "जनरल इन्टर्नेट यूझर्स"चे प्रमाण हे भरतातील प्रमाणापेक्षा बरेच वेगळे असू शकते.
आता पुढील काही मराठी संकेतस्थळे बघूया :
महाराष्ट्र सरकारचे मराठी भाषेतील प्रवेशद्वार (आलेक्सा दुवा)
ई-सकाळ वर्तमानपत्र (आलेक्सा दुवा)
लोकसत्ता वर्तमानपत्र (आलेक्सा दुवा)
आता भारतातील काही स्थळे बघूया :
भारत सरकारचे प्रवेशद्वार (आलेक्सा दुवा)
टाइम्स ऑफ इंडिया वर्तमानपत्र (आलेक्सा दुवा)
द हिंदू वर्तमानपत्र (आलेक्सा दुवा)
या सर्वच ठिकाणी पुरुष उपभोक्ते "जनरल इन्टर्नेट ऑडियन्स"पेक्षा अधिक आहेत, आणि स्त्री-उपभोक्ते "जनरल इन्टर्नेट ऑडियन्स"पेक्षा कमी आहेत.
अशा परिस्थितीत "मराठी संस्थळे भारतातील सामान्य स्थितीशी समसमान आहेत, मराठी संस्थळ असणे हे या बाबतीत वैशिष्ट्य नाही" असे उत्तर देता येते.
अर्थात एकूण भारतातच "जागतिक सरासरीपेक्षा" पुरुष वापरकर्ते अधिक का? स्त्री-वापरकर्ते कमी का? असा प्रश्न कोणी विचारू शकेल. परंतु ही बाब चर्चाविषयाच्या बाहेरची आहे, असे मला वाटते, कारण चर्चाविषयाचा मोठा भाग मराठी स्थळांच्या तपशीलवार आढाव्याचा आहे.
भंपकच
ह्याही चर्चेची गरज नाही. मराठी स्थळांवर वावरणे म्हणजे काही विकास झाल्याचे लक्षण नव्हे. महिलांचे प्रमाण कमी असले तर त्याने काय फरक पडतो?
गुलाबी रंग आवडण्यात स्त्रिया पुरुषांपेक्षा पुढे का? हा चर्चाविषय पुढच्या महिला दिनासाठी कसा वाटतो?
डिजिटल डिव्हाइड
इंटरनेटच्या वापराचा आर्थिक प्रगतीशी संबंध असतो. याबाबत बरेचसे संशोधन झालेले आहे (गूगल स्कॉलर संकेतस्थळावरील यादी, दुवा).
स्त्रियांच्या बाबतीतही असे संशोधन झालेले आहे (गूगल स्कॉलर संकेतस्थळावरील यादी, दुवा)
तर हा फरक आहे.
"मराठी संकेतस्थळ" यापासून बदलून मी विचारलेला प्रश्न एकूण भारतातच "जागतिक सरासरीपेक्षा" इंटरनेटचे स्त्री-वापरकर्ते कमी का? हा स्त्रियांच्या रोजीरोटी आणि सबलीकरणाशी संबंधित होतो. मला तरी हा व्यापक प्रश्न मुळीच भंपक वाटत नाही.
आता "इंटरनेट वापर आणि आर्थिक बळ यांतला संबंध" या बाबतीत संशोधन झाल्याचे कोणाला माहीत नसेल. नसेलच - सर्व क्षेत्रातील संशोधन ठाऊक असणे दुरापरस्त आहे.
तरी हा संबंध रोजव्यवहरातही स्पष्ट दिसतो. (संबंध असा : कॉम्प्यूटर-इंटरनेट कामासाठी वापरून तरबेज होणारे लोक यातून उत्पन्न मिळवतात, आणि तरबेज झाल्यामुळे त्यांना गंमत म्हणून कॉम्प्यूटर-इंटरनेट वापरण्यात आडचण येत नाही, सवडही मिळते.) असा काही संबंध आहे, याबाबत कोणाला प्रतिक्षिप्त अविश्वास वाटला, भंपकपणाच दिसला, तर मला त्यांच्या रोजव्यवहारातील निरीक्षणाचे आश्चर्य वाटते.
गुलाबी रंग आवडण्याचा आणि सबलीकरणाचा संबंध रोजच्या व्यवहारात तितपत दिसत नाही. कोणास सूक्ष्म निरीक्षणात तसा संबंध दिसल्यास तेही विश्लेषण जरूर करावे.
बदलेला प्रश्न योग्य आहे
तुमचा बदलेला प्रश्न भंपक आहे असे मी म्हंटलेलेच नाही. माझ्या प्रतिसादातुन तसे प्रतित होत असल्यास तो माझा लेखनदोष समजावा. माझा आक्षेप इथल्या उथळ अभ्यासाला आहे. माझे विधान पुन्हा तपासून पाहावे. "मराठी स्थळांवर वावरणे म्हणजे काही विकास झाल्याचे लक्षण नव्हे."
मराठी संकेतस्थळे त्यातही ड्रुपलवाली चर्चास्थळे इतकाच संकुचित दृष्टीकोन सदर अभ्यासाचा आहे. माझ्या मते ह्या स्थळांवर येणे आणि सबलीकरणाचा काडीमात्रही संबंध नाही कारण ही स्थळे एकूण समाजाच्या तुलनेत नगण्य आहेत. त्यावरुन कुठल्याही निष्कर्षाप्रत येणे धोक्याचे आहे.
इथल्या आकडेवारीवरुन तुम्ही (उपक्रम/मिपा वगैरे) मराठी संस्थळांवरील महिलांचा वावर सबलीकरणासाठी वाढायला हवा असे अनुमान काढाल का?
अनुमान
ह्या चर्चेच्या निमित्ताने चारही स्थळांवर ही चर्चा पाहून आलो. मायबोलीवर अनेकांनी ह्या अभ्यासातील कच्चे दुवे दाखवून सपशेल असहमती दाखवली आहे. निधप ह्यांची भुमिका काहीशी माझ्यासारखी दिसली. मिसळपाववर अर्थातच ही चर्चा निकालात निघणार होती. तिकडे ह्याचे सुमार विडंबनही आले आहे. उपक्रमींनी दुर्लक्ष+टिका असे धोरण ठेवले आहे. एकूण इतर सर्वत्र झिडकारलेल्या ह्या अभ्यासावर ऐसीवर मात्र स्तुतीसुमने उधळली जात आहेत. ह्या अभ्यासातून बाकीचा काही निष्कर्ष निघो ना निघो ऐसीअक्षरे हे एक तद्दन कंपूबाजीचे स्थळ आहे हे अनुमान मी काढले. (ऐअचे प्रवक्ते ऋषीकेश ह्यांचा इथला प्रतिसाद त्याचेच द्योतक आहे)ऐअची जाहिरात हा ह्या चर्चेचा उद्देश असल्यास तो माझ्या बाबतीत तरी अयशस्वी झाला आहे. कारण एकमेकाची पाठ खाजवण्यासाठी काढलेली संकेतस्थळे मला तरी पसंत नाहीत. इत्यलम्!
खरं सांगायचं झालं तर....
रीकामटेकडे पणा कुणात जास्त आहे हे ह्याचे प्रमाण आहे बाकी काही नाही.
घरी आल्यावर स्वयंपाकची काही काळजी नसते, ऑफीसमधे कामासाठी (?) लेट झालेले चालते , वीकएन्डला कुणा पहुण्यांकडे जायला नको, सूटीच्या दिवशी संड लॅपटोप घेउन पडायचे आणि मी सर्वात भारी "तर्क" धारी प्राणी आहे हे दाखवायच पडलेलं असल्यामूळे जाळ्यावर सतत असावे लागणे...
एकंदरीत ज्या लोकांना कमी जबाबदारी, जास्त फुकट वेळ , अती ज्ञान असते ती लोक इंटरनेटवर पडीक असतात.
(अर्थात , जर जी खरी विचारविमर्ष करतात, ज्यांच्याकडे ज्ञान आहे आणी ज्यांना ते शेअर करायचे आहे , ज्यांना अभ्यास करायचा आहे अश्या लोकांचे इन्टरनेट वावराचे प्रमाण काढले तर स्त्री पुरूष प्रमाण थोड्याफार फरकात सेमच असेल.)
---------------------
-धनंजय कुलकर्णी
माझे दोन पैशे
चर्चा वाचली. इतरत्र जाऊनही वाचली. मायबोली आणि उपक्रम या दोन्ही संकेतस्थळांनी या चर्चेवर नाराजी दाखवली आहे. मायबोलीवर खालीलप्रमाणे म्हणलेले आहे ->
सुरुवातीला चर्चा चांगली चालू होती. नंतर मात्र मुद्दामहून शक्य असेल तिथे मायबोलीबाहेरील काही विशिष्ट संकेतस्थळांचे दुवे देऊन तिथे जाऊन पहावे अशी अपेक्षा सुरु दिसते आहे. असे सगळे दुवे प्रतिसादातून काढले आहेत आणि परत काढले जातील. ही चर्चा "चर्चा" म्हणून न करता दुसर्या संकेतस्थळांची जाहिरात करण्यासाठी केली आहे असे म्हणायला नक्कीच जागा आहे.
उपक्रम आणि मायबोलीवरील सदस्य वेगळे असताना त्यांना या प्रकरणाचा सारखाच वास येणे बरेच काही सांगून जाते. मायबोली, मनोगत आणि उपक्रमसारख्या प्रथितयश संकेतस्थळांचे मालक इतर संकेतस्थळांवर स्वतः आणि आपल्या चमचामंडळासह जाऊन चापलूसी करताना दिसत नाहीत. याचा बोध काही इतर चालक घेतील अशी अपेक्षा आहे. मायबोलीने सदर चर्चा वाचनमात्र करून या चर्चेची खरी जागा दाखवून दिली आहे. उपक्रमवरदेखील अश्या प्रकारांना वेळीच लगाम घालावा अशी संपादक मंडळाला विनंती करतो.
सहमत आहे
इकडच्या तिकडच्या चर्चांमधले प्रतिसादही जसेच्या तसे उचलून जाहिरातीच्या स्थळावर टाकले आहेत. धनंजय ह्यांचा मला आलेला इथला उपप्रतिसाद विनासंदर्भ् तिकडे चिकटवुन त्यावर परस्पर भाष्य केले आहे. इकडेही सदस्यत्व असताना ही चापलूसी कशाला? तिकडेच चर्चा करायची असेल तर इथे कशाला यायचे? (इतर वेळी अशा गोष्टींबाबत सतर्क असणार्या धनंजय ह्यांचाही त्याला आक्षेप दिसला नाही ह्याचे मात्र आश्चर्य वाटले. किंवा त्यांच्या हे बघण्यात अजून आले नसावे)
असल्या उचापती करुन संस्थळ पुढे आणण्यापेक्षा चालकांनी काही सकारात्मक कृती केल्यास संस्थळ नावाजेल.
मागे एका उपक्रमींनी खवमधून हे लोक तिकडे येण्यासाठी तगादा लावतात असेही मला सांगितले होते. इतका बाजारूपणा एका हौशी स्थळासाठी कशासाठी?
चर्चा
मायबोलीवर ही चर्चा का बॅन झाली ह्याचे हे एक कारण असावे.
अदिती ह्यांचा मायबोलीवरील एक प्रतिसादः
मालकांच्या हस्तक्षेपाचंच म्हणाल तर उपक्रमाचे मालक, मी जालावर गेली तीन-साडेतीन वर्ष आहे त्या काळात अगदी क्वचित दिसले आहेत. मिसळपावचे आताचे मालक संस्थळावर महिन्यातून फारतर एखादा दिसतात. मीमराठी आणि ऐसीअक्षरेचे मालक संस्थळांवर प्रचंड प्रमाणात कार्यरत आहेत आणि चांगले लेखन करणार्या लेखकांना उत्तेजन देतात; अगदी विरोधी मतं मांडणार्यांनाही!
इतर स्थळांवर जाऊन ऐसीअक्षरेची प्रसिद्धी करण्यासाठी उपक्रम किंवा मिसळपाव वगैरे साइट्सना कमी लेखणे हे योग्य नाही. ऐसीअक्षरेचे मालक श्री. बापट ह्याची नोंद घेतील ही अपेक्षा. जी काय स्पर्धा असावी ती सकारात्मक असावी.
सकारात्मक स्पर्धा
इतर स्थळांवर जाऊन ऐसीअक्षरेची प्रसिद्धी करण्यासाठी उपक्रम किंवा मिसळपाव वगैरे साइट्सना कमी लेखणे हे योग्य नाही.
गेल्या काही दिवसांत विविध संकेतस्थळांवर आलेल्या प्रतिसादांपैकी किती प्रतिसादांत (मूळ लेखांत नव्हे) इतर संकेतस्थळांवर शेरेबाजी झालेली आहे, किती प्रतिसादांत 'कंपूबाजी' वगैरे शब्द वापरले गेले आहेत, याचा कुणीतरी (शिवजयंतीनिमित्त) अभ्यास करेल का? त्यातून काही मनोरंजक विदा हाती लागेल असे वाटते ;-)
सन्जोप राव
हम तुझे वली समझते, जो ना वादाखार होता
'विदा' म्हणजे काय?
'विदा' म्हणजे काय?
----------------
सुधीर काळे
डाटा
डाटा ह्या इंग्रजी शब्दाला समानार्थी शब्द म्हणून 'विदा' (इंन्फर्मेशन इन डिजिटल फॉरमॅट) हा शब्द सुरवातीला कोणाकडून तरी वापरण्यात आला. हाच शब्द कां? ह्या विचाराच्या भानगडीत न पडता तो शब्द आत्ता आंतरजालावर सगळ्यांकडून वापरात येतो.
गंमत म्हणजे - 'विद्वान' म्हणजे 'विदावान' - 'केवळ भरपूर माहिती असलेला' असा अर्थ देखील त्यातून काढता येऊ शकतो, म्हणून तो शब्द चालण्यासारखा वाटतो.
मराठीत बरेच शब्द एकतर चूकीचे तरी वापरले जाताहेत, किंवा कोणत्या तर्कसूत्रानुसार शब्दांची घडण व्हावी हे अजून ठरले जात नाही आहे. ह्या संदर्भाबातच एक लेख इथे वाचायला मिळाला होता.