वैचारिक दिशा

फेसबुकवरील मैत्रीण ऋग्वेदिता हिने अंजली पेंडसे यांच्या लेखाबाबत काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्यावरील माझी ही कॉमेंट :लोकसत्ताच्या चतुरंगची आजवरची जी वैचारिक दिशा होती, ती राहिलेली नाही आणि अनेक विषयांवरील असे (अंजली पेंडसेंच्या लेखासारखे) विसंगतींनी भरलेले हौशी लेख प्रसिद्ध होताहेत. सकाळच्या सप्तरंग मध्ये सध्या असेच एक विचित्र सदर ( 'घराबाहेर पडताना' - वृषाली जोशी) प्रकाशित होते आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाईटवर जाऊन पाहिलेस तर 'झणझणीत वेबमसाला' या शीर्षकाखाली 'पोर्नो' पाहण्यास मिळते. ( मुलांनी वृत्तपत्र पाहिले तरी पुरे. त्यांना पोर्नो साइट शोधायची गरज नाही. आईबापांनी अशा साइट ब्लॉक करून ठेवल्या असल्या तरी वृत्तपत्रांच्या साइट तर ओपन असतातच!) इतर वृत्तपत्रांच्या(ही) स्त्रीविषयक पुरवण्या पाहिल्या, तर डोळे थिजतात. कला-साहित्य याविषयीच्या बातम्या/लेख इ.साठी या लोकांकडे अजून निश्चित व नियमित 'पान' नाही, पण या उथळपणासाठी खूप जागा आहे. असो. वेगाने घसरणार्‍यांना थांबवता येत नसते. त्यांचे तेच कुठेतरी जाऊन पडतील ( आणि त्याची त्यांना काही खंत, लाज इ. नसेल.). तरीही आपल्या कुवतीप्रमाणे आपण विरोध/निषेध नोंदवत जाणे आणि दुसर्‍या बाजूने जे वैज्ञानिक दृष्टिकोण राखणारे, योग्य आहे ते मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे. भले आपण अल्पसंख्य असू... पण आहोत, तर ठाम उभे राहिलेच पाहिजे.

Comments

वानवा

संबंधित लेखांचे आणि प्रतिक्रियांचे दुवे दिल्यास बरे होईल. मी चतुरंग पुरवणी अधूनमधून वाचत असे. सकाळप्रमाणे लोकसत्ता बोटचेपे वाटत नसे. त्यातील लेखही वाचनीय असत. असो. सकाळच्या सप्तरंगचे तर कधीच तीन तेरा वाजले आहेत. तथाकथित सिलेब्रिटींकडून आलेले लेखन कधीकधी फारच टुकार असते. बऱ्याच वेळा विकिपीडियावरून ढापून, इकडूनतिकडून उचलेगिरी करून हे लेखन केलेले असते. असो. मटा ऑनलाइनवर तुम्ही म्हणता तसे निळेपणाकडे झुकणारा मजकूर असतो. असो. एकंदरच चांगल्या लेखकांची वानवा आहे. (म्हणूनच बहुधा टाइम्ज़ ऑफ़ इंड्यासारख्या वृत्तपत्रांना ब्लॉगांवर जाऊन स्काउट करावे लागते आहे. त्यांना आदरणीय सतीश रावलेंचा पत्ता कुणीतरी द्यायला हवा.) तर त्यामुळे हौशी लेखकांसाठी सुगीचे दिवस आहेत. आणि कृतक ऑनलाइन लेखनाला मिळणाऱ्या वारेमाप उथळ स्तुतीने असले लेखक बनचुकेही झाले आहेत. असो. तूर्तास घाईत एवढेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

त्रोटक

संबंधित लेखांचे आणि प्रतिक्रियांचे दुवे दिल्यास बरे होईल.

धम्मकलाडू ह्यांच्याशी सहमत, दोन्ही पुरवण्यात काही चांगली सदरं आहेत, तरीपण चतुरंग हे सप्तरंगपेक्षा खूपच चांगलं आहे, बाकी सर्व गोष्टी बहूदा 'मटा'ने पुण्यातली 'सकाळची' सद्दी संपवण्यासाठी केली असणार, असल्या तद्दन बथ्थड गोष्टींबद्दल निषेध नोंदवण गरजेचं आहे.

'झणझणीत वेबमसाला' सम वेब पेजेस पण ब्लॉक करता येतात पण तेवढं तांत्रिक ज्ञान पालकांना असणं अवघड आहे, बर्‍याच पालकांना तेवढा वेळ असणं त्यापेक्षा अवघड आहे.

-----------------------------
एकंदर प्रतिक्रिया-
खाली चिंतातुर जंतूंनी दिलेला दुवा हाच जर चर्चेचा मुळ लेख असेल तर - तो लेख वाचला होता, माहितीतल्या लेख वाचणार्‍या एकंदर महिलावर्गाचं मत "उथळ आणि बायस्ड्" असं होतं, चतुरंगमधे अशा लेखांच प्रमाण सप्तरंग पेक्षा कमी असतं, मटा बहूतेक १२ वर्षापुर्वी वाचनीय होता असे अनेक बुजुर्ग मंडळी सांगतात, सप्तरंगचा कागद दर्जा आणि कंटेन्ट दर्जा दोन्हीही चतुरंगच्या मानाने कमीच वाटतो, मला ज्ञात मध्यमवर्गीय वाचकांच्या सर्कल मधे चतुरंगला सप्तरंग किंवा इतर पुरवण्यांपेक्षा अधिक प्राधान्य दिले जाते, पण मुळ वर्तमानपत्र मात्र सकाळच असते, त्यासाठी मटा किंवा लोकसत्ता हे अजुन तरी सेकंड चॉइस आहेत.

चांगले लेखन
लोकसत्तामधे आलेला ऍन् फेल्डहाऊस यांच्याबद्दलचा लेख किंवा डॉ. कामक्षी भाटे/पद्मजा सावंत ह्यांची स्त्रिआरोग्याबाबतची ही लेखमाला सुंदर आहे, तसेच मध्यंतरी पेशवेकालीन वाडे आणि इमारतींवर आधारित काही लेखही छान् होते, सकाळ मधे सध्या गेस्ट संपादकीय सदर माहितीपूर्ण असतं, सुहास कुलकर्णींचा हा त्यातलाच एक लेख, सप्तरंगमधील अच्युत गोडबोलंची मेंदू/मानसिक आजारासंबधी माहितीपर लेखमालादेखील छानच होती.

बहुसंख्य वर्ग आणि माध्यमांचा व्यवहार.-
वृत्तपत्रातील रंजक लेख हे दुपारी सास-बहू छाप मालिका बघणार्‍या वर्गाला ध्यानात ठेऊन टाकत असावेत, वैचारीक/अभ्यासपुर्ण लेख असतात पण ते असे पुरवणी व्यापणारे नसतात, रंजक आणि वैचारीक ह्यांचा समतोल साधणे ह्या वृत्तपत्रांना कठीण का जाते हे लक्षात येत नाही, हेच थोड्याफार फरकाने दूरदर्शनला लागू होते, पण ज्याप्रमाणे दूरदरर्शनवर रंजक/रुचीहीन चॅनल्स प्रमाणे अभ्यासपूर्ण चॅनल्स देखील असतात त्याप्रमाणे वृत्तपत्र माध्यमात अशी वृत्तपत्रे कमी किंवा अस्तित्वातच नाहित, पण छापील माध्यमात काही मासिके(अनुभव/अंतर्नाद/पालकनिती/पत्रिका) जरूर वैचारीक/सामाजिक/अभ्यासपुर्ण कन्टेटला वाहिलेली असतात.

विरोध-
वृत्तपत्र इतर माध्यमांप्रमाणेच किंवा अधिक विलक्षण परिणामकारक माध्यम आहे, त्यामुळे त्याचे स्वरूप योग्य आणि निरपेक्ष असण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे, त्यामुळे अशा बथ्थड लेखांचा/सदरांचा निषेध करणे गरजेचे आहे.

दुवा

येथे दुवा देण्याचा प्रयत्न केला तर तो 'लाल रंग' दाखवतोय. स्वीकारला जात नाहीये. :-(

दुवा द्यावा

सकाळ मी वाचत नाही पण मटा आणि लोकसत्ता यांत लोकसत्ता बराच उजवा वाटतो. मटा ही पॉर्न साइट वाटावी इतकी वाईट आहे. गेल्या चर्चेत अभंग देशपांडे यांनी चतुरंगच्या पुरवणीचा जो उल्लेख केला होता त्यात सोशल नेटवर्किंगवर काही लेख होते. त्यापैकी काही लेख विसंगतींनी भरले होते असे वाटले होते हे निश्चित.

तुम्ही म्हणता आहात त्या लेखाचा दुवा आवडेल.

दुवा

मूळ चर्चा व लेखाची लिंक इथे आहे... ती पहावी. माझ्या फेसबुक अकाउंटवर इतर मते-मतांतरे देखील दिसतील. इथे अधिक गंभीर व वेगळी चर्चा होईल असे वाटल्यामुळे तोच मजकूर इथे पुन्हा दिला आहे. : http://www.facebook.com/permalink.php?story_fbid=263973163670318&id=1000...

दुवा चालत नाही

तुम्ही दिलेला दुवा चालत नाही. तुम्हाला या लेखाविषयी चर्चा हवी होती का?

असल्यास नेमकी कशी ते कळले नाही. चर्चेचा आवाका निश्चित केलात तर कळेल.

महत्वाचा विषय

लेखाचा विषय अतिशय महत्वाचा व रिलेव्हंट आहे. लेखिकेने दुवे दिलेले नसल्याने लेखाचे आकलन होण्यास अडचण येते आहे हे खरेच आहे. उपक्रमवर जास्त रोमन अक्षरे लिहिता येत नाहीत ही या मागची खरी अडचण असावी. याला मार्ग म्हणजे लेखिकेने आपल्या अनुदिनीची लिंक देणे. तसे शक्य नसल्यास खरडवहीत दुवे देता येतील असे वाटते.

चंद्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

सरकार काहिच करीत नाही. आपण काहीच करू शकत नाही.

मला मी वयात आल्यापासून कै. माधव गडकरींच्या लेखांमुळे लोकसत्ताच वाचायला आवडत असे.

मी आत्ता म.टा. व टाइम्स ऑफ इंडिया यांची संयुक्त ऑफर निवडून दोन वर्तमानपत्र '९९९ रुपयात वर्शभर' चालू केली आहेत. दोघांची मिळून रद्दी चांगली साठते. ९-१० रुपये किलोने महिन्याभरात विकली कि १०० रुपये तरी मिळतात. माझ्या घरी सध्या लहान मुल आहे त्यामुळे बाळाच्या 'शीने भरलेल्या डायपर'साठी हे कागद उपयोगी पडतात. मटा. असो वा टाइम्स ऑफ इंडिया दोनही फक्त चित्र पहाण्याच्याच लायकीची असतात. म.टाच्या वैचारीकतेवर टाइम्स ऑफ इंडियाच्या मॅनेजमेंटचा वरचश्मा आहे. केवळ तिथल्याच बातम्या तोडक्या-मोडक्या पद्धतीने अनुवादीत होवून मटावर येतात असे नाही, तर लोकांना आकर्शित कसे करावे याचे मंत्र देखील त्यांच्याकडून त्यांना मिळालेले आहेत. जास्तीत-जास्त लोकांपर्यंत हे वर्तमान पत्र जात असल्यामुळे दे आर लिटररी कंट्रोलिंग द मांईंड ऑफ द मासेस.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रंगीत पुरवणीत दोन दिवसातून एकदा तरी एखादी तरी उघडी बाई असतेच. पूर्वी वयात येताना जे पहाण्यासाठी पैसे खर्च करून तसली मॅगझिन विकत घ्यावी लागत असे, पण टाइम्स च्या तेच अगदी नेहमी छापू लागली आहे, अगदी बिनदिक्कत! राजकारण्यांपासून ते समाजकारण्यांपर्यंत सगळ्यांचेच डोळे फुटले आहेत असे वाटते. बायकां-पोरींना उघड्यावर हगायला बसावे लागू नये, त्यांची लाज जावू नये, म्हणून महाराश्ट्र सरकार वेगवेगळ्या योजना राबवते. पण मग त्याच न्यायाने ह्या वर्तमान पत्रांवर दंडात्मक कारवाई का करीत नाही? व्यक्तीगत स्तरावर अश्लील चित्र पाहणं हि मानवी प्रवृत्ती जरी असली तरी त्या प्रवृत्तीने सामाजिक स्तरावर बेधडकपणे नागडं होणं नक्कीच रानटीपणाचे लक्शण आहे. काहि गोश्टी दडवून, झाकूनच करायला हव्यात. त्यातूनच समाजात लाज जपली जावू शकते, भीती बाळगली जावू शकते.

सध्याची महाविद्यालयीन मुलं-मुली बिनदिक्कतपणे ट्रेनमध्ये, बसमध्ये श्रुंगारीक चाळे करीत असतात, चुंबन घेत असतात. अशाप्रसंगी मी (असो इतर कोणीही) 'रस्त्यावरची कुत्रा-कुत्रीला' जसे बघून मान फिरवतो, तशी मान फिरवत आपल्या विचारात, कामात पुन्हा गुंग होत असतो.

अंजली पेंडसे यांच्या लेखाचा दुवा

कविता महाजन यांना अभिप्रेत लेखाचा दुवा हा असावा.

मराठी वृत्तपत्रांत उभं केलं जाणारं स्त्रियांचं चित्र आणि त्याची बदलत गेलेली वैचारिक दिशा अशी चर्चा अभिप्रेत असावी असं वाटतं. तसं असेल तर एकंदरीत इतरांपेक्षा लोकसत्ताच बरा म्हणावा लागेल. उदाहरणार्थ, 'चतुरंग' पुरवणीत गेल्या शनिवारी ऍन् फेल्डहाऊस यांच्याबद्दल हा लेखही आला होता. 'सकाळ' किंवा 'महाराष्ट्र टाईम्स'च्या महिलांसाठीच्या सदरं/पुरवण्यांमध्ये अशा लेखाला जागा असते असं वाटत नाही. चूभूद्याघ्या.
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

बदलती दिशा

वृत्तपत्रीय लेखनाची बदलती दिशा अशा स्वरुपात याकडे पाहिल्यास चिडचिड होणार नाही. राशीभविष्यासारखा अशास्त्रीय कॉलम वर्तमानपत्रांना आपल्या खपासाठी द्यावाच लागतो. बाकीच्या कॉलमचही तसेच आहे. लेखन विविध विषयांवर असले कि प्रत्येक वाचकाला आपल्या आवडीचे त्यात शोधता येत,
बाकी समाजाला वैचारिक दिशा दाखवत असल्याचा आळ वृत्तपत्रांवर कायम येत असतो. असो
प्रकाश घाटपांडे

पटले

वेगाने घसरणार्‍यांना थांबवता येत नसते. त्यांचे तेच कुठेतरी जाऊन पडतील ( आणि त्याची त्यांना काही खंत, लाज इ. नसेल.). तरीही आपल्या कुवतीप्रमाणे आपण विरोध/निषेध नोंदवत जाणे आणि दुसर्‍या बाजूने जे वैज्ञानिक दृष्टिकोण राखणारे, योग्य आहे ते मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे. भले आपण अल्पसंख्य असू... पण आहोत, तर ठाम उभे राहिलेच पाहिजे.

हे पटले. आपण अल्पसंख्य आहोत आणि असणार आहोत हे मान्य करुनच लढत राहिले पाहिजे. वृत्तपत्रांमागची पवारट निर्लज्ज आर्थिक ताकद, संवेदनशीलता गुंडाळून फेकून देणारी वार्तांकन पद्धती आणि चुरचुरीत, चमचमीत वाचायला सोकावलेली जनता -सुस्त, मद्दड जनता - ही सतत बहुमतात असणार हे मान्य करुनच विरोध / निषेध करत राहिले पाहिजे.
सन्जोप राव
हम तुझे वली समझते, जो ना वादाखार होता

कशासाठी आणि कुणासाठी?

>आपण अल्पसंख्य आहोत आणि असणार आहोत हे मान्य करुनच लढत राहिले पाहिजे.

किती जण वृत्तपत्रे वाचण्यात पूर्वीइतका वेळ घालवतात्? आणि तो जर् हळूहळू कमी होत् असेल् तर् त्या वृत्तपत्रांचा प्रभाव पूर्वीइतकाच जनमानसावर् असणार् गृहीतक चुकीचे नाही का? आणि तो प्रभाव जर् कमी होत् असेल् तर् फारसा विचार्/लढा का करावा?
>चुरचुरीत, चमचमीत वाचायला सोकावलेली जनता -सुस्त, मद्दड जनता
बरोबर्. पण् म्हणूनच् अशी मद्दड जनता विचारही करत् नाही आणि त्या त्या वृत्तपत्राने काही लिहले तरी त्याचा प्रभावही कमी होतो आहे.
फार् पूर्वी श्री नावाचे एक अत्यंत उथळ् साप्ताहिक् निघत् असे. त्याला प्रचंड खप् होता. पण् त्यातल्या सवंगपणामुळे गंमत् म्हणून् चहा चिवड्याबरोबर् वाचायला मजा यायची. कमी अधिक प्रमाणात् अनेक वृत्तपत्रे त्याच् दिशेने वाटचाल करत् आहेत् असे माझे प्रामाणिक मत् आहे. मग कशाला त्यांची चिंता करायची? मटा, लोकसत्ता या एकेकाळी "संस्था" होत्या त्या आता केंव्हांच नष्ट् झाल्या आहेत्. "मटा" ला "अरे मठ्ठा" असे म्हणायची वेळ आहे.

सगळ्या जगात् वृत्तपत्रांना वाईट दिवस येऊन् ती बंद पडत् आहेत्. बातम्या शोधून् संपादित् करायला लागणारा वेळ्/खर्च्, त्या जनमानसापर्यंत् पोहचवण्यासाठी लागणारा खर्च् आणि वृत्तपत्रांतून् मिळणारे उत्पन्न यांचा ताळमे़ळ जुळत् नाहीये. जसे जसे जगातल्या जाहिरातदारांना ऑनलाईन जाहिरातींचे फायदे कळायला लागले तसे वृत्तपत्रांचे जाहिरातदार् गळत गेले. प्रत्येक् देशात् हे घडले आहे. भारत् या जागतीक ट्रेंडपासून् किती दिवस् दूर् रहाणार्?

म्हणजे मद्दड विचारांना विरोध करायचा नाही असे माझे म्हणणे नाही. मद्दड विचार् करणार्‍या मद्दड संस्थांची (वृत्तपत्रांची) कशाला काळजी घ्यायची? त्यांना मरु द्या. मद्दड् विचारांना लढा द्यायला इतर् अधिक् प्रभावी माध्यमे उपलब्ध होत् आहे त्याचा उपयोग् करून् लढा देऊया.

http://journalism.about.com/od/trends/a/dyingpapers.htm

http://www.genealogyintime.com/GenealogyResources/Articles/why_are_newsp...

http://newspaperdeathwatch.com/

 
^ वर