इमेज किंवा पीडीएफ फाईलचे टेक्स्ट फाईल मध्ये रुपांतर बाबत

नमस्कार मित्रांनो!

मला खाजगी कामासाठी एक सॉफ्टवेअर हवे आहे. मला असे सॉफ्टवेअर हवे आहे जे मराठीत असलेली पीडीएफ फाईल किंवा एखादी स्कॅनड् इमेज मला एडिटेबल फॉरमॅट मध्ये वर्ड किंवा एक्सेल फाईल मध्ये रुपांतरीत करून देईल.

मी गुगल वर शोधण्याचा प्रयत्न केला होता, गुगलच्या सेवेचा देखील उपयोग करून पाहिला. पण कुठेच मराठीत रुपांतरण होत नाही.

आपल्या कोणाकडे याबाबत माहिती असल्यास कृपया मला देण्यात यावी हि विनंती या प्रस्तावासोबत करीत आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

थोडीशी मदत

सतीशजी,

इमेजमधील् टेक्स्ट हे रुपांतरीत् करण्यासाठी OCR सॉफ्टवेअर्स वापरतात.

मायक्रोसॉफ्टचे OCR सॉफ्टवेअर् आहे पण् बहुतेक उत्तम दर्जाची OCR सॉफ्टवेअर्स ही विकतच् घ्यावी लागतात.

या दुव्यावर तुम्हाला अपेक्षित् असलेली माहिती मिळेल :)

उपयोग होईल अशी आशा आहे.

भारतीय भाषांसाठी ओसीआर

परदेशात उपलब्ध सॉफ्टवेअर भारतीय भाषांसाठी चालत नसावे. सी-डॅकने खास भारतीय भाषांसाठी एक OCR सॉफ्टवेअर मोफत उपलब्ध करून दिले आहे (दुवा खाली पाहावा). प्रत्यक्ष वापराचा अनुभव नाही त्यामुळे ही शिफारस नसून निव्वळ माहिती समजावी.
http://pune.cdac.in/html/gist/products/chitra.aspx

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

धन्यवाद!

प्रतिसाद दिल्याबद्दल दोनही सदस्यांचा मी आभारी आहे.
चिंतातूर ह्यांनी दिलेल्या संकेतस्थळावर चित्रांकन हे सॉफ्टवेअर उतरवून घेतले. पण ते कार्यरत करताना 'chitranakar.ini file is missing' असा संदेश झळकला अन् मग सगळं मुसळ केरात गेलं!

ह्म्म्.

जर पीडीएफ फाईल तुम्हाला मजकुर् सिलेक्ट् \ कॉपी करु देत् नसेल् तर् ती प्रोटेक्टेड् आहे आणि तिला कॉपी करणे पायरसी ठरेल.

तुम्ही तिचा पासवर्ड् शोधुन् तिला कॉपी करु शकता. अन् स्कॅनड् इमेज साठी तुम्हाला OCR सॉफ्टवेअरच् लागेल्. मी पाहतो कुठले ओपन् सोर्स् सॉफ्टवेअर आहे का.

सांगतो तुम्हाला.

अभिजीत राजवाडे

 
^ वर