सा रे ग म प.... स्वप्न तार्‍यान्चे

झी-मराठी वर चालु असलेले सा रे ग म प... या कार्यक्रमाचा या पर्वाचा नेमका हेतु काय हेच कळत नाही...
सर्व नावाजलेले कलाकार... पण त्याना गाणे म्हणायला घेतले?

क्रान्ती रेडेकरचा आवाज तर.... खरच रेड्या सारखा आहे... नुस्ती किन्चाळत असते... ती आली तर मी चेनल बदलतो किन्वा आवाज बन्द करतो आणि अशा गाण्या नन्तर पण अवधूतला तिच कौतुक कराव लागत...हे पाहून मला हसु येत....आणि आज कल राग पण येतो.
सम्पुर्ण कार्यक्रमात मला गाण सोडुन फक्त अवधूतचे बोलणे आवडते...

प्रशान्त दामले...मोहन जोशी... अम्रुता सुभाष... अशा काही मोजक्या कलाकाराचे गाणी सोडली तर... बाकिचे नाममात्र फक्त कलाकार आहेत.

मराठी सा रे ग म प मध्ये...हिन्दी गाण्यान्चा भडिमार् का?

आणि अवधूत एक शेवटची इछा व्यक्त करतो... कार्यक्रमाचा शेवट अवधूतच्या एका गाण्याने व्हावा... एक तरी चान्गले गाणे ऐकायला मिळेल.

लेखनविषय: दुवे:

Comments

असे असावे बहुतेक

हेतू
- व्यवसायिक.
नावाजलेल्या कलाकरांना का घेतले?
- टिआरपी वाढवण्यासाठी. नवीन लोकांना घेण्यासाठी त्यांच्या टिमला जास्त कष्ट घ्यावे लागत असावेत, त्यापेक्षा हे लोक विनासायास मिळाले.
सम्पुर्ण कार्यक्रमात मला गाण सोडुन फक्त अवधूतचे बोलणे आवडते...
-हो अर्थात, बोलणे आणि सगळ्यांचे कौतुक करणे यासाठीच त्याला घेतले असावे.
मराठी सा रे ग म प मध्ये...हिन्दी गाण्यान्चा भडिमार् का?
मराठी गाणी गायला अवघड आहेत, भाग घेणारे लोक गायक नसल्यामुळे त्यांना ती गाणे कठीण गेले असते.
कार्यक्रमाचा शेवट अवधूतच्या एका गाण्याने व्हावा...
-हो नाहीतर गाणे म्हणायची सवय मोडून जाईल त्याची.

 
^ वर