विधानसभेमध्ये अश्लील चित्रफीत

'पार्टी विथ डिफरन्स' असे बिरुद मिरवणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे कर्नाटकातील एक मंत्रीमहोदय भर विधानसभेतच अश्लील चित्रफीतीचा आनंद लुटण्यात मग्न असल्याचे दृश्य अनेक चित्रवाहिन्यांनी दाखवले. यासंदर्भात वाईट वाटून घ्यावे की मंत्रीमहोदयांनी अशी चित्रफीत पाहताना करावयाच्या क्रियेची पुढची पातळी विधानसभेतच गाठली नाही याबाबत हायसे वाटून घ्यावे हे नक्की समजत नाही.

काही प्रश्न
१. भारतीय जनता पक्ष यासंदर्भात काही कारवाई करेल असे आपणास वाटते का?
२. आण्णा हजारे व त्यांची गँग यांनी या स्वरुपाच्या नैतिक अधःपतनाविरोधात काही आंदोलन करावे का?
३. भारतीय जनता पक्षाचे पितृक रा.स्व.संघाने या संदर्भात काही प्रतिक्रिया दिल्याचे कोणाच्या वाचनात आले असल्यास सांगावे.

लेखनविषय: दुवे:

Comments

पार्टी विथ डिफरन्स

काँग्रेसवाले असले धंदे किमान भर सभागृहात तरी करणार नाहीत. मंत्रीद्वयांनी भर विधानसभेतच तथाकथित अश्लील चित्रफितीचा आनंद लुटत भाजप 'पार्टी विथ डिफरन्स' आहे हेच सिद्ध केले.
१. भारतीय जनता पक्ष यासंदर्भात काही कारवाई करेल असे आपणास वाटते का?
भाजपाचा महिला मोर्चा, स्मृती इराणी आणि कर्कश बाया मूग गिळून बसण्याची कारवाई करतील असे वाटते आहे.

२. आण्णा हजारे व त्यांची गँग यांनी या स्वरुपाच्या नैतिक अधःपतनाविरोधात काही आंदोलन करावे का?
हेहेहे. रामदेवबाबांना विसरले काय?

३. भारतीय जनता पक्षाचे पितृक रा.स्व.संघाने या संदर्भात काही प्रतिक्रिया दिल्याचे कोणाच्या वाचनात आले असल्यास सांगावे.
संघांनी बसवलेल्या गडकरींनी फोनाफोनी केल्याचे समजते. पण कर्नाटकात सत्ता टिकवायची आहे. असो. तूर्तास एवढेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

काँग्रेसवाले असले धंदे किमान भर सभागृहात तरी करणार नाहीत....

अशी कुणाची खात्री देऊ नका. न जाणो उद्याच तोंडावर पडायची पाळी येऊ शकते.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

चल्ता है

चल्ता है...

जौंद्या

चालायचंच....

फेसबुकावर अजून ही गोष्ट शेअर आणि लाईक झाली नाही याचे आश्चर्य वाटते.

अवांतर : पार्टी विथ डिफरन्स चा क्लेम >१५ वर्षांपूर्वीच खारिज झाला.

नितिन थत्ते

फेसबुक

फेसबुकावर ही बातमी लाईक व्हायला वेळ लागेल. फेसबुकावरील बहुसंख्य लोक हे प्रामुख्याने भाजपाचे सहानुभूतीदार असतात असे सामान्य निरीक्षण आहे. त्यामुळे हे जास्त शेअर झाले नसावे.

बातमी फुटली कशी?

नेमकं काय झालं? हे महाशय एकटे एकटेच लुत्फ लुटताहेत असे लक्षात आल्यावर आजूबाजूला अनेकांची गर्दी झाली का? नै निदान तिथे तरी या चित्रफितीनिमित्ताने सर्वपार्टी सदस्य एकत्रित आले असावे काय? पुढील वेळी, महत्त्वाचे निर्णय घेताना अशा चित्रफितींचे जाहीर आयोजन करता येईल काय? (सर्व सदस्य हजर तरी राहतील.)

बातमी

हे मंत्रीमहाशय चित्रफीतीचा लुत्फ लुटत असताना मंत्रीमहाशयांची चुळबूळ प्रेस ग्यालरीतील एका पत्रकाराच्या लक्षात आली. त्याने मंत्रीमहोदयांच्या मोबाईलवर झूम केले असता हा प्रकार उघडकीस आला. आजूबाजूला गर्दी झाली नसली तरी दुसऱ्या मंत्रीमहोदयांनी काही क्षण हा लुत्फ लुटला असे व्हिडिओ पाहता लक्षात येते.

कहर म्हणजे मंत्रीमहोदयांनी 'आपण अमेरिकेचे सैनिक इराक-इराणमध्ये स्त्रियांवर करत असलेल्या अत्याचाराची बातमी पाहत होतो' असे हास्यास्पद स्पष्टीकरण दिले आहे. ज्या वाहिनीने ही बातमी दाखवली तिचे प्रसारण एका मंत्रीमहाशयांच्या मतदारसंघात बंद पाडण्यात आल्याचे तर दुसऱ्या मंत्रीमहाशयांच्या मतदारसंघात वीजपुरवठा खंडित केल्याचे कळते.

मंत्र्यांचे राजीनामे

मंत्रीमहोदयांनी राजीनामा दिल्याचे कळते. कलम २९२ नुसार त्यांच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते का? उपक्रमावरील कायदेतज्ञांनी माहिती द्यावी.

ओळख

लोक इंटरनेटवर ओळख लपवून हेच बघतात तेव्हा ठीक इथे ओळख कळल्यावर गोंधळ! चालायचेच म्हणा. असो.
असल्या याविषयातील काहि प्रसिद्ध तज्ञ उपक्रमींच्या मताच्या प्रतिक्षेत!

स्वगतः तरीच लोक जालावर ओळख लपवून पहातात - आपलं वावरतात ;) !

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

हास्यास्पद

ओळख कळल्यावर गोंधळ? अहो विधानसभेत असे व्हिडिओ पाहणे तुम्हाला योग्य वाटते का? इंटरनेटवर लोक ओळख लपवून हेच बघतात हे स्वानुभवाचे बोल आहेत काय? अशा गोष्टी खाजगी ठिकाणी पाहणे हा गुन्हा नसून त्याचे प्रदर्शन व शेअरिंग करणे हा गुन्हा आहे. या दृष्टीने या गोष्टीकडे बघावे.

बाय द वे फेसबुकवर ही बातमी का शेअर झाली नाही याचे उत्तर नितीन थत्ते यांना मिळालेच असेल. हाच प्रकार काँग्रेसी मंत्र्याने केला असता तर किती थयथयाट झाला असता याची कल्पना करु शकतो.

+१

इंटरनेटवर लोक ओळख लपवून हेच बघतात हे स्वानुभवाचे बोल आहेत काय?

जब मै छोटा लडका था...बडी शरारत करता था...मेरी चोरी पकडी जाती....तब रोशन होता बजाज!!

सदस्य, तुम्ही ओळख लपवलेला बजाज बल्ब आहात का?

अभ्यास वाढवावा

अशा गोष्टी खाजगी ठिकाणी पाहणे हा गुन्हा नसून त्याचे प्रदर्शन व शेअरिंग करणे हा गुन्हा आहे

भारतीय कायद्याचा अभ्यास वाढवावा! :)
तोपर्यंत चालु दे!

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

अभ्यास

अश्लिल चित्रफिती खाजगी ठिकाणी पाहायला बंदी असायला भारत म्हणजे काही सौदी अरेबिया नाही. 'फक्त प्रौढांसाठी' सिनेमे तर रितसर थेट्रात जाऊनही पाहता येतात. दुसर्‍यांना अभ्यास वाढवायला सांगण्याआधी स्वतःला शिस्त लावा. उगाच हसं करुन घेऊ नका.

हार्डकोअर पॉर्नवर सार्वत्रिक बंदी होती

भारतात हार्डकोअर पॉर्नवर सार्वत्रिक बंदी अगदी हल्लीपर्यंत होती, असे वाटते (विकिपेडियावर असे म्हटले आहे, तेथे संदर्भ नाही...) पण २०१० साली मुंबई हायकोर्टाने असा निकाल दिला की खाजगी ठिकाणी पॉर्न बघणे गुन्हा नाही (विकी दुवा, संदर्भासह).
कोर्टाचा निकाल सार्वत्रिक होईपर्यंत (हायकोर्टाचे निकाल त्याच्या क्षेत्रात कायदा मानले जातात, उर्वरित देशांत त्यांचे प्रामाण्य आंशिक असते), किंवा सार्वत्रिक ज्ञानाचा होईपर्यंत, या बाबतीत सुशिक्षित लोकांतही गोंधळ असू शकतो.

(२००९ ते २०१२ काळात समाज बर्‍यापैकी तुल्य होता. "भारत म्हणजे सौदी अरेबिया नाही" हे दोन्ही काळांत ठीकच. पण आदल्या काळात खाजगी ठिकाणी पॉर्न बघणे बेकायदेशीर असल्याचे सरकारचे अधिकृत धोरण होते; आणि आज - मुंबई हायकोर्टाच्या क्षेत्रात तरी - हा गुन्हा नाही.)

सॉफ्ट पॉर्न?

सदर मंत्रीमहोदय 'हार्डकोअर पॉर्न' पाहत होते असे लिहिलेले मला दिसले नाही. 'फक्त प्रौढांसाठी गुलाबी थंडीतले आकर्षण' छाप जाहिराती लावुन रितसर थेट्रात सॉफ्ट पॉर्न दाखवले जायचे/जाते.

हे फार गुंतागुंतीचे होत आहे

हे फार गुंतागुंतीचे होत आहे. (आणि मुद्दा तोच आहे.)

दिलेल्या दुव्यांत (आणि प्रतिसादाच्या शीर्षकात) हार्डकोर आणि सॉफ्ट यांच्यात फरक केलेलाच आहे. त्यामुळे सॉफ्ट पॉर्न थिएटरात दाखवतात, हे वरील प्रतिसादाच्या विरोधात नाही. (हा मुद्दा उपप्रतिसादात काहीसा नि:संदर्भ वाटतो.)

गुंतागुंतीचे मुद्दे :
१. मंत्री काय बघत होता ते मला वृत्तावरून कळत नाही. अश्लील चित्रफीत सॉफ्ट किंवा हार्ड पॉर्न असू शकते. त्यावरून कायदेशीरपणाबाबत संदेह होतो.
२. मुंबई हायकोर्टाचा निकाल अगदी हल्लीहल्लीचा आहे. हा निर्णय काय आहे या बाबतीत सार्वत्रिक ज्ञान झालेले नसेल.
३. मुंबई हायकोर्टाचा निकाल कायदा म्हणून भारताच्या अन्य भागात (उदाहरणार्थ बेंगळूरूमध्ये) कितपत लागू आहे, याबाबत संदेह आहे.
४. सॉफ्टपॉर्नविषयीदेखील जाहीर/खाजगीबाबत तरतमभाव असावा. ज्या "सार्वजनिक" थिएटरात सॉफ्ट पॉर्न दाखवण्यात येते, त्या ठिकाणी दाराशी "फक्त प्रौढांसाठी" हे तपासण्याकरिता यंत्रणा (कमकुवत का होईना) असावी लागते. म्हणजे ही थिएटरे पूर्णपणे सार्वजनिक नसून, मर्यादित ठिकाणे आहेत. ज्या ठिकाणी अशी यंत्रणा नाही, अशा ठिकाणी सॉफ्ट पॉर्न जाहीररीत्या दाखवणे कायदेशीर असल्यास मला आश्चर्य वाटेल.

मुद्दा गुंतागुंतीचा नाही, असे तुमचे म्हणणे असेल, तर ठीक. तसे असेल. या बाबतीत मला मर्यादित कुतूहल आहे. दोन प्रतिसादांत ते संपले.

संदेह कसा काय?

१. मंत्री काय बघत होता ते मला वृत्तावरून कळत नाही. अश्लील चित्रफीत सॉफ्ट किंवा हार्ड पॉर्न असू शकते. त्यावरून कायदेशीरपणाबाबत संदेह होतो.

मला वाटते सभागृहामध्ये असे काही पाहणे हा गुन्हा आहे. याबाबत संदेह का निर्माण व्हावा हे समजले नाही.

सोपे आहे

सरसकट पॉर्न खाजगी जागेत पाहणे बेकायदेशीर नाही. माझ्या प्रतिसादाचा उद्देश हा 'अभ्यास वाढवा' ही टिप्पणी हास्यास्पद आहे हे दाखवुन देणे हा होता. (मंत्र्यांचा विडियो सॉफ्ट पॉर्न होता की हार्ड पॉर्न ह्यावर मूळ बातमीत काहीही टिप्पणी नाही त्यामुळे तो अनावश्यक फोडलेला फाटा आहे.) मंत्री महोदय अश्लिल चित्रफित होते इतकेच बातमीत दिले आहे. ते लगेच हार्ड पॉर्नच होते आणि खाजगी जागतेही त्यावर कायदेशीर बंदीच आहे असे ठरवुन वर लोकांना अभ्यास वाढवायचा सल्ला देणे हे बलिशपणाचे लक्षण आहे.

एक रोचक बातमी

अश्लिल चित्रफिती खाजगी ठिकाणी पाहायला बंदी असायला भारत म्हणजे काही सौदी अरेबिया नाही.

बरोबर. ह्यावरून दुबईतली एक जुनी रोचक बातमी आठवली.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

म्हणजे नक्की काय?

भारतात खाजगी ठिकाणी पॉर्न बघणे हा कायदेशीर गुन्हा नाही. कायद्याचा अभ्यास वाढवा म्हणजे नक्की काय? तुम्हाला दुसरा कायदा माहीत आहे का?

दुसरा कायदा.

उदाहरणार्थ,
बीएसएनएल च्या इंटरनेट वापरासाठीचा अर्ज भरताना आपण काय लिहूण देत आहोत/दिले आहे- ते कृपया या पीडीएफ फाईलीत वाचावे.

बीएसएनएल

बीएसएनएलचा अर्ज मला दिसला नाही. मात्र माझा अंदाज असा आहे की हे नियंत्रण बीएसएनएलपुरते मर्यादित असावे. इतर आयएसपींनाही याबाबतीत आक्षेप आहे का?

विशेष फक्त ठिकाण...

मंत्रीमहोदयांनी हा जो प्रकार केला आहे त्याचे ठिकाण फक्त चूकले आहे. बाकी काय चालायचेच. (खरे तर खरा विशेष प्रकार म्हणजे ते रंगेहाथ पकडले गेलेत हाच आहे.)

+१

विधानसभेतले सभागृह जाहीर ठिकाण आहे, आणि खाजगी व्यवहार तिथे करू नयेत.

(टीप १ : तरी येथे मंत्र्याने मतदारांची केलेली फसवणूक/तोटा तसा सौम्य आहे : चर्चेकडे लक्ष देण्याऐवजी मन विचलित होऊ देणे, हे मतदारांचे नुकसान करणे होय. विधानसभेत कौटुंबिक ईमेल वाचणे-लिहिणे हे तितकेच तोटा करणारे. म्हणजे सौम्य तोटा. राजीनामा द्यावा लागणे हा त्याचा दंड म्हणून असंतुलित वाटतो.
उपटीप २: भारतात बहुधा उत्तान चित्रफिती खाजगीमध्ये बघणे, हासुद्धा गुन्हा आहे. आहे का? परंतु गुन्हा असेल, तर तो कदाचित मान्य नसेल. अशा परिस्थितीत अशा चित्रफिती बघणे म्हणजे त्या कायद्याविरुद्ध एका प्रकारची कायदेभंग चळवळ असू शकते. पण कायदेभंग चळवळ ही घोषणा देऊन केली, तरच हेतू स्पष्ट होतो. येथे तसे काही जाणवत नाही.)

प्रचंड असहमत

विधानसभेत चर्चेच्यावेळी पोर्न क्लीप बघणे म्हणजे "चर्चेकडे लक्ष देण्याऐवजी मन विचलित होऊ देणे, हे मतदारांचे नुकसान करणे होय" एव्हडच? उद्या पोर्नक्लीप बघून विधानसभेतच हस्तमैथुन केल्यानंतर फक्त अस्वच्छतेबद्दल दोष द्यायचा काय? एखाद्या शाळा-कॉलेज मध्ये मागच्या बाकावर बसून केलेलं कृत्य नाहिये हे. याची तीव्रता बरीच मोठी आहे, परिणाम सुद्धा तसेच असायला हवेत.

फक्त चर्चेत लक्ष दिलं नाही हा मुद्दा नाहीच.संसदेत झोपणारे कितीतरी जणं बघतो. कितीतरी जण टिवल्याबावल्या करत बसलेली असतील. कितीतरीजण दोन-दोन वर्षात तोंडपण उघडत नसणार.आणि काहीच वॅल्युऍडीशन होत नसेल तर नुसतं लक्ष देउन पण उपयोग नाही.

पण राजरोसपणे भर सभागृहात कामकाज चालू असताना पोर्नपाहणे म्हणजे नुसताच त्यावेळी केलेला कामचुकारपणा नव्हे तर लोकांच्या प्रश्नाविषयी अनास्था असलेल्या कामांध व्यक्तीने सभागृहाचा केलेला अक्षम्य अपराध ठरावा.

असेल बुवा

लोकांच्या प्रश्नाविषयी अनास्था असलेल्या कामांध व्यक्तीने सभागृहाचा केलेला अक्षम्य अपराध ठरावा

असेल बुवा. अनास्था कामांध व्यक्तीला असली तर अपराध अक्षम्य ठरावा, आणि अनास्था बिगर-कामांध व्यक्तीकडून असली तर अपराध क्षम्य ठरावा.
(यू. एसमध्ये बिल क्लिंटनला महाभियोगाने हटवणार्‍या खासदारांचादेखील हाच विचार असावा. लैंगिक व्यवहार राष्ट्रपतीच्या ऑफिसात झाला, ही बाब त्या काळात काही लोक अतिशय महत्त्वाची मानत.)
परंतु या बाबतीत पुष्कळ मतभेदही असावा. यू.एस.मध्ये ५०% पेक्षा थोड्या अधिक मतदारांनी त्याला पुन्हा निवडून आणण्याइतपत क्षमा केली. भारतातही शोधल्यास सेक्सकांडानंतर पुन्हा निवडून आलेले प्रतिनिधी सापडतील.

तुलना होऊ शकत नाही असे वाटते

सभागृहात झोपणे आणि सभागृहात पॉर्न पाहणे या गोष्टींची सरळसरळ तुलना करू नये (apple to apple) असे वाटते.

सगळ्याच तुलना आंशिक असतात

एका ऍपलची दुसर्‍या ऍपलशीसुद्धा तुलना काही अंशी अयोग्य असते. (ती दोन वेगवेगळ्या जातींची असतील. एखाद्या जातीत ऍपल पिकल्यावर तपकिरी होते, तर दुसर्‍या कुठल्या जातीत पिवळेधमक होते. "कच्चा/पिकला रंग" या विषयाच्या बाबतीत त्यांची तुलना ठीक नसते.)

कुठलीच तुलना परिपूर्ण नसते. प्रत्येक तुलनेत "अमुक-अमुक अंशाच्या बाबतीत तुलना आहे" अशी आडवळणीच तुलना असते. तुलना ज्या बाबतीत केलेली आहे, ते वाक्यात आलेलेच आहे. त्यामुळे तुलना "सरळसरळ" नाही.

लोक वेगवेगळ्या ठिकाणी पॉर्न बघतात याबाबत मी फारसा सनसनाटलेलो नाही, हे मात्र खरे. त्यामुळे विधानसभा-कार्यात हेळसांड = मतदात्यांची हानी ही बाब मला महत्त्वाची वाटते. जी बाब महत्त्वाची वाटते, त्या पैलूने तुलना केली. क-जीवनसत्वाच्या स्रोतांबाबत बोलताना ऍपल आणि ऑरेंजची तुलना सुद्धा ठीकच असते.

असो.

:)

:)

सहमत

ठिकाण चुकले आहे आणि हाच मुद्दा आहे. काही सदस्यांनी घरच्याघरी इंटरनेटवर अशा गोष्टींचा आनंद लुटण्याशी या प्रसंगाची हास्यास्पद तुलना केली आहे. एक शंकाः सभागृहातील सदस्यांना असलेल्या विशेषाधिकारांमध्ये या गोष्टीचा समावेश होतो काय?

म्हणजे?

अशी चित्रफीत पाहताना करावयाच्या क्रियेची पुढची पातळी

म्हणजे काय्???

शान्तम् पापम् म्हणत कान धरून चुकचुक

"शान्तम् पापम्" म्हणत कान धरून चुकचुक करायची. ही क्रियेची पुढची पातळी.

:)

:)

बॉबिटायझेशन

अशी एक पाप शांत करण्याची पातळी डोळ्यासमोर तरळून गेली.. बॉबिटायझेशन

 
^ वर