तर्कक्रीडा:सातच्या आत घरात
सातच्या आत घरात
बनगावच्या रामला ननगावी नोकरी मिळाली.तिथे खोली घेऊन राहिला.आठवड्यात शनि.,रवि. सुट्टी. शुक्रवारी ऑफिस सुटले की राम ननगाव रेल्वे स्थानकावर जायचा.ठराविक गाडी मिळायची.बनगाव स्टेशनला पोचायचा.त्याचा भाऊ शाम तिथे स्कूटर घेऊन हजर असायचा.दोघे स्कूटरवरून घरी जायचे. स्कूटरचा वेग ताशी तीस किलोमिटर नियमित. स्टेशनपासून घर दूर होते.
ते दोघे शुक्रवारी सायं.सातला पाच मिनिटे असताना घरी पोचायचे.प्रत्येक शुक्रवारी हाच कार्यक्रम.
एका शुक्रवारी ऑफिस वेळेआधी सुटले.राम स्टेशनवर गेला.लौकरची गाडी मिळाली.बनगाव स्थानकावर उतरला.नेहमीच्या रस्त्याने पदयात्रा करीत निघाला.घरून नेहमीच्या वेळी निघालेला शाम वाटेत कदंबाच्या झाडाजवळ भेटला.लगेच स्कूटर वळवली.दोघे निघाले.
"आज वेळेआधी कसा?"
"ऑफिस लौकर सुटले. आधीची गाडी मिळाली."
"कळवले असतेस तर आधी आलो असतो.गाडी इथे किती वाजता आली?"
रामने वेळ सांगितली.त्या शुक्रवारी ते सायं.पावणे सातला घरी पोचले.
पुन्हा पुढच्या शुक्रवारी मागच्यासारखेच ऑफिस लौकर सुटले.राम स्टेशनवर आला. शामला कळवले.एवढ्यात गाडी आली.वेळ मागच्या शुक्रवारचीच.गाडी बनगाव स्थानकाला पोचली.राम उतरला.शाम आलाच होता. "गाडी अगदी वेळेवर आली" शाम म्हणाला.दोघे स्कूटरवरून नेहमीच्या वेगाने निघाले. या शुक्रवारी ते सायं.सहा वाजून वीस मिनिटांनी घरी पोचले.
..............................................................................
तर रामच्या पदयात्रेचा वेग ताशी किती किलोमिटर?
.............................................................................
गाडीच्या गमनागमनाच्या वेळा,स्कूटरचा वेग हे सगळे नियमित, आदर्श स्थितीत आहे असे मानावे.
*गणितीयुक्तिवादाने तोंडी उत्तर शक्य.कदंबाची खुण दिली आहे.कृपया उत्तर व्य नि. ने.उत्तरात युक्तिवाद अपेक्षित.
***************************************************************************
Comments
व्यनि
केला आहे
उत्तर क्र.:१
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
सर्वप्रथम उत्तर श्री.प्रमोद सहस्रबुद्धे यांनी पाठविले. त्यांचे उत्तर आणि गणिती युक्तिवाद दोन्ही अचूक आहेत.त्यांना बीजगणिती समीकरण लिहावे लागले नाही.धन्यवाद!
एकाहून अधिक उत्तरे येत आहेत.
अनेक बाबी दिलेल्या नाहीत, अर्थातच त्यामुळे त्या गृहीत धरायला गणित सोडविणार्यास स्वातंत्र्य दिलेले आहे असे मानतो.
१. बनगाव रेल्वेस्थानकापासून राम शाम बंधूंचे घर किती अंतरावर आहे ते दिलेले नाहीये.
२. बनगाव रेल्वेस्थानकापासून कदंबाचा वृक्ष किती अंतरावर आहे ते दिलेले नाहीये.
अर्थातच त्यामुळे
रामच्या पदयात्रेचा वेग ताशी किती किलोमिटर?
या प्रश्नाची एकाहून अधिक उत्तरे येत आहेत. नमुन्यादाखल दोन उत्तरे देत आहे.
उत्तर क्रमांक १. रामच्या पदयात्रेचा वेग ताशी ११.२५ किलोमिटर असून कदंबाचा वृक्ष बनगाव रेल्वेस्थानकापासून ७.५ किलोमीटर अंतरावर आहे.
उत्तर क्रमांक २. रामच्या पदयात्रेचा वेग ताशी १५ किलोमिटर असून कदंबाचा वृक्ष बनगाव रेल्वेस्थानकापासून १२.५ किलोमीटर अंतरावर आहे.
याप्रमाणे अनेक उत्तरे येऊ शकतात. मी त्यातल्या त्यात मानवी क्षमतेच्या रेंज मधली उत्तरे घ्यायचा प्रयत्न केला आहे. शिवाय ही उत्तरे बनगाव रेल्वेस्थानकापासून राम शाम बंधूंचे घर किती अंतरावर आहे या राशीसोबत सापेक्ष ही नाहीत. म्हणजेच ही राशी ३० किमी असेल तरी ही दोन्ही उत्तरे बरोबर आहेत हे सिद्ध करता येते. त्याचप्रमाणे ही राशी ६० किमी असेल तरीही ही दोन्ही उत्तरे बरोबर आहेत हे सिद्ध करता येते.
चूकीचे उत्तर
वरील उत्तर काढताना
घरून नेहमीच्या वेळी निघालेला शाम वाटेत कदंबाच्या झाडाजवळ भेटला.
ही माहिती विचारात घेण्याचे राहून गेल्याने उत्तर चूकलेले आहे. ही माहिती विचारात घेऊन पुन्हा काढलेले नेमके उत्तर व्यनि केले आहे.
मी दिलेल्या उत्तरांची सिद्धता
उत्तर क्रमांक १. रामच्या पदयात्रेचा वेग ताशी ११.२५ किलोमिटर असून कदंबाचा वृक्ष बनगाव रेल्वेस्थानकापासून ७.५ किलोमीटर अंतरावर आहे.
सिद्धता :-
शक्यता क्रमांक १ - बनगाव रेल्वेस्थानकापासून राम शाम बंधूंचे घर ३० किमी अंतरावर आहे.
पूर्ण अंतर स्कूटरने बनगाव स्थानकापासून घरी जाण्यास १ तास (६० मिनीटे) लागेल. ताशी ११.२५ किमी वेगाने पायी गेल्यास कदंबाच्या वृक्षापर्यंत जाण्यास रामला ४० मिनीटे लागतील (कारण त्याचा मिनीटाचा वेग ०.१८७५ किमी आहे व या वेगाने ७.५ किमी अंतर कापण्यास इतका वेळ लागणारच). आता उरलेले अंतर जर त्याने स्कूटरने कापले तर हे उरलेले ३०-७.५=२२.५ किमी अंतर कापण्यास ४५ मिनीटे लागणार. म्हणजे स्कुटर व पायी अशा एकूण प्रवासास ८५ मिनीटे लागणार. म्हणजेच संपूर्ण प्रवास स्कुटरने केल्यापेक्षा २५ मिनीटे अधिक लागणार. हे दिलेल्या उदाहरणातील माहितीशी जुळते आहे. कारण स्कुटरने गेल्यास १८:२० ला तर स्कुटर + पायी गेल्यास १८:४५ ला रामशाम बंधू घरी पोचले आहेत.
शक्यता क्रमांक २ - बनगाव रेल्वेस्थानकापासून राम शाम बंधूंचे घर ६० किमी अंतरावर आहे.
पूर्ण अंतर स्कूटरने बनगाव स्थानकापासून घरी जाण्यास २ तास (१२० मिनीटे) लागतील. ताशी ११.२५ किमी वेगाने पायी गेल्यास कदंबाच्या वृक्षापर्यंत जाण्यास रामला ४० मिनीटे लागतील (कारण त्याचा मिनीटाचा वेग ०.१८७५ किमी आहे व या वेगाने ७.५ किमी अंतर कापण्यास इतका वेळ लागणारच). आता उरलेले अंतर जर त्याने स्कूटरने कापले तर हे उरलेले ६०-७.५=५२.५ किमी अंतर कापण्यास १०५ मिनीटे लागणार. म्हणजे स्कुटर व पायी अशा एकूण प्रवासास १४५ मिनीटे लागणार. म्हणजेच संपूर्ण प्रवास स्कुटरने केल्यापेक्षा २५ मिनीटे अधिक लागणार. हे दिलेल्या उदाहरणातील माहितीशी जुळते आहे. कारण स्कुटरने गेल्यास १८:२० ला तर स्कुटर + पायी गेल्यास १८:४५ ला रामशाम बंधू घरी पोचले आहेत.
उत्तर क्रमांक २. रामच्या पदयात्रेचा वेग ताशी १५ किलोमिटर असून कदंबाचा वृक्ष बनगाव रेल्वेस्थानकापासून १२.५ किलोमीटर अंतरावर आहे.
शक्यता क्रमांक १ - बनगाव रेल्वेस्थानकापासून राम शाम बंधूंचे घर ३० किमी अंतरावर आहे.
पूर्ण अंतर स्कूटरने बनगाव स्थानकापासून घरी जाण्यास १ तास (६० मिनीटे) लागेल. ताशी १५ किमी वेगाने पायी गेल्यास कदंबाच्या वृक्षापर्यंत जाण्यास रामला ५० मिनीटे लागतील (कारण त्याचा मिनीटाचा वेग ०.२५ किमी आहे व या वेगाने १२.५ किमी अंतर कापण्यास इतका वेळ लागणारच). आता उरलेले अंतर जर त्याने स्कूटरने कापले तर हे उरलेले ३०-१२.५=१७.५ किमी अंतर कापण्यास ३५ मिनीटे लागणार. म्हणजे स्कुटर व पायी अशा एकूण प्रवासास ८५ मिनीटे लागणार. म्हणजेच संपूर्ण प्रवास स्कुटरने केल्यापेक्षा २५ मिनीटे अधिक लागणार. हे दिलेल्या उदाहरणातील माहितीशी जुळते आहे. कारण स्कुटरने गेल्यास १८:२० ला तर स्कुटर + पायी गेल्यास १८:४५ ला रामशाम बंधू घरी पोचले आहेत.
शक्यता क्रमांक २ - बनगाव रेल्वेस्थानकापासून राम शाम बंधूंचे घर ६० किमी अंतरावर आहे.
पूर्ण अंतर स्कूटरने बनगाव स्थानकापासून घरी जाण्यास २ तास (१२० मिनीटे) लागतील. ताशी १५ किमी वेगाने पायी गेल्यास कदंबाच्या वृक्षापर्यंत जाण्यास रामला ५० मिनीटे लागतील (कारण त्याचा मिनीटाचा वेग ०.२५ किमी आहे व या वेगाने १२.५ किमी अंतर कापण्यास इतका वेळ लागणारच). आता उरलेले अंतर जर त्याने स्कूटरने कापले तर हे उरलेले ६०-१२.५=४७.५ किमी अंतर कापण्यास ९५ मिनीटे लागणार. म्हणजे स्कुटर व पायी अशा एकूण प्रवासास १४५ मिनीटे लागणार. म्हणजेच संपूर्ण प्रवास स्कुटरने केल्यापेक्षा २५ मिनीटे अधिक लागणार. हे दिलेल्या उदाहरणातील माहितीशी जुळते आहे. कारण स्कुटरने गेल्यास १८:२० ला तर स्कुटर + पायी गेल्यास १८:४५ ला रामशाम बंधू घरी पोचले आहेत.
चूकीचे उत्तर
वरील उत्तर काढताना
घरून नेहमीच्या वेळी निघालेला शाम वाटेत कदंबाच्या झाडाजवळ भेटला.
ही माहिती विचारात घेण्याचे राहून गेल्याने उत्तर चूकलेले आहे. ही माहिती विचारात घेऊन पुन्हा काढलेले नेमके उत्तर व्यनि केले आहे.
उत्तर एकमेव
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या कोड्याचे उत्तर एकमेव आहे.तसेच ते काढण्यासाठी दिलेली माहिती पर्याप्त (पुरेशी) आहे.शेवटच्या दोन शुक्रवारांचा विचार करावा. पहिल्या शुक्रवारी ते नेहमीपेक्षा १० मिनिटे आधी आले. तर दुसर्या शुक्रवारी आदल्या शुक्रवारच्या तुलनेत २५ मिनिटे आधी आले. पहिल्या वेळी १० मिनिटे कशी(कोणत्या कारणाने) वाचली(सेव्ड)? आणि दुसर्यावेळी आणखी २५ मिनिटे कशी वाचली याचा विचार केल्यास उत्तर येईल.
अभिनंदन!
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या कोड्याचे अचूक आणि एकमेव उत्तर शोधण्यात श्री.चेतन गुगळे यशस्वी झाले.अनेक उत्तरे संभवतात असे त्यांना प्रथम वाटले होते.पण त्यांना आपली चूक उमगली. सुसंगत विचार करून त्यांनी बरोबर उत्तर शोधले. त्यांचे अभिनंदन !
धन्यवाद.
केवळ एक वाक्य दुर्लक्षिले गेल्यामुळे कोडे सोडविण्यात अक्षम्य अशी मोठी चूक झाली. याचाच अर्थ आपल्या कोड्यातील प्रत्येक वाक्य न वाक्य व शब्द न शब्द महत्त्वाचे आहेच. असे कोडे बनविल्याबद्दल आपलेही अभिनंदन व आभार.
उत्तर
अजून इथे बरोबर उत्तर दिसत नसल्यामुळे मी माझे उत्तर व्य.नि. ने पाठवले आहे.
-स्वधर्म
आणखी एक अचूक उत्तर
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या कोड्याचे श्री.स्वधर्म यांनी पाठविलेले उत्तर अचूक आहे.धन्यवाद!त्यानींही हे कोडे अंकगणिती तर्काने तोंडी सोडविले आहे.
काही कोड्यांच्या सोडवणुकीसाठी अंकगणिती पद्धत ही बीजगणिती रीतीहून वरचढ ठरते.
फरक काय आहे?
अंकगणित आणि बीजगणित यांत मूलभूत फरक काय आहे?
अंकगणितात अज्ञातासाठीचे चिन्ह प्रत्येक पायरीत ज्ञात झाले पाहिजे, पण बीजगणितात अज्ञाताचे चिन्ह अनेक पायर्यांसाठी अज्ञात राहाते, असा फरक आहे काय?
उदाहरणार्थ मी पाठवलेल्या उत्तरात अज्ञातासाठी "चिन्ह" असे, म्हणजे 'क्ष' वगैरे वापरलेले नाही. पण वापरलेल्या वाक्यातील मराठी शब्द "अमुक अज्ञात आहे" हे सांगतातच. म्हणजे "क्ष" चिन्ह वापरून-वा-ना-वापरून मूलभूत फरक पडत नाही.
उदाहरणार्थ : सीता काल तिच्या नेहमीच्या वेगाने घरून कार्यालयात चालत गेली. ती सकाळी १०:०० वाजता पोचली. आजसुद्धा सीता तिच्या नेहमीच्या वेगाने घरून कार्यालयात चालत गेली. ती सकाळी १०:१५ वाजता पोचली.
(अंकगणित (अंतर्गत बीजगणित)) :
आज निघायची वेळ (य) ही काल निघायच्या वेळे(क्ष)पेक्षा(उणे"-"; = य - क्ष) (य+ १०:१५ - क्ष - १०:०० =) १५ मिनिटे उशीरा होती. तिचा वेग (व) आणि कार्यालयास जायचे अंतर (अ) समान असल्यामुळे त्याचा हिशोब जुळतोच.
पूर्ण बीजगणित :
क्ष+अ/व = १० तास + ०० मिनिटे
य+अ/व = १० तास + १५ मिनिटे
तस्मात् :
य + अ/व - (क्ष + अ/व) = (१० तास + १५ मिनिटे)-(१० तास + ०० मिनिटे)
य - क्ष = १५ मिनिटे
येथे असे भासते, की बीजगणितात अज्ञात चिन्हे एका ओळीपेक्षा अधिक - तीन ओळींपर्यंत - येत राहातात. परंतु हे अंकगणितापेक्षा थोडेसुद्धा वेगळे नाही, कारण अंकगणितात "क्ष", "य", "व", "अ" चिन्हांऐवजी पूर्ण मराठी शब्द वापरलेले आहेत.
अंकगणिताचे सामर्थ्य
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
हे कोडे बीजगणिती समीकरणे लिहून सोडवता येईल हे खरे.पण त्याला अंकगणिती रीतीपेक्षा अधिक वेळ लागेल. म्हणून अंकगणिती पद्धत इथे अधिक प्रभावी आहे असे म्हटले.समजा प्रस्तुत कोडे बीजगणिती पद्धतीने सोडयायला घेतले तर:
घर ते ब(बनगाव स्टेशन) हे अंतर=क्ष किमि.
क (कदंब) ते ब अंतर = य किमि.
म्हणून घ ते ब जाऊन परत येण्यास लागणारा वेळ=२क्ष/३० तास
...
...
असे लिहित गेलो तर वेळ अधिक लागेल एवढेच.
हेच नीट कळले नाही
हेच नीट कळले नाही. अंकगणिती पायर्या म्हणजे मराठी शब्दांत लिहिलेली बीजगणिती समीकरणेच आहेत ना?
हीच वाक्ये मराठीत लिहिता येतील :
वरील प्रत्येक वाक्य अंकगणित करणार्याने मनातल्या मनात मानलेच पाहिजे, नाहीतर अंकगणितातील आकडेमोड निरर्थक होते. त्यामुळे अंकगणिती आणि बीजगणिती पद्धतीत मला फरक नीट कळला नाही. "क्ष" या छोट्या चिन्हाऐवजी ""घर-ते-बनगाव-विवक्षित" हे मोठे चिन्ह वापरलेले आहे.
कदाचित अंकगणित आणि बीजगणितात फरक काय, हे समजण्याकरिता वेगळा चर्चेचा धागा काढला पाहिजे. संपादक मंडळाला जर हा उपधागा वेगळा करता आला, तर बरे होईल.
बीजगणित अंकगणित
बीजगणित अं़कगणितात तत्वत: फरक नाही हे तुमचे म्हणणे मान्य कराण्यासारखे. नुकताच एक लेख वाचला. त्याची आठवण झाली.
http://www.ias.ac.in/resonance/December2011/1120-1131.pdf
या लेखात द्रव आणि घन पदार्थात तत्वतः फरक आढळत नाही असे काहीसे प्रतिपादन आहे. या दोन्ही प्रतिपादनात साधर्म्य आहे. पण आपण हे चारही शब्द विविध ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरतो. तेव्हा या संकल्पनांसाठी कुठेतरी रेष ओढतो. या रेषेला कदाचित नेमकी व्याख्या नसेल किंवा ती धूसर जाडसर असेल.
या कूटप्रस्नातील उत्तरात यनावालांनी ही रेष क्ष वगैरे संज्ञांसाठी वापरलेली दिसते. अर्थवाहीतेसाठी ही रेष फारशी चुकीची वाटली नाही.
प्रमोद
होय, पण कुठल्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी?
निबंध वाचला. धूसर सीमारेषा वगैरे ठीक आहे. पण सीमारेषेपासून दूरच्या क्षेत्रात तरी फरक सांगता आला पाहिजे.
या ठिकाणी यनावाला म्हणतात, की बीजगणितापेक्षा (म्हणजे 'क्ष' वगैरे चिन्हे वापरून) अंकगणितात उत्तर कमी पायर्यांत मिळते. म्हणजे या ठिकाणी तरी सीमारेषेपासून दूरची स्थिती आहे.
हे ठीक वाटत नाही. पायर्या तंतोतंत एकाइतक्या दुसर्या पद्धतीत आहेत. (आणि जर काही पायर्या अध्याहृत मानून न लिहायचे ठरवले, तर दोन्ही प्रकारात तसेच करता येते : म्हणजे दोन्ही प्रकारात पायर्या खूप कमी होऊ शकतात.)
"घर-स्टेशन-अंतर" ऐवजी "क्ष" वापरले तर काय फरक पडतो - लिहिताना थोडा वेळ वाचतो, इतकेच. पण "घर-स्टेशन-अंतर" हा शब्दप्रयोगसुद्धा "राम-शामच्या घरापासून बनगाव स्टेशनापर्यंतचे अंतर" या दीर्घ शब्दप्रयोगाचे लघुरूपच आहे .
हा मुद्दा ताणायचे कारण असे : "अंकगणित" म्हणून जी मराठी वाक्ये वापरली आहेत, त्यांच्यात अध्याहृते आहेत. ती आहेत याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. गणितात आपली गृहीतके/अध्याहृते काय ते ठाऊक नसणे मोठे धोक्याचे असते.
यनावाला उत्तर जाहीर करतील, त्यानंतर मी माझे उत्तर ("अंकगणिती", मराठी वाक्ये) येथे देईन. परंतु मुळात मी गणित "क्ष"/"य"वगैरे चिन्हे कागदावर लिहून सोडवले होते. मग त्याच बीजगणिताच्या समीकरणांतल्या चिन्हांच्या ठिकाणी मूळ मराठी शब्दांची आदलाबदल केली. मग वाक्ये थोडी "प्रासादिक" केली. असे करताना काही वाक्ये "अध्याहृत" मानून गाळता आले. या वैयक्तिक आणि ताज्या अनुभवामुळे हा प्रश्न पुन्हा विचारतो आहे. प्रश्न "कुठल्याशा सीमारेषेवर घन-द्रव फेझ ट्रांझिशन कळत नाही" असा कल्पक-सैद्धांतिक नाही. अगदी या गणिताच्या संदर्भात माझ्या स्वतःच्या पद्धतीवरून मला फरक कळत नाही. असा थेट उपस्थित प्रश्न आहे. मागच्या एका कोड्याच्या वेळेलाही माझ्या मनात हाच प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा विचारावासा वाटला.
- - -
(ज्या गणितांमध्ये शेवटपर्यंत व्हेरिएबले राहातात, तो प्रकार वेगळा आहे असे मला समजते.
उदाहरणार्थ : (क्ष+१)२ = क्ष२ + २क्ष + १ (गणित समाप्त)
पण या ठिकाणी असे काही झालेले नाही.)
गणित सोडवायची पद्धत
अशा प्रकारे वाक्यात सांगितलेली गणिते सोडवायची एक बीजगणिती पद्धत आहे.
या पद्धतीत जवळपास प्रत्येक वाक्यातून काही अज्ञातांचे (वेरियेबल्सचे) एक समीकरण मांडता येते. पूर्ण गणित वाचण्यापूर्वी देखिल ही क्रिया सुरु करता येते. अशी समीकरणे जमली की त्या समीकरणांना सोडवायचे (बहुदा एलिमिनेशने) आणि उत्तर काढायचे.
अशा बहुतेक गणितांमध्ये ही पद्धत धोपटमार्गाने वापरता येते. पण काही गणितांमध्ये हीच पद्धत नाहक मोठी वा निरुपयोगी समीकरणे (उत्तरासाठी निरुपयोगी) तयार करते. बीजगणिती मार्गाने यातील निरुपयोगी समीकरण बाजुला काढता येते. असे समीकरण मांडणे आणि ते बाजुला काढणे यात वेळ जातो. म्हणून ते समीकरण अमान्य करण्याचे आधीच लक्षात आले तर वेळ कमी लागतो.
दिलेल्या उदाहरणात मी पहिल्यांदा ही बीजगणिती पद्धत वापरायचे ठरवले होते. पण त्यातील एका वेरियेबलची माहिती काढणे फुकाचे आहे हे लक्षात आल्याने एक समीकरण वाचले. दुसरे समीकरण हे डायरेक्ट प्रपोर्शनचे होते. त्यामुळे एलिमिनेशन हे अंकात होऊ शकले.
या कमी झालेल्या समीकरण मांडायच्या पद्धतीला यनावाला हे अंकगणिती पद्धत म्हणतात. तर दुसर्या पद्धतीला बीजगणिती पद्धत म्हणतात.
हे म्हणणे माझ्या दृष्टीने सीमारेषेवरचे आहे. साधारणतः दोन अननोन्सची/समीकरणांची पर्यंतची गणिते अंकगणिते तर त्यावरची म्हणजे तीन+ अननोन/समीकरणे ही बीजगणिते. अशी काहीशी ती व्याख्या असावी. या गणितात तीन अननोन होते (दोन अंतरे आणि एक वेग). गणित वाचल्यावर त्यांची फोड दोनात होते आणि म्हणून अंकगणिती.
या म्हणण्यात दोन अननोन्सची गणितांची उत्तरे अर्थवाही शब्दात लिहिता येतात. तर त्यापुढील गणिते ही सांकेतिक अक्षरात लिहावी लागतात. असा फरक असावा.
प्रमोद
अंकगणितात तरी काय वेगळे होते?
हे अंकगणितातही होते. नाहीतर अंकगणितात वाक्याचा अर्थ काय म्हणून समजून येतो? कुठलेही संख्यात्मक शब्द असलेले तर्कशुद्ध वाक्य म्हणजे समीकरण (किंवा असमीकरण)च असते.
हे अंकगणितातही होते. कारण मराठी वाक्यांचा अर्थ मला एक-एक करून जाणवत होता. त्याचा संख्यात्मक आशयही एक-एक वाक्य करून जाणवत होता.
हेच अंकगणितातही होते. दोन मराठी वाक्यांतील माहिती संख्यात्मक दृष्टीने एकत्रित करायची तर वेगळे काय आहे?
"फुकाचे आहे हे लक्षात आले" आणि "बीजगणिती एलिमिनेशन" यांच्यात फरक काय आहे? जर "फुकाचे आहे हे लक्षात येणे" आणि "बीजगणिती एलिमिनेशन" यांतील मानसिक प्रक्रिया तसूभरही वेगळी असेल, तर काहीतरी चुकते आहे. बेरीज-वजाबाकी-गुणाकार-भागाकार... असा काही विचार केल्यामुळेच "फुकाचे आहे हे लक्षात येते", नाही का? जर कुठल्या वेगळ्या विचाराने हे लक्षात येत असेल, तर गणिताचा ताळा जुळेल, याची काय शाश्वती आहे?
प्रभावी युक्तिवाद
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या कोड्याचे अचूक उत्तर शोधण्यात श्री.दादा कोंडके यांना यश लाभले आहे.त्यांनी मोजक्या शब्दांत प्रभावी गणिती युक्तिवाद केला आहे.
उत्तर क्र.६
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.धनंजय यांनी उत्तर कळवले आहे.ते अचूक आहेच.तसेच उत्तर सहजतेने कसे काढता येते याचा त्यांनी मित शब्दांत मांडलेला विचार परिपूर्ण आहे
उत्तर क्र.६
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.धनंजय यांनी उत्तर कळवले आहे.ते अचूक आहेच.तसेच उत्तर सहजतेने कसे काढता येते याचा त्यांनी मित शब्दांत मांडलेला विचार परिपूर्ण आहे
तोंडी उत्तर
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
जे कोडे अंकगणिती रीतीने सोडवता येते ते बीजगणिताने सोडवता येईलच यात शंका नाही.(याचा व्यत्यास मात्र सत्य नाही)
* प्रस्तुत कोडे तोंडी सोडवायचे म्हटले तर अंकगणिती तर्कच वापरावा लागेल. बीजगणिती समीकरणे लेखी ना मांडता डोक्यातल्या डोक्यात सोडवणे अवघड आहे.अंकगणिती पद्धतीत वेळ वाचतो.
* अंकगणिती पद्धतीत तर्काचा विचार अधिक असतो. बीजगणिती समीकरणे लिहिताना विचार करावाच लागतो. पण पुढे बरेचसे समीकरणांवर सोडून देता येते.
* प्रमोदजी म्हणतात,
...माझ्यामते ज्या गणितात अव्यक्ताच्या वर्गाचा (अथवा अधिक मोठ्या घाताचा) संबंध येत असेल ते अंकगणिती तर्काने सोडवता येत नाही.अंकगणिताची ही मर्यादा आहे. (प्रमोदजींनी डायरेक्ट प्रपोर्शन असा शब्द प्रयोग वापरला आहे.)बीजगणिताचे क्षेत्र विशाल आहे.
* मागे "उडीदपापड आणि मूगपापड" या तर्कक्रीडा कोड्यात अंकगणिती पद्धतीचा प्रभावी वापर केला आहे.
उत्तर
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या कोड्याचे दादा कोंडके यांनी पाठविलेले उत्तर पुढील प्रमाणे:
.....
प्रेषक: दादा कोंडके
प्रति: यनावाला
विषय: कोड्याचं उत्तर
दिनांक: मंगळ, 02/07/2012 - 21:57
नमस्कार,
रामच्या चालण्याचा वेग ताशी ५ किमी होता.
स्पष्टीकरणः
अंतरः शाम नेहमीच्या वेळेला निघून ते १० मिनीटं लवकर पोहोचले. म्हणजे शामची जाण्या येण्याची ५ + ५ मिनीटं वाचली. म्हणजे रामने ५*३०/६० म्हणजे कदंबाचं झाड स्टेशनपासून २.५ किमी वर आहे.
वेळः दुसर्यावेळी ते २५ मिनीटं आधी पोहोचले म्हणजे रामला कदंबाच्या झाडापर्यंत यायला (वाचलेला वेळ + स्कूटरवरून स्टेशनपासून कदंबाच्या झाडापर्यंत पोहोचायला लागणारा वेळ) एव्हडा वेळ लागतो. तो २५ + (२.५*६०/३०) = ३० मिनीटं.
गती: म्हणजे त्याच्या चालण्याचा वेग २.५ किमी/३० मिनीटं = ताशी ५ किमी.
प्रश्नोत्तरी
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
बनगाव स्थानक ब, कदंब क.शेवटच्या दोन शुक्र. चा विचार.
* शुक्र.१:
* शुक्र.२
काही अध्याहृत वाक्ये
वरील प्रश्नोत्तरांत काही वाक्ये अध्याहृत आहेत :
* शुक्र.१:
* शुक्र.२:
अधोरेखित अध्याहृत टाळून चालत नाही. कारण शुक्र.१ मध्ये "नेहमीच्याच वेळेला निघाला" हे आवर्जून सांगितले आहे - ते ठीकच आहे. म्हणजे शुक्र.२ ला हे वेगळे होते, हे स्पष्ट करणेसुद्धा तितकेच आवश्यक आहे. पण आता राम-शाम लवकर पोचण्याचे "शाम लवकर निघाला" हे कारणही लागू होते. तसे असताना "स्कूटरने ५ मि.त आला.त्यात २५ मि.वाचली." हा एकांगी हिशोब तर्कशुद्ध होत नाही. त्यामुळे "शामचे लवकर निघणे, रामचे लवकर पोचणे" याची हिशोबात सोय लावली पाहिजे. तो हिशोब वरच्या संवादात अध्याहृत आहे. (हिशोब बरोबरच आहे, पण अध्याहृत-लपवलेला आहे, एवढे सांगायचे आहे.)
समजावणीच्या आवश्यकते अनुसार
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.धनंजय म्हणतात:
..
शुक्र.१ प्रामुख्याने शामच्या प्रवास विचारात घेतला आहे.तो नेहमीच्या वेळी, नेहमीच्या वेगाने निघूनही आज लौकर कसा आला? यावर लक्ष केंद्रित केल्यावर तो क ते ब गेला नाही,परतला नाही हे ध्यानी येते.त्यामुळे १० मि.वाचली हे लक्षात येते.कोड्याची सोडवणूक थोडी पुढे सरकते.
..
शुक्र.२: रामच्या प्रवासाचा विचार केला आहे.मागच्या शुक्रवारी "कळवले असतेस तर आधी आलो असतो"असे शाम रामला सांगतो. गाडी किती वाजता येते तेही विचारतो. राम सांगतो. आज लौकरच्या गाडीने येतो आहे हेही राम कळवतो.तो ब. ला उतरला तेव्हा शाम तिथे असतो. हे सर्व लिहिले आहे.तेव्हा ब. ला किती वाजता पोचायचे त्या बेताने शाम घरून निघतो हे गृहीत धरावे ही अपेक्षा आहे. लक्ष रामच्या प्रवासावर वेधले आहे. तरीपण शामच्या आजच्या प्रवासाविषयी लिहिले असते तर बरे झाले असते हे पटते.समजावणीच्या आवश्यकतेला धरून लिहिले आहे.अधिक लांबण लावल्यास लक्ष विचलित होऊ शकते.