उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
फोबिया
टिंकरबेल
January 17, 2012 - 2:04 pm
आम्ही काही दिवसांपुर्वी आमच्या एका मित्रांसोबत् फिरायला गेलो होतो. तिथे एरिअल ट्रामवेमधून जायचे होते. आमच्या बरोबर मित्रांचा ६-७ वर्षांचा मुलगा होता. आत चढल्यावर तो अचानक रडू लागला, ओरडु लागला आणि हायपर झाल्यासारखं करू लागला. इतक की त्यांना ट्राम सुरु होण्यापूर्वी बाहेर जावे लागले. या मुलाला बंद जागेचा किंवा उंचावर जाण्याचा फोबिया असेल. नंतर मी त्याच्या आईवडलांना विचारल् की पूर्वी काही घटना घडली होती का? त्यांनी नाही असं सांगितलं. तो विमानातून प्रवासही करतो. थोडासा घाबरतो पण इतका नाही.
या मुलाच्या वागण्याला फोबिया म्हणायच् का? फोबियाच् कारण काय असावे? त्याच्या पूर्वायुष्यात काहीच झाले नाही तर इतकी भिती का वाटत असावी? डॉक्टरी उपचारांनी ही भिती निघून जाऊ शकते का?
दुवे:
Comments
असंख्य प्रकार
वरच्या वागण्याला फोबिया म्हणायचे का ते माहित नाही. त्या मुलाला काही विपरित अनुभव नसतील पण कदाचित टिव्हीवर काहीतरी पाहून वगैरेही भीती मनात बसलेली असू शकेल आणि कदाचित तात्पुरती असू शकेल किंवा खरेच त्याला फोबिया असेल.
माझा वैद्यकीय क्षेत्राशी संबंध नसल्याने माझे विधान सर्वसामान्य मानावे परंतु फोबियाचे असंख्य प्रकार पाहता फोबिया नसलेली माणसे सापडणे कठीण असावे. :-)
फोबियाबद्दल शोधताना येथे ही लांबलचक यादी मिळाली. गंमत म्हणजे ही यादी परिपूर्ण नसावी असे वाटते.
या यादीत मला आल्फ्रेड हिचकॉकचा फोबिया सापडला नाही. हिचकॉकला म्हणे अंड्याची प्रचंड भीती आणि किळस वाटे. किंबहुना त्याला अंड्याच्या आकारातील तुळतुळीत वस्तूंची भीती होती. त्याची बायको गरोदर असताना तिच्या पोटाकडे तिला बघवत नसे. आता हिचकॉक स्वतःला आरशात कसा बघत होता ते मला माहित नाही. ;-)
एखाद्या गोष्टीची किळस किंवा भीती वाटायला काही कारण असलेच पाहिजे असे वाटत नाही.
समुपदेशन
मुळात त्रास एरिअल ट्रामचाच आहे हे निश्चित केले पाहिजे, विचार आणि भावना व्यक्त न करणारी मुले/व्यक्ती कोणत्याही अगम्य कारणासाठी असे वागु शकते, तरीदेखिल हे तुम्ही निश्चित केले असेल असे समजल्यास त्यावर उपाय म्हणजे - वयानुसार आणि योग्य समुपदेशनाने त्या मुलाची भिती जाउ शकेल असे वाटते, इतर जाणकारांनी मदत करावी.
अवांतर - पूर्वजन्मात काही झाले असणे शक्य असेल :)
फोबिया की....
आत चढल्यावर रडला की ट्राम चालू झाल्यावर?
एरिअल ट्राम आणि विमान ही जोडी पाहता प्रॉब्लेम मोशन सिकनेसचासुद्धा असू शकेल.
नितिन थत्ते
+१
हेच म्हणतो. आमच्या मुलांना विमान उड्डाण/अवतरण करताना लहानपणी त्रास झालेला आठवतो.
अहो,
मला अजूनही चक्कर् अन् मळमळ् होते विमानात; इतका मोठा घोडा झालो तरी ;)
असो. मोशन सिकनेसला सोप्पी गोळी असते. 'स्टेमेटिल् एम.डी.' (माऊथ डिसॉल्व्हिंग्) स्वस्त आहे. भारतात ओ.टि.सी. मिळेल.
चघळा व मोशनसिकनेस्मुक्त व्हा.
आत चढल्यावर लगेच्
आत चढल्यावरच रडू लागला. फक्त रडणे नाही तर किंचाळत, पाय आपटत् रडत होता. त्याला काहीतरी होते की काय असे वाटले तेव्हा आईबाबा त्याला घेऊन् बाहेर गेले.
मला फोबिया का होतो हे जाणुन घ्यायच आहे? नुसती भिती वाटत नव्हती, ही भिती वेगळी होती.
फोबिया
त्या मुलाला क्लॉस्ट्रोफोबिया असावा. बंद जागेत कोंडल्याची भिती वाटणे म्हणजे क्लॉस्ट्रोफोबिया. उंचीची भिती असती तर ट्राम उंचीवर पोहचल्यावर घाबरला असता. चढताच घाबरला म्हणजे क्लॉस्ट्रोफिबिक असण्याची शक्यता आहे. वैद्यकिय मानसशास्त्रा विषयी अजूनही माणसाचे ज्ञान तोकडे आहे त्यामुळे असे नेमके कशामुळे होते ह्याचे नक्की कारण अजून माहित नाही.
फोबिया
आपले मत बरोबर वाटते. तद्न्य डॉक्टर Hypnotherapy देतात अशा डॉक्टरान्चा सल्ला योग्य राहील असे वाटते.
फोबियाची कारणे
मानसिक ताणतणाव (anxiety व stress ) यामुळे फोबियासारखे विकार निर्माण होऊ शकतात.
सहमत
सहमत आहे. धमकोफोबिया (dhammakophobia) हा टोपणनावांच्या किंवा सदस्यनामांच्या फोबियाचा प्रकार नुकताच लक्षात आला आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
अलेलेलेलेलेले. बिच्चाला!
"बालमानसशास्त्राची 'वेस्टर्न' पुस्तके वाचून मुले वाढविणे" हा एक नवा फोबिया मला आहे.
(नॉर्वे मधे एका भारतिय दंपतीची मुले, 'हाताने' भरविले (चमचा न वापरता) म्हणून चाईल्ड वेल्फेअरवाल्या अतिरेक्यांने नेली अशी बातमी अताशाच कुठे तरी वाचलेली आठवते. व पुढील रिस्पॉन्स भारतात रहाणार्या भारतीय मायबापांसाठी आहे.)
If the child is throwing such a tantrum, it needs a little harsh handling, अशा रानटी मताचा मी आहे. त्या क्षणी दिलेली एकच कानाखाली, अन् नंतर् त्याने घाबरून का होईना पूर्ण केलेला तो प्रवास त्या बाळाची खात्री पटवून देतो की त्याचा फोबिया चुकीचा आहे.
Now, calculate your own risk benefit ratio. एक कानाखाली, पोराला वाटलेली १५ मिनिटे भिती, (या भितीदरम्यान तो तुमच्या कुशीत आहे) :याविरुद्ध्: बालमानसोपचारतज्ज्ञाची फी + त्याचा 'सक्सेस् रेट्' + तुमची लागलेली वाट.
A child needs healthy neglect : (सायकिऍट्रीच्या पुस्तकात वाचलेले वाक्य.)
अमेरिकेत
अमेरिकेत सर्वांसमक्ष पोराच्या कानाखाली एक वाजवणे... छान छान. सदस्यपानाप्रमाणे अमेरिकेत राहणार्या टिंकरबेलताई आपला सल्ला मनावर न घेतील अशी आशा करते.
ओ काकू,
येडीटेड प्रतिसाद पुन्हा वाचा.
अन माझी मते रानटी आहेत हे ही लिव्लया थितं.
रानटी?
सदस्यपानाप्रमाणे अमेरिकेत राहणार्या टिंकरबेलताई आपला सल्ला मनावर न घेतील अशी आशा करते.
चर्चा प्रस्ताविकेने चर्चा योग्य शब्दांत मांडली आहे. चर्चेला उत्तर देणार्या इतरांनी प्रतिसाद योग्य शब्दांत दिले आहेत असे असताना आपल्याला "रानटी" व्हावेसे का वाटले?
रानटी बनून उपक्रमावर चर्चा कराव्या हा उपक्रमाचा उद्देश नाही. एखादी चर्चा चांगल्या रितीने चालवता येईल तेथे अशाप्रकारे "रानटी" प्रतिसाद न देण्याची विनंती करते.
ज्याला खरोखरी फोबिया सदृश भीती वाटते त्यांनी अशा गोष्टी करू नयेत असे मी म्हणेन. माझ्या माहितीतील एका बाईंना मांजराची इतकी भीती वाटे की अर्धमेल्या झाल्यागत त्यांची अवस्था होई तेव्हा भीती वाटते तरी खेचून सोबत नेण्यासारखे उपाय टाळावे असे वाटते.
हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे. स्वतंत्र चर्चा करता येईल. किंबहुना, तुम्ही सुरू कराच.
प्रतिसाद संपादित
विषयांतरित प्रतिसाद संपादित केला आहे.
मा. संपादक महोदय/महोदया
"विषयांतरित प्रतिसाद संपादित"
अशी या संस्थळांच्या संपादकांची टिप्पणी वर दिलेली आहे.
आपली परवानगी गृहित धरून आपणांस् व मा. प्रियाली यांस जरा स्पष्टिकरण देऊ इच्छितो.
प्रियाली ताई आपण माझ्या "शैक्षणिक क्वालिफिकेशन्स" ओळखतात असे माझे मत आहे. सबब 'सायकॉलॉजी व चाईल्ड सायकॉलॉजी' या विषयांवर मत नोंदण्यास मी काही प्रमाणात सक्षम आहे, असे मझे मत आहे. तरीही 'रानटी' या अवतरणचिन्हांकित शब्दास धरून आपण वर प्रतिवाद केलात, याबद्दल सखेद आश्चर्य वाटले. तो प्रतिवाद तसाच असून त्याचे उत्तर संपूर्ण संपादित झाल्याबद्दल जास्त आश्चर्य वाटले.
'रानटी' हा शब्द भारतिय मनोवृत्ती विरुद्ध पाश्चात्य मनोवृत्तीबद्दल् योजिला होता.
बालके कशी वाढवावीत याबद्दलच्या 'सुसंस्कृत भारतीय' संकल्पना येणे प्रमाणे :
या पाश्चात्य "संकल्पना" मुलांना बोटही न लावता 'You reason out things with 4-5 year olds' या प्रमाणे चालतात. मला हे मान्य नाही, सबब, या सुसंस्कृत् पाश्चात्यांपेक्षा मी 'रानटी' असा उल्लेख होता.
या प्रतिसादातला हा बारकावा, 'रानटी' शब्दाची ही 'कॉन्टेक्स्ट्' प्रियाली ताइंना ठाउक होती, किंवा उमजली होती असे माझे 'कंटेन्शन्' आहे. त्यामुळेच त्यांनी धागाकर्त्यांच्या प्रोफाईलमधील त्यांच्या 'लोकेशन'चा उल्लेख करून् माझ्या प्रतिसादास् उप प्रतिसाद लिहिला होता.
असो.
यापुढे जीभ टाळ्यास लावण्याआधी (टंकण्याआधी सदस्यपाने तपासून पाहीन.)
उपक्रमी संपादकांस माझे उप-उपप्रतिसाद रुचलेले नाहीत्, सबब, येथे पुढील चर्चा करण्यात रुची नाही. (उपक्रमावर वेगळा धागा काढणार नाही, काढू इच्छीत नाही)
मा. संपदक महोदय,
वरील प्रतिसाद टंकताना आपल्या अधिकारांचा अधिक्षेप करण्याचा हेतू नाही. I hereby agree that i have been put in my proper place by your just and proper editing, according to the rules of this site.
धन्यवाद.
आश्चर्य
रानटी हा माझा प्रतिसाद आपल्या उपप्रतिसादाला उत्तर होते. माझ्या मूळ प्रतिसादात (जो उडलेला आहे) रानटीवर टिप्पणी नव्हती. माझेही काही प्रतिसाद गेलेले दिसल्याने रानटीविषयी लिहिलेला माझा प्रतिसाद किंचित अस्थानी झाला आहे. तरीही, ज्या संपादकांनी हे प्रतिसाद काढले त्यामागे त्यांची भूमिका असावी. एखादी चर्चा संयतपणे चालली असता उपरोधाने अचानक आलेले २-४ प्रतिसाद चर्चेची दिशा बिघडवतात.
असो. गैरसमज नसावा.
अरेरे! त्या ४ वर्षांच्या बाळाला 'अलेलेलेले बिच्चाला' म्हणताय पण स्वतः असे रुसताय काय? ह. घ्या. तुमच्या चर्चेचा विषय खरेच चांगला आहे. स्वतंत्र टाका असे पुन्हा सांगते.
(उपरोल्लेखित मूळ प्रतिसाद आणि त्याचा उपप्रतिसाद पुनर्प्रकाशित करण्यात आला आहे. --संपादन मंडळ.)
चर्चा..
इतरत्रही करता येऊ शकते.
संपादित चर्चा वाचून भविष्यातील वाचकांचे चुकिचे ग्रह होउ शकतात. ते होऊ नये असे वाटले. रुसण्याचा प्रश्नच नाही.
'कानाखाली काढणे' हा शब्दप्रयोग ही अतिशयोक्ती होती. आपण घेतलेला आक्षेप समजू शकतो, हे येथे नमूद करतो व दिलगिरी व्यक्त करतो.