"फेसबुक" वापरतांय ? तर मग हे बघायलाच हवे !
"फेसबुक" हे "हत्यार" दुधारी सुरी आहे.वेळप्रसंगी शिवीगाळ अथवा समोरच्याची दिशाभूल करून त्याचा गैरवापर करणे हे तेथे नवीन नाही. त्या मुळे ते वापरताना खूप जपूनच वापरले पाहिजे.येथे मी फक्त मला आलेल्या एका मेसेजचा नमुना वानगी दाखल देत आहे.फेसबुकवर जे लोक खास करून महिला,मुली आपला खरा खुरा चेहरा घेऊन उतरतात व त्यांच्या मित्रमंडळींना(?) त्यांच्या खाजगी जीवनात प्रवेश करण्याची आयती संधी उपलब्ध करून देतात त्यांच्या साठी ही पहा एक धोक्याची सूचना.
प्रस्तुत मेसेज मधील ह्या मुलीला ...नव्हे..... खरे तर ह्या फोटो खालच्या प्रोफाईलवर एके ठिकाणी १७,१५८ subscribers (?)आहेत असे दिसते तर दुसऱ्या एका ह्याच फोटोचा वापर केलेल्या प्रोफाईल मध्ये तिला थोडे थोडके नव्हे तर तब्बल ४८९४ मित्रमंडळी असल्याचे दिसून येते.हा एकच फोटो वापरून तयार केलेल्या काही प्रोफाईल मध्ये हि मुलगी डॉक्टर ,अकौंटंट,शिक्षिका असल्याचे दिसते तर काही ठिकाणी तिचा फोटो चक्क विवाह विषयक साईट्स मध्ये दिसून येतो आणि काही मर्यादे पलीकडील अवैध साईट्स मध्ये तर ह्या फोटोचा वापर, ती अगदी विक्री साठी सुद्धा उपलब्ध आहे असे दर्शविते.थोडक्यात, महिलांनी,विशेषतः मुलींनी फेसबुकचा किंवा अगदी कोणत्याही सामाजिक संकेतस्थळाचा (सोशल नेटवर्किंग साईट्सचा) वापर करताना,खास करून त्यावर मित्रमंडळी जोडताना विशेष सावध रहाणे हे ह्या पुढील काळात अजून गरजेचे असणार आहे आणि आता हा पहा त्या फोटोचा धुमाकूळ....
Comments
प्रोफाइल
वर उल्लेखलेल्या मुलीचे प्रोफाइल (तिच्या विविध नावांनी) फेसबुकवर शोधायचा मी प्रयत्न केला. मला या पैकी एकही प्रोफाइल सापडले नाही. (याचा अर्थ असे होणे शक्य नाही असा नाही पण) तुम्हाला ही माहिती कुठून मिळाली?
प्रोफाइल
आपण म्हणता त्या प्रमाणे मी लगेचच ते चेक करून बघितले.दुर्दैवाने त्यातील एक प्रोफाईल मात्र अद्याप जिवंत आहे असे दिसून आले.त्यातील subscribers मध्ये मला सदरहू प्रकारच्या माहितीच्या आलेल्या "त्या" मेल नंतर जवळपास एकोणीसपट वाढ झाल्याचे निदर्शनास आले.थोडक्यात काय तर ह्या गोष्टी होत असाव्यात.होत असतात फक्त आपण सर्वसाधारण वाचक त्या पासून चार हात दूर असल्याने आपल्याला(त्यात मी हि आलो) त्याची कल्पना नाही/नव्हती... असो.
फेसबुक
फेसबुक सर्च पर्सन्लाईज्ड असतो. एकच सर्च टर्म असली तरी येणारे रिझल्ट वेगळे असतात.
-Nile
मुलीचे प्रोफाइल
मुलीचे प्रोफाइल
जगदिश देशमुख - हैद्रबाद
पुढे?
उपक्रमावर स्वागत आहे. तुमचा प्रतिसाद उमटलेलाच नाही त्यामुळे मुलीचे प्रोफाइल असे म्हणून पुढे काय म्हणायचे ते कळले नाही.
दुवा
मुलीचे प्रोफाइल असा दुवा त्यांच्या प्रतिसादात आहे, टॅग चुकल्यामुळे दुवा उमटला नसावा.
प्रोफाइल
प्रती प्रियाली,
आपल्या माहिती बद्दल धन्यवाद.मी हा प्रयत्न केला नव्हता.आपण म्हणता त्या प्रमाणे त्यातील प्रोफाईल सापडत नाही/नसेल हे शक्य आहे.आता कदाचित ते वगळले गेले असणे शक्य सुद्धा असेल.मी मात्र फक्त मला आलेल्या एका मेलचा आधार घेऊन हि पोस्ट तयार केली आहे.हेतू फक्त हा कि आपण सावधगिरी बाळगलेली बरी.किमान ह्या अशा गोष्टींमुळे त्या बळी पडलेल्या व्यक्तींचा तसा काही दोष नसतो हे निदान आपल्या समोर येते हे हि नसे थोडके.
सहमत... परंतु ;-)
१००% सहमत.
पण कोणजाणे, या पोरीने आणि तिच्या मित्रमंडळाने किंवा हा इमेल पाठवणार्याने सर्वांना टोपी घातली असेल ही शक्यताही नाकारता येत नाही. :-)
धुमाकूळ
हा प्रोफाइल कुठे कुठे बनवला आहे हे नुसते स्क्रोल करुन करुन मी थकलो आणि सोडून दिले. ज्याने हे सगळे प्रोफाइल बनवले आहेत त्याच्या रिकामटेकडेपणाला सीमा नाही. हे सगळे संकलनही ज्याने हे प्रोफाइल्स बनवले आहेत त्यालाच शक्य आहे. ५-१० लोकांची एखादी टीम ह्यावर अहोरात्र काम करत असावी असा माझा अंदाज आहे.
(बाकी भिती थोडी अनाठायी वाटली, तुम्ही कुणी सेलेब्रेटी असल्यास शिवाय तुमच्यावर कुणी इतका वेळ खर्च करण्याची शक्यता नाही...आणि तुम्ही सेलेब्रेटी असल्यास..व्हू केअर्स? :) )
बादरायण संबंध
सदर प्रकरणाचा आणि फेसबुकचा संबंध बादरायण वाटतो.
मुळात या व्यक्तीची अशी नालस्ती करण्याचे कोणीतरी ठरवलेले आहे. फेसबुकला दोष का? फोटो फेसबुकवरून मिळवला असेल, किंवा मिळवता येतो असे नाही. प्रेमाला नकार दिला म्हणून एखादा मित्रही चिडून असे काहीतरी करू शकतो. वगैरे वगैरे. इथेही त्या मुलीला व्यवस्थितपणे टारगेट केलं जात् आहे हे तर स्पष्टच आहे.
अर्थात, इंटरनेटवर (आणि इतरही) अशा गोष्टी तुमच्याबरोबर होऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे असे म्हणणे बरोबरच आहे.
-Nile
सहमत आहे
ज्याला तुमचे नुकसान करायचे आहे त्याला तुमचा फोटो मिळवायला फेसबुक हा एकंच पर्याय आहे असे नाही.
सहमती
एखाद्या व्यक्तीबद्दल उलटसुलट बरळण्यासाठी फेसबुक हा तसा नवा पर्याय आहे. फेसबुक प्रचंड पॉप्युलर आहे एवढाच काय तो फरक.
:)
विज्ञान/गणिताच्या नावाखाली बरळ* करण्यासाठी मात्र चर्चासंस्थळेच चांगली, नाही काय?
* उदा., अयुक्लिडीय भूमितीत ग्रेट आर्क हीच सरळ रेषा म्हणविली जात असतानाही "पृथ्वीवरील सरळ रेषांपेक्षा ग्रेट आर्क आखूड असतात" असे विधान ठोकणे.
:) :)
असे आहे होय. यावरून आठवले आमचा एक परचित 'टू पॅरलल लाइन्स मीट इन द थर्ड डायमेन्शन' असे म्हणत असे. त्याला विचारले कुठे तर 'लाँजिट्यूडस येऊन मिळतात की अॅट नॉर्थ अँड साउथ पोल' असे त्याचे उत्तर होते. तोदेखील खगोलशास्त्रज्ञ होता आणि नासाला अनेक पेपर त्याने पाठवले होते.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
काही मजकूर संपादित.
खवकुमारी आणि खवकुमारांचे काय?
बरळायचे असेल तर खरडवह्याही वापरतात की हलक्या खवकुमारी आणि खवकुमार.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
बरळ
खवमधली बरळ काहीच नाही, 'अधिक माहिती हवी असल्यास व्यनी (इथला नव्हे), इमेल, फेसबुकावर संपर्क करणे' असेही सदस्यांना उकसावले जाते. दिवसभर काम नसले की दुसरे करणार तरी काय म्हणा? गुगलुन गुगलुन खगोलशास्त्र तरी किती कळणार? मग इमेल फेसबुक आहेच.
एक रोचक बातमी
यासंबंधी आजच एक रोचक बातमी डीएनए मधे वाचली.
ऋषिकेश
------------------
'नाविन्य' हे एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या आयडीने लिहुन कसे बरे तयार व्हावे?
नुसते नावात गोड पदार्थ घालुन तसे लिहिता थोडेच येते?