इराणचा अणूकार्यक्रम

नमस्कार ,
सर्व प्रथम उपक्रम आणि उपक्रम वासीयांचे आभार एक मंच उपस्थित करून दिल्या बद्दल.
मी उपक्रम वर नवीन असल्यामुळे माझे पहिलेच लेखन( अशुद्धलेखण) समजून घ्यावे ही विनंती.
आजच ही (http://in.news.yahoo.com/wary-u-uncertain-israels-iran-plans-063947841.html) बातमी वाचनात आली व इराणच्या अनुप्रकल्पा बाबत बरेच प्रश्न पडले. आपणा पैकी कुणास या विषयावर अधिक माहिती असेल तर जरूर त्या प्रतीसादातून नक्की द्यावी.
या विषया संबंधी काही पुस्तके किंवा लेखन असल्यास सुचवावे.
धन्यवाद.

लेखनविषय: दुवे:

Comments

प्रश्न

उपक्रमावर स्वागत.

>>इराणच्या अनुप्रकल्पा बाबत बरेच प्रश्न पडले.
आपणास काय प्रश्न पडले आहेत ते लिहावे म्हणजे येथील सदस्य उत्तरे देऊ शकतील.

नितिन थत्ते

स्वागत

उपक्रमावर स्वागत.

लिहिते झालात हे उत्तम आहे मात्र चर्चा विषय देताना विषयाची व्याप्ती स्पष्ट करणारे - चर्चेला दिशा देणारे काहि लिहिलेत तर त्या अनुशंगाने चर्चा करता यावी. तुम्हाला कोणते प्रश्न आहेत?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

माझे काहि प्रश्न्

आप्पामाळी

धन्यवाद.
१. इराण सारख्या एखाद्या सार्वभौम राष्ट्राला स्वतः च्या आर्थिक प्रगति साठी किंवा लष्करी कारणासाठी अनूकार्यक्रम राबवायचा हक्क नाही का?
२. इराण खरच अण्वस्त्र बनवायचा प्रयत्न करत आहे का?
३. जर इराणच्या अण्वस्त्र बाळगण्याने आजूबाजूच्या राष्ट्रांच्या (इस्त्रायल) अस्तित्वाला धोका उत्पन्न होत असेल तर अशाच प्रकारच्या शेजार्यांन मुळे(इस्त्रायल) त्यांच्या अस्तित्वाला धोका नाही का?
४. इराणच्या अनुकार्यक्रमा बाबत भारताची अधिकृत किंवा अनधिकृत भूमिका नक्की काय आहे.

जस जसे इतर प्रश्न आठवतील तसेच वेळ मिळेल तसे माझे प्रश्न मांडत जाईन .
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

प्रयत्न

या विषयाचा अभ्यास नाही. उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.

१. इराण सारख्या एखाद्या सार्वभौम राष्ट्राला स्वतः च्या आर्थिक प्रगति साठी किंवा लष्करी कारणासाठी अनूकार्यक्रम राबवायचा हक्क नाही का?

अर्थात हक्क आहे. मात्र आंतरराष्ट्रीय करार कोणत्याही देशाला नव्याने अण्विक शस्त्रे बनविण्याला विरोध करतो त्यावर इराणने स्वाक्षरी केली आहे. अर्थात शांततापूर्ण कारणांसाठी आपण आण्विक कार्यक्रम राबवतो आहोत असा इराणचा दावा आहे. तो कितपत खरा / खोटा आहे हे सांगणे कठीण आहे

२. इराण खरच अण्वस्त्र बनवायचा प्रयत्न करत आहे का?

याचे ठाम उत्तर देणे फारच क्ठीण वाटते. (आणि मला अजिबातच माहित नाहि :) )
याला अनेक पदर आहेत. शांततापूर्ण कारणांसाठी आपण आण्विक कार्यक्रम राबवतो आहोत असा इराणचा दावा असला तरी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आय ए ई ए रिपोर्टमधे असे प्रयत्न चालले असल्याचा संशय व्यक्त केला गेला आहे. (अर्थातच इराणने खंडन केले आहे)
मात्र जर अधिक विचार केल्यास इराणचा शेजारी देश पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत. इस्रायलकडेही आहेत. वर रशियाकडे आहेत. चायना, भारत आदि जवळचे देशही अण्वस्त्रे बाळगतात तेव्हा या दृष्टीने इराणला अण्वस्त्रे बाळगणे गरजेचे वाटत असेलच.
शिवाय हा एकमेव शिया देश आहे. बाकी सुन्नी देशांसोबत त्यांचे संबंध ठिक असले तरी फारसे विश्वासाचे नाहितयुद्या अमेरिकेने (किंवा कोणीही) हल्ला केल्यास इतर मुस्लिम देश इराणच्या मदतीला धावतील याची खात्री नाही. (बहुदा नाहीच) अश्यावेळी इराण अण्वस्त्रांच्या प्रयत्नात असेल असे वाटते.

३. जर इराणच्या अण्वस्त्र बाळगण्याने आजूबाजूच्या राष्ट्रांच्या (इस्त्रायल) अस्तित्वाला धोका उत्पन्न होत असेल तर अशाच प्रकारच्या शेजार्यांन मुळे(इस्त्रायल) त्यांच्या अस्तित्वाला धोका नाही का?

प्रत्येक राष्ट्राला शेजार्‍यांमुळे धोका असतोच

४. इराणच्या अनुकार्यक्रमा बाबत भारताची अधिकृत किंवा अनधिकृत भूमिका नक्की काय आहे.

भारत इराणच्या अणुकार्यक्रमाला विरोध करतो. आपल्या शेजारी अजून एक आण्विक शक्ती असणे भारता साठी घातक आहे.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

असहमत....

प्रत्येक राष्ट्राला शेजार्‍यांमुळे धोका असतोच

भारत-नेपाळ, अमेरिका-क्यानडा, म्यानमार-चीन,जपान-रशिया, म्यानमार-थायलंड,ब्रिटन-फ्रान्स,जर्मनी-स्वित्झर्लंड किंवा युरोपातील् सध्याचे बहुतांश देश हे शेजारी असूनही त्यांचे काही वैर् नाही आणि त्यांना एकमेकांपासून् धोका आहे असेही नाही.
मात्र जगात कुठेही एखादा देश असला, तरी त्याच्यापासून् अमेरिकेला धोका असू शकतो असे अमेरिकावाद्यांचे म्हणणे आहे, अमेरिकेला विएतनाम्,इराक्,लिबिया,उत्तर कोरिया व आता इराण ह्या सर्वापासून् धोका आहे. मधे मधे अमेरिकेला युरोपातल्या युगोस्लावियापासूनही धोकाच् होता.

भारत इराणच्या अणुकार्यक्रमाला विरोध करतो. आपल्या शेजारी अजून एक आण्विक शक्ती असणे भारता साठी घातक आहे.

इराण कधीपासून् आपल शेजारी झाला? भारताचा स्पष्ट् विरोध् आहे की "आमचा पाठिंबा नाही" असे स्टेटमेंट् आहे? कारण् कितीही नाही म्हटले तरी अजूनही इराणशी आपले संबंध् बरेच् चांगले आहेत. थेट जाहिर् विरोध भारत् करेल् असे वाटात् नाही.(माझी माहिती कमी असू शकते.)

--मनोबा

देअर इज नो ऍक्शन् विथ् झिरो रिस्क

भारत-नेपाळ, अमेरिका-क्यानडा, म्यानमार-चीन,जपान-रशिया, म्यानमार-थायलंड,ब्रिटन-फ्रान्स,जर्मनी-स्वित्झर्लंड किंवा युरोपातील् सध्याचे बहुतांश देश हे शेजारी असूनही त्यांचे काही वैर् नाही आणि त्यांना एकमेकांपासून् धोका आहे असेही नाही.

वैर नाहि म्हंजे धोका नाहि असं नाही. धोक्याचं प्रमाण - शक्यता खूप कमी आहतितकंच .. 'देअर इज नो ऍक्शन् विथ् झिरो रिस्क' ;)

बाकी, शेजारी म्हणजे अगदी खेटून खेटून नाहि पण आपल्या इमारतीत आपल्याच मजल्यावर एक सोडून एक असलेल्या ब्लॉकमधल्यांना नाहि का आप्ण शेजारी म्हणत तसच काहिस. बाकी भारताने इथे तटस्थ धोरण न ठेवता थेट विरोध केला आहे. पटकन एक दुवा मिळाला शोधले तर अजुन व्यवस्थित स्टेटमेंटस मिळतीलच. बाकी हा विरोध फक्त याच क्षेत्रात- फक्त अणुकार्यक्रमापुरता - आहे. हा विरोध करताना दुसरीकडे भारताने यासाठी इराणवर नव्या प्रतिबंधांनाही चीनच्या बरोबरीने विरोध केला आहे. (सुन्नी )पाकिस्तानचा (न्युट्रल / विविध टोळ्यांच्या) अफगाणिस्तानवर प्रभाव वाढू नये असे (शिया)इराणलाहि वाटते.. उगाच नाही आपल्याला तिथे पोर्ट बांधायला दिलंय :)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

वाचतो आहे.......

आप्पामाळी

>>वैर नाहि म्हंजे धोका नाहि असं नाही. धोक्याचं प्रमाण - शक्यता खूप कमी आहतितकंच .. 'देअर इज नो ऍक्शन् विथ् झिरो रिस्क' ;)

अण्वस्त्र धारी देश म्हणजे शेजारील देशांना नक्कीच धोका आहे. मग तसे पहिले तर सगळ्यात धोकादायक देशा मध्ये भारत सुद्धा आहेच ???

धोकादायक

>>अण्वस्त्र धारी देश म्हणजे शेजारील देशांना नक्कीच धोका आहे. मग तसे पहिले तर सगळ्यात धोकादायक देशा मध्ये भारत सुद्धा आहेच ???

इतरांसाठी अर्थातच. तेच सांगून/दाखवून पाकिस्तान अमेरिकेकडून आणि चीनकडून मदत घेत असतो.

नितिन थत्ते

आभार.

शंका निरसनाबद्दल् आभार.
दुवे कामाचे आहेत.
अजून् एक् प्रश्नः- भारताची खरी भूमिका काय् आहे?
म्हणजे, हजसे वरवर् चीन जसे NPT वर सही केल्याशिवाय काहीही देउ नये/देणार नाही अशी भूमिका घेतो, व आतून् थेट जगभर अण्वस्त्रांची तस्करी करत लिबिया,उ कोरियापर्यंत आण्विक शक्ती नेउन् पोचवतो, तसे भारताचे स्वतःच्या मित्रदेशांबद्द्ल आहे काय?असायला हवे काय?

--मनोबा

^ वर