उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
जरबेरा
नीलपक्षी
December 6, 2011 - 3:35 pm
एका पुष्प-प्रदर्शनात काढलेले हे जरबेराच्या फुलाचे छायाचित्र. प्रतिक्रिया कळवा.
![]() |
कॅमेरा - कोडॅक इझीशेअर झेड ६५०
ऍपर्चर- f/३.२
आय.एस.ओ. - ८०
एक्स्पोजर - (ऑटो) - १/१२५
दुवे:
Comments
छान सुरुवात
मॅक्रो फोटोग्राफीच्या छंदाकरिता ही सुरुवात छान आहे. ठळक रंग, पाकळ्या आणि मधल्या भागाची गुंतागुंत, योग्य डेप्थ ऑफ फोकस सगळेच चांगले.
काही सुचवण्या : चित्र कलात्मक हवे तर त्याच्यात एक कथा हवी. दृष्टी चित्रात गुंतून राहावी, अशा प्रकारचे काही घटकांचे "मार्ग" असावे. चित्रांच्या मांडणीबाबत काही ढोबळ नियम आहेत. नियम हे मोडण्याकरिताच असतात, वगैरे गोष्टी अगदी-अगदी खर्या आहेत. "चित्रांतील डोळ्यांना खेचणारे बिंदू १/३ रुंदी *१/३ लांबी या ठिकाणी असतात, मांडणीतील केंद्रबिंदू हा थोडा कंटाळवाणा असतो" हा ढोबळ नियम जरूर मोडता येतो. परंतु "माझे हे चित्र ढोबळ नियमासाठी अपवाद ठरते असे विलक्षण आहे" याबाबत चित्रकाराला खात्री हवी... या चित्राच्या बाबतीत प्रेक्षक म्हणून तरी मला वाटते, की मांडणीतला केंद्रबिंदू कंटाळवाणा आहे : या चित्रात फुलाचा सुंदर गाभा त्या ठिकाणी योजून चित्राचे नुकसान झाले आहे.
फोटो छानच आहे
फोटो छानच आहे, पण -
ह्या धनंजयच्या वाक्याशी सहमत, २/३ चा सुवर्ण-नियम मानला जातो, अर्थात त्याला अपवाद असु शकतो.
तसेच, फुलाचा आणि पार्श्वभुमिचा कॉन्ट्रास्ट थोडा गंडलाय, त्यामुळे फुलावरुन नजर पानावर गेल्यावर फोटोची मजा जाते.
जरबेरा
उपक्रमावर स्वागत. जरबेरा हे नाव पहिल्यांदा ऐकले. अधिक माहिती मिळेल का?
जर्बर किंवा गर्बर डेझी
डँडेलायन आणि गर्बर डेझी "ऍस्टरेसी" या "फॅमिली"मधलील फुले आहे. पण अगदी सख्खे-चुलते इतके जवळ नाही.
धन्यवाद
मी मध्यंतरी असे फूल वीड म्हणून उगवलेले पाहिले होते पण वरील फूल कुंडीत उगवलेले पाहिल्याने प्रतिसाद संपादित केला. :प्
हा फोटो मी अगदी सुरूवातीला...
हा फोटो मी अगदी सुरूवातीला फोटोग्राफीची विशेष माहिती नसतांना काढला होता. अर्थात तेव्हा मला १/३ चा नियम माहित नव्हता.
कॉन्ट्रास्ट उठावदार करण्यासाठी काय करायला हवे होते?
हे जरबेराचे फूल आहे. हे फ्लॉवर ऍरेंजमेंटमध्ये वापरले जाते आणि याचे झाड ग्रीनहाऊसमध्ये वाढवले जाते. हे एक फुलशेतीमध्ये वापरले जाणारे झाड आहे, जे कुंडीतही लावता येते.
फ्लॅश?
बहुधा तुम्ही इथे फ्लॅश मारला. किंवा जो प्रकाशाचा स्त्रोत आहे तो जास्त प्रखर आहे त्याने खुपच भडक सावल्या निर्माण केल्यात. जर दिवसा उजेडी लख्ख प्रकाशात (उन्हात नव्हे) हेच छायाचित्र घेतले तर जास्त उठावदार होईल आणि कॉन्ट्रास्ट बदलताना सावल्याही फार त्रास देणार नाहीत. बाकी वरच्या सर्व प्रतिक्रियांशी सहमत. आणि हो, ते कॉपीराईटचे दोन-दोन ठसे उमटवल्याने चित्राच्या सौंदर्याला खूपच हानी पोहोचते आहे. शक्यतो एकच ठसा, बारिक आणि डोळ्याला खुपणार नाही असा द्या. पारदर्शक दिला तर अधिक उत्तम.
फ्लड लाईट्स
त्या पुष्प प्रदर्शनात रात्रीच्या वेळी खूपच प्रखर फ्लड लाईट्स लावलेले होते.
त्या फोटोवर कॉपी राईटचा ठसा उमटवण्याव्यतिरिक्त त्यावर दुसरे कोणतेही प्रोसेसिंग केलेले नाही. पावणेदोन वर्षांपूर्वी मी जेव्हा हा फोटो इंटरनेटवर टाकला, तेव्हा माझ्या काँम्प्युटरवर फक्त कोडॅकचे सॉफ्टवेअर उपलब्ध होते आणि त्यात फक्त ठळक ठसा देण्याचाच पर्याय उपलब्ध आहे त्यामुळे नाईलाजाने मला तसेच ठसे द्यावे लागले.
प्रति:
रात्रीच्या वेळी हे थोडे कठीण होते, ज्या गोष्टींवर प्रकाश जास्त आहे त्या जास्त भडक दिसतात व उर्वरित गोष्टी फेडेड वाटतात, त्यासाठी पोस्ट-प्रोसेसिंग करता येइल, फोटो क्रॉप करुन अनावश्यक भाग काढुन टाकणे अथवा अनावश्यक भाग जास्त गडद करणे (काळ्या रंगाकडे झुकणारा), त्यामुळे सब्जेक्ट अधिक उठुन दिसेल असे वाटते, तसेच शक्यतो कमी प्रकाशातिल फोटो बहुदा आयत-आकारापेक्षा चौकोन-आकारात असु द्यावेत जेणेकरुन इतर फेडेड गोष्टी जास्त दिसणार नाहीत, पण सब्जेक्ट-मागिल भाग गडद काळ्या रंगाकडे झुकणारा असेल तर फोटो जास्त प्रभावी ठरु शकेल.
तुमच्या सूचनेप्रमाणे...
मी वर लिहिल्याप्रमाणे,
त्या पुष्प प्रदर्शनात रात्रीच्या वेळी खूपच प्रखर फ्लड लाईट्स लावलेले होते. आणि त्या फोटोवर कॉपी राईटचा ठसा उमटवण्याव्यतिरिक्त त्यावर दुसरे कोणतेही प्रोसेसिंग केलेले नाही.
पण आता तुमच्या सूचनेप्रमाणे फोटोशॉपमध्ये प्रोसेसिंग करून बघेन.
धन्यवाद!
ब्लॉग आवडला
नीलपक्षी, वेगळ्या विषयावर आधारित तुमचा ब्लॉग फार आवडला. विशेषतः तुमच्या ब्लॉगवर जो गुलाबांवर लेख आहे तो तुम्हाला उपक्रमावर प्रकाशित करायला आवडेल का? मला आणि इतरांनाही प्रश्न असल्यास ते येथे विचारायला आवडतील.
लेख
माझा गुलाबांवरचा लेख आधीच एका साप्ताहिकात प्रकाशित झालेला असल्याने संपादकांच्या पूर्वपरवानगीनंतरच तो इथे प्रकाशित करता येईल. पण कोणाला प्रश्न विचारायचे असतील, तर तोपर्यंत माझ्या ब्लॉगवर येऊन प्रश्न विचारले, तरी चालतील. मला जी माहिती आहे, तितकी मी देऊ शकेन. कारण जरी मी हा लेख लिहिला असला, तरी मी हॉर्टीकल्चरिस्ट नाही. हॉर्टीकल्चरचा कोर्स केवळ हौस म्हणून केल्यानंतर लगेच काही दिवसांत मी तो लेख लिहिला होता. त्यामुळे त्या विषयातील तज्द्न्य व्यक्तीइतकी माहिती मी देऊ शकेनच असे नाही.
हरकत नाही.
हरकत नाही. ब्लॉग्जवर चर्चा करण्यापेक्षा एक समांतर चर्चा येथे टाकून तुमच्या ब्लॉगचा संदर्भ देता येईल. तुम्ही हॉर्टीकल्चरिस्ट नसाल तरी बहुधा माझ्यापेक्षा (आणि इतर अनेकांपेक्षा) तुम्हाला खचितच अधिक माहिती असावी.
मला शक्य झाल्यास मीच एक स्वतंत्र चर्चा टाकेन आणि प्रश्न विचारेन. तुम्ही जमेल तशी उत्तरे द्या.
छायाचित्र आवडले
तांत्रिक ज्ञान नसल्याने विश्लेषणात रस नाही, पण मला हे छायाचित्र आवडले.
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा
धन्यवाद!
धन्यवाद!
आभार!
ज्यांनी वरती चर्चेत भाग घेऊन मला विविध सूचना दिल्या आहेत, त्या सगळ्यांचे आभार!
कृपया अजून काही वेगळ्या सूचना द्यायच्या असतील, तर जरूर द्याव्यात.