दिवाळी अंक २०११: "दृष्टीचा डोळा पाहों गेलीये"

नंदन यांचा लेख खूप आवडला. स्वच्छ आणि नेमक्या भाषेत "आधुनिक कलाप्रवाहा"चा मस्त आढावा घेतला आहे. नवीन कल्पनांचा पॅरिस ते सँटाफे प्रवास, औद्योगिक क्रांतीचे घोड्यांच्या पायांच्या चित्रणापर्यंत पडलेले दीर्घ परिणाम, दृश्यकलांमधील सूक्ष्म फरक, हे अगदी सुरसपणे रेखाटले आहे. मूळ विषयाच्या व्यापक संदर्भांच्या तपशीलात किती शिरायचे हे ठरवणे सोपे नसते - ते इथे इतके व्यवस्थित साधले आहे, की लेख वाचून आनंद झाला.

मला स्वतःला ओ'कीफ ची शैली तेवढी आवडत नाही. एखादे स्वतंत्र पाहायला आवडते, आणि निळ्या-गुलाबी-जांभळ्या रंगांची निवड आणि त्यातून पांढर्‍या रंगाची साधनाही आवडते, पण एकत्र अनेक चित्रे पाहिले की त्यातील साम्य (खासकरून योनीचे सिंबोलिझम्) कंटाळवाणी वाटू लागते. ओ'कीफ संग्रहालयाला भेट दिल्यावर तसेच वाटले होते. पण सँटा फे तील एकूण मेक्सिकन, गोरे अमेरिकन, आणि नेटिव्ह चित्रकला/हस्तकला, आणि रंगांचा भव्य पॅलेट (मराठीत कसे म्हणायचे?) एकत्र पाहिल्यावर ओ'कीफ यांच्या शैलीचा बोध होतो. त्यांच्या "unity of expression" चा अर्थ मग चांगला लागतो.

सँटा फे आणि टाओस येथील कापड आणि दोर्‍यांच्या रंगाईच्या, विणकामाच्या कलाही खूपच प्रगत आहेत, आणि वेड लावतात! नावाहो विणकामाचा प्रभाव आहेच, पण या चित्रकारांच्या रंगप्रयोगाचे ही नवीन रंगाईकलाकारांवर प्रभाव पडला आहे. लेखात म्हटल्याप्रमाणे फोटोग्राफी आणि चित्रकलेतील फरकांसारखेच, द्विमितीय आणि त्रिमितीय कलाप्रकारांमधले फरक विणकाम, रंगाई इत्यादींतून शोधले गेल्याचे वाचले होते. संगणकासारख्या नवीन तंत्राबरोबरच अगदी पारंपारिक कलांद्वारे देखील या चर्चेत कलाकार सहाभागी आहेत. अर्थात, आज न्यू मेक्सिकोचा पर्यटनस्थळाचा लौकीक पाहता आजच्या प्रयोगांमध्ये निव्वळ "कले"चा आणि "वाणिज्या"चा वाटा किती आहे हे सांगणे कठीण आहे - नवीन तंत्रांतून उद्भवलेल्या वस्तूंपेक्षा या वस्तू ग्रहण करणे अधिक सोपे जाते, म्हणून त्याला अजून ही वाव आहे का, असे वाटून जाते.

सँटा फे च्या आजकालच्या चित्रकलाजगताबद्दल, निरनिराळ्या प्रवाहांबद्दल अधिक वाचायला आवडले असते (आवडेल).

लेखनविषय: दुवे:

Comments

आधुनिक कलाप्रवाह

लेखात आधुनिक कलाप्रवाहाचा थोडक्यात पण उत्तम आढावा घेण्यात आलेला आहे.

छायाचित्रे आणि चित्रकला यातील प्रवाहांचा जो वेध घेण्यात आला आहे त्यावर थोडेसे अधिक तांत्रिक.

छायाचित्रे जरी १८२६ मधे काढणे शक्य होते तरी ती रंगीत व्हायला शतकाहून जास्त काळ गेला. त्या दरम्यान व्यावसायिक चित्रकार ब्रोमाईड कागदावर रंग पसरवून चित्रे रंगीत करीत असत. हे करणे मोठे कौशल्याचे काम होते. या रंगामुळे चित्रे रंगीत व्हायची आणि स्वस्तातही. भारतात ही कला काही वर्षांपूर्वीच बंद पडली. रंगीत छायाचित्रे काढण्याचे तंत्रज्ञान आले तरी त्यातील रंग कायम राहत नसत. पिगमेंट ऐवजी डाय वापरल्याने ते होत असावे. (?). त्यावेळी मृत होत जाणारी सिल्वर ब्रोमाईडवाली माणसे आमचे छायाचित्र वर्षानुवर्षे टिकते यावर भर देत असत. चित्रे रंगीत झाली त्यावर आता संगणकीय प्रक्रिया सहज होऊ लागली या तंत्रज्ञानाने कित्येकांच्या पोटावर पाय आला. (अशी कित्येक माणसे भेटतात.) पोस्टर्स रंगवणारी माणसे (हुसेनची सुरुवात इथपासूनची) फ्लेक्स आल्यापासून बेकार झाली. अगदी पाट्या रंगवणारी देखील.

चित्रपद्धतीवरील आढावा आवडला आणि चित्रांची निवडही. या विषयाची व्याप्ती खूप जास्त आहे. आणि त्याला एका सूत्रात बांधणेही कठीण आहे.
अधिक असेच वाचायला मिळो ही अपेक्षा.

प्रमोद

ट्रेडमार्क लेखन

मलाही हा लेख आवडला.
काहिश्या अनवट विषयांवरचे 'नेमके' आणि सुटसुटीत लेखन नंदनचा ट्रेडमार्क आहे :)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

मनोमन आभारी आहे

ह्या लेखाचे शीर्षक जरी जरासे दुस्तर असले तरी छायाचित्रकला आणि चित्रकला ह्यांतील परस्परपूरकता, संबंध तसेच त्यातून जन्मास आलेल्या वेगवेगळ्या शैल्या वगैरेंची ह्या लेखाने चांगली आणि सुगम अशी ओळख करून दिली आहे. लेख आणखी थोडा मोठा असायला हवा होता असे वाटून गेला. ह्या उत्तम लेखासाठी मराठी आंतरजालावरील आघाडीचे लेखक1 श्री. नंदन होडावडेकर ह्यांचा मनोमन आभारी आहे.

1. आंतरजालवरीलच कशाला अगदी आंतरजालाबाहेरील अनेक छोटे-मोठे लेखकही श्री. नंदन ह्यांच्या व्यासंगाच्या पासंगाला पुरणारे नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

धन्यवाद

(विस्तृत प्रतिसादासाठी जागा राखून ठेवतो.)

प्रतिसादकांचे आणि वाचकांचे मनःपूर्वक आभार. सवडीने सविस्तर लिहितोच, मात्र आज सापडलेले काही दुवे येथे देतो.

स्टायकेनचे १९०४ सालचे चंद्रोदयाचे 'पिक्टोरियलिस्ट' छायाचित्र आणि स्टिगलिझने जॉर्जिया ओ'कीफच्या हातांचे घेतलेले छायाचित्र. सुदैवाने गेल्याच आठवड्यात साधारण याच विषयाशी संबंधित अजून एक दालन/एक्झिबिट पाहता आले. त्याची त्रोटक माहिती येथे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

 
^ वर