अमेरिका मुर्दाबाद!

(या कामरान शफ़ी यांनी लिहिलेल्या आणि २९ सप्टेंबर २०११ रोजी "एक्सप्रेस ट्रिब्यून"मध्ये सर्वप्रथम प्रकाशित झालेल्या "Hate America, Crush America" या सुंदर लेखाचा मी अनुवाद केलेला आहे. हा आजच ई-सकाळवरही प्रकाशित झालेला आहे. या लेखात आलेले प्रथमपुरूषी उल्लेख लेखकाबद्दलचे आहेत.)

पाकिस्तानातील एका बाजारात ’अमेरिका मुर्दाबाद’च्या घोषणा देणार्‍या पाकिस्तानी नागरिकांचा "वॉल स्ट्रीट जर्नल"मध्ये गेल्या बुधवारी प्रसिद्ध झालेला फोटो खूप लोकांनी पाहिला असेल. पाहिला नसेल तर तो http://si.wsj.net/public/resources/images/P1-BC689_MULLEN_G_201109271847... इथेही पहाता येईल. सगळ्यात पुढे डाव्या बाजूला संतापाने वेडा-वाकडा झालेल्या चेहर्‍याचा एक दाढीवाला माणूस आणि त्याच्या आजूबाजूला यथा-तथा कपडे घातलेले १०-१५ लोक! पण नीट पाहिल्यास दिसेल कीं खरी परिस्थिती तशी नाहीं कारण या निदर्शकामागील हे लोक छद्मीपणे हसताना दिसत आहेत!

त्या निदर्शकांच्या हातात फलक आहेत आणि ते निदर्शक वार्ताहारांच्या पुढे-पुढे करत आपापले फलक कॅमेर्‍यांच्या भिंगांसमोर आणत आहेत. फलकांवर "अमेरिका मुर्दाबाद", "अमेरिकेला चेचून टाका" यासारख्या घोषणा लिहिलेल्या आहेत. यातले बहुसंख्य निदर्शक जहालमतवादी वृत्तपत्रांच्या पाठिंब्यावर जमविलेले होते[१]. ओसामा बिन लादेन यांच्या मृत्यूनंतरही "ISI झिंदाबाद"च्या फलकांसह अशीच निदर्शने इस्लामाबादला झाली होती!

यातल्या "अमेरिकेला चेचून टाका" या फलकाने मला (मला म्हणजे कामरान शफींना) ४१ वर्षे मागे नेले आणि त्यावेळच्या "भारताला चेचून टाका" मोहिमेची आठवण करून दिली. ही मोहीम पाकिस्तानी लष्कराने एका लाहोरहून प्रकाशित होणार्‍या उर्दू वृत्तपत्राच्या सहकार्याने उभी केली होती[२]. आजच्या तरुण पिढीतील पाकिस्तानी वाचकांना या ४१ वर्षांपूर्वीच्या मोहिमेची माहितीसुद्धा नसेल. कारण ही मोहीम पाकिस्तानच्या त्यावेळी झालेल्या विभाजनाच्या निषेधार्थ होती. या विभाजनात स्वतंत्र बांगलादेशच्या निर्मितीने पाकिस्तानचा अर्धा भूभाग कापला गेला होता आणि तिचे अर्ध्याहून जास्त नागरिक विभक्त होऊन ’बांगलादेश’चे नागरिक झाले होते.

त्यावेळी आपण एका आर्थिकदृष्ट्या दुबळ्या[३] पण आपल्याहून खूप मोठ्या देशाला चेचून टाकायला निघालो होतो. तसे पहाता शस्त्रास्त्रांबाबत आपली आणि भारताची बर्‍यापैकी बरोबरी होती. पण यावेळी काय परिस्थिती आहे? यावेळी आपण कुणाला चेचून टाकायला निघालोय? आपण निघालोय अमेरिकेला चेचून टाकायला! जगातल्या एकुलत्या एक महासत्तेला! आपले लष्कर आपल्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसाठी, आर्थिक मदतीसाठी आणि नैतिक पाठिंब्यासाठी ज्या महासत्तेच्या औदार्यावर अवलंबून असते आणि ज्या महासत्तेच्या पाठिंब्याच्या बळावरच पाकिस्तानी सरकार सार्‍या जगावर गुरगुरत "दादागिरी" करत असते त्याच महासत्तेला चेचून काढायला आपण निघालो आहोत!!

अलीकडेच "अमेरिकेला चेचून टाका" मोहीमवाल्या एका जिहादी लेखकाने त्याच्या ब्लॉगवर "अमेरिका पाकिस्तानच्या मदतीला कशी आली" याबद्दल नेमकी माहिती वाचकांना देण्यासाठी त्याच्या ब्लॉग-वाचकांना आवाहन केले आहे. मी (शफीसाहेबांनी) जेंव्हां १९६५ सालच्या भारताबरोबरच्या लढाईनंतर पाकिस्तानी खड्या सैन्यात कमिशन घेतले (इमर्जन्सी कमिशन नव्हे) त्यावेळी मी जे पाहिले ते खाली देत आहे.

मी पाकिस्तान मिलिटरी अकादमीत प्रशिक्षण घेत असताना आम्हाला ब्रिटिश काळातल्या "No.4 Mk 1" या बोल्ट-ऍक्शनवाल्या रायफलवर आणि .३०३ लाईट मशीन गन (LMG) वर प्रशिक्षण दिले गेले होते. मे १९६६ मध्ये आम्ही जेंव्हां आमच्या पहिल्या तुकडीत (unit) प्रवेश करते झालो त्यावेळी आम्हाला अमेरिकन बनावटीची अर्ध स्वयंचलित (semi-automatic) .30 M-1 रायफल आणि .30 Browning स्वयंचलित रायफल (BAR) light machine gun आणि .३० भारी machine gun दिली गेली. ही सारी शस्त्रें कोरियन युद्धाच्या वेळची उरली-सुरली शस्त्रें होती व ती त्या युद्धाच्या समाप्तीनंतर पाकिस्तानकडे वळविण्यात आली होती.

आम्हाला भली मोठी M38 Willys जीपही मिळाली होती. आम्ही गमतीने तिला "छोटी विली" (Little Willy) म्हणायचो. फारच तगडी असलेली ही जीप नेऊ तिथे जायची व पडेल ते काम करायची. पुढे हिचा M-38 A-1 असा नवा (आणि सुधारित) अवतारही आला. ही जीपही कुठेही जायची आणि कांहींही करायची. ही M38 तावी नदीतून नेलेले मला आजही आठवते. त्यावेळी तिचा exhaust pipe पाण्याखाली दोन फूट होता. याखेरीज पाऊण टनी डॉज गाडी, अडीच टनी कार्गो गाडी आणि पॅटन रणगाडे व F-86, F-104, F-16 जातीची लढाऊ विमाने, C-130 ही सैनिक आणि माल वाहून नेणारी विमाने आणि ORION-P3C ही पाणबुडी-विनाशक (Anti-submarine) विमानेही मिळाली होती. (सारी ORION-P3C विमाने अलीकडेच अल कायदाच्या आतंकवाद्यांच्या मेहरान येथील नाविक हवाई तळावरील हल्ल्यात नष्ट झाली ही किती नामुष्कीची गोष्ट आहे!). या खेरीज नौदलातील जहाजे, क्रूझर्स, पाण्यातील सुरुंग काढणारी जहाजेही अमेरिकेकडूनच मिळाली होती. हा सारा इतिहास इतक्या सहजपणे विसरणार्‍या आपल्या (पाकिस्तानी) लोकांचा धिक्कारच केला पाहिजे!

अमेरिकेची क्षमा मागण्याचा माझा मनसुबा नाहीं. कारण मी अमेरिकेकडून जास्त साह्य मिळावे म्हणून कांही मूलभूत बदल करणार्‍या अयूब खानपासून ते जुलमी झिया आणि वाईट चिंतणार्‍या मुशर्रफपर्यंतच्या लष्करशहांना पाठिंबा देणार्‍या त्यांच्याधोरणाचा पुरस्कर्ता मुळीच नाहीं. मी फक्त गेल्या कित्येक दशकांच्या आपल्या लष्करासंबंधीच्या अमेरिकेच्या औदार्याची माहिती इथे देत आहे. दुर्दैवाने आपले लष्कर या औदार्याला (तथाकथित) राष्ट्रीयतेच्या नांवाखाली ओळखत नाहीं असे वाटते.

हे कृत्य म्हणजे बेइमानीची आणि दुटप्पीपणाची हद्दच आहे. हा प्रचार केवळ स्वतःच्या उणीवापासून व अलीकडील अबोटाबादच्या (Abbottabad) बिन लादेनच्या हत्त्येपासून आणि मेहरान येथील नाविक हवाईतळावरील पीछेहाटीपासून जनतेचे लक्षदुसरीकडे वळविण्यासाठी केला जात आहे. या घटनांमुळे आपल्या लष्कराचा नाकर्तेपणा आणि भोंगळपणा सार्‍या जगाला दिसलेला आहे. अशा लटक्या उन्मादाने आणि दुराग्रहाने रचलेली निदर्शनें वापरून असल्या समस्या दृष्टिआड सारता येतात. या समस्यात मग "नाहीशी" केलेली माणसे आणि सलीम शहजादसारख्या वार्ताहाराचा अमानुष आणि निर्दय खून वगैरेसारख्या गोष्टीही येतात.

सलीम शहजाद यांच्या अमानुष खुनानंतर ISI ने अतिशय आढ्यतेने आपल्या "चमचा" मीडियाद्वारा जाहीर केले होते, कीं ते त्याच्या खुनाचा छडा लावण्यात कसलीही कसर ठेवणार नाहींत आणि त्यांच्या खुन्याला पकडतील. खरे तर या खुनाच्या संशयाच्या सार्‍या खुणा ISI च्याच दिशेनेच बोट दाखवीत होत्या. आता या खुनाला चार महिने होऊन गेले पण त्यांच्या खुन्याला अद्यापही अटक झालेली नाहीं. थोडक्यात ISI वाले जी ऐट मिरवतात त्यात कांहींच दम नाहीं.

पुन्हा एकदा आपल्या ’रोमेल’ आणि ’गुडेरियन’ची[४] ऐट दाखविणार्‍या आपल्या सेनाधिकार्‍यांच्या लुटपुटीच्या "सात्विक" संतापाकडे वळू. अमेरिकेवर ते किती अवलंबून आहेत आणि कसे अमेरिकेच्या मिठीत आहेत हे या सेनाधिकार्‍यांना चांगले माहीत आहे. अमेरिकेने सार्‍या जगापुढे त्यांचा दुटप्पीपणा जाहीर केलेला आहे. आपले लष्कर कसे वाईट लोकांशी शय्यासोबत करत आहे हे सार्‍या पाकिस्तानी जनतेला माहीत झाले आहे मग अमेरिकेला राग आल्यास त्यात त्यांचे काय चुकले? आणि अफगाणिस्तानमधील भावी राजवटीत मोलाचे स्थान मिळविण्याच्या उद्देशाने वापरले जाणारे चुकीचे परराष्ट्र धोरण अद्यापही तसेच आहे. मग तालीबान, आणि तालिबानचे मित्र हक्कानी वगैरे पाकिस्तानच्या दृष्टीने चांगले कसे? कारण त्यांची आतापर्यंतची कृत्ये एकजात वाईटच आहेत.
--------------------
टिपा:
[१] त्या मानाने भाड्याने घेतलेली तट्टेही खूप कमी दिसत आहेत!-अनुवादक
[२] पाकिस्तानी मीडिया आणि पाकिस्तानी वृत्तपत्रें त्यांच्या लष्कराला आणि ISI संस्थेला Deep State या नावाने संबोधतात!
[३] हे मूळ लेखक कामरान शफी यांचे मत आहे आणि १९७१ साली ते बर्‍याच अंशी खरेही होते!
[४] दुसर्‍या महायुद्धातले सुप्रसिद्ध आणि पराक्रमी जर्मन सेनाधिकारी. इथे लेखकाने सध्याच्या पाकिस्तानी सेनाधिकार्‍यांची टर उडविण्यासाठी त्यांची उपमा दिलेली आहे!

(पाकिस्तानी फौजेतील माजी वरिष्ठ अधिकारी कामरान शफ़ी हे पाकिस्तानचे खूप विख्यात स्तंभलेखक आणि समालोचक आहेत. त्यांनी डेली टाइम्स, डॉन सारख्या वृत्तपत्रांत लेखन केलेले असून सध्या ते ’एक्सप्रेस ट्रिब्यून’साठी लिहितात. वरील लेख ’एक्सप्रेस ट्रिब्यून’मध्येच २९ सप्टेंबर २०११ रोजी सर्वात प्रथम प्रसिद्ध झाला होता. बेनझीर भुत्तोंच्या पहिल्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांचे वृत्तपत्र सचिव होते).

लेखनविषय: दुवे:

Comments

परंपरा

लेखाचे शीर्षक संभ्रम निर्माण करणारे वाटले (नव्हे ते आहेच) त्यामुळे प्रथमदर्शनी असा समज होतो की आपण (म्हणजे भारतीय) तसा पुकारा देत आहेत आणि त्या अनुषंगाने लेखाचे प्रयोजन.

असो.

आपण (श्री.सुधीर काळे) केलेल्या अनुवादात त्या फोटोतील लोकांना "पाकिस्तानी नागरिक" म्हटल्याचे आढळते. वास्तविक कोणत्याही गल्लीबाजारात आढळणारी ती झोपडपट्टीतील बेकार तरुणांची [जे रात्रीच्या जेवणाच्या बोलीवरसुद्धा आणले जाऊ शकतात] गॅन्ग वाटते....फोटोत तरी. एखादा अपवाद सोडल्यास सारी पंचविशीतील दिसतात. त्यामुळे घटनेमध्ये ज्याना "नागरिक" या सुशील नावाने ओळखले जाते त्यात यांचा समावेश करावा की नको असा मनी प्रश्न उभारतो. श्री.कामरान शफी यांच्या लेखातील मुद्यांशी सहमती दाखविताना असेही म्हणणे भाग आहे की त्या फोटोवरून सारा पाकिस्तान आजकाल "अमेरिका मुर्दाबाद" म्हणत नसावा.

श्री.शफी यांच्या लेखातील भाषा संतुलीत असून अत्यंत व्याववारिक नजरेने ते अमेरिकेच्या आर्थिक आणि लष्करी मदतीकडे पाहातात. भारतासारख्या प्रगतीशील राष्ट्रांशी सलोख्याचे संबंध शेजारील छोट्यामोठ्या देशांनी ठेवणे शेवटी त्यांच्याच भल्याचे कसे असणार आहे हे सांगण्याचे धाडस श्री.शफी आपल्या लिखाणातून डोळसपणे दाखवित असतात ते कौतुकास्पदच मानावे लागेल. असे पाय जमिनीवर असणार्‍यांचीही संख्या पाकिस्तानात नगण्य नाही असे म्हटले पाहिजे.

पाकिस्तानातील एक असंतुष्ट गट कायम तसाच राहाणार आहे आणि ती परंपरा अगदी मो.जिना ते मुशर्रफपर्यंत् निर्धोक चालू आहे असा इतिहासाचा दाखला आहेच. पण बराचसा मोठा गट (जो काहीसा चूप असतो) आर्थिक सुबत्तेसाठी कधीही अमेरिकेची साथ सोडणार नाही, आणि नेमके हे अमेरिकेलाही माहीत असल्याने 'Hate America, Crush America" असल्या मूठभरांच्या घोषणांनी व्हाईट हाऊसच्या भिंतीवर कसला ओरखडा उमटणार ?

पापाची फळं !

अमेरिका केलेल्या पापांची किंमत मोजते आहे. काळजी इतकीच वाटते की या पाक-अमेरिका तणावात पाकिस्तान काहीतरी करून भारताला ओढील नी भारताविरुद्ध अण्वस्त्र वापरण्याची धमकी देऊन एक प्रकारे (भारताला) ओलीस ठेऊन अमेरिकेवर दडपण आणण्याचा प्रयत्न करील. इंग्रजांच्या राजवटीत मलबारी मोपल्यांनी इंग्रज सरकारवर दडपण आणण्यासाठी (सॉफ्ट टारगेट) हिंदूंविरुद्ध दंगे घडवून आणले होते असं कुठेतरी वाचल्याचं आठवतं.

छेछे! असे कसे होईल?

>लेखाचे शीर्षक संभ्रम निर्माण करणारे वाटले (नव्हे ते आहेच) त्यामुळे प्रथमदर्शनी असा समज होतो की आपण (म्हणजे भारतीय) तसा पुकारा देत आहेत आणि त्या अनुषंगाने लेखाचे प्रयोजन. <

लेख कोण लिहीते आहे हे दिसत नाहीये का पाटील तुम्हाला? जरा चष्म्याचा नंबर तपासून या पाहू आधी?

असो. व्यक्तीशः तुम्हांस् विचारले हे बहुधा 'पॉलिसी'विरोधी आहे काय्? :(

अडकित्तासाहेब, आपल्या प्रश्नाचा रोख व अर्थ कळला नाहीं.

अडकित्तासाहेब, आपल्या प्रश्नाचा रोख व अर्थ कळला नाहीं.
___________
जकार्तावाले काळे

सहमती

+ सहमत.
मलाही समजले नाही, त्यामुळे श्री.आडकित्ता याना विचारावे की नको या संभ्रमात असतानाच श्री.सुधीरजींनीच तशी चौकशी केल्याचे वाचले आणि त्याला सहमती.

पाक नेतृत्व आणि पाक उद्योगपती आता भारताच्या मैत्रीबाबत उत्सुक!

पाटीलसाहेब,
(कोणत्याही गल्लीबाजारात आढळणारी ती झोपडपट्टीतील बेकार तरुणांची [जे रात्रीच्या जेवणाच्या बोलीवरसुद्धा आणले जाऊ शकतात] गॅन्ग वाटते)
टीप नं १ मध्ये मीही असेच म्हटले आहे, नाहीं कां? (त्या मानाने भाड्याने घेतलेली तट्टेही खूप कमी दिसत आहेत!-अनुवादक) या माझ्या वाक्याचा मूळ लेखाशी तसा संबंध नाहींय्.
ज्याना "नागरिक" या सुशील नावाने ओळखले जाते त्यात यांचा समावेश करावा की नको असा मनी प्रश्न उभारतो
जो मत देतो तो नागरिक!
पण बराचसा मोठा गट (जो काहीसा चूप असतो) आर्थिक सुबत्तेसाठी कधीही अमेरिकेची साथ सोडणार नाही
भारताच्या आर्थिक प्रगतीकडे पाहून आजचे पाक नेतृत्व आणि तिथेले उद्योगपती आता भारताशी मैत्री करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. नुकतेच त्यांचे एक व्यापारी शिष्टमंडळ आपल्याकडे येऊन गेले हे बर्‍याच जणाना आठवत असेल. त्यातले एक सभासदमहाशय नवाज शरीफ यांचे सख्खे बंधू होते!
पण माझ्या वाचनानुसार व मतानुसार ज्यांनी अद्याप एकही युद्ध जिंकलेले नाही अशा पोकळ पाकिस्तानी फौजेचे अस्तित्वच भारताशी असलेल्या वैरावरच अवलंबून असल्यामुळे ते स्वार्थी हेतूंसाठी या वैराचे पडघम वाजवतच रहाणार. आपला समेट झाला तर त्यांच्या 'जहागिरी' संपुष्टात येतील हीच त्यांना भीती आहे. जोवर पाक मुलकी नेतृत्व सबळ होऊन सेनेला आपल्या हुकुमात ठेवू शकत नाहीं तोवर तिथली लोकशाही लुटपुटीचीच आहे.
___________
जकार्तावाले काळे

नागरिक

"तोवर तिथली लोकशाही लुटपुटीचीच आहे."

~ हे एक प्रखर असे सत्य असून केवळ आपणच नव्हे तर खुद्द अनेक शांतताप्रिय पाकिस्तानी नागरिकांनाही ते मान्य आहे असे मी अनेक ब्लॉग्जवर वाचले आहे. पण झाले असे की अगदी स्थापनेच्या पहिल्या वर्षापासून पाक सत्ताधार्‍यांनी भारतद्वेषाची बिन आळवायला सुरुवात केली ती आजतागायत तिथला मतदार थांबवू शकलेला नाही. भुट्टो (बाप असो वा मुलगी), शरीफ सारखी लोकशाही प्रणाली मानणारी असोत वा डझनभर लष्करशहा असोत, प्रत्येक सकाळी इस्लामाबादच्या मशिदीतून दिल्लीकडे तोंड करून बांग दिल्यावरच यांचा दिवस सुरू होत असल्याने त्या विषावरच तेथील राज्यकारभार चालत आलेला आहे आणि चिन्हे अशीच आहेत की ते एपिसोडस् अनंतकाळापर्यंत पडद्यावरून हटणारही नाहीत. भारताच्यादृष्टीने सतत सजग राहायला लागते, ही बाबसुद्धा एका बाजूने पाहिल्यास ठीकच मानावी लागेल.

(अवांतर : मला "नागरिक" अभिप्रेत आहे ते केवळ वयाची १८ वर्षे पूर्ण झाली म्हणून मिळालेला मतदानाचा हक्क दाखविणारी 'अर्चिन्स' नव्हेत, सुधीरजी. ज्याला खर्‍या अर्थाने जबाबदार, वेल बॅलन्स्ड आणि सुजाणता अंगी भिनलेली व्यक्ती म्हटले जाईल असे रूप. इंग्रजीमध्ये 'पीपल' आणि 'सिटिझन' या दोन संज्ञांना काहीशी अलग टिंट आहे. लिंकमधील त्या 'हेट अमेरिका....' किंकाळ्या फोडूंना तुम्ही 'सिटिझन' नाम देण्यास धजावणार नाही असे वाटते.)

बरोबर. पण....

बरोबर. पण....
तुम्ही म्हणता तसे सिटिझन हे कुठल्याही देशात अत्यल्पसंख्यच असतात.प्रगल्भ,प्रदीर्घ लोकशाही म्हणवले जाणारे पाश्चात्त्य देशातही (अगदि ब्रिटन/यु के, अमेरिका) इथेही वेगळी स्थिती नाही. "समाजमन" हा शब्द बहुतांशी "पीपल"च्या भावना मांडाण्यातच खर्ची होतो. समाजमनाच्या चित्रणात "मतदारा"चे चित्र उभे राहणे अशा वेळेस ठिकच वाटते.

--मनोबा

सारे "मोले घातले रडाया, नाहीं आसू नाहीं माया" छापातले निदर्शक!

लेखकानेच लिहिल्याप्रमाणे हे सारे "मोले घातले रडाया, नाहीं आसू नाहीं माया" छापातले निदर्शक होते, मग ते अर्चिन्सच असणार. गंमत हीच वाटते कीं आपल्याकडे पैसे मोजले कीं ट्रक भरन-भरून भाडोत्री निदर्शक मिळतात, मग पाकिस्तानात त्या चित्रात दिसणारी भाडोत्री निदर्शकांची संख्या इतकी किरकोळ कशी?
मी शफीसाहेबांना लिहिले होते कीं "द नंबर ऑफ डेमॉन्स्ट्रेटर्स ईज टू लिटल टु बी ऑफ मच ऑफ अ कॉन्सिक्वेन्स & हेन्स (टु क्रिएट) मच ऑफ अ न्यूज! इफ धिस इज व्हॉट द 'एस्टॅब्लिशमेंट' कॅन ऑर्केस्ट्रेट, देन इट ईज नॉट मच! (विचित्र कायद्यामुळे असे करावे लागले. त्रासाबद्दल दिलगीर आहे!)
त्याला शफीसाहेबांनी उत्तर दिले, "Exactly what I said, sir!"
___________
जकार्तावाले काळे

विषयांतर

अगदी स्थापनेच्या पहिल्या वर्षापासून पाक सत्ताधार्‍यांनी भारतद्वेषाची बिन आळवायला सुरुवात केली
या वाक्यातील 'बिन' या शब्द खटकला. तुम्हाला 'बीन' म्हणजे गारुड्याची पुंगी असे म्हणायचे आहे काय? 'बिन' हा शब्द एकतर हिंदीत 'शिवाय' या अर्थाने वापरला जातो ( 'बिन तेरे, तेरे बिन साजना') किंवा नावात (ओसामा बिन लादेन). त्यामुळे भारतद्वेषाचा राग आळवायला सुरुवात केली हे अधिक योग्य झाले असते ('राग' या शब्दावरील श्लेष वगळूनही!)

सूचनांबद्दल राग नसावा. एखाद्या सुरेख, शालीन चेहर्‍यावरचे किंचित विस्कटलेले काजळ पटकन लक्षात येते. मेकपने बरबटलेल्या चेहर्‍यावरचे येत नाही.
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

बिन....बीन

थॅन्क्स सन्जोप राव

~ मला जे म्हणायचे होते ते तुम्हीच स्पष्ट केले आहे. वास्तविक "गारुड्याची पुंगी" ही चपखल संज्ञा हाती असताना माझी बोटे अनर्थ करण्यार्‍या 'बिन' कडे कशी गेली हा कोळसा उगाळण्यातही अर्थ नाहीच. 'बिन' आणि 'बीन' या दोन्हीतील छटा माझ्या लक्षात येणे मला स्वतःलाच अभिप्रेत होते, पण तसे झाले नाही आणि त्यामुळे क्षमस्व म्हणणे मला आवश्यक वाटते.

खरंय, काजळाने चेहर्‍याचे देखणेपण उठावदार होणे हा त्याचा स्थायी भाव आहेच, तो विस्कटून जाणे यात काजळाची नसून बोटांचीच चूक आहे.

{सूचनांबद्दल राग येणे शक्य नाहीच.}

मिलिटरी इंक

आयेशा सिद्दिकालिखित Military Inc. हे पुस्तक आपण वाचले/पाहिले आहे काय? कोणास हवे असेल तर ते येथे उपलब्ध आहे.

मलाहि ते आताच थोडा शोध घेतल्यावर मिळाले. ह्यानंतर वाचेन.

पकिस्तानी सैन्य हे एक व्यापारी साम्राज्यच निर्माण झाले आहे कारण आपल्या स्थानाचा उपयोग करून सैन्य नाना प्रकारचे उद्योग चालविते आणि अन्य आर्थिक लाभाच्या गोष्टी करते, ज्यांचा हेतु सैन्यातील उच्चपदस्थांच्या वैयक्तिक भरभराटीसाठी होतो असे काहीसे पुस्तकाचे स्वरूप आहे. ह्याला लेखिकेने milbus असे नाव दिले आहे. असे milbus पाकिस्तानखेरीज अन्य काही देशांतहि आहेत असे दिसते, उदा. इंडोनेशिया (जेथे तुम्ही सध्या राहता), तुर्कस्तान आणि काही प्रमाणात चीन. पाश्चात्य देशांतहि आयसेनहॉवरनी अध्यक्षपद सोडतेवेळी केलेल्या भाषणातील Military-Industrial Complex ह्याची आठवण येथे येते.

'The tail wags the dog' अथवा 'नाकापेक्षा मोती जड' अशा उक्तींचे उत्तम उदाहरण म्हणजे पाकिस्तानी देश आणि सैन्य. 'Other nations have armies. The Pakistani Army has a nation!' असे म्हणतात ते खरेच आहे.

पुष्कळांना पटणार नाही पण माझे वैयक्तिक मत असे आहे की फाळणी झाली हे एक blessing in disguise होते. हेच लोक जर आपल्या देशाचा भाग असते तर ह्या जिहादी लोकांनी (आणि अर्थातच त्यामुळे हिंदु तालिबानांनी) देशात काय धुमाकूळ घातला असता ह्याची कल्पना करवत नाही.

भारताचा बागुलबोवा उभा करून स्वत:ची चैन चालू ठेवणे हाच उद्देश

इंडोनेशियात लष्करी अधिकारर्‍यांनी 'धंदे' चालू केले आहेत ते खरे आहे, पण हे लोक 'लई हुश्शार' असल्याने त्यांनी बरेच असले धंदे 'चालवायला' दिलेले आहेत. (आपल्याकडे जशी बरीचशी मराठी मालकीची रेस्टॉरंट्स 'शेट्टी' मंडळी चालवतात तोच प्रकार!) म्हणजे दर महिना ठराविक नैवेद्य दाखविला कीं बाकीचे तो ठेकेदार करतो!
पाकिस्तानात हे धंदे कसे चालविले जातात ते माहीत नाहीं. पण कराचीजवळच्या नाविक तळाशेजारी लष्करी अधिकार्‍याच्या मालकीचे "मंगल कार्यालय" आहे असे वाचले आहे.
पण बिचारे लष्करी अधिकारी तरी काय करणार? आजवर त्यांना एकही युद्ध जिंकता आलेले नाहीं. उलट बांगलादेशवर उदक सोडावे लागले आहे. त्यामुळे भारताचा बागुलबोवा उभा करून स्वत:ची चैन चालू ठेवण्याखेरीज त्यांच्याकडे दुसरा तरणोपायच नाहीं!
___________
जकार्तावाले काळे

निगेटीव्ह पॉप्युलॅरिझम

पाकिस्तानात सतत 'कोणाविरुद्ध' तरी जनमत चेतवून राजकीय पोळ्या भाजल्या जातात. एकुणच 'निगेटीव्ह पॉप्युलॅरिझम' वर आधारीत राजकीय व्यवस्था असर्‍या पाकिस्तानात हे होताना बघुन आश्चर्य वाटत नाही.

(दुर्दैवाने(?) तशाच निगेटीव्ह राजकारणाचा ट्रेंड भारतात येऊ घातला आहे. उदा. 'हिसार', 'राईट टू रीकॉल', 'राईट टू रीजेक्ट' वगैरे सवंग मागण्या वगैरे वगैरे)

बाकी एक दृष्टीकोन - लेख मांडण्याची पद्धत आवडली

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

येउ घातला आहे?

माझ्या माहितीप्रमाणे इथे फक्त सवंग गोष्टीच चालतात असे वाटायची परिस्थिती आहे;अगदि कित्येक दशकांपासून. फक्त् मागच्या दोन्-चार दिवसात आपले म्हणणे मांडाणार्‍यांना सवंग म्हणत् वेगळे काढणे पटले नाही. निदान ते प्रामाणिक तरी आहेत.

फुक्टात टीव्ही घ्या, एक् रुपयात ढीगभर् तांदूळ् घ्या, फुक्टात साड्या वाटा, दारूचा महापूर दरिद्री लोकांत योग्य त्यावेळी सोडा हे धंदे करणार्‍यांना तुम्ही सवंग म्हटले नाहित ह्याचे महत् आश्चर्य वाटले. फक्त् कुणी एक् तसे करत नसताना हट्टीपणाने का असेना पण इतरांना खरोखर लाभ होण्याची शक्यता गृहित धरून् म्हणणे मांडतोय म्हणून त्याला सवंग म्हटले जात् आहे. आपली लोकशाही खरेच महान आहे हे पटते आहे.

--मनोबा

उदाहरणार्थ!

प्रतिसादात "उदा." लिहिले आहे. उदाहरणार्थ लिहिले आहे म्हणजे अर्थातच लिहिलेल्या घटना अनेकांतील काहि उदाहरणापुरत्या दिल्या आहेत (म्हणजेच यादी सर्वसमावेशक नाही. ) तरीही वरील निष्कर्ष काढलेला बघुन आश्चर्य वाटले. असो!

..........करणार्‍यांना तुम्ही सवंग म्हटले नाहित ह्याचे महत् आश्चर्य वाटले.

बाकी "फुक्टात टीव्ही घ्या, एक् रुपयात ढीगभर् तांदूळ् घ्या, फुक्टात साड्या वाटा, दारूचा महापूर " वगैरे प्रकारात 'निगेटीव्ह सवंगता' करणारे राजकारण न दिसल्याने (व वरील प्रतिक्रीया निगेटीव्ह सवंग राजकारणासंबंधीत असल्याने) त्यांचा समावेश उदाहरणात केला नाहि.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

प्रकाटाआ

प्रकाटाआ

डेडीकेशन

Dedication of Military Inc!
To
the hope in my life, Sohail,
and the wretched of my land
We shall live to see.
So it is writ
We shall live to see|
The day that's been promised,
The day that's been ordained;
The day when mountains of oppression,
Will blow away like wisps of cotton;
When the earth will dance
Beneath the feet of the once enslaved;
And heavens'll shake with thunder
Over the heads of tyrants;
And the idols in the House of God
Will be thrown out;
We, the rejects of the earth,
Will be raised to a place of honor.
All crowns'll be tossed in the air,
All thrones'll be smashed.
And God's word will prevail,
He who is both present and absent
He who's beheld and is the beholder.
And truth shall ring in every ear,
Truth which is you and I
We, the people will rule the earth
Which means you, which means I.
Faiz Alimed Faiz
America, January 1979

आपण येथे इतके मोहरून जायची आवश्यकता दिसत नाही.

'डेडिकेशन' पाहिले. आपणास ते फार आवडले आहे हे उघड आहे कारण संपादकमंडळास विशेष विनंति करून पूर्ण रोमन अक्षरातील मजकूर लिहिण्याची मुभा आपण मिळविली आहे. (तशी विनंती करणारा आपला प्रतिसाद मात्र limbo मध्ये गेलेला दिसतो. हेहि मला खटकते. तसा प्रतिसाद होता कारण मी स्वतः तो वाचला होता. प्रतिसादांची सुसूत्रता बिघडवणे हे 'पुराव्यात ढवळाढवळ' करण्यासारखेच आहे. हा paternalism कशासाठी? )

आयेशा सिद्दिकीबाई विचारक्षेत्रात तरी कोणताच धर्म न मानणार्‍या असाव्यात असा सुरुवातीस भ्रम होता त्याचा निरास झाला.

And the idols in the House of God
Will be thrown out;

..........

And God's word will prevail,

(हे म्हटले आहे फैज अहमद फैज ह्यांनी पण सिद्दिकीबाईनी त्याला अर्पणपत्रिकेत स्थान दिले आहे. साहजिकच त्यांनी हे विचारपूर्वक केलेले आहे आणि त्यांना हे सर्व मान्य आहे असाच अर्थ वाचक काढणार.)

कोणाची idols? मी स्वतः कसल्याच idols वर श्रद्धा ठेवून नाही पण ज्यांची अशी श्रद्धा आहे त्यांची ती idols फेकून देणे हे ज्यांना योग्य वाटते अशांचेहि फार कौतुक करायची आवश्यकता दिसत नाही.

And God's word will prevail ही तद्दन भंपक विचारपद्धति आहे. ताकाला जाऊन भांडे लपवत नाही म्हणून स्पष्टच लिहितो की वरील उद्धृतातील God काही बायबलमधला जीजस वा हिंदूंचा ईश्वर नाही तर तो कुराणातील अल्ला आहे. त्याच्या मते पैगंबराच्या मुखातून जग चालविण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत आणि नम्रपणे त्यांचे पालन करण्यापलीकडे तुमचे काहीहि कर्तव्य उरलेले नाही. विशेषेकरून लोकशाही वगैरे अन्य सर्व तत्त्वज्ञाने फजूल आहेत कारण त्यांचा कुराणात उल्लेख नाही. इस्लामच्या मार्गाने जग चालवायचे असेल तर ते खालीलप्रमाणे असेल. (पहा: Quran's Constitution in an Islamic State by G.A.Parvez: http://www.tolueislam.com/Parwez/articles/Parwez_ConstitutionIslamicStat...

इस्लामी आदर्श जग
इस्लामी आदर्श जग

इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ

वरील उतार्‍यात आज्ञा केल्याप्रमाणे आपली विचारशक्ति दुसर्‍या कोठल्यातरी अज्ञात शक्तीच्या सुपूर्द करायला आणि कोणाच्याहि मुखातून आलेल्या आज्ञा 'वरून आल्या आहेत' म्हणून त्यांचे पालन करायला मी तरी तयार नाही. त्या तथाकथित अज्ञात शक्तीचे अस्तित्वहि आजवर कोणी दाखवू शकलेले नाही.

'डेडिकेशन'ने इतके मोहरून जायची काही आवश्यकता दिसत नाही असे म्हटले त्याचे हे कारण.

गांजलेल्या स्त्रीने फोडलेला टाहो जगाने ऐकावा म्हणून केलेली निवड

आहिस्ता कदम, हुजूर, आहिस्ता कदम. मला वाटते माझे खालील निवेदन वाचल्यावर आपल्यालाही मला वाटले तेच वाटेल असे वाटते!
सर्वात प्रथम मला जाणवले कीं या बाईंच्या जवळच्या नात्यातली कुणी "सोहेल" नावाची व्यक्ती-वडील, भाऊ, पति किंवा मित्र-पाक लष्कराच्या हातून मारली तरी गेली आहे किंवा त्या व्यक्तीला खूप त्रास दिला गेला आहे.म्हणून ती म्हणते "The day that's been promised, The day that's been ordained; The day when mountains of oppression, Will blow away like wisps of cotton; When the earth will dance Beneath the feet of the once enslaved; And heavens'll shake with thunder".
सोहेलवर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन होईल अशी तिला खात्री आहे आणि ही खात्री पूर्ण आत्मविश्वासाने व्यक्त करण्यासाठीच तिने फैजसाहेबांच्या कवितेचा पहिला भाग वापरला आहे असे मला वाटले.
"Over the heads of tyrants; And the idols in the House of God Will be thrown out" या ओळीतून फैजसाहेबांना काय म्हणायचे आहे ते त्यांनाच माहीत पण सिद्दीकीबाईंना tyrants व idols म्हणजे लष्करातील क्रूर अधिकारी असाच अर्थ अभिप्रेत असावा असे मला मनापासून वाटले. "We, the rejects of the earth, Will be raised to a place of honor. All crowns'll be tossed in the air, All thrones'll be smashed. And God's word will prevail" या ओळींतून त्या बाई पाकिस्तानातील लष्करशाही किंवा लष्कराची दादागिरी नष्ट होईल याची खात्री दर्शवतात. या ओळींत मात्र God म्हणजे ईश्वर हाच अर्थ त्यांनाही अभिप्रेत असावा पण तिथे त्यांनी तो कुठल्या धर्माचा God हे व्यक्त केलेले नाहीं हे आपल्या लक्षात आले नाहीं कां?
"We, the people will rule the earth, Which means you, which means I" या ओळी वाचून तर हृदयात कासावीस झाली.
अतीशय गांजलेल्या या स्त्रीने हिंमत दाखवून तिने फोडलेला टाहो जगाने ऐकावा म्हणून एक अतीशय चांगली कविता निवडली आहे. त्यात आपल्याला दिसले तसले काळे-बेरे मला तरी अजीबात दिसले नाहीं. मी म्हणतोय त्या दृष्टिकोनातून आपण ती कविता पुन्हा एकदा वाचावीत ही विनंती.

___________
जकार्तावाले काळे

 
^ वर