लोकसंख्या आणि अन्य चिंताजनक गोष्टी

लोकसंख्येचे घडयाळ
लोकसंख्येचे घडयाळ

वरील हलते चित्र मी काही क्षणांपूर्वी http://www.worldometers.info/world-population/ ह्या संस्थळावरून घेतलेले आहे. त्यानुसार आजपासून १४ दिवसांनी जगाची लोकसंख्या ७ अब्जाला जाऊन पोहोचेल. अर्थात् हा केवळ संख्याशास्त्रीय अंदाज आहे. एव्हढे निश्चित की त्या दिवसाच्या पुढेमागे ही गोष्ट अस्तित्वात येणार.

ह्या सगळया नव्या प्रजेला अन्न, पिण्याचे आणि वापराचे पाणी, आरोग्याच्या मूलभूत सुविधा, वीज आणि अन्य शक्तिस्रोत, कपडा ह्या अतिमूलभूत चीजा तर लागणार आहेतच पण राहणीमानाच्या वाढत्या अपेक्षेमुळे ह्या सर्व गोष्टी अधिक वैविध्यपूर्ण असाव्या अशीहि मागणी निर्माण होणार आहे.

अर्थकारण चालवायची प्रचलित पद्धत ह्या प्रश्नांना तोंड देण्यास अपुरी पडत आहे अशी जाणीवहि मूल धरत आहे. वॉल स्ट्रीटमध्ये बसकण मारून बसण्याचे आंदोलन सुरू झाल्याला आत सुमारे १५ दिवस झाले. ते चांगलाच जोर धरत आहे असे जाणवते कारण न्यू यॉर्क पलीकडे अन्य अनेक शहरात आणि अमेरिकेपलीकडे अन्य अनेक देशात स्टॉक एक्स्चेंजपुढे निदर्शने आणि बसकण मारण्याचे प्रकार होऊ लागले आहेत. आतापर्यंत शांतिपूर्ण असलेल्या ह्या चळवळीला हिंसक स्वरूप मिळणेहि शक्य दिसते कारण इटलीमध्ये चळवळीने असे वळण घेतलेले आहे. पहा http://occupywallst.org/. (मात्र ह्या चळवळीचे भारतात पडसाद उठत असल्याचे वृत्तपत्रांच्या e-editions वरून वाटत नाही.)

अफगाणिस्तानात शांतता निर्माण होण्याचे काही चिह्न दिसत नाही. मध्यपूर्वेत नवे मूलतत्त्ववादी निर्माण होण्यासाठी सुपीक स्थिति आहे.

भारतात स्वतःचे प्रश्न आहेतच. अनेक चळवळी आणि निषेध चालू आहेत. शेअर बाजाराच्या गेल्या चारपाच वर्षांमधील मुडदूस झाल्यासारख्या आरोग्यामुळे मध्यमवर्ग नाखूष आहे तर गरिबांना दोन वेळचे जेवण मिळण्याचीहि भ्रान्त आहे. अर्थात त्यामुळे मॉल-संस्कृति आणि सुबत्तेत वाढलेल्या तरुणाईच्या मौजमजांमध्ये काही बदल जाणवत नाही. सचिनला भारतरत्न द्यावे की न द्यावे हा वाद हिरिरीने लढवला जात आहे!

थोडा विचार करणार्‍यांना हा डोलारा कसा सांभाळला जाईल अशी चिंता वाटावी अशीच एकंदर जागतिक स्थिति दिसते.

लेखनविषय: दुवे:

Comments

गोंधळ

जगात कुठल्याही एका क्षणी थांबून पाहीले असता अनेक समस्यांचा डोंगर उभा असलेला दिसतो. आजच्या समस्यांचा डोंगर काही वेगळा आहे असे वाटत नाही.
उदा. ७०चे दशक

ऑक्युपाय वॉलस्ट्रिट आणि लोकसंख्या यांचा फारसा संबंध नसावा. 'ऑक्युपाय वॉलस्ट्रिट' या चळवळीच्या नेमक्या मागण्या काय आहेत याविषयी काही कल्पना नाही. भांडवलशाही व्यवस्थेत लोभीपणा वाढीस लागतो, त्याला आळा घातला जावा अशी सर्वसाधारण आंदोलनाची मांडणी आहे. भारतातील मध्यमवर्गाला आर्थिक उदारीकरणाचा फायदा झालेला असल्याने तसेच लेटेस्ट अण्णा हिरो म्हणून मिळालेले असल्याने या चळवळीचे पडसाद भारतात उमटलेले दिसत नाही.

असेच : शाश्वत चिंता

असेच : चिंताविश्व शाश्वत आहे.

कुठल्याही काळात लोकांनी त्या-त्या काळातल्या घटनांबाबत आणि शक्यतांबाबत अधिक सतर्क असावे हेसुद्धा ठीकच आहे. पण वरील चर्चाप्रस्ताव जरा जास्तच मोघम आहे.

सहमत आहे

प्रश्नांचे गांभीर्य मान्य करूनही, वरील प्रतिसादांत व्यक्त केलेल्या दृष्टिकोनाशी सहमत आहे.

किंचित अवांतर - 'अ टेल ऑफ टू सिटीज्'च्या पहिल्या परिच्छेदात It was the best of times, it was the worst of times, it was the age of wisdom, it was the age of foolishness अशी 'थोर' सुरूवात करून डिकन्स प्रत्येक काळ/दशक/जमाना हा तत्कालीन व्यक्तींना सर्वात महत्त्वाचा वाटतो, हे शाश्वत सत्य सांगतो - त्याची आठवण झाली (in short, the period was so far like the present period, that some of its noisiest authorities insisted on its being received, for good or for evil, in the superlative degree of comparison only). पूर्ण परिच्छेद इथे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!

चिंता करिता विश्वाची?

वरील हलते चित्र मी काही क्षणांपूर्वी http://www.worldometers.info/world-population/ ह्या संस्थळावरून घेतलेले आहे. त्यानुसार आजपासून १४ दिवसांनी जगाची लोकसंख्या ७ अब्जाला जाऊन पोहोचेल. अर्थात् हा केवळ संख्याशास्त्रीय अंदाज आहे. एव्हढे निश्चित की त्या दिवसाच्या पुढेमागे ही गोष्ट अस्तित्वात येणार.

७ अब्ज लोकसंख्या, उपलब्ध साधन-संपत्तीच्या तुलनेत कमी आहे किंवा जास्त आहे हे नमूद केल्याशिवाय ते वाईट किंवा चांगले आहे हा निष्कर्ष काढता येणार नाही, तरी सर्व-साधारणपणे खाणारी तोंडे वाढणे त्रासदायकच वाटते, तसे ते वाटत असावे.

भारतात स्वतःचे प्रश्न आहेतच. अनेक चळवळी आणि निषेध चालू आहेत. शेअर बाजाराच्या गेल्या चारपाच वर्षांमधील मुडदूस झाल्यासारख्या आरोग्यामुळे मध्यमवर्ग नाखूष आहे तर गरिबांना दोन वेळचे जेवण मिळण्याचीहि भ्रान्त आहे. अर्थात त्यामुळे मॉल-संस्कृति आणि सुबत्तेत वाढलेल्या तरुणाईच्या मौजमजांमध्ये काही बदल जाणवत नाही. सचिनला भारतरत्न द्यावे की न द्यावे हा वाद हिरिरीने लढवला जात आहे!

प्रश्न आधीही होते, आज परिस्थिती बरी आहे असे वाटते,महमूद गझनी, खिलजी, मुघल, १५० वर्ष गुलामी, आणि नंतर ९० च्या दशकात निघालेले देशाचे दिवाळे, मुक्त-अर्थव्यवस्था (काही-प्रमाणात) स्वीकारली नसती तर भिक मागायची पाळी आली असती असे तज्ञ सांगतात, त्यामुळे आज परिस्थिती वाईट आहे असे म्हणल्यास ते कशाच्या तुलनेत वाईट आहे हे नमूद करावे लागेल.

वर क्रेमर किंवा धनंजय म्हणतात त्याप्रमाणे चिंता शाश्वत आहे, काळाच्या कोणत्याही एका बिंदूवर बघितले असता चिंता आहेच(ज्ञात इतिहासाप्रमाणे निदान मागचे १००० वर्षे), आत्ता फरक एवढाच आहे कि आपण आता सात-समुद्रापार असलेल्या लोकांच्या देखील चिंता वाहतो, किंवा ती चिंता करावी लागते कारण एकमेकांमधील अंतर कमी झाले आहे, पण बहुदा ते अनिवार्य आहे.

+१००००

१०००० वेळा सहमत.

असेच

जगाची आणि विश्वाची चिंता करण्याइतपत आता डेटा आता उपलब्ध आहे. तो उपलब्ध नसतानाही विश्वाची चिंता सुरू होतीच.

वरील प्रतिसादाशी +१.

चिंता शाश्वत

चिंता शाश्वत आहे व हा लेख (फारच) मोघम आहे या दोन्ही मतांशी सहमत

हरीतात्यांची आठवण झाली "आहे तुमच्या वर्गात कोणी? लपेल फडताळात? म्हणेल चिंता करतो विश्वाची?" ;)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

नीट वाचून प्रतिसाद देइन

नीट वाचून प्रतिसाद देइन म्हणतोय.
सध्या एक् गोष्ट :- लोकसंख्या/वाढ ही समस्या आहे की लोकसंख्या नियोजन ही समस्या आहे ह्यावर एकदा विचार व्हावा.

--मनोबा

प्रश्न

>>लोकसंख्या/वाढ ही समस्या आहे की लोकसंख्या नियोजन ही समस्या आहे ह्यावर एकदा विचार व्हावा.
लोकसंख्या नियोजन ही समस्या आहे का? असल्यास कशी यावर थोडे स्पष्टीकरण देता येईल का? मला या विषयात माहिती नसल्याने विचारत आहे.
असेही युरोपात कमी लोकसंख्या ही समस्या आहेच. पण ती समस्या उद्योग धंद्याच्या वाढीशी निगडीत आहे. इथेही तुम्हाला तसेच म्हणायचे आहे का?

लोकसंख्या नियोजन?

बहूधा 'कुटूंब नियोजन' म्हणायचे असावे. जननदर घटल्याने उत्पादन करू शकणार्‍या घटकांवर (लेबर फोर्स) अवलंबून असणार्‍या लोकांचे (मूख्यत: वृद्ध) प्रमाण वाढते व विकासाचा दर कमी होऊ शकतो. अर्थात तंत्रज्ञान आणि लेबर फोर्स पार्टीसिपेशन (म्हणजे अधिकाधिक स्त्रिया ज्या पारंपारिकपणे उत्पादनात भाग घेत नसत) पुरेसे वाढल्यास विकासदर कमी होईलच असे गरजेचे नाही.

कुटुंब नियोजन् नव्हे.

कुटुंब नियोजन् नव्हे. लोकसंख्या नियोजन् असेच म्हणायचे आहे. मागे एकदा ह्याच विषयावर जिचकारांची लेखमालिका कुठल्याशा वृत्तपत्रात आली होती; त्यात नेमके मला जे वाटत असे त्या धरतीवरच लिहिले होते.

सध्या उपासमार, अन्नधान्य तुटवडा वगैरे जो जाणवतो आहे, तो उपलब्ध अन्न नीट वितरित न केल्याने होतो आहे. अन्नोत्पादन किंवा अन्नोपलब्धी ही पुरेशी आहे.leakage हे व्यवस्थेत आहे. आपण क्षमता पुरेपूर वापरण्यास अजूनही वाव आहे.
दुसरे म्हणजे आहे ते धान्योत्पादनच मुळात भरपूर वाढवता येणे शक्य आहे. भारताचे सरासरी धान्योत्पादन हे बहुतांश विकसित आणि विकसनशील देशांपेक्षाही पुष्कळच कमी आहे. चीनचे लागवडीखालील क्षेत्र भारताच्या जवळपास निम्मे आहे, तरीही तो देश आपल्या दुप्पट धान्योत्पादन करतो! म्हणजे दर हेक्टरमागे ते आपल्या चौपट धान्य काढतात! पाश्चात्त्य देश किंवा इस्राइल तर चीनच्याही भरपूर पुढे आहेत.
ह्यासाठी सुयोग्य नियोजन,एकसंध भरपूर जमीन(विघटित/fragmented/सीमांत नको), योग्य् तिथे यांत्रिकीकरण, वैज्ञानिक दृष्टीकोन, व्यावहारिक अंमलबजावणी केले तर आजच्या युगात हे नक्कीच शक्य आहे. ह्यासाठी पारंपारिक शेतीचा पुरेपूर अनुभव असणार्‍यांना अधिकाधिक स-दिशक खरोखरीची मदत करून, उत्तेजन देउन काहितरी* करता येइलच.
हे "शेती " किंवा अन्न किम्वा धान्य ह्या एका resource बद्दल झाले.
इतरही ठिकाणी/स्त्रोतांमध्ये optimum utilisation केल्यास आहे त्याच्या पुष्कळच अधिक लोकसंख्या पोसू शकू.

पुढील पिढीचे प्रतिनिधी मागील पिढीपेक्षा कमी असणे ह्याला demographic shrink का काहितरी म्हणतात. अर्थव्यवस्थेसाठी व एकूणच समाजजीवन व संस्कृतीसाठी ही एक भयावह घटना आहे. ह्यामुळे अत्यल्प काळासाठी वरवर बघता "पुरेसे स्त्रोत" उपलब्ध दिसले, तरी काम करणारे हात घटत जाउन अर्थव्यवस्था पार कोलमडू शकते. भारताच्या सध्याच्या (तथाकथित)आर्थिक घोडदौडीत demographic dividend हा महत्वाचा भाग आहे. इथे मागच्या पिढीपेक्षा सध्याच्या पिढीचे प्रतिनिधी अधिक आहेत, देश सरासरी तरूण आहे, म्हणूनच काम करणारे हात अधिक उपलब्ध आहेत.(आणि हातांकडे कौशल्यही आहे-सकुशल कामगार.)
अर्थव्यवस्था बरी सुरु आहे. तिथे आख्ख्या युरोप म्हातारा होतोय. त्यातही मोठ्या देशंपैकी सर्वात भयंकर स्थिती स्पेनची आहे.
तिथे जननदर १.२१ च्याही खाली गेलाय.जननदर म्हणजे जोडप्याला सरासरी असनारे मूल. हे २ किंवा २.१ असावे. म्हणजे साधारण लोकसंख्या स्थैर्य गाठते किंवा अल्लाद, हळूवार वाढते. सध्या स्थानिक स्पॅनिश हे प्रजननाबाबत् उदासीन/अनुत्सुक् आहेत. काम करणार्‍यांची संख्या कमी. म्हणून कामगार "आयात" करावे लागतात. ह्यातले बहुतांश मुस्लिम् व त्यातही प्रचंड जननदर असणारे(सरासरी ७-८ च्या वरसुद्धा!!) आहेत. म्हणजेच आख्ख्यी स्पॅनिश लोकसंख्या घटात जाउन येत्या फक्त ४-५ दशकात स्पेन हे स्थलांतरितांच्या अचाट जननदरामुळे इस्लामी राष्ट्र होणार हे दिसतेच आहे.त्या पाठोपाठ उरलेल्या देशांचाही नंबर लागणार.थोडक्यात, तिथे सध्या दिसणार्‍या संस्कृतीचा ठसा नाहिसा होत जाणार. हे होणे चालत असेल, तर मग तक्रारीचे मोठेच कारण कमी होइल.

मुळात लोकसंख्या म्हणजे काय? आपले, मानवाचे अस्तित्वच ना? ते भरपूर असावे असे वाटणे स्वाभाविकच आहे. "भरभराट होवो" असा आशिर्वाद/शुभेच्छा/दुवा उर्दु मध्ये देताना "आबादीआबाद होइये" असा काहिसा का देतात?
कुठल्याही संस्कृतीत "आबादी" वाढणे हे शुभचिंतनच मानले आहे. मानवी मनाची, व्यवस्थेची ती मूळ प्रेरणा आहे.
थोडीशी लोकसंख्या थेवणे,घटवत ठेवणे व मग समृद्ध जीवन जगणे ही संकल्पना अगदिच कृत्रिम वाटते.ही मागच्या फक्त काही ५-७ दशकातच आलेली दिसते. "आबादी आबाद" होणे हे मानवाच्या संस्कृतीपासून मानवी मनात आहे.अनुभवसिद्ध आहे.

अगदि स्वतःबद्दल वैयक्तिक विचार केल्यास काय दिसते? सध्या काही ठिकाणी "हम-दो हामारा एक् " हा प्याटर्न सुरु झालेला दिसतो. म्हणजे समजा आज चार वेगवेगळी जोडपी आहेत. फक्त दोनच पिढ्यांच्या अंतरात अशा चार जोडप्यांचा म्हणजे आठ व्यक्तिंचा प्रतिनिधी म्हणून एकच व्यक्ती उरलेला असेल. आधीच्या सर्वांची जिविताची,पोषणाची जिम्मेदारी त्याच्या एकट्यावर असेल. हे विचित्र आहे. मला स्वतःला अधिक काका-मामा-मावशी असणे आणि "घर भरल्यासारखे वाटणे" ह्या पारंपारिक भावनाच अधिक रुचतात. रिकामे घर प्रायव्हसीच्या नावाखाली घेण्यापेक्षा भरलेल्या घरात "adjust" करुन घेतलेले मला आवडेल.
माफी असावी. सध्या एवढ्यावरच भागवावे. उर्वरीत जसे सुचेल तसे(सुचले/आठवले तर) नवीन प्रतिसादात लिहीन.

*शेतीबद्दल "काहितरी" लिहिणे म्हणजे माझ्या अज्ञानामुळे "काहिच्या काही" ठरु शकते ह्याची कल्पना आहे.
पण तरीही अत्यंत सुपीक जमीन असूनही भारताचे धान्योत्पादन वाढवण्यास वाव आहे, हे ठामपणे म्हणू शकतो.

**बरीचशी विधाने sweeping वाटू शकतील. कृपया भूमिका समजून घ्यावी.

--मनोबा

नियोजन

'लोकसंख्या नियोजन' म्हणजे लोकसंख्येत होणारे बदल कसे असावेत याविषयी काही योजना तयार करणे. अशा प्रकारची योजना ही संस्थात्मक पातळीवर केले जाणे शक्य आहे. या संस्था एखाद्या देशाचे अथवा प्रांताचे सरकार असू शकते. यावरून चीनमध्ये जे केले जाते त्याला 'लोकसंख्या नियोजन' म्हणता येईल.

'कुटूंब नियोजन'म्हणजे आपल्याला किती अपत्ये असावीत, ती किती काळाने व्हावीत याविषयी काही नियोजन करणे. हे निर्णय कुटूंबाच्या पातळीवर नवरा-बायको झालेच तर त्यांच्या अगदी जवळचे नातलग घेतात. अनेक कुटूंबांमध्ये अपत्य संख्या कितपत असावी यात काही प्रवाह असू शकतात. उदा. भारतात बहूसंख्य पति-पत्नी दोन्ही काम करणार्‍या कुटूंबात एकच अपत्य असावे असा प्रवाह आहे. पण हा शेवटी कुटूंबांचा व्यक्तिगत निर्णय आहे. म्हणून त्यास 'कुटूंब नियोजन' म्हणणचे योग्य आहे. युरोपात जे घडते ते अशा प्रकारचे अनेक नियोजन आहे. कमी अपत्यांचा प्रवाह (ट्रेंड) असल्याने एकूण लोकसंख्येत घट होत आहे पण कुटूंबपातळीवर केलेल्या नियोजनामुळे.

जननदर व विकासदर यांच्याबाबत मी वर काही मत मांडले आहे. ते पुरेसे आहे असे वाटते.

घटता जननदर

आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वाढलेली आयुर्मर्यादा आणि घटता जननदर यामुळे युरोपात जो प्रश्न उभा राहिलाय तोच काही काळानंतर भारतासमोरही उभा राहण्याची शक्यता आहेच. पण त्याचसोबत सामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबात अपत्यसंख्या वाढल्यास त्या कुटुंबापुरते दरडोई उत्पन्न कमी होवून सर्वांच्या राहणीमानावर व अपत्यांच्या पालन-पोषणावर त्याचा विपरित परिणाम होवू शकतो. त्याचा परिणाम त्या अपत्यांनी पुढे आधीच्या पिढीच्या जिविताची जबाबदारी घेण्यात सक्षम नसण्यातही होवू शकतो.
अर्थात मी समाजशास्त्रज्ञ नसल्याने हे सर्व फक्त अंदाज आहेत.

स्वार्थ आहे तोवर चिंता आहेच...

गरजा मर्यादित राहू शकतात. स्वार्थाला मात्र अंत नसतो. हा स्वार्थ जितका प्रबळ तेवढा तो सामान्यांसाठी चिंतेचा विषय...

अरविंदराव,
जिथे प्रश्न आहेत तिथेच उत्तर असते. मुद्दा असा आहे, की शाश्वत पर्यायाचा पाठपुरावा करण्यात समाजाला रस असतो का?

जगाची चिंता जग करो. भारताबाबतचा मुद्दा येतो तेव्हा इथले प्रश्न घाणेरड्या राजकारणामुळे निर्माण झाल्याचे जाणवते. विचार चांगला असला तरी तो मांडणारी व्यक्ती माझ्या पक्षाची/जातीची/धर्माची/हितसंबंधाची आहे का? महत्त्वाचे म्हणजे त्यातून 'मला काय फायदा?' इतपतच विचारांची झेप जात असेल तर प्रश्न सुटणार कसे?

स्वातंत्र्य काळात भारताची लोकसंख्या साधारणपणे ३० ते ४० कोटींच्या दरम्यान होती. महात्मा गांधींचा संततिनियमनाला वेगळ्या अर्थाने विरोध होता. ते मनाचा निग्रह महत्त्वाचा मानायचे. शंतनुराव किर्लोस्करांच्या एका भेटीत महात्माजींनी संतति प्रतिबंधक साधने आणि लोकसंख्या नियंत्रण या मुद्द्यांवर चर्चा येताच मौन धारण करुन शंतनुरावांना भेट संपवण्याचा इशारा केला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपल्या लोकसंख्येचे नियोजन या विषयावर धुरीणांनी दीर्घकालीन विचार केलेला दिसत नाही. पहिल्या आरोग्यमंत्री राजकुमारी अमृतकौर या महिला होत्या, पण अधिक मुले म्हणजे अंतिमतः एका स्त्रीचेच जीवन धोक्यात घालणे, हे त्यांनाही जाणवले नाही.

ज्याला व्हिजनरी म्हणता येईल असे नेते घडवण्यात भारत कमी पडला. विश्वास पानपतावर गेला म्हणीप्रमाणे भारतीयांचा भाबडेपणा लाल बहादूर शास्त्रींबरोबरच लयाला गेला. 'होटों पे सच्चाई रहती है, जहाँ दिलमे सफाई रहती है, हम उस देश के वासी है, जिस देश मे गंगा बहती है' ही ओळखही पुसली गेली.
असो. सर्व समस्यांवर उत्तरे असतात. निर्धाराची उणीव आहे इतकेच.

 
^ वर