उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
मराठी शब्दकोशाचे खंड
सुशान्त
October 10, 2011 - 11:41 am
महाराष्ट्र-राज्य-साहित्य-आणि-संस्कृति-मंडळाने प्रकाशित केलेल्या मराठी शब्दकोशाच्या खड १ आणि खंड २ ह्यांच्या पीडीएफ धारिका मंडळाच्या संकेतस्थळावर खालील दुव्यावर उपलब्ध आहेत. संकेतस्थळाच्या वरच्या भागातल्या विषयपट्टीत शब्दकोश असं लिहिलं आहे त्यावर टिकटिकवून (क्लिक करून) अक्षरानुसार पीडीएफ धारिका पाहता येतील.
http://mahasahityasanskriti.maharashtra.gov.in/shoabdakosh.htm
दुवे:
Comments
छान
छान.
"क"ची पाने चाळून बघितली. पानांचा क्रम उलटसुलट झाला आहे - कोणास संकेतस्थळचालकाची ओळख असेल, तर सांगून सुधारावे.
आजवर मोल्सवर्थचा शब्दकोश बघायचो, पण तो थोडासा जुनाट आहे. हा नवीन शब्दकोश मिळाला हे उत्तम झाले.
धन्यवाद
दुव्याबद्दल धन्यवाद.
शब्दकोशाचे पुढील खंड लवकर प्रकाशित होवोत.
शब्दसंख्या भरपूर मोठी आहे. प्रकाशन गुण ही चांगले वाटले.
प्रमोद
जुन्या मराठीचा शब्दकोश
अजून एक माहिती.
तुळपुळे-फेल्डहाउस संपादित जुन्या मराठीचा शब्दकोश http://dsal.uchicago.edu/dictionaries/tulpule/tulpule.html येथे online viewing साठी उपलब्ध आहे. तेथेच मोल्सवर्थहि आहे.
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
उत्तम
उत्तम. अनेक धन्यवाद.
लिंक कुठे आहे?
सांगितल्याप्रमाणे दिलेल्या दुव्यावरून "शब्दकोश" वर मारल्यावर "ताज्या घडामोडी" चे पान येते. तिथे .पीडीएफ चा दुवा कुठेही दिसत नाही. कुठल्या ठराविक ब्रौजर वरच स्थळ चालते का?
दुवे
पिडिएफ दुवा (१)
पिडिएफ दुवा (२)
वरील दुवे फक्त मूखपृष्टाकडे घेऊन जातात. खालच्या धनंजय यांच्या प्रतिसादातील सूचनांप्रमाणे करावे.
____________
वाचण्यासारखे काही
खाली उमटणारी यादी (ड्रॉप डाऊन मेन्यू)
"शब्दकोश"वरती तर्जनी (न टिचकता) फिरवल्यावर एक यादी उमटते, त्यातील कलमे "पहिला खंड आणि "दुसरा खंड". पैकी कुठल्याही एका खंडावर तर्जनी (न टिचकता) फिरवल्यावर बाजूला अक्षरांची यादी उमटते : "अ" "आ" "इ", वगैरे. त्यांच्या वर टिचकी मारता पीडीएफ पाने उतरवता येतात.
हम्म्म्म.
कदाचित ब्रौजरचाच घोळ असावा. तर्जनी फिरवल्यावर काहीच उमटत नाही - ती कलमे मला दिसत नाहीत. टिचकी मारल्यावर शेजारचेच घडामोडींचे पान येते. मुखपृष्ठावर जाऊन पुन्हा प्रयत्न केला तर "शब्दकोश" टॅब नाहिसा होऊन शेजारी-शेजारी दोन घडामोडींचेच टॅब दिसतात! मी मॅकवर मोझिला आणि सफारीवर करून पाहिले... असो. ऑफिसच्या पीसी/एक्सप्लोरर वर पुन्हा प्रयत्न करेन...
(क्रेमरच्या दुव्यावरचे कव्हर छान आहेत!)
येस्स्स!
धनंजय, मदतीबद्दल आभार. आज ऑफिसच्या पीसीवर सगळे दुवे दिसताहेत!
धन्यवाद
दुव्याबद्दल धन्यवाद.
शब्दकोश बर्यापैकी मोठा दिसतो. क अक्षराचीच २७६ पाने आहेत.
नितिन थत्ते
मनःपूर्वक धन्यवाद!
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्राचार्य रामदास डांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठी शब्दकोश निर्मितीचे काम चालू आहे असे वाचले होते.साहित्यसंस्कृतिमंडळ तो कोश जालावर उपलब्ध करून देईल याची कल्पना नव्हती.मंडळाने हे उत्तम कार्य केले आहे.श्री.सुशान्त यांनी त्याचा दुवा(लिंक) इथे देऊन आम्हांला उपकृत केले आहे.त्यांचे हार्दिक आभार.
अनेक आभार!
वा! हे काम मस्त झालं
अनेक आभार!
पहिल्याच पानावर 'ब्रह्मा' ऐवजी 'ब्रम्हा' दिसले. असो. इतक्या मोठ्या खंडात असे व्हायचेच ;)म्ह न्ह हे नव्या नियमांनी योग्य आहे हे श्री. धनंजय यांनी लक्षात आणून दिले त्याबद्दल त्यांचे आभार.ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
अक्षरानुक्रमाची वेगळी आणि विचित्र पद्धत
का कोण जाणे, कोश उघडून वाचायला कोणतीही अडचण आली नाही.
>>"क"ची पाने चाळून बघितली. पानांचा क्रम उलटसुलट झाला आहे - कोणास संकेतस्थळचालकाची ओळख असेल, तर सांगून सुधारावे>>इति धनंजय.
१९६२ च्या शुद्धलेखनाच्या नियमांनी मराठीतून अर्ध-अनुनासिक उच्चार काढून टाकले आहेत, त्यामुळे 'हं हं' हे हल्ली 'ह ह' असे लिहावे लागते, आणि थु: थु: हे थुथु असे.. कारण त्या तज्ज्ञांच्या मते, 'हं'चा उच्चार हम् आणि ह: चा हहा; थु: चा थुहु.. ( कःपदार्थ, दु:ख वगैरेंचे अनुक्रमे कहापदार्थ, दुहुख वगैरे? माहीत नाही! जिव्हामूलीय आणि उपध्मानीय यांचा स्पष्ट उल्लेख शुद्धलेखन नियमांत नाही.) त्यामुळे हल्ली अं(अम्) आणि अ:(अहा) यांना स्वर समजले जात नाही, त्यांना काही मराठीचे अभ्यासक स्वरादी म्हणतात. त्यामुळे अक्षरानुक्रमानुसार सगळे 'क' संपल्यावर 'कं' आणि नंतर 'क:' येतात. (मोल्सवर्थ अ आणि अं-अ: यांचा क्रम, अनुस्वार-विसर्ग नाहीत असे समजून एकत्रितपणे लावतो.) असे केल्याने कप आणि कंप या शब्दांमध्ये अनेक पानांचे अंतर पडते. 'कांहीं' शब्द दिलेला नाही म्हणून, पण दिला असता तर तो काहीपासून काहीच्याबाहीच दूर गेला असता. असा विचार केल्यावर कदाचित पानांचा क्रम उलटसुलट नसेल असे वाटते.
संकेतस्थळचालकाची ओळख नाही, पण प्राचार्य रामदास डांग्यांची आहे. ते पुण्याच्या सदाशिव पेठेत राहतात.
दूरध्वनिक्रमांक : ०२०-२४४७-२९४४(कार्यालय), भ्रमणध्वनी ९८५-०७५-०६२४....वाचक्नवी
पृष्ठ १ नंतर पृ ९८..., आणि पृ २७६ नंतर पृ २-९६
पृष्ठ १ (संकेतस्थळावरील पहिले पृष्ठ) बघता शेवटचा शब्द "कचकचीत" आहे. त्याची व्याख्या अर्धवट ठेवून संकेतस्थळावरील दुसरे पृष्ठ (छापील पृष्ठ क्रमांक ९८) पहिला शब्द "कळसपट्टी" असा देते. त्यानंतर छापील पृष्ठ क्रमांक क्रमाने आहेत.
छापील पृष्ठ २७६ ("क्विंटल", व नंतर प्रकरण समाप्तीच्या दोन टिंबांच्या) नंतर पृष्ठ २ ("कचकचून") आले आहे. त्यानंतर २-९७ पृष्ठे क्रमाने आहेत.
ही चर्चा संबंधित व्यक्तींना कळवली आहे
उपक्रमावर चाललेली ही चर्चा संबंधित व्यक्तींना कळवली आहे. लवकरच त्याकडे लक्ष दिले जाईल अशी अपेक्षा आहे.
बापरे!
'क' मध्ये काही पानं चाळली.. हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच शब्द ओळखीचे वाटले! शब्दकोषाचा अभ्यास करावा लागणार आता!! ;-)
-Nile
धन्यवाद!
सुशांत दुव्याबद्दल माहिती दिल्याबद्दल आभारी आहे.
शब्दकोशा संबंधित व्यक्तींशी आपला संपर्क असेल तर कृपया खालील सुचना देखील त्यांपर्यंत पोहचवाव्यात हि विनंती.-
१) पीडीएफ फाईल मध्ये शब्द संगणकाच्या मदतीने सर्च करणे होत नाही.
२) पीडीफ फाईल संकेतस्थळाच्या ठिकाणीच उघडते. दुसरा एखादे वर्णाक्शर शोधायचे म्हटले तर वेबपेज मागे-पुढे करत बसावे लागते.
३) संगणकीय आवृत्तीमधील शब्दकोशामध्ये एखादा शब्द (वा म्हण) 'कोणत्या प्रांतामध्ये वा ', 'कोणत्या बोली भाशेतून' सररास वापरला जातो? अशी पूरक माहिती देखील दिली तर शब्दकोश केवळ 'मराठी शब्दकोश' न राहता 'महाराश्ट्री शब्दकोश' अशी ओळख त्यास प्राप्त होऊ शकेल.
उदा. 'गजाली' हा शब्द मालवणीत 'वेळ घालवण्यासाठीच्या (फालतू) गप्पा- गॉसिप्स इत्यादी' या अर्थाने वापरतात. ह्याच अर्थाचा दुसरा एखादा शब्द महाराश्ट्राच्या इतर कोणत्या भागात वा कोणत्या इतर बोलीभाशेत वापरला जातो कां? व असेल तर कोण-कोणता?
ता.क.-
अरे बापरे! या शब्दकोशात मलेशीयामधील मराठी जनांकडून वापरले जाणारे शब्द देखील आहेत कां?
'गटापर्चा'.
'गटगटे' हा शब्द केवळ अलिबाग प्रांतात वापरला जातो कां? कारण त्या शब्दाच्या बाजूला कंसात अलिबाग असे लिहीलेले आहे. तसे असेल तर माझी वर मांडलेली सुचना अंमलात आणणे शक्य आहे असे वाटते.