तर्कक्रीडा १७: धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे..

भारतीय युद्धात सातव्या दिवशी पांडवसेनेची मोठी हानी झाली.त्यादिवशी कौरव महारथी सौमदत्ती,शरभंज,कुकुंभ आणि सिंहनाद यांनी आपल्या अभूतपूर्व पराक्रमाने पांडव सेनेला संत्रस्त करून सोडले.
सूर्यास्तानंतर युद्धविराम झाला. पांडवांकडील महारथी सात्यकी,विक्रांत,युधामन्यू आणि उत्तमौजा यांनी प्रतिज्ञा केल्या की ते आठव्या दिवशी घनघोर रणकंदन घडवून वरील चारही कौरव महारथींचा वध करतील. परंतु कोणी कोणास मारावे या विषयी मतैक्य होईना.शेवटी त्यांनी पुढील प्रमाणे भविष्यकथन केले.
...सात्यकी : उद्याच्या तुमुल युद्धात उत्तमौजा सौमदत्तीचा वध करील.
...उत्तमौजा:कुकुंभाला यमसदनास पाठविण्याच्या वल्गना युधामन्यू करीत असला त्याच्या हातून तसे होणार नाही.
...विक्रांत :उद्या शूर सात्यकी शरभंजाला कंठस्नान घालील.
...युधामन्यू :पांडवांच्या विजयाने हर्शभरित झालेले देव उद्या स्वर्गातून पुष्पवृष्टी करतील.
महाभारतातील युद्धपर्वावरून (संशोधित प्रत)असे दिसून येते की प्रतिज्ञेप्रमाणे या चार महारथींनी आठव्या दिवशी त्या चार कौरव महारथींचा वध केला. प्रत्येकाने एकाचाच वध केला.अधिक सूक्ष्म अभ्यास करता असे दिसते की ,ज्याने सौमदत्तीचा वध केला त्याने वर्तविलेले भविष्यच खरे ठरले. इतर तिघांची भविष्यवाणी खोटी ठरली.
तर कोणी कोणाचा वध केला?
त्यादिवशी स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली काय?
( कृपया उत्तर व्यनि. द्वारे)
........यनावाला

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तर

उत्तर व्य नि ने पाठवले आहे. अजून कोडी येऊद्यात !

येऊ द्या..येऊ द्या..!

नमस्कार आहे,आपल्या तपश्चर्येला.येऊ द्या,येऊ द्या.आणखीन भरपूर कोडी येऊ द्या.तूम्ही माझ्या सारख्या अरसिक माणसाची चिंता करु नका.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

त्र्क.१७:धर्मक्षेत्रे.....

या कोड्याचे उत्तर वरदा, अमित, अनु, मनिमाऊ, अभिजित, राधिका, अदिती आणि विसुनाना यांनी अचूक दिले आहे.अनु आणि अदिती यांनी युक्तिवादही लिहिला आहे.त्यांतील अनु यांचा युक्तिवाद अपुरा आहे.तर अदिती यांचा पटण्यासारखा असून परिपूर्ण अहे. इतरांनी लिहिला नसला तरी त्यांनी युक्त्तिवाद लढवलाच असणार. अन्यथा उत्तर बरोबर आलेच नसते. या सर्वांचे अभिनंदन!
.......यनावाला.

उत्तर

यना तुम्ही याचं उत्तर प्रकाशित करायला विसरलात् बहुतेक?? :-)

अभ्या

कूट प्रश्नाचे उत्तर....

वर वर कूट प्रश्न वाटत असला तरी माझ्यामते उत्तर सोपे आहे

सात्यकीने सौमदत्तीला मारले
उत्तमौजाने सिंहनादला मारले
विक्रांतने शरभंजाला मारले
युधामन्यूने कुकुंभाला मारले

असे उत्तर आहे.
यनावाला यांच्याकडून अधिक खुलाशाची अपेक्षा

उत्तराची कारण मीमांसा:

...सात्यकी : उद्याच्या तुमुल युद्धात उत्तमौजा सौमदत्तीचा वध करील. (खोटे)
हे भविष्य खोटे ठरण्यासाठी उत्तमौजाने कुकुंभ, शरभंज वा सिंहनाद यांपैकी एकाला मारणे आवश्यक आहे
...उत्तमौजा:कुकुंभाला यमसदनास पाठविण्याच्या वल्गना युधामन्यू करीत असला त्याच्या हातून तसे होणार नाही. (खोटे)
हे भविष्य खोटे ठरण्यासाठी युधामन्यूने कुकुंभाला मारणे आवश्यक आहे
...विक्रांत :उद्या शूर सात्यकी शरभंजाला कंठस्नान घालील.(खोटे)
हे भविष्य खोटे ठरण्यासाठी सात्यकीने कुकुंभ, सौमदत्ती वा सिंहनाद यांपैकी एकाला मारणे आवश्यक आहे
...युधामन्यू :पांडवांच्या विजयाने हर्शभरित झालेले देव उद्या स्वर्गातून पुष्पवृष्टी करतील (खरे).
हे भविष्य खरे होण्यासाठी चौघांनी एकेकाला मारणे आवश्यक आहे. तेव्हा हीच भविष्यवाणी खरी सदरात मोडू शकते
ज्याने सौमदत्तीचा वध केला त्याने वर्तविलेले भविष्यच खरे ठरले. इतर तिघांची भविष्यवाणी खोटी ठरली.

आहे का बरोबर?
(महाभारतभक्त )सागर

 
^ वर