संध्याकाळ

ढगाळलेलं आकाश आणि मावळता सुर्य म्हणजे विलोभनीय रंगांची उधळण.. असाच एक क्षण टिपण्याचा प्रयत्न माझ्या गॅलरीतून..

तांत्रिक माहिती,
निकॉन डी५१०० कॅमेरा, सनसेट मोड.
एक्सपोझर १/४००, एफ १०.

लेखनविषय: दुवे:

Comments

फोटो दिसत नाहीए?

फोटो बहुदा सर्वांना दिसत नाहीए. दुसर्‍या दुव्यावरून् पुन्हा एकदा फोटो लावतो आहे. तरीही दिसत नसल्यास कृपया खाली वेगळा प्रतिसाद देऊन कळवावे. ह्याच प्रतिसादात् बदल करून पुन्हा देण्याचा प्रयत्न करेन.

-Nile

मस्त

आता दिसतोय
रंगांची उधळण मस्त टिपलिये फक्त त्या विजेच्या तारा टाळून फोटो काढता आला असता तर अधिक आवडले असते.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

+/-

>>त्या विजेच्या तारा टाळून फोटो काढता आला असता

अगदी हाच विचार मनात आला होता पण तसे शक्य नसावे असे जाणवले म्हणजे तारा टाळण्यासाठी अधिक उंचावर जाणे शक्य नसावे. तारा टाळण्याइतका झूम केला तर व्ह्यू बिघडला असता असे वाटते.

नितिन थत्ते

वेगळे मत

असे नव्हे. या चित्राच्या कथानकात विजेच्या तारांचे महत्त्व आहे. फोटोच्या कातरण्यावरून चित्रकाराचे असे मत होते हे जवळजवळ स्पष्ट आहे.

(तारा टाळूनही फोटो काढता आला असता तर असता. पण त्या फोटोची कथा वेगळी असती.)

तरी माझ्या मते कथानक हवे तितके प्रभावी नाही. आकाशातील नाट्यमय रंग आणि नाट्यमय तारा/खांब हे एकमेकांशी समन्वय (किंवा कलात्मक भांडण) न साधता नुसतीच लठ्ठालठ्ठी करत आहेत.

होय.

मूळ् फोटोत तारांचा खांबही टिपला होता. पण तो फारच डावीकडे असल्याने फोटो कातरला. फोटो घेताना एका कोपर्‍यात सुर्यही हवा होता. क्रॉप केल्याने तारांची (विज्युअल) जागा बदलली खरी. मागचा खांब मोबाईल टॉवर असावा, तो असण्यावाचून पर्याय नव्हता.

ऍपलच्या iphoto सॉफ्टवेअर वापरुन पोस्ट प्रोसेसिंग केलं, (ते लिहलं होतं मी, पण चुकुन डिलीट झालं वाटतं), क्रॉप केल्यावर शॅडो ऍडज्स्ट केली आणी थोडा टींज इफेक्ट दिला.

सर्वांना प्रतिसादा करता धन्यवाद.

दुर्दैवाने, मुळ फोटोत आणि ह्या फोटोत जाणवण्याइतका फरक आहे (वेब होस्टिंगमुळे साईझ् अर्धा झाला आहे), पण् तो विशेष सुर्याच्या बाजूलाच जाणवतो.

-Nile

सुरेख

या फोटोवर काही संस्करण केले आहे का?

छबी दिसत नाही

दिसून नाय राहिली.

आण्णा चिंबोरी
पोट्टे काय बोलून राहिलेत बे!

 
^ वर