पुरुषोत्तम करंडक २०११, पुणे.

गेल्या गुरुवारी मझ्या जळगावच्या बहीणीचा फोन आला, तीच्या टिम सोबत या शनिवारी ती पुण्याला येणार होती . प्रसंग होता पुण्यातील भरत नाट्य मंदिरात होण्यार्‍या "पुरुषोत्तम करंडक २०११" चा. मागच्या वर्षी जळगावात झालेल्या या स्पर्ध्येत त्यांचा तिसरा क्रमांक आला होता. या स्पर्धेचा पुणे स्तरावरील आयोजनाचा आणि उत्साहाचा अनुभव मिळावा म्हणुन पुण्यातील आयोजकांकडुन त्याना खास निमंत्रण होतं.

पुरूषोत्तम करंडक - आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा १९६३ पासुन महाराष्ट्रीय कलोपासकचे चिटणीस पुरुषोत्तम रामचंद्र उर्फ अप्पासाहेब वझे त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पुण्यात दरवर्षी आयोजीत करण्यात येते. मगील काही वर्षांपसुन ही स्पर्धा कोल्हापुर, औरंगाबाद, जळगाव, मुंबई शरांतही घेण्यात येते.

पुणे विद्यापीठ अंतर्गत येणारी कॉलेज तसेच पुण्यातील इतर विद्यापीठ या स्पर्धेत आपली दरवर्षी नाटके सादर करतात. ऑगस्ट महिन्यात झालेल्या प्रथमिक फेरीतुन निवडलेल्या ९ एकांकीका या दोन दिवसात पुण्यातील भरत नाट्य मंदिरात सादर करण्यात येणार होत्या.

अप्रतीम सादरीकरण, सुक्ष्म नेपथ्य, आत्मविश्वासाने परिपुर्ण अभिनय असलेल्या एकाहुन एक सरस एकांकिका पाहायला मिळाल्या.. दिलेल्या ठराविक वेळत स्पर्धेत सहभाग घेणारे कलाकार स्वतः सगळं करतात. संगीत, लाईट, स्टेज लावणे अशा सगळ्या गोष्टी स्वतः विद्यार्थी करतात . तरुणाईनि तुडुंब भरलेल्या उत्साही पण तितक्याच शीस्तबद्ध वातावरणात तर त्या एकांकिका बघतांना मन अगदी भांबावुन गेलं होतं..

जवळ जवळ एक दीड महिन्यानंतर मिळालेला मोकळा सप्ताहंत याहून अधिक चांगल्या रीतिने कुठे घालवताच आला नसता. हे दोन दिवस आपण अगदी वेगळ्याच विश्वात असल्याचा अनुभव झाला. महाविद्यालयीन काळात ज्या गोष्टी अनुभवायच्या राहुन गेल्या, त्या माझ्या यादीतील काही गोष्टी या दोन दिवसात अगदी मनसोक्त अनुभवायला मिळाल्या.

घुस घुस घुस घुस घुसतय कोण......................... एम आय टी शीवाय आहे कोण
अरे घुस घुस घुस घुस घुसतय कोण.................. एम आय टी शीवाय आहे कोण

आम्ही सगळे................. माहान आहोत
बाकि सगळे ...............लाहान आहेत
आम्ही कुणाचे..........सीओईपी चे..
तुम्ही कुणाचे..........सीओईपी चे..
आणि म्हणुनच, सी ओ ई पी
सी ओ ई पी
सी ओ ई पी

चल रे सुमीत .................लढ
चल रे स्वप्निल ...........लढ
चल गं केतकि ............फाईट

करंडक कुणाआआआआआचा..........................कमेन्स कॉलेजचाआआआआआ....
करंडक कुणाचा............................................कमेन्स कॉलेजचा

उगीचच एक विचार मनात येउन गेला हे सर्व अनुभवायला जरा उशीर झालाय का ? कदाचित काहि वर्षां आधी हे सर्व पहायला मिळालं असतं तर... मग वाट्लं अरे आत्ता अनुभवायला मिळ्तय तेच काही कमी आहे का !! खरच कोलेज सोडल्यानंतर अश्या वतारणाशी संपर्क येण्याची आशाच संपली होती. ऑफिसध्ये वयस्कर लोकंबरोबर काम करता करता आपणही अजुन तरुणच आहोत याचा जणु विसरच पडला होता. दोन दिवस त्या उत्साही वातावरणात राहुन आपल्याच तरुणपणाचा नव्याने साक्षात्कार झाल्यासारखं वाटतय.

पण एक विचार जो मनात आधीपासुनच होता, तो आज अधीक पक्का झाला "ईच्छा असेल तर वयाच्या कुठ्लयाही क्षणी आपण हवं ते एन्जॉय करु शकतो". अगदीच काही अपवाद सोडले तर..

प्रफुल चौधरी.

लेखनविषय: दुवे:

Comments

छान!

छान. काही कारणांमुळे असे बरेच काही करायचे, अनुभवायचे राहून जात असते याची रुखरुख वाटते खरी. तरी उशीरा का होईना पण तुम्हाला कॉलेजच्या वातावरणाची मनसोक्त मजा लुटता आली हे छान झाले. सीओईपीच्या घोषणा जबरदस्त आहेत. :-)

पण जरा करंडकातील एकांकिकांबद्दलही लिहा की. :-)

नक्की..

प्रतिसाद वाचुन् खुप् आनंद झाला..
उपक्रम वरील् माझे पहिलेच पोस्ट असल्याने प्रतिसादाची अगदि वाट् बघत बसलो होतो म्हटल तरी चालेल्.. :-)

वेळ मिळाला की प्रयत्न करील एकांकिकांबद्दलही लीहायचा..

प्रफुल..

स्वागत आणि शुभेच्छा

उपक्रमावर स्वागत आहे.

त्या वातावरणात जोष असतो खरे.

नाटकांबाबतही लिहा अशी माझी विनंती जोडतो.

स्वागत आनि शुभेच्छा!

ईच्छा असेल तर वयाच्या कुठ्लयाही क्षणी आपण हवं ते एन्जॉय करु शकतो

खरं आहे! तुम्हाला आनंदात रहाण्यासाठी शुभेच्छा!

उपक्रमावर स्वागत आहे.
हिरमोड करायचा हेतू नाही मात्र उपक्रम हे 'माहितीपर' लेखनाला व चर्चेला वाहिलेले संकेतस्थळ आहे. इथे ललित लेखन चालत नाही. म्हणून प्रतिसाद कमी असतील कदाचित
असो. तुमच्याकडून विविध विषयांवर चर्चा अथवा माहितीपर लेखनाची वाट बघतो आहोतच. शुभेच्छा!

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

 
^ वर