ई-स्निप्स् ला काय आजार आहे?

संगीत ऐकण्यासाठी मी esnips.com ह्या स्थानाचा बराच उपयोग करतो. आपल्याला आवडलेले संगीत playlist मध्ये घालून नंतर केव्हाहि विनासायास ऐकणे हे येथे पूर्वी अतिशय सोपे होते. एखादे गाणे वाजू लागल्यावर एक बटन (कोणते ते आता आठवत नाही) दाबल्यावर ते गाणे quicklist मध्ये जाऊन बसायचे आणि तेथून हव्या त्या नव्या अथवा जुन्या playlist मध्ये ते सहज आणता यायचे.

गेले काही महिने ह्यापैकी काहीहि करता येणे पूर्णपणे थांबलेले आहे. esnips चा interface पूर्णपणे बदलला आहे आणि ह्या नव्या interface मध्ये वरीलपैकी काहीहि करता येत नाही. quicklist हा शब्दच कोठे उरला नाही आणि नवी playlistहि करता येत नाही. तसेच एखादे गाणे ज्या folder मध्ये असेल तेथे जाऊन त्यातील अन्य संगीत बघणे आणि ऐकणे हेहि बंद झाले आहे. सध्या मला मीच पूर्वी निर्माण केलेल्या playlist काय त्या दिसतात आणि त्या वाजवताही येतात पण त्यांमध्ये काही बदल करता येत नाही.

गूगल मध्येहि ह्यावर काहीच सामुग्री सापडली नाही. आपातत: असे वाटते की (दुर्दैवी!) मी सोडून पूर्ण जगात अन्य कोणालाच काहीच अडचण नसावी.

(ह्या काळ्या ढगाची चंदेरी कड म्हणून की काय, musicindiaonline.com मात्र खूपच सुधारले आहे...)

कोणी अनुभवी तज्ञ ह्याचा खुलासा करू शकेल काय अशासाठी हे लिहीत आहे. माझेच काही चुकत आहे काय?

लेखनविषय: दुवे:

Comments

चंदेरी कड...

+१
म्युझिकइंडियाऑनलाईन.कॉम मधील प्लेलिस्ट, फेवरिट, नको असलेले गाणे उडवणे या सुविधा अतिशय उपयुक्त आणि वापरण्यास सोप्या आहेत.

||वाछितो विजयी होईबा||

स्पॉटीफाय

स्पॉटीफाय वापरून पाहिलेत का? (मराठी गाणी किती आहेत पहावे लागेल, पण एकदा का मराठी लोक जमले की पटापट उपलब्ध होतील असे वाटते.)

http://www.spotify.com/us/hello-america/comb/

*अपडेटः भारतात उपलब्ध नाही असे दिसते. :-(

-Nile

 
^ वर