उपक्रम दिवाळी अंक २०११
मागील वर्षांप्रमाणे यंदाही उपक्रमचा दिवाळी अंक काढण्याचा विचार आहे! विविध विषयांवर माहितीपूर्ण लेख आणि चर्चांनी उपक्रम या आपल्या संकेतस्थळाने आपले वेगळेपण जपले आहे. उपक्रमींच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आणि उत्साहपूर्ण सहभागामुळे उपक्रम दिवाळी अंक २००८ , दिवाळी अंक २००९ आणि उपक्रम दिवाळी अंक २०१० वैशिष्ट्यपूर्ण झाले आहेत. यावर्षीचा दिवाळी अंकही असाच वैशिष्ट्यपूर्ण व्हावा यासाठी सर्व उपक्रम सदस्यांना आवाहन आहे की त्यांनी आपले लेखन उपक्रम दिवाळी अंक २०११ साठी पाठवावे.
लेखांचे विषय आणि प्रकार
भाषा, अर्थकारण, वाणिज्य, व्यवस्थापन, गणित, विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, शिक्षण, संस्कृती, कला, क्रीडा, चित्रपट, पर्यावरण, प्रवास, व्यक्तिमत्व, साहित्य व साहित्यिक, राजकारण इ. कोणत्याही विषयावर अनुभव, अनुवाद, आस्वाद, प्रवासवर्णन, बातमी, माहिती, विचार, व्यक्तिचित्र, संदर्भ, स्फुट, कोडी/तर्कक्रीडा, छायाचित्रे, चलचित्रे, व्यंगचित्रे आणि पानपूरके (वरील विषयांवरील थोडक्यात पण रंजक माहिती, घटना, 'तुम्हाला हे माहीत आहे का?' वगैरे) अश्या प्रकारचे लेखन पाठवावे.
लेखन पाठवताना
- कृपया या अंकासाठी उपक्रमच्या लेखनविषयक धोरणात बसणारे लेखनच पाठवावे.
- सदस्यांनी एकाहून अधिक लेख पाठवण्यास हरकत नाही.
- उपक्रमचे सदस्य नसलेल्यांचे उपक्रमच्या धोरणात बसणारे लेखन त्यांच्या अनुमतीने पाठवण्यासही हरकत नाही.
- लेखन प्रताधिकार कायद्याचा भंग करणारे किंवा उपक्रमवर किंवा इतरत्र पूर्वप्रकाशित झालेले नसावे.
- लेखन शक्यतो १५ ऑक्टोबरच्या आधी पाठवावे. आणखी थोडा वेळ हवा असल्यास १५ ऑक्टोबर पूर्वी लेख पाठवण्याचा मनोदय कळवावा.
लेखनाविषयी मार्गदर्शन
- लेख साधारणपणे किमान ५०० शब्दांचा असावा. (यथोचित अपवाद वगळता)
- लेख मोठा असेल तर दोन किंवा जास्तीत जास्त तीन भागात प्रकाशित करणे शक्य आहे.
- पारिभाषिक शब्दांच्या बरोबर मूळ शब्द देवनागरी आणि रोमन लिपीत कंसात द्यावा.
- आवश्यक तेथे संदर्भ, दुवे वगैरे द्यावेत.
- आवश्यक तेथे चित्रे, आकृत्या, छायाचित्रे, तक्ते द्यावेत. याविषयी कोणतीही संपादकीय मदत लागल्यास कळवावे.
- स्वतःविषयी थोडक्यात माहिती द्यावी, शक्य असल्यास छायाचित्रही. (वैकल्पिक)
लेखन upakramdiwali@ gmail.com या पत्त्यावर पाठवावे. लेखन टेक्स्ट स्वरूपात किंवा थेट विरोपात चिकटवून पाठवावे. लेखनाची एक प्रत स्वतःजवळही ठेवावी. उपक्रम दिवाळी अंकाविषयी सर्व पत्रव्यवहार दिवाळी अंक या सदस्यनामाशी करावा.
अंकनिर्मिती (मुद्रितशोधन, संपादन इ.), अंकाची सजावट, मुखपृष्ठ, चित्रे याबाबतीत सहभागी होण्याची इच्छा असेल तर आपले स्वागत आहे, लागलीच कळवावे.
तेव्हा झटपट लिहायला लागा आणि वरील सूचनांप्रमाणे शक्य तितके लेखन पाठवा! आपल्या उत्स्फूर्त आणि भरघोस प्रतिसादाची अपेक्षा आहे!
कळावे, लोभ असावा,
उपक्रम दिवाळी अंक २०११
.
Comments
शुभेच्छा!
२०११ चा दिवाळी अंकही दरवर्षीप्रमाणेच दर्जेदार होईल अशी आशा करते. :-)
शुभेच्छा!
अरे वा! २०११ चा दिवाळी अंकही वाचनीय असेल ही खात्री आहेच. दर्जेदार अंकासाठी शुभेच्छा!
एक शंका: किमान मर्यादा ~५०० शब्द आहे. कमाल मर्यादा आहे का? असल्यास किती?
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
कमाल शब्दमर्यादा नाही
कुठलीही कमाल शब्दमर्यादा नाही.
कलोअ,
उपक्रम दिवाळी अंक
शुभेच्छा
दिवाळी अंकास शुभेच्छा.
जमले तर काही साहित्य पाठव्ण्याचा प्रयत्न करु.
हा अंक 'पीडीएफ' स्वरुपात् उपलब्ध होतो का ?
जुने अंक आत्ताच पाहिले, त्यात ही सोय नव्हती.
ऑफलाईन वाचनासाठी हे अंक संगणकावर पीडीएफ स्वरुपात साठवता आले तर उत्तम सोय होईल असे वाटते.
धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद.
अंक पीडीफ स्वरूपात उपलब्ध होत नाही.
उपलब्ध वेळेत सध्यातरी शक्य होईलसे वाटत नाही आहे. पीडीएफ स्वरूपात अंकनिर्मितीसाठी सदस्यांनी हातभार लावल्यास अशी सोय देण्याबद्दल पुनर्विचार करता येईल.
कलोअ,
उपक्रम दिवाळी अंक
शुभेच्छा !!
---------------------
-धनंजय कुलकर्णी
शुभेच्छा
शुभेछा !!!!
नितिन थत्ते
एक प्रश्न
मला सध्याच्या लिंक मधे दिवाळी २०१० चा अंकच दिसतो आहे. त्या आधीचे अंक मिळण्यासाठी दुवे अस्तित्त्वात आहेत का ?
वरच्या लेखनात
वरच्या लेखनात/मजकुरात जुन्या अंकांचे दुवे दिलेले आहेत.
शुभेच्छा!
२०११ च्या उपक्रम दिवाळी अंकास शुभेच्छा! अंक नेहमीप्रमाणेच दर्जेदार होईल ही खात्री आहे.
शुभेच्छा
दिवाळी अंकास शुभेच्छा.
साहित्य पाठवले आहे. कळावे.
शुभेच्छा!
शुभेच्छा!
उपक्रम दिवाळी २०११ अंकास शुभेच्छा! हा धागा उशीराने पाहिला गेला. लेख पाठविण्यासाठीची अंतिम मुदत कळवावी.
धन्यवाद.
--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले
हैयो हैयैयो!
धन्यवाद! | मुदतवाढ
उपक्रम दिवाळी अंकासाठी लेखन आणि पानपूरके पाठवलेल्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!
ज्या उपक्रमींनी लेखन पाठवण्याचा मनोदय कळवला आहे त्यांच्या लेखांची आम्ही वाट पाहात आहोत.
इतरांनीही कृपया वेळात वेळ काढून एखादा लेख किंवा शक्य न झाल्यास काही थोडक्यात पण मनोरंजक माहिती पानपूरके म्हणून पाठवावी. पानपूरके दिवाळी अंकात वेगवेगळ्या पानांवर दाखवली जातील. याशिवाय कोडी, किस्से, प्रसंग, चित्रे, छायाचित्रे, आपणांस हे ठाऊक आहे का? इ. इ. स्वरूपाच्या साहित्यामुळे दिवाळी अंक रंगतदार होईल! तेव्हा लगेचच लिहायला लागा आणि कळवा!!
लेख पाठवण्याची इच्छा असूनही वेळेअभावी शक्य झाले नसले तरी लेखनाचा प्रयत्न अवश्य करावा अशी आग्रहाची विनंती! लेखाचा विषय आणि अंदाजे शब्दसंख्या कळवून वाढीव मुदत (येत्या सप्ताहांतापर्यंत) घेता येईल!
प्रश्न/शंका/सूचना/मदत/माहिती इ. साठी दिवाळी अंक या सदस्यनामाशी संपर्क साधावा.
कलोअ,
उपक्रम दिवाळी अंक २०१०
शेवटचे दोन दिवस!
उपक्रम दिवाळी अंकासाठी लेखन, कूटप्रश्न, पानपूरके इ. पाठवलेल्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!
ज्या उपक्रमींनी लेखन पाठवण्याचा मनोदय कळवला आहे त्यांच्या लेखांची आम्ही वाट पाहात आहोत.
लेखन, चित्रे, छायाचित्रे, कूटप्रश्न, पानपूरके इ. पाठवण्यासाठी आता आणखी फक्त दोन दिवस शिल्लक राहिलेत!
प्रश्न/शंका/सूचना/मदत/माहिती इ. साठी दिवाळी अंक या सदस्यनामाशी संपर्क साधावा.
कलोअ,
उपक्रम दिवाळी अंक