उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
पयसा कमलेन विभाति सर:।
अभिजा
July 20, 2011 - 5:45 am
मुंबईतील राणीच्या बागेत एक छान पुष्करणी आहे. त्या पुष्करणीमध्ये आणि सभोवती खूप सुंदर फुलं आहेत.
त्या पुष्करणीमधील काही कमळ फुलं!
एक गुलाबी कमळ इथे पहा!
धन्यवाद! :-)
दुवे:
Comments
तांत्रिक माहिती
क्यामेरा कोणता? ऍपर्चर, आय एस ओ वगैरे माहिती द्यावी.
नितिन थत्ते
एक्झिफ्
धन्यवाद! कॅमेरा निकॉन, लेन्स १८-२००, ऍपरचर ५.६
पयसा कमलेन विभाति सरः
पयसा कमलं कमलेन पय: पयसा कमलेन विभाति सरः|
मणिना वलयं वलयेन मणि: मणिना वलयेन विभाति करः||
अरविंद कोल्हटकर, २० जुलै २०११.
संपूर्ण श्लोक
मणिना वलयं वलयेन मणिर्मणिना वलयेन विभाति कर: ।
कविना च विभुर्विभुना च कवि: कविना विभुना च विभाति सभा ॥
शशिना च निशा निशया च शशी शशिना निशया च विभाति नभः ॥।
पयसा कमलं कमलेन पयः पयसा कमलेन विभाति सरः ॥॥
--वाचक्नवी
अहो
कोल्हटकर, वाचक्नवी अर्थ पण उलगडा की.
पयसा कमलेन विभाति सर:। हे राणीच्या बागेत म्हणजे कोणीतरी नव्या इश्टाईल मधे "सर, हे कमळ घेतलेत तर लै पैसा लाभेल व भिती (भय) पण सरेल (जाईल)" असे संस्कृतात सांगत लकी चार्म म्हणून कमळ विकतोय असे वाटते.
अर्थ
शशिना च निशा निशया च शशी शशिना निशया च विभाति नभः ॥। --- शशी (चंद्र) मुळे रात्र(निशा), रात्रीमुळे चंद्र, तर चंद्र व रात्री मुळे हे आकाश(नभ) शोभून दिसते.
पयसा कमलं कमलेन पयः पयसा कमलेन विभाति सरः ॥॥--- पाण्यामुळे (पय) कमळ, कमळामुळे पाणी, तर पाणी व कमळामुळे हे सरोवर (सर) शोभून दिसते.
वरच्या दोन ओळींचा तेवढा नक्की अर्थ महिती नाही.
पयसा कमलेन विभाति सरः
मणिना वलयं वलयेन मणिर्मणिना वलयेन विभाति कर: ।
कविना च विभुर्विभुना च कवि: कविना विभुना च विभाति सभा ॥
रत्नामुळे कडे, कड्यामुळे रत्न, रत्न आणि कडे ह्या दोहींमुळे हात शोभून दिसतो.
कवीमुळे राजा, राजामुळे कवि, कवि आणि राजा ह्या दोहींमुळे राजसभा शोभून दिसते.
अरविंद कोल्हटकर, जुलै २२, २०११.
धन्यवाद
सुहासिनीतै व श्री. कोल्हटकर दोघांना धन्यवाद.
फोटो.
फारच आवडला.
-Nile
धन्यवाद!
धन्यवाद! :-)
टवटवीत
प्रसन्न आणि टवटवीत फूल!
(शीर्षकातले "पयसा" चित्रात फारसे दिसत नाही. पिवळ्या रजोकणांनी नटलेले पराग बघून हे सुचवतो : "रजसा कमलं कमलेन रजः रजसा कमलेन विभाति पटः"!)
धन्यवाद!
धन्यवाद धनंजय! रजसा शब्द अधिक चपखल!
कमळ
छायाचित्रातले फूल हे कमळाचा कोणता प्रकार असेल? कारण कमळाच्या जाती बर्याच आहेत आणि संस्कृत मध्ये या कमल वा तत्सदृश फुलाची नावेही अनेक आहेत.
माहित नाही...
माफ करा राही, मला प्रस्तुत कमळ फुलाच्या जातीविषयी माहिती नाही!
धन्यवाद!
सर्वांचे आभार!