तर्कशास्त्र म्हणजे काय रे भाऊ?

मदत हवी आहे!

तर्कशास्त्र म्हणजे काय रे भाऊ?

  • तर्कशास्त्र म्हणजे नक्की काय?
  • या शास्त्रात काय अंतर्भूत होते?
  • तर्कशास्त्र म्हणजे निव्वळ प्रमाण अनुमानांचे शास्त्र आहे का?
  • याच्या प्रमुख शाखा कोणत्या व का?
  • यातील तत्वज्ञान मांडणारे प्रमुख अधिकारी व्यक्ती कोण?

या विषयी कुणी अजून माहिती देऊ शकेल का?

लेखनविषय: दुवे:

Comments

तर्क म्हणजे

तर्क म्हणजे गेस किंवा लॉजिक ना? मग विकीवरचा हा लेख उपयोगी आहे का बघा बरे!

फक्त तिसरा प्रश्न

मी फक्त तिसय्रा प्रश्नाचे उत्तर देउ ईच्छितो,कारण या एका मुद्यावरुनच बरेचसे वाद होत असतात...तर्कशास्त्रवादी फक्त प्रत्यक्षप्रमाणच मानतात,(म्हणजे जे दिसेल तेच खंरं)असा त्यांच्यावर १आरोप नेहमी होत असतो.खर म्हणजे जिथे 'व्याप्ती' मिळण्याची शक्यता नाही,तिथे अनुमान म्हणजेच पुढच्या टप्यातलं प्रत्यक्ष प्रमाण मानता येत नाही,असा तर्कवाद्यांचा मुद्दा असतो.

प्रतिसाद

उत्तरबद्दल धन्यवाद प्रियाली आणि पराग.

आशा आहे की येथे समग्र चर्चा होईल.
कारण उपक्रमावर तर्कवादी मंडळी बरीच आहेत. आश्चर्य आहे की त्यांनी या चर्चेत काही भाग घेतला नाही.

तर्कशास्त्राची किमान व्याख्या तरी येथे सहतेने येईल असे वाटले होते.
शिवाय भारतीय तर्कशास्त्रानुसार सांख्य आणि न्यायशास्त्राचाही विचार यावा ही अपेक्षा आहे.
पाश्चात्य मत काय आहे आणि ते भारतीय मतापासून कसे व कुठे निराळे आहे हे समजेल अशी आशा आहे.

प्रमुख भारतीय विचारवंत तर्कशास्त्री कोणते?
तसेच जागतिक स्तरावरचे विचारवंत कोणते?

-निनाद

थोडे थांबा

आशा आहे की येथे समग्र चर्चा होईल.
कारण उपक्रमावर तर्कवादी मंडळी बरीच आहेत. आश्चर्य आहे की त्यांनी या चर्चेत काही भाग घेतला नाही.

भारतीय आणि पाश्चात्य तर्कशास्त्राबद्दलच्या प्रश्नांना संदर्भासह उत्तरे मिळतील याची खात्री आहे. थोडे थांबा.

इंग्रजी विकिपेडियावरील दुवा कसा वाटला?

इंग्रजी विकिपेडियावरील दुवा कसा वाटला?

"तर्कशास्त्र" हा शब्द आधुनिक मराठी भाषेत इंग्रजी "लॉजिक"साठी प्रतिशब्द म्हणून वापरला जातो. या शास्त्राच्या विषयविस्ताराशी जवळात जवळ जाणारे प्राचीन भारतीय शास्त्र म्हणजे "न्याय" होय. अन्नंभट्ट या नैयायिकाने ई.स. १६व्या शतकात न्यायशास्त्रावरती "तर्कसंग्रह" म्हणून ग्रंथ लिहिला होता. म्हणजे काही शतकांपूर्वीसुद्धा "न्याय"शास्त्र आणि "तर्क" या शब्दाचा घनिष्ठ संबंध मानला जाई. (अन्नंभट्टाच्या तर्कसंग्रहाच्या इंग्रजी भाषांतराचा पीडीएफ दुवा येथे.)

न्यायशास्त्रातील सर्वात प्राचीन उपलब्ध ग्रंथ म्हणजे गौतमाचे "न्यायसूत्र". गौतमाच्या न्यायसूत्रात प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द ही चार वैध प्रमाणे म्हणून सांगितलेली आहेत. वगैरे.

नव्यन्यायात (म्हणजे ५००-६०० वर्षांपूर्वीची) प्रगती करणारे गंगेश उपाध्याय, रघुनाथ शिरोमणि, अन्नंभट्ट वगैरे.

धन्यवाद

इंग्रजी विकिपेडियावरील दुवा कसा वाटला?

दुवा उत्तम आहे पण त्यात मला भारतीय तत्वज्ञांचे कार्य दिसेना. ते तुम्ही (त्रोटकपणे?) उल्लेखले आहे.
अन्नंभट्टांचा बहुलीकरांचा दुवा उत्तम आहे.

अजून काही माहिती असल्यास जरूर द्यावी.
धन्यवाद

-निनाद

भारतीय तत्वज्ञांचे कार्य

दुवा उत्तम आहे पण त्यात मला भारतीय तत्वज्ञांचे कार्य दिसेना. ते तुम्ही (त्रोटकपणे?) उल्लेखले आहे.

तुमच्या मूळ प्रस्तावातही त्याविषयी काही उल्लेख नाही. मूळ प्रस्तावात ज्या माहितीची मागणी केली आहे त्याविषयी पूर्ण माहिती विकी पानावर दिसली. 'भारतीय तत्वज्ञांचे कार्य' हा नवा उपमुद्दा तुम्ही काढला आहेत. तुम्हाला काय अपेक्षीत आहे ते नीट मांडणारा नवा धागा काढा.

तो मी नव्हेच

वरील प्रतिसाद देणारा आयडी विनायक म्हणजे पूर्वीचा आयडी बेसनलाडू . मी, विनायक गोरे, पूर्वी विनायक आयडीने वावरत असल्याने अनेकांचा गोंधळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे स्पष्टीकरण देत आहे.

आमची उत्तरे!

मदत हवी आहे!

हो! मी करतो नां!

तर्कशास्त्र म्हणजे काय रे भाऊ?

ते एक डोकेफोडीचे शास्त्र असते माझ्या भावा! तू कशाला त्या नादी लागतोस?

तर्कशास्त्र म्हणजे नक्की काय?

आता देव म्हणजे काय? तो कसा असतो? असतो की नसतो? ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाले की 'तर्कशास्त्र म्हणजे काय?' ह्या प्रश्नाचे उत्तर लगेच मिळेल, म्हणतो.

या शास्त्रात काय अंतर्भूत होते?

या शास्त्रात माझ्या माहितीप्रमाणे 'तर्क' नावाचे असे काहितरी अंतर्भूत असते.

तर्कशास्त्र म्हणजे निव्वळ प्रमाण अनुमानांचे शास्त्र आहे का?

आत्ता इथे 'प्रामाण हेच अनुमान' कि 'अनुमान हेच प्रमाण' असे मानायचे? हे तुम्ही स्पश्ट केले नाही भाऊ.

याच्या प्रमुख शाखा कोणत्या व का?

कमाल आहे दादा! अगोदर विचारता प्रमुख शाखा कोणत्या? मग लगेचच विचारता, त्या कां आहेत? त्यांचे अस्तित्व कशासाठी आहे? आता ह्यात कोणते बरे तर्कसूत्र (आपलं लॉजिक हो!) आहे?

यातील तत्वज्ञान मांडणारे प्रमुख अधिकारी व्यक्ती कोण?

आता मी म्हणालो, ती प्रमुख अधिकारी व्यक्ती मीच आहे, तर तुम्ही लगेच म्हणाल, तुम्हीच कां? मग माझा तिथं झालाच कि अपमान.
च्यायला म्हणून म्या म्हणतो, कुणी बी नाही!

या विषयी कुणी अजून माहिती देऊ शकेल का?

अरे वा! हा तर्क खूप छान आहे. तुमी बी लई झ्याक तर्क करता कि राव!

म्हणजे काय रे भाऊ?

हा प्रश्न पुलंनी वेगळ्या स्टाइलने अजरामर केला आहे. याला सरळ उत्तरे मिळतील का?

रफ व्याख्या

"(१) उपस्थित परिस्थितीचा साकल्याने विचार करून
अथवा
(२) काही गृहीतकांच्या आधारे
अनुमान काढणाच्या " प्राण्यांच्या मेंदूच्या फॅकल्टीवर आधारीत शास्त्र म्हणजे तर्कशास्त्र म्हणता येईल का?

कारण तर्कशास्त्र पशुपक्षी सर्वांमध्ये आढळून येते.

बाद!!!! :प

वेल् ...... (१) व्याख्या कधीही रफ नसते तर "प्रिसाइज्" असते
(२) गणित हा विषय वरच्या व्याख्येत येतो आहे.

तेव्हा माझी व्याख्या बाद्!!!!

 
^ वर