दुढ्ढाचार्य

दुढ्ढाचार्य म्हण्जे काय? ( दोग्धृ : भाडोत्री कवी) तर भिकार कवींमध्ये ( खरे तर एकदा कवी म्हटल्यावर पुन्हा भिकार कशाला म्हटले पाहिजे?) :-). जो श्रेष्ठ ( हे हे हे) तो दोग्धाचार्य. ( =दोढ्ढाचार्य = दृढाचार्य ) - असे मी आज राजवाडे लेखसंग्रहात वाचले. जाम मनोरंजन झाले.

लेखनविषय: दुवे:

Comments

दुढ्ढाचार्य

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
**********************************
"मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी"(लेखक वा.गो.आपटे) या कोशात ढुढ्ढाचार्य असा शब्द आहे.त्याविषयी पुढीलप्रमाणे लिहिले आहे:
.
"ढुढ्ढाचार्यः-- (कानडी भाषेत दुड्डु=दोन +आचार्य;)ज्यांना दुप्पट दक्षिणा द्यावयाला पाहिजे असे प्रतिष्ठित विद्वान.यावरून स्वतःची प्रौढी मिरवणारा असा अर्थ. A swaggerer.
तुमचें लोकांनी ऐकावे असे काय तुम्ही मोठे ढुढ्ढाचार्य आहां?"

दोन की मोठा?

डोड्डा म्हणजे कानडीत मोठा असे वाटते. (मला कानडीतले नेमके माहित नाही पण तुळूत नक्की.)

डोड्डाम्मा आणि डोड्डाप्पा असे मोठ्या काका-काकूला म्हटले जाते. यावरून, डोड्डाचार्य = दुढ्ढाचार्य = मोठा (मानाने) आचार्य (पक्षी: दुप्पट दक्षिणा घेणारा) असा अर्थ असावा.

दोड्ड, दुड्डु

दोड्ड म्हणजे मोठा, दुड्डु म्हणजे पैसे. (कोंकणीमध्ये "दुडू" म्हणजे पैसे. मराठीमध्येसुद्धा, पण अप्रचलित शब्द.)

मोल्सवर्थच्या शब्दकोशात "दुढ्ढाचार्य = दुढ्ढी+आचार्य" अशीच फोड केलेली आहे. आणि "दुढ्ढी"चे अर्थ फाशावरचे "२"चे दान, अथवा दोन रुपयांची दक्षिणा वा भीक, असे दिलेले आहेत. मात्र त्याची व्युत्पत्ती कन्नड दुड्डु=दोन अशी दिलेली आहे.
कन्नड शब्दकोशात मात्र "दुड्डु"चा अर्थ १/३ आणे किमतीचे तांब्याचे नाणे, असा दिलेला आहे. जुना ६४ पैशांचा रुपया, ४ पैशांचा आणा घेतला तर दुड्डु नाण्याची किंमत ४/३ पैसे इतकी येते. (फाशावरचे २चे दान - याची व्युत्पत्ती मात्र मला संस्कृतोद्भव वाटते.)

अधिक शोध घेता हा प्रकार भलताच गुंतागुंतीचा दिसतो. विजयनगर साम्राज्याच्या "वराह" नाण्यांच्या समांतर ईस्ट इंडिया कंपनीने ३ पैंचे दुड्डु, ४ पैंचे घट्टि-दुड्डु आणि ६ पैंचे दोड्ड-दुड्डु अशी तांब्याची नाणी टांकली.

अशा रीतीने दोड्ड आणि दुड्डु दोन्ही शब्द असलेला "दोड्ड-दुड्डु" शब्द माझ्या दृष्टिपटलावर दुडदुड दौडला.

क्या बात है

दोड्ड आणि दुड्डु दोन्ही शब्द असलेला "दोड्ड-दुड्डु" शब्द माझ्या दृष्टिपटलावर दुडदुड दौडला.

- आनंददायक अभिनंदनीय अनुप्रास.
असो.
दुड्ढाचार्य = दोड्डाचार्य म्हणजे सर्वात मोठे आचार्य असा अर्थ जास्त भावतो. "पेद्दा जीयार" आणि " दोड्डाचार्य" हे शब्द दक्षिणेत मठाधिपतींसाठी सर्रास (अजूनही) वापरात आहेत.
पेद्दा जीयार जवळजवळ रिटायर व्हायला आले की त्यांची जागा चिन्ना जीयार घेतात.

दुड्डु म्हणजे पैसे.

>>दुड्डु म्हणजे पैसे.

नवीनच आलेल्या आणि मस्त हिट् झालेल्या "सिंघम्" या बॉलीवूडपटात हा संदर्भ येतो आणि हा अर्थ तुळू भाषेत होतो असे तिथे सांगितले आहे.

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

दोड्डा गणेश

आम्हाला आपला दोड्डा गणेश आठवला.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

दुरुस्ती

कन्नडमध्ये मोठा यास 'डोड्डा' हा शब्द नसून 'दोड्ड' आहे. त्यावरून वडिलाच्या मोठ्या भावाला (काकाला) दोड्डप्पा व काकीला दोड्डम्मा असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे वडिलाच्या लहान भावाला चिक्कप्पा व काकीला चिक्कम्मा असे म्हटले जाते. 'ढ' मुलाला दड्ड असे संबोधले जाते.

 
^ वर