उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
कलावंतांची प्रेमप्रकरणे
चिमा
June 15, 2011 - 4:32 pm
अनेक कलावंत / साहित्यिक ( स्त्री वा पुरुष ) यांचे एकाहून अधिक व्यक्तींशी प्रेम प्रकरणे झालेली / होताना दिसतात. ( सामान्य माणसाचे एखादे होते आणि त्यातच तो त्रासतो, गिल्ट वाटते इ.) यावर पुस्तकेही लिहिली जातात्. अनेक समीक्षक चरित्राचा संबंध कलेशी / कलाकृतीशी / साहित्याशी जोडून समीक्षा करतात. ( उदा. म.वा.धोंड यांची मर्ढेकरांवरील समीक्षा ) यातील नैतिक-अनैतिकता चर्चिली जाते. मुळात हे लोक तीव्र संवेदनशीलता / तीव्र भावना असलेले ( त्यामुळे काम इत्यादी सर्वच गोष्टींबाबत अधिक व वेगळी तीव्रता असलेले ) आहेत असे समर्थन केले जाते. त्याकडे वेगळ्या सहानुभूतीने पाहिले जाते. ( एकतर आदर्श मानले जाते किंवा त्यांच्या सर्व चुका / गुन्हे माफ असेतरी ) आजच्या काळात कलावंत / साहित्यिकांकडे आपण कसे पाहावे?
दुवे:
Comments
मर्ढेकर-म.वा.धोंड समीक्षेबद्दल थोडे अधिक सांगावे
मर्ढेकरांविषयी म.वा.धोंड यांच्या समीक्षेबद्दल थोडे अधिक सांगावे, ही विनंती.
(हे दोघेही समीक्षक होते ना, कलाकार म्हणून तितकेसे प्रसिद्ध नाहीत. श्री. विनायक गोरे यांनी माझ्या नेणतेपणाबाबतीत रास्त नवल व्यक्त केले आहे. हा त्यांचा मोठेपणा आहे. मर्ढेकरांच्या प्रेमप्रकरणांमुळे त्यांच्या कवितेवर झालेल्या परिणामांबद्दल मला माहीती नाही, असा येथे अनुरोध आहे. परंतु अधोरेखित वाक्य चुकलेले आहे, हे स्पष्टच आहे. परंतु त्यांचे आश्चर्य वाचकांना कळावे म्हणून मुळातले चुकीचे वाक्य अधोरेखित करून तसेच ठेवलेले आहे.)
सामान्य व्यक्तींची किती प्रेमप्रकरणे होतात? आर्थिक आणि सामाजिक मध्यमवर्गीय लोकांची कमी प्रकरणे होत असावीत असे कोणी सांगितले, तर (कुटुंबातील मर्यादित सर्वेक्षणामुळे) मला पटेल. मात्र कनिष्ठ आणि उच्च आर्थिक वर्गामध्ये अधिक होत असावीत, असेसुद्धा वाटते.
चर्चाविषय असा काहीसा आहे काय : कलाकार पुष्कळदा आर्थिक मध्यमवर्गात असतात, पण त्यांच्या प्रेमप्रकरणांची संख्या अन्य आर्थिक वर्गांइतकी असतात, आणि हे योग्य आहे की अयोग्य?
वाचावे ते नवलच!
मर्ढेकरांविषयी म.वा.धोंड यांच्या समीक्षेबद्दल थोडे अधिक सांगावे, ही विनंती.
(हे दोघेही समीक्षक होते ना, कलाकर म्हणून तितकेसे प्रसिद्ध नाहीत.)
मर्ढेकर कवी म्हणून फारसे प्रसिद्ध नाहीत? मला वाटते की ते मराठीतील सर्वश्रेष्ठ कवींपैकी एक समजले जातात.
खरेच की
खरेच की. मर्ढेकरांच्या समीक्षासिद्धांताचा समीक्षकांमध्ये जितका दरारा आहे, त्यापेक्षा रसिकांमध्ये त्यांची ओळख श्रेष्ठ कवी म्हणून आहे.
परंतु त्यांच्या प्रेमप्रकरणांची ओळख मला नाही, हे नवल असले, तरी खरे आहे. चर्चाप्रस्तावकाने तरी सुद्धा म. वा. धोंडांच्या या बाबतीतल्या समीक्षेबाबत सांगावे, ही विनंती. मर्ढेकरांच्या चारित्र्यामुळे (किंवा चारित्र्याच्या अभावामुळे) त्यांच्या कवितेच्या आस्वादात/समीक्षेत काय फरक पडतो, ते समजून घेण्यास आवडेल.
मर्ढेकर
रोचक चर्चाविषय.
म वा धोंडांनी मर्ढेकरांच्या कवितांचे समीक्षण/विश्लेषण/अन्वेषण/पोस्ट् मॉर्टम् चिरफाड करताना त्यांच्या चरित्रातील घटनांचा संदर्भ लावण्याचा यत्न केला आहे. त्यांची रेडीयोतील नोकरी, त्यांच्यावरील खटला, त्यांचे प्रकृतीअस्वास्थ्य, त्यांचे वैवाहिक जीवन या सार्यांबद्दलच्या ज्या सर्वसामान्यपणे माहिती असलेल्या नोंदी आहेत त्यांच्या अनुषंगाने त्यांच्या दुर्बोध वाटलेल्या कवितांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. चिमा यांचा निर्देश मर्ढेकरांच्या प्रेमसंबंधांकडे नसून , या तथाकथित चरित्रात्मक समीक्षेकडे आहे असे मला वाटते. चूभूदेघे.
जाळ्यातील चंद्र
मला वाटते म.वा. धोंडांनी 'जाळ्यातील चंद्र' लेखसंग्रहात बालकवींबाबतही अशीच (धोंदांनी केलेल्या मर्ढेकरांच्या समीक्षेसारखीच) समीक्षा(?) केलेली आहे.
किंबहुना त्या लेखसंग्रहाचे नावही द्व्यर्थी आहे असे वाटते. - १. चंद्र म्हणजे कला/साहित्य आणि जाळे म्हणजे समीक्षा / २.चंद्र म्हणजे कलाकार/साहित्यकार आणि जाळे म्हणजे त्यांची प्रकरणे. (या लेखसंग्रहात धोंडांनी कवि + त्याची प्रकरणे यांची सांगड त्याचे सृजन आणि काव्यविषय यांच्याशी घालण्याचा प्रयत्न केला आहे असे आठवते.)
इतर : अत्रे- वनमाला , रणजीत- माधवी देसाई इ.इ. मराठीत. हिंदी चित्रपट सृष्टी ही उच्चवर्गीय गणली तर ती उदाहरणे येथे नकोत.
पण धनंजय यांचे - 'सामान्य व्यक्तींची किती प्रेमप्रकरणे होतात? आर्थिक आणि सामाजिक मध्यमवर्गीय लोकांची कमी प्रकरणे होत असावीत असे कोणी सांगितले, तर (कुटुंबातील मर्यादित सर्वेक्षणामुळे) मला पटेल. मात्र कनिष्ठ आणि उच्च आर्थिक वर्गामध्ये अधिक होत असावीत, असेसुद्धा वाटते.' हे म्हणणे पटते.
धोंड आणि त्यांची समीक्षा
धोडांची 'जाळ्यातील चंद्र' आणि 'अजून येतो वास फुलांना' हे मर्ढेकरांच्या समीक्षेवरील पुस्तक अशी दोन्ही पुस्तके माझ्या संग्रही आहेत.
प्रथम चिमा यांनी लिहिल्याबद्दल. धोंडांनी मर्ढेकरांच्या काही कवितांचा संदर्भ लावताना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा मागोवा घेतला आहे. त्यात मसु म्हणतात त्याप्रमाणे मर्ढेकरांच्या प्रेम प्रकरणे आणि लग्नांबरोबर इतरही घटना आहेत. केवळ प्रेम प्रकरणे नाहीत. धोंडांनी तीन स्त्रियांचा उल्लेख आपल्या पुस्तकात केला आहे. त्यापैकी दोघींबरोबर मर्ढेकरांनी लग्ने केली. धोंड नैतिकता अनैतिकताही तपासत नाहीत.
त्यामुळे मसुंचा "चिमा यांचा निर्देश मर्ढेकरांच्या प्रेमसंबंधांकडे नसून , या तथाकथित चरित्रात्मक समीक्षेकडे आहे असे मला वाटते." हा निष्कर्ष बरोबर वाटतो.
दुसरे विसुनाना यांच्या प्रतिसादाबद्दल. धोंडांचे 'जाळ्यातील चंद्र' हा समीक्षासंग्रह "कवि + त्याची प्रकरणे यांची सांगड त्याचे सृजन आणि काव्यविषय" असा अजिबात नाही. त्यात बरेच विषय आहेत. र. धों. कर्व्यांवर त्यात ४ लेख आहेत. शिव - समर्थ संबंधांवर दोन लेख आहेत. बालकवी आणि त्यांची कथित प्रेरणा असणारी स्त्री असा एक लेख आहे. पण त्यात ते बालकवी त्या स्त्रीला आई मानत होते आणि बालकवींच्या मित्राला या सगळ्या प्रकरणात आणि स्त्रीमध्ये मुख्य रस होता असा निष्कर्ष काढतात.
संग्रहाच्या नावाबद्दल बहुतेक त्यांनी ज्ञानेश्वरीचा दाखला दिला आहे. (चूभूदेघे). ज्याप्रमाणे पाण्यात पडलेल्या चंद्रप्रतिमेला जाळ्यात पकडले तरी तो फसवा प्रयत्न असतो तसेच समीक्षा ही सुद्धा कलाकृतीच्या प्रतिमेला पकडण्यासारखेच आहे . या पुस्तकात आधी मर्ढेकरांच्या 'पिपात मेले' वर दोन लेख होते (आता ते वर लिहिलेल्या स्वतंत्र पुस्तकात आहेत.) त्यातील दुसर्या लेखात धोंडांनी पहिला लेख चुकला असल्याचे कबूल करून तो लेख म्हणजे जाळ्यातील चंद्र असल्याचे म्हटले आहे.
यात कोठेही विसूनाना म्हणतात त्या प्रमाणे नावाचा व कलाकार आणि त्यांची प्रकरणे असा अन्वय नाही.
आता मूळ विषयाबद्दल.
कलाकारांचे स्वभाव मनस्वी असतात. त्यांची प्रकरणेही सहसा त्या क्षेत्रातील किंवा संबधित क्षेत्रातील व्यक्तींशी होतात ज्या स्वतः कलाकार / व्यावसायिक क्षेत्रात महत्वाकांक्षा असणार्या असू शकतात. त्यामुळे त्यांची प्रकरणे असफल होणे ज्यास्त दिसून येते. (सुनीताबाईंनीही 'आहे मनोहर तरी' मध्ये वेगळे व्हावे का? असा विचार मनात आल्याचे लिहिले आहे. तर इतरांची गोष्टच सोडा.) आणि त्यामुळे मग आणखी प्रकरणे होत असावीत. पण महत्वाचे हे की कलाकार नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असतात. त्यामुळे त्यांचे खाजगी जीवन सगळ्या जगाला माहीत असते. प्रकरणे ही सामान्य लोकांच्या आयुष्यातही घडतात पण ती मर्यादीत लोकांनाच माहित असल्यामुळे माहित असलेल्या शे-दोनशे मध्ये एक-दोन असे प्रमाण असते. पण २५ कलाकारांमध्ये हे प्रमाण २० वगैरे निघू शकते. आकडे हे केवळ कल्पनारंजन. त्यांना पुरावा नाही. त्यामुळे कलाकारांची खाजगी गोष्ट असेच याकडे पहावे असे वाटते.
- ओंकार.
विवाहबाह्य प्रेमप्रकरणे
विवाहबाह्य प्रेमप्रकरणे करायची तर खालील गोष्टी गरजेच्या असतात ( पुरुष कोणत्याही आर्थिक स्तरातला असला तरी ) :
१. आर्थिक क्षमता उत्तम. ( कारण खर्च दुप्पट होतात.)
२. निरोगी मानसिकता ( विवाह आणि विवाहबाह्य दोन्ही ठिकाणी स्थिरमनाने प्रश्न सोडवता येणे.)
३. सामाजिक रोषाला ( प्रकरण उघडकीस आल्यास) सामोरे जावे लागण्याची तयारी.
४. जोडीदारावर अन्याय न करता विवाह्यबाह्य संबंध ठेवता येण्याची क्षमता.
५. प्रकरण उघडकीस आले तर जोडीदाराच्या संतापाला / घटस्फोटाला / पोलीसकेसला / आत्महत्येला / घरातच राहून केल्या जाणार्या धमकीच्या राजकारणाला / जोडीदाराने दुसरीकडे विवाहबाह्य संबंध ठेवण्याला सामोरे जाण्याची क्षमता आणि अशा परिस्थितीत आपण कसे वागावे याचे द्न्यान.
६. पुरेसा वेळ असणे.
आता या मुद्द्यांमध्ये कलावंतांचा विचार करायचा तर "मनस्वी" या शब्दाखेरीज "बेपर्वा" असा शब्द देखील वापरता येईल.
बेपर्वा मेंदू
बेपर्वा हा शब्द आपण चांगल्या अर्थाने वापरून पाहू. उदा. मेंदूचा फ्रंटल ग्लोब विकसित न झाल्याने टीनएजर व्यक्तींची रिस्क घेण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे या वयातील शास्त्रद्न्य, कलावंत यांनी घडवलेल्या कलाकृती, लावलेले शोध अफलातून असतात. कलावंतांचे / साहित्यिकांचे मेंदू असे काही "वेगळे" / टीनएजर राहिलेले असतात का? त्यांचे एकूण वर्तन ( प्रेम प्रकरणे, व्यसने, आत्महत्या ) टोकाचे असण्यात काही "केमिकल लोचा" असतो का? मनाच्या / शरीराच्या "त्या अवस्थेत" त्यांना जे लेखन / संगीत / चित्र इ. सुचते / स्फुरते ते सामान्य माणसाला "दैवी" किंवा "अमानवी" वाटते. याबाबत विद्न्यान काय सांगते?
( अरे इथे "द्न्य" टाइप होतेय... त्या नेमक्या कीज् कोणी सांगेल का? हे देवनागरीचे कीबोर्ड सगळीकडे वेगळे असण्याचं लफडं कधी संपणार?)
ब्रेन टू बेड
'धारिष्ट्य आणि संधी यांचा अभाव' या कारणांमुळे महाराष्ट्रात चारित्र्यवान पुरुषांची संख्या पुष्कळ आहे असे (मला वाटते ग. वा. बेहेरे यांचे ) वाक्य आहे. कलावंतांची (विशेषतः पुरुष कलावंतांची) मानसिक भूक वेगळी ( आणि अधिक) असते असा समज असल्याने त्यांना एकाहून अधिक व्यक्तींशी नाते ठेवण्याचे लायसन असते असे समजले जाते. मानसिक पातळीवर आपला जोडीदार आपली भूक भागवू शकत नाही म्हणून अशा भुकेच्या शमनार्थ इतर व्यक्तींशी संबंध ठेवणार्या कलाकारांच्या अशा संबंधांचा शेवट बाकी बिछान्यातच होतो, हे विशेष. एकाहून अधिक व्यक्तींशी शारीर पातळीवर संबंध ठेवणार्या सर्वांना सरसकट 'कलाकार' या गटात टाकणे बाकी धोक्याचे होईल. पण असे करायचे नाही, तर मग काय करायचे हाही एक प्रश्नच आहे. प्रोतिमा बेदी यांनी आपल्या आयुष्यात आलेले असंख्य पुरुष आणि त्यांच्याबरोबरचे आपले शारीरिक संबंध यावर खुलेपणाने आणि चटकमटक असे लिहिले आहे. बेदींच्या आयुष्यात आलेल्या असंख्य पुरुषांपैकी एक म्हणजे पंडीत जसराज. पण यातले जसराज हे कलाकार असल्याने त्यांचे हे संबंध समाजमान्य (भीमसेन जोशींच्या दुसर्या विवाहासारखे) आणि बेदीबाई बाकी उठवळ - असे का? बेदी याही उडीशी नृत्यातल्या, मॉडेलिंगमधल्या कलाकारच होत्या. मग त्यांचे असे संबंध ही त्यांच्या 'ब्रेन टू बेड' या प्रवासाचाच एक भाग आहे असे का समजले जात नाही? की हा सरळसरळ भारतीय संस्कृतीमधल्या दुटप्पीपणाचा अणि खोटारडेपणाचा भाग आहे?
सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक
बेहऱ्यांकडे दोन्ही होते
चारित्र्यवान पुरुषांची संख्या पुष्कळ आहे असे (मला वाटते ग. वा. बेहेरे यांचे ) वाक्य आहे.
बेहेऱ्यांकडे धारिष्ट्यही होते आणि त्यांना संधीही (आनंदीबाई विजापुरे) मिळाली.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
विवाहसंस्था आणि एकपति/पत्नित्व
मुळात एकपति/पत्नित्व हे काही मानवजातीचं गुणवैशिष्ट्य नाही त्यामुळे कलावंतच काय कुणाहीकडून आयुष्यभर एकनिष्ठ रहाण्याची अपेक्षा करणं गैरवाजवी वाटतं.
http://en.wikipedia.org/wiki/Monogamy#Evolutionary_history_of_monogamy वरून उद्धृतः
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.क्रिएटीविटीसाठी गरजेचे ;)
लफडी करणे क्रिएटीविटीसाठी गरजेचे आहे. बुद्धिमान पुरुष (किंवा स्त्री) एका स्त्रीसोबत (किंवा पुरुषासोबत) सुखी राहू शकत नाही असे कुणीतरी म्हटले आहेच. रसेलसाहेबांनी बहुधा. (कंसातल्या सुधारणा माझ्या)
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
क्रिएटिविटी
लफडी करणे क्रिएटीविटीसाठी गरजेचे आहे.
हे इतके सरळ सोपे आहे हे ठाऊक नव्हते. ज्यांच्याकडे मुळातच सर्जनशीलता नाही किंवा ज्यांची सर्जनशीलता सध्या या ना त्या कारणाने साकळली आहे, अशांनी लफडी केली तर ते पाणी खेळते होईल काय? यापुढील पांचटपणा करायचा तर सर्जन लोकांच्या सर्जनशीलतेचे रहस्य त्यांच्या (नर्सेस बरोबर वगैरे) लफड्यांमध्ये असते काय?
आणि यापुढे एकमेकांबरोबर सुखी राहिलेले जोडपे पाहिले की त्यांमधील एक किंवा दोन्ही जोडीदार बुद्धिमान नाहीत असा निष्कर्ष काढावा काय?
सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक
नल हायपोथिसिस
याला निव्वळ दिसणं दोषी असावं असं वाटतं. 'कलाकार व सामान्य माणसं यांच्यात प्रेम प्रकरणांच्या बाबतीत फारसा फरक नाही' हा नल हायपोथिसिस केवळ 'वाचण्यात आलं, टीव्हीवर दिसलं' वगैरेनी कसा खोडला जाणार?
ते खोडणं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत संभाव्य गैरसमजाची कारणपरंपरा यापलिकडे चर्चेला काय अर्थ रहातो?
(इथे कलाकारांच्या यादीत हिंदी चित्रसृष्टीतल्या तारकांचा समावेश करत नसावात असं गृहीत धरतो)
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी