निसर्ग चमत्कार

झाडातून झाड ?

आपणा सर्वांना बांडगुळे माहीत आहेत. एका झाडाच्या फांदीतून उगवलेले दुसरे झाड. बांडगुळ मूळ झाडाच्या फांदीतून अन्नरस शोषून घेते व स्वत : वाढते. पण तुम्ही अशी झाडे पाहिली आहेत कां की जात दोनही झाडांची मूळे जमीनीत आहेत पण एका झाडाचा बुन्धा दुसर्‍या झाडाच्या बुन्ध्यातून वाढला आहे व दोनही झाडे चांगली वाढलेली आहेत ( व अजूनही वाढत आहेत) ? अशी दोन झाडे पुणे विद्यापीठाच्या आवारात आहेत. मुख्य इमारतीच्या शेजारच्या हिरवळीच्या कडेला एक चांगले ३०-४० फूट उंचीचे गुलमोहराचे झाड आहे. व त्याच्या बुन्ध्यातून दुसरे पिंपळाचे झाड उगवले आहे. पहिल्या चित्रात दोनही झाडे लांबून दिसतात. दुसर्‍या चित्रात जवळून दिसतात व तिसर्‍या चित्रात गुलमोहराच्या बुन्ध्यामध्ये पिंपळाचा बुन्धा दिसतो. आणखी उदाहरणे कुणाला माहीत आहेत ?

Copy (2) of Trees 007

Trees 007 copy

Copy of Trees 015

शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

गंमत आहे

दोन्ही झाडांचे एकमेकांत कलम झाल्यासारखे वाटत आहे. खरेतर जेव्हा दोन झाडे किंवा झुडपे जवळजवळ येतात त्यावेळी बळकट झाड/झुडूप दुसर्‍याला खाऊन टाकते असे म्हणतात. पिंपळ बळकट असतो. तो चटकन तग धरतो पण गुलमोहरही अशाप्रकारे वाढू शकते हे पाहून आश्चर्य वाटले. विशेषतः दोन्ही झाडे सरळ न वाढता ४५-५० च्या कोनात वाढून तग धरून आहेत याची गंमतही वाटली.

गमतीशीर

गमतीशीर असले तरी हे तितकेसे दुर्मिळ नसावे. अगदी मुंबईतही माझ्या नातेवाईकांच्या घरासमोर वडाच्या झाडामधून असे सुपारी/नारळाचे (नक्की कसले ते पट्कन आठवत नाही) झाड आले आहे ते आठवले.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

इंटरेस्टींग

प्रकाराने कूतूहल जागवले खरे. चित्राकडे पाहून असे वाटते की पिंपळाचे झाड गुलुमोहराच्या झाडावर उगवून मग मुळाची वाढ गुलमोहोराच्या बुंध्यातून झाली असावी. बुंध्याला पडलेली चर त्यामुळेच असावी अशी शंका येते. पिंपळाची मुळं अशा प्रकारे मार्ग काढणारी असावीत असे मला निरिक्षणावरून वाटते. मात्र गुलमोहोराची मुळं उलट प्रकारची दिसतात. (यामुळे अशी उदाहरणं क्वचित दिसत असावीत?) गुलमोहोरांच्या मुळाबद्दल खालील माहिती विकीवरून.
"The Royal Poinciana* is regarded as naturalised in many of the locations where it is grown, and is seen by some as an invasive species in some parts of Australia, partly because its dense shade and root system prevent the growth of other species under it."

*Royal Poinciana=गुलमोहोर.

रोचक धाग्याबद्दल धन्यवाद.
-Nile

गमतीदार वृक्ष

चित्र छान आहे.

पिंपळ असे काही करताना अधूनमधून दिसतो खरा.

 
^ वर