हम है मता-ए-कुचा

हम है मताअ-ए-कूचा-ओ बाजारकी तरह
उठती है हर निगाह खरीदार की तरह ...१

इस-कू-ए-तश्नगी मीं बहुत है कि एक जाम
हात आ गया है दौलते-नादार की तरह ...२

वो तो कहीं है और, मगर दिल के आसपास
फ़िरती है कोई शै, निगहे यार की तरह ...३

सीधी है राहे-शौक, पे यूं ही कहीं कहीं
खम हो गयी है गेसू-ए-दिलदार की तरह ...४

अब जा के कुछ खुला ., हुनरे-नाखुने-जुनूं
जख्मे-जिगर हुए लबो-रुख्सार की तरह ...५

"मजरूह", लिख रहे है वो, अहले-वफा का नाम
हम भी खडे हुए है गुनहगार की ररह ...६

महरूह्

मताअ ..मालमत्ता, माल, वस्तू. . कूचा--गल्ली. निगाह ... नजर. तश्नगी ... तहान. नादार ... निर्धन, कंगाल, गरीब. शै ... वस्तु, पदार्थ.
राह ... मार्ग, प्रतिक्षा, आशा. शौक .. शौक, हौस, लालसा, इच्छा. खम .. वक्र, कुरळे, गेसू-ए-दिलदार ... प्रेयसीचे केस .जुनू ... उन्माद, वेड
लब ... ओठ. रुख्सार .. गाल. अहल ... लोक, उचित, पात्र. अहलेवफा ... प्रेमी, प्रामाणिक.

आयुष्यात अनेक वेळां आपणास असे वाटावयास लागते कीं आपले जीवन ही एक कवडीमोलाची वस्तु आहे.कोणाला त्याची किंमत नाही.
रस्त्यावर-फूटपाथवर विकल्या जाणार्‍या फुटकळ वस्तूप्रमाणे कोणीही यावे, उचलून उलटसुलट करून पहावे, नजरेनेच किंमत विचारावी व परत फेकून देऊन पुढे चालू लागावे ! मानी माणसाला हा अनुभव हृदयात खोल जखम करणारा असतो.या अशा वैराण जीवनांत एखादा आपल्या सारखाच सामान्य माणुस क्वचित केंव्हा जरा सहानभुती दाखवितो व त्यावेळीं त्याची किंमत घशाला कोरड पाडणारी तहान लागली असतांना रस्त्यावरील एखाद्या झोपडीत मिळणार्‍या घोटभर पाण्यासारखी अमोल वाटू लागते. हे झाले बाहेरच्या माणसांचे. ते तर परकेच. पण आपण जिला आपली समजलो होतो ती, ती तर केंव्हाचीच दुरावली आहे ; मीलनाची आशाही उरलेली नाही. पण तिच्या नजरेप्रमाणे एखादी वस्तु आपल्या आसपास सारखी फिरत आहे हा भास मात्र आपणास सारखा होत असतो. आता प्रेमाची साधीसुधी वाट ; तीत अडथळे यावयाचे काही कारणही नाही. पण तीही असे एखादे वळण घेते की आपण गुमराह होतो ( पण अशा घोर प्रसंगातही आठवण होते ती तिच्या कुरळ्या केसांची ). उन्मादात गालावर-ओठावर झालेल्या जखमांतून भळाभळा रक्त वहात आहे, पण ते ठीक आहे ; ते तर ओठातून बहरलेले काव्यच आहे. खैर, ती म्हणे प्रामाणिक प्रेमिकांची यादी लिहावयाला बसली आहे. चला तर, "मजरुह", (आता प्रेम करण्याचा गुन्हा घडलाच आहे तर ) गुन्हेगाराप्रमाणे रांगेत उभे राहिलेच पाहिजे !

मजरूह सुलतानपुरीची ही गझल लताने "दस्तक" सिनेमात गायली आहे. १९७० चा बर का. ९६चा महेश भटचा नव्हे. लताच्या आठवणीत रहाणार्‍या गाण्यांत बहुतेक सगळी करुण रसातीलच आहेत, पण या गझलेतील भावनेला तिने दिलेली दर्दभरी साथ.... क्या कहिये ! मदन मोहनचे संगीत नेहमीच भुरळ पाडंणारे. पण या तबकडीतली त्याने दिलेली सुरावट खोल जखम करणारी आहे. वाईट एकाच गोष्टीचे वाटते सगळी गझल ऐकावयाला मिळत नाही. पण तीन शेर ऐकावयास मिळाले, काय कमी आहे ?

गझल ऐका :
http://www.musicplug.in/multiple_song_flashplayer.php?songid=49369&br=me...
शरद

Comments

क्या बात है...

एका उत्तम गजलेचे तितकेच उत्तम रसग्रहण पेश केल्याबद्दल आभार, शरद. गाण्यात नसलेले शेर अणि त्यांचा अर्थ येथे दिल्याबद्दलही धन्यवाद.
सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक

माझे आवडते गाणे

यातल्या काही सोप्या ओळींचा अर्थ समजत होता आणि आतापर्यंत इतर ओळींचा अर्थ अंदाजाने लावत होतो. प्रत्येक उर्दू शब्दांचा अर्थ दिल्याबद्दल आभार.
उत्तम रसग्रहण

फार छान

रसग्रहण आवडले.

अप्रतीम

शरदजी,
गज़ल , सिनेगीत, संगीत व भावनांचा सुंदर मिलाफ़
आणखी येऊ दे....
नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९

छान

वा. वा. छान.

सुंदर !

अप्रतिम गझल आहे. लताजींनी ही गझल गायली असल्याचे माहित नव्हते !
आभारी आहे, शरदराव.

 
^ वर