अशी एक शक्यता :केवळ तर्क

अशीही एक शक्यता
(श्री.विकू यांच्या लेखाच्या प्रतिसादात श्री.धम्मकलाडू यांनी "हे डॉ.वर्तक कोण हो?" असा प्रश्न विचारला आहे.त्या प्रश्नाच्या उत्तरार्थ हा लेख आहे.)
"फलज्योतिषाचा बोजवारा"(मनोविकास प्रकाशन) या पुस्तकात चौदा लेख संकलित केले आहेत.(संपादन:श्री.जगदीश काबरे).त्यांत "माझा ज्योतिषावर विश्वास नाही" हा पत्रकार ग.वा.बेहेरे यांचा लेख आहे.त्या लेखातील काही भाग असा:
"पुण्यातले डॉ.प.वि.वर्तक हे आपल्याजवळ अतीन्द्रिय शक्ती आहे.आपण अचूक भविष्य
सांगतो.असा दावा करतात.एकदा त्यांच्या दवाखान्यात मी बसलो होतो.वेळ सायंकाळ सहाची होती.त्याकाळी गाजलेली एक कुस्ती बेळगावमध्ये त्यावेळी चालू होती.मी विचारले नसताही त्या कुस्तीतला कोणता पैलवान कोणत्या डावावर किती वेळात जिंकणार हे आपल्या अतीन्द्रिय शक्तीने त्यांनी मला सांगितले.
गमतीची गोष्ट अशी की नेमके त्याच्या विरुद्ध घडले.आम्ही तिथे बसलो असतानाच आम्हाला हे सारे रेडिओवृत्तातून कळले
.(त्याकाळी टी.व्ही.नव्हते.) आपण त्या घटनेकडे पाहाण्यासाठी लावलेली दृष्टी चुकीच्या कोनावर लागल्यामुळे असे झाले असे त्यांनी स्पष्टीकरण दिले.अर्थातच ते खोटे होते यांत शंका नाही."
पत्रकार बेहेरे यांनी न विचारता डॉ.वर्तकांनी त्यांना कुस्तीभविष्य का सांगितले त्याचे कारण उघड आहे.
"फलज्योतिषाचा बोजवारा" या पुस्तकातील हा लेख वाचण्यापूर्वी डॉ.वर्तकांची दिव्यदृष्टी,
त्यांची अतीन्द्रिय शक्ती,अचूक भविष्यकथन, त्यांचे सूक्ष्म देहाने अंतराळभ्रमण याविषयींच्या बातम्या अधून मधून वाचल्या होत्या.
डॉ.वर्तक वैद्यकशास्त्राचे पदवीधर आहेत.त्यांचा पुण्यात दवाखाना होता.(आता आहे की नाही कल्पना नाही.ते आता वयाच्य पंचाहत्तरीत असतील.) अतीन्द्रिय शक्तीचा दावा ते करीत हे खरे.पण त्यांनी बुवाबाजी केली नाही.लोकांना नादी लावून फसविले नाही.त्यांच्याविषयी असला कोणताच प्रवाद ऐकला/वाचला नाही.
मग ते अतीन्द्रिय शक्ती,सूक्ष्मदेहाने मंगळग्रहावर भ्रमण असे दावे का करीत? हेतू काय? केवळ प्रसिद्धीसाठी कोणी हे करील असे वाटत नाही. आपल्यापाशी अलौकिक शक्ती आहेत असे डॉ.वर्तकांना प्राणिकपणे वाटत होते असे म्हणावे लागेल.गेल्या दहा बारा वर्षांत ते अतीन्द्रिय शक्तीविषयी काही बोलल्याचे ऐकिवात नाही.पण असा दावा ते पूर्वी करत होते तेव्हा त्यांना तसे काही भास,भ्रम होत असावे.
अशा भ्रमाचे कारण काय बरे असेल? यावर विचार करीत असता मला माझी शाळा (इ.८वी) आठवली.शाळा मेहुणपुर्‍यात होती. शाळेचा रस्ता वर्तकाश्रमाजवळून होता.वर्तक घराण्यात तपकीर निर्मितीचा व्यवसाय पूर्वापार आहे.वर्तकी तपकीर नावाजलेली होती.तिची निर्मिती वर्तकाश्रमात होई.शाळेत जाता येता तपकिरीचा वास येई.क्वचित शिंकाही येत.कुतूहल म्हणून मी एकदा वाड्याच्या आत जाऊन पाहिले.तिथे चौकात दळलेली तंबाखूपूड वाळत घातली होती.
हे दृश्य डोळ्यापुढे आल्यावर वाटले की लहानपणी डॉक्टर इथे भावंडांबरोबर,मित्रांबरोबर खेळले असतील.तेव्हा तंबाखूचे सूक्ष्म कण नाकावाटे आत जाऊन जाऊन त्यांच्या मेंदूच्या विशिष्ट केंद्रावर काही परिणाम झाला असेल का? त्यामुळे भ्रम निर्माण होत असेल का? मला वैद्यकीय ज्ञान नाही.पण अशी एक शक्यता असावी असा आपला एक तर्क आहे एव्हढेच.

Comments

तर्क

शाळेत जाता येता तपकिरीचा वास येई.क्वचित शिंकाही येत

.तेव्हा तंबाखूचे सूक्ष्म कण नाकावाटे आत जाऊन जाऊन त्यांच्या मेंदूच्या विशिष्ट केंद्रावर काही परिणाम झाला असेल का? त्यामुळे भ्रम निर्माण होत असेल का?

ज्या तंबाखूच्या कणांनी वर्तकांच्या मेंदूवर परिणाम केला असण्याची शक्यता आहे, त्याच तंबाखूच्या कणांनी आपली पावर त्या रस्त्याने जाणार्‍या येणार्‍यांच्याही मेंदूवर दाखवली असण्याची तितकीच शक्यता आहे.

वर्तकांना अंतराळभ्रमणाचे भास झाले, तर इतरांना आणखी कशाचे होत असतील, झाले असतील, एवढाच काय तो फरक.

मलाही वैद्यकीय ज्ञान नाही.पण अशी एक शक्यता असावी असा आपला एक तर्क आहे एव्हढेच.

असेलही...

यावर विचार करीत असता मला माझी शाळा (इ.८वी) आठवली.शाळा मेहुणपुर्‍यात होती. शाळेचा रस्ता वर्तकाश्रमाजवळून होता.वर्तक घराण्यात तपकीर निर्मितीचा व्यवसाय पूर्वापार आहे.वर्तकी तपकीर नावाजलेली होती.तिची निर्मिती वर्तकाश्रमात होई.शाळेत जाता येता तपकिरीचा वास येई.क्वचित शिंकाही येत.कुतूहल म्हणून मी एकदा वाड्याच्या आत जाऊन पाहिले.तिथे चौकात दळलेली तंबाखूपूड वाळत घातली होती.
हे दृश्य डोळ्यापुढे आल्यावर वाटले की लहानपणी डॉक्टर इथे भावंडांबरोबर,मित्रांबरोबर खेळले असतील.तेव्हा तंबाखूचे सूक्ष्म कण नाकावाटे आत जाऊन जाऊन त्यांच्या मेंदूच्या विशिष्ट केंद्रावर काही परिणाम झाला असेल का?

मी डॉक्टर नाही. असे काही परिणाम होतात का माहित नाही पण वर्तकांच्या मेंदूच्या विशिष्ट केंद्रावर परिणाम झाले असतील तर वर्तकाश्रमाजवळून शाळेत जाता-येता तपकीरीचे वास घेऊन शिंकणार्‍यांवरही कमी-अधिक प्रमाणात परिणाम होणे शक्य असावे हा कॉमनसेन्स आहे. आपण तपासणी केलीत का?

त्यांनी बुवाबाजी केली नाही.लोकांना नादी लावून फसविले नाही.त्यांच्याविषयी असला कोणताच प्रवाद ऐकला/वाचला नाही.

त्यांचे वास्तव रामायण आणि इतर पुस्तकांचा खप किती आहे याचा अंदाज आहे काय?

बुवाबाजी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
डॉ.वर्तकांनी कल्ट निर्माण केला नाही. अतीन्द्रिय शक्तीचा दावा केला. पण कुणाला आपल्या भजनी लावून आर्थिक लाभ करून घेतला नाही. या अर्थी त्यांनी बुवाबाजी केली नाही
असे बुवाबाजी रूढार्थाला धरून म्हटले.त्यानी आपल्या पुस्तकांत (पु. ना. ओकांसारखे )काहींच्या बाही दावे केले आहेत हे ऐकून आहे.त्यांच्या पुस्तकांच्या खपाचा आकडा माहीत नाही.

तपकीर

.तेव्हा तंबाखूचे सूक्ष्म कण नाकावाटे आत जाऊन जाऊन त्यांच्या मेंदूच्या विशिष्ट केंद्रावर काही परिणाम झाला असेल का? त्यामुळे भ्रम निर्माण होत असेल का? मला वैद्यकीय ज्ञान नाही.पण अशी एक शक्यता असावी असा आपला एक तर्क आहे एव्हढेच.

आयुष्यभर तपकीर ओढणारे बरेच लोक(मुख्यतः आमच्या गावाकडच्या शेतकरी स्त्रिया) माझ्या परिचयाच्या आहेत..त्यांनी असले काही दावे केलेले ऐकले नाहीत. भांगलणीचे रेट मात्र भलतेच वाढले आहेत त्याचा तपकीरीशी काही संबंध असावा असा तर्क करावा असे मला वाटत नाही.

शाळा मेहुणपुर्‍यात होती. शाळेचा रस्ता वर्तकाश्रमाजवळून होता.वर्तक घराण्यात तपकीर निर्मितीचा व्यवसाय पूर्वापार आहे.वर्तकी तपकीर नावाजलेली होती.तिची निर्मिती वर्तकाश्रमात होई.शाळेत जाता येता तपकिरीचा वास येई.क्वचित शिंकाही येत.कुतूहल म्हणून मी एकदा वाड्याच्या आत जाऊन पाहिले

हे आजही आहे...पण वर्तकांबद्दल काहीही माहीत नसतानाही माझी आत जाण्याची डेरिंग नाही झाली.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

हेच म्हणतो

वर्तक स्वतः तपकीर ओढतात कि नाही ते माहित नाही. पण वर्तकांच्या मेंदुतील जैवरासायनिक प्रक्रियेची गुंतागुंत इतरांपेक्षा वेगळी असावी असे मात्र वाटते.त्याचा तपकीरीशी संबंध नसावा.
प्रकाश घाटपांडे

इतर

वर्तकांच्या घरातील इतरांचे काय?

नितिन थत्ते

वास्तववादी विचार असावा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
*लहानपणापासून डॉक्टरांचा संबंध तंबाखूकणांशी सातत्याने दीर्घ काळ आला.
*एकाच गोष्टीचा परिणाम सर्व व्यक्तींवर सारखाच होतो असे नव्हे.
* मोठी माणसे तपकीर ओढतात त्यांच्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता कमी असते.
अशा कोणत्याही मुद्द्यांचा किंचित देखील विचार न करता "उचलले बोट आणि लावले कळीला" अशा पद्धतीने लिहिलेले प्रतिसाद विचारार्ह वाटत नाहीत.

तर्क

हलुसिनोजेन पदार्थांबद्दल अधिक माहिती इथे.

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

:)

[ तुम्ही दगा दिला ;), मी हा प्रतिसाद देत असतानाचा तुमचा प्रतिसाद बदलला. ]

सॉक्रेटिस हुशार होता.
सॉक्रेटिस कुरूप होता.
कुरूप माणसे हुशार असतात.

दगा नाही

दगा नाही दिला, हा तर्कप्रकार या उदाहरणाला बसत नाही असे वाटले म्हणून प्रतिसाद बदलला. :)
सॉक्रेटीसच्या उदाहरणात किमान एक समान दुवा तरी सापडतो. इथे ते ही नाही. मुळात तंबाखू/तपकिरीमुळे हलुसिनेशन होते हेच सत्य नाही तर पुढचे इमले बांधण्यात काय फायदा? तसे म्हटले तर चहा-कॉफीही उत्तेजक पदार्थांमध्ये मोडतात मग वर्तकांनी लहानपणी चहा-कॉफी प्यायली असल्याने त्यांच्या मेंदूवर परिणाम झाला असेही म्हणता येईल. (म्हणायचे असले तर काहीही म्हणता येईल!)

येनकेनप्रकारे इनसॅनिटी डिफेन्सच्या धर्तीवर वर्तकांना क्लीन चिट द्यायची आहे असे वाटते आहे.

ताक : तुमचे उदाहरण अधिक योग्य आहे असे वाटते.

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

आता?

:) :)

नास्तिक विज्ञानवादी असतो.
नास्तिक अस्तिकांना खोटे ठरविण्यासाठी कै च्या कै तर्क लावतात.
विज्ञानवादी कै च्या कै तर्क लावतात :प्

गंमत

गंमत अशी आहे की नेहेमीचेच यशस्वी पब्लिक या धाग्यामधील कै च्या कै तर्क खोडताना दिसणार नाही. :)

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

पैज

मी म्हणतो दिसणार - लावता पैज? :)

असे

असे म्हटल्यावर दिसतीलही कदाचित. ;)

:)

हा हा :)

आपली उपचर्चा संपादित होणार/नाही हि पैजही लावायला हरकत नाही.

टाईम-स्टँपवरून शहानिशा करता येईल

पैजेविषयीचे प्रतिसाद आणि पैजेचे लक्ष्य असलेले प्रतिसाद यांच्या वेळांची नोंद बघून वरील हायपोथेसिसविषयी शहानिशा करता येईल असे वाटते.

शक्य तर्क.

रसायनांमुळे निर्माण होणारा "आभासी" आजार (हॅलुसीनेशन??) हा तपकिरीमुळेदेखील होऊ शकतो हा तर्क प्राथमिक स्वरुपात शक्य आहे, पण तपकीर/तंबाखू च्या संशोधनात सेवनामुळे मानसिक आजार झाल्याचे निरीक्षण नाही, तसेच आभासी आजाराच्या संशोधनातदेखील त्याचा संबंध तपकीर/तंबाखूशी लावल्याचा दिसत नाही. त्यामुळे विना संदर्भ असा तर्क थोडासा निरर्थक वाटतो.

अगदीच वर्तकांचे वर्तन कसे वेडेपणाचे आहे हे "सिद्ध" "करण्याच्याच" हेतून लेखन केले आहे असे देखील म्हणता येऊ शकते, त्यार्थी ते माहिती स्वरूपाचे न वाटता केवळ वयक्तिक भावनेतून आल्यासारखे वाटते.

प्रत्येक वेळेसच संदर्भाची गरज आहे असे नाही पण रासायनिक प्रक्रियेचे मानवी बुद्धीशी किंवा मनाशी असे क्वचित आढळणारे तर्क बघितल्यास त्यासाठी संदर्भ हवेत असे वाटते.

पर्याय

"वर्तक लबाड आहेत की बिनडोक?" या प्रश्नासाठी त्या दोन पर्यायांपैकीच कोणतेतरी एक उत्तर योग्य आहे असे वाटत असेल तर ती वैयक्तिक भावना 'दुष्टपणा' ही नसून 'कणव' अशीही असू शकेल.

बेनिफिट ऑफ डाउट?

नक्कीच शक्य.

तंबाखूचा असा कुठला गुणधर्म ऐकलेला नव्हता

तंबाखूचा असा कुठला गुणधर्म ऐकलेला नव्हता.

काही प्रकारच्या भूछत्रे सेवन केल्यास अतींद्रिय भासणारे अनुभव येतात. तंबाखूचा असा गुणधर्म असल्यास तो फारसा बलवान नसावा.

अफू-गांजा

तपकिरीचे माहीत नाही पण अफू, गांजा ह्या अंमली पदार्थांचे सेवन केल्यास असे भास होऊ शकतात असे वाटते. तुम्ही दिलेला बेहेरे ह्यांनी सांगितलेला किस्सा भन्नाटच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मॅड ऍज ए हॅटर

व्यवसायामुळे डोक्यावर परिणाम होऊ शकतो, उदा. टोपी बनविणार्‍यांना मॅड हॅटर रोग होऊ शकतो. मात्र, तंबाखूमुळे असे परिणाम घडत असल्याचे वाचनात नाही.
शिवाय, वर्तकांना खरेच भ्रम होत असते तर त्यांनी आव्हानांचा भाबडेपणे स्वीकार केला असता.
बाकी, डोक्यावर परिणाम होण्याबाबतीत हा एक रोचक दुवा सापडला ;)

स्कित्झोफ्रेमिया?

वर्तकांना स्कित्झोफ्रेमिया वगैरे मानसिक आजार नाही हे ठामपणे म्हणता येते का?
बाकी, हे तपकिरीचे कारण पटले नाही

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

विश्वासार्ह माहिती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
१)या संदर्भात मला ठामपणे काय ठाऊक होते?
..* आपल्याला अतीन्द्रिय शक्ती आहे असा दावा डॉ.वर्तक करीत असत.
..*कुणाही व्यक्तीपाशी कोणतीही अतीन्द्रिय शक्ती नसते.
..* बालपणापासून पुढे दीर्घकाळपर्यंत डॉ.वर्तक यांचा संपर्क तंबाखूच्या चूर्णाशी आला.
२) मी काय गृहीत धरले?
..*डॉ.वर्तक बुवाबाजी करत नाहीत. ते या संदर्भात हेतुतः खोटे बोलत नसावे.
..*लहानपणापासून तपकिरीच्या सतत संपर्कात आल्यास त्याचा मेंदूच्या विशिष्ट केंद्रांवर काही विपरीत परिणाम होत असावा. त्यामुळे भ्रम, भास होत असावे.डॉ.वर्तकांच्या बाबतीत कदाचित असे घडले असावे.(या विषयी लेखात कोणतेही ठाम विधान केलेले नाही.)
३)मला कोणती सर्वस्वी नवी विश्वासार्ह माहिती मिळाली?
माणसाला भ्रम,भास होतात त्याचा तंबाखूच्या कोणत्याही स्वरूपातील सेवनाशी काहीही संबंध असू शकत नाही.
धन्यवाद !

घनिष्ठ संबंध नाही इतकेच

भ्रम भासांशी घनिष्ठ संबंध नाही इतकेच.

तंबाखूचा भ्रम-भासांशी "काहीही" संबंध नाही, इतकी घट्ट वर्गवारी करता येणार नाही.

(अतिरेकी प्रमाणात साध्या पाण्याचे सेवन केल्यानेही भ्रम-भास होऊ शकतात. परंतु आपण साधारणपणे पाण्याला भ्रम-भास घडवणारा पदार्थ मानत नाही. बहुतेक प्रसंगांत भ्रम-भास पाण्याने घडत असावेत याची संभवनीयता फार कमी असते, म्हणून ती शक्यता विचारात-न-घेण्यालायक मानतो. परंतु "काहीही संबंध असू शकत नाही" असे म्हणण्याऐवजी आपण म्हणतो "संभवनीयता फार कमी आहे". तद्वतच येथेसुद्धा.)

एक अनुभव

यावरून आठवले. दहा बारा वर्षांपूर्वी एका अतींद्रिय शक्तीवाल्या पुण्याच्या डॉक्टराच्या 'घरगुती' कार्यक्रमाला मी गेलो होतो. त्यांचे नाव लक्षात राहिले नाही. त्याच्या बोलण्यात पुरेपूर भंपकपणा होता. तो निश्चितपणे ठरवून थापा मारत होता हे सहज दिसून येत होते.त्याला विचारले गेलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे ठरलेली दिसत होती. कोणी एकादा वेगळा प्रश्न विचारलाच तर त्याला टोलवाटोलवीची उत्तरे देण्याची कला त्या लबाड माणसाकडे होती. त्याच्या मनावर परिणाम झाला असेल आणि त्याला खरोखरच सूक्ष्मरूप धारण केल्याची भावना होत असेल असे मला क्षणभरासाठीसुद्धा वाटले नाही. आपले भाषण संपवताच त्याने पोतडी उघडली आणि आपली काही पुस्तके तिथे जमलेल्या भोळ्या लोकांना खपवली. सगळ्या प्रती संपवून झाल्यावर काही लोकांच्याकडून ऍडव्हान्ससुद्धा घेतला. त्या व्यवहारात किती खरे ग्राहक होते आणि किती त्याचेच हस्तक होते अशी शंका मला तेंव्हा आली. त्यात काही 'परिवारातले' लोक होते ते कसला तरी 'आदेश' त्यांना मिळाला असल्यासारखे वागत होते.

एकंदरीत...

एकंदरीत पुण्याचे लोक फारच हुशार दिसतात ब्वा ! हे असे सगळे चमत्कार पुण्यातच का घडतात बरे ? यावर एक धागा काढायला हरकत नाही आता.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

 
^ वर