१ हिरा आणि ६ चोर
एकदा ६ चोर एक हिरा चोरून आणतात. त्या हिर्याची वाटणी करायची आहे.
(एकच हिरा असल्यामुळे तो कुणा एकालाच मिळनार आहे हे नक्की)
सहा चोरांना अनुक्रमे १,२,३,४,५,६ असे नाव देऊ.
चोर १ हा सर्वात सिनीअर आहे .... आणि अनूक्रमे चोर ६ हा सर्वात ज्युनीअर आहे.
चोर १ पहिल्यांदा वाटणीचा प्रस्ताव मांडणार. प्रस्ताव नामंजूर झाल्यास चोर १ चा शिरच्छेद होणार आणि चोर २ प्रस्ताव मांडणार.
प्रस्ताव जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत प्रस्ताव मांडणार्याला मारून टाकले जाइल.
प्रस्ताव मांडल्यानंतर ५०% च्या वर चोरांनी जर नकार दिला तर प्रस्ताव नामंजूर (उदा. ६ चोर असताना चोर १ ने प्रस्ताव मांडला तर
जर कुठल्याही ४ चोरांनी नकार दिला तर चोर १ चा बळी जाणार. पण जर ३ (किंवा जास्त) चोरांनी (चोर १ धरून) जर होकार दिला तर प्रस्ताव मंजूर. अजून एक उदा. जर २ चोर शिल्लक राहिले तर जो चोर प्रस्ताव मांडणार त्याचा प्रस्ताव मंजूर कारण नकार फक्त एकाचाच येयील (जे की ५०% पेक्षा कमी आहे)).
प्रत्येक चोर कुठल्याही प्रस्तावाला मंजूरी देताना खालील गोष्टींना त्यांच्या अनूक्रमे प्राधान्य देयील :
१. स्वत:चा जीव
२. मिळणारी रक्कम
३. जर कुठल्याही केस मधे रक्कम सारखीच मिळनार असेल तर प्रस्ताव मांडणार्याचा शिरच्छेद.
(उदा. चोर क्ष प्रस्ताव मांडत आहे. चोर "य" ला माहित आहे की मी जर नकार दिला तरीही पुढच्या चोराच्या प्रस्तावात मला तेवढीच रक्कम मिळणार आहे जेवढीकी ह्या प्रस्तावात मला चोर क्ष देणार आहे)
प्रश्न : चोर क्र.१ ने त्याचा जीव वाचवण्यासाठी काय प्रस्ताव मांडावा ?
(कृ. उत्तरे व्य.नी. करावीत किंवा पांढर्यात द्यावीत)
Comments
प्राधान्य -
कृ. प्रस्ताव प्राधान्य क्रमांक ३ असा वाचावा -
३. जर कुठल्याही केस मधे रक्कम सारखीच मिळनार असेल तर प्रस्ताव मांडणार्याचा शिरच्छेद.
(उदा. चोर क्ष प्रस्ताव मांडत आहे. चोर "य" ला माहित आहे की मी जर नकार दिला तरीही पुढच्या चोराच्या प्रस्तावात मला तेवढीच रक्कम मिळणार आहे जेवढीकी ह्या प्रस्तावात मला चोर क्ष देणार आहे, तर चोर "य" नकार देईन)
---------------------
-धनंजय कुलकर्णी
छान कोडे
गेम थिअरीची करामत दाखविणारे हे एक चांगले कोडे आहे, मात्र स्पाईट (सूड - माझा एक डोळा फुटला तरी तुझे दोन डोळे फुटावे) या अविवेकी भावनेमुळे कोड्याचे उत्तर अनेकांना पटत नाही ;)
--
मी ऐकलेले कोडे थोडे निराळे होते. आता या कोड्यावर विचार करतो आहे.
नो ब्रेक्स
एकही तुकडा करायचा नाही.
>> (एकच हिरा असल्यामुळे तो कुणा एकालाच मिळनार आहे हे नक्की)
हिर्याचे तुकडे करता येणार नाहीत. तो हिरा कुणा एकालाच मिळनार आहे.
>> मात्र स्पाईट (सूड - माझा एक डोळा फुटला तरी तुझे दोन डोळे फुटावे) या अविवेकी भावनेमुळे कोड्याचे उत्तर अनेकांना पटत नाही ;)
हे खरे आहे.
कुठलच उत्तर हे कधीच परफेक्ट नसतं. प्रत्येक उत्तराला फाटे फुटू शकतात.
आपण काहीतरी प्रयत्न करू शकतोच.
---------------------
-धनंजय कुलकर्णी
---------------------
-धनंजय कुलकर्णी
एकही नाही
>> (एकच हिरा असल्यामुळे तो कुणा एकालाच मिळनार आहे हे नक्की)
हिर्याचे तुकडे करता येणार नाहीत. तो हिरा कुणा एकालाच मिळनार आहे.
---------------------
-धनंजय कुलकर्णी
हे बरोबर वाटतं का?
याच कोड्यात थोडा बदल सुचवतो - १०० नाणी आहेत (एकसारखी, अविभाज्य) तर वाटणी कशी करावी? माझ्या उत्तराच्या पांढऱ्यात त्याही प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न केला आहे...
मला वाटतं पहिल्याने हिरा तिसऱ्याला द्यावा म्हणजे दुसरा जिवाच्या भीतीने (पुढच्या खेपेला) आणि तिसरा हिरा मिळाल्याच्या आनंदापायी वाटणीला मान्यता देतील. खरं तर नंबर दोन सोडून कोणालाही दिला तरी चालेल.
वाटणी या शब्दाचा कोड्यात अपेक्षित असा अर्थ न घेतल्याने मी थोडा वेगळा विचार केला. समजा हिऱ्याऐवजी शंभर सोन्याची नाणी आहेत (अविभाज्य). ती वाटायची आहेत असं गृहित धरून हे कोडं सोडवतो आहे.
चोर क्रमांक ५ व ६ मरणार नाहीत त्यामुळे त्यांना केवळ आपल्या वाट्याचा प्रश्न आहे. शेवटी तिघे उरण्यात पाचव्या व सहाव्या चोराचा तोटा आहे. कारण चौथा जी वाटणी करेल ती सहाव्याला मान्य करावी लागणार. (चौथा मेल्यास सहाव्याला शून्य मिळणार. चौथ्याने त्याला एक नाणं देखील दिलं तरी त्याला ते स्वीकारावा लागेल) त्यामुळे चौथा मरणार नाही हे निश्चित. तिसरा चोर जे म्हणेल त्याला पाचवा व सहावा मान्यता देतील तर चौथा विरोध करेल. याचा अर्थ फक्त चौघे शिल्लक रहायला चौथ्याचा विरोध असेल, इतकंच नव्हे तर पाच व सहा यांना झक मारत तिसरा जे देईल ते स्वीकारावं लागेल. त्याअर्थी चोर क्रमांक ३ देखील मरणार नाही. त्यामुळे दुसरा चोर जे देईल त्याला तिसऱ्याचा विरोध असेल, आणि इतरांचा नाईलाजास्तव पाठिंबा असेल. हेच पुढे नेलं तर पहिला चोर जे म्हणेल त्याला दुसऱ्याचा विरोध असेल तर बाकीचे झक मारत पाठिंबा देतील.
पहिल्या चोराने दुसऱ्याला शून्य नाणी द्यावी हे निश्चित कारण कितीही दिलं तरी तो विरोधच करणार. स्वतःकडे नव्वद ठेवावीत आणि दुसरा ते सहावा यांना अनुक्रमे ०, १, २, ३, ४ नाणी द्यावीत. पहिला मेला तर दुसरा चोर स्वतःकडे ९४ ठेवेल व इतरांना ०,१,२,३ देईल...
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
मी ऐकलेले कोडे
१०० नाण्यांची वाटणी २ चोरांमध्ये करावयची असेल तर ती कशी होईल? (बाकी नियम याच कोड्यासारखे)
उत्तरः १००-०
म्हणून, १०० नाण्यांची वाटणी ३ चोरांमध्ये करायची असेल तर ९९-०-१ असे सुचविले तरी पुरेल.
म्हणून, १०० नाण्यांची वाटणी ४ चोरांमध्ये करायची असेल तर ९९-०-१-० असे सुचविले तरी पुरेल.
म्हणून, १०० नाण्यांची वाटणी ५ चोरांमध्ये करायची असेल तर ९८-०-१-०-१ असे सुचविले तरी पुरेल.
म्हणून, १०० नाण्यांची वाटणी ६ चोरांमध्ये करायची असेल तर नेता ९८-०-१-०-१-० असे सुचवेल.
--
मूळ कोड्याचे माझे उत्तर (धक्का यांना मी आधी दोन चूक उत्तरे व्यनिने दिली होती :D):
जर ५६ उरले तर ५ स्वतःला हिरा ठेवेल.
तर मग ४५६ उरलेले असताना ४ क्रमांकाचा चोर ६ क्रमांकाच्या चोराला हिरा देऊ करेल.
तर मग ३४५६ उरलेले असताना ३ क्रमांकाचा चोर ५ क्रमांकाच्या चोराला हिरा देऊ करेल.
तर मग २३४५६ उरलेले असताना २ ने ६ ला हिरा देऊ केला तरीही बाकीचे तिघे त्याला मारतील कारण ५ चा आर्थिक लाभ दडपला जाईल आणि बाकीचे (३ आणि ४ हे दोघे) २ ला मारण्यातच समाधान मानतील.
तर मग १२३४५६ असताना १ ने ६ ला हिरा देऊ केला तर २ त्याला समर्थन देईल कारण २ चा जीव वाचेल, आणि ६ समर्थन देईल कारण त्याचा आर्थिक लाभ होईल!
--
मनोवृत्तींचा प्राधान्यक्रम बदलून वेगवेगळी उत्तरे शोधता येतील.
हम्म..
अभिनंदन . छान उत्तर. पण चोर १ चोर ३ ला पण देउ शकतो ना?
---------------------
-धनंजय कुलकर्णी
मान्य
होय की! ३, ४ किंवा ६ यांना हिरा दिल्यास चालेल असे दिसते.
काही त्रूटी -
>> कारण चौथा जी वाटणी करेल ती सहाव्याला मान्य करावी लागणार.
(१०० नाणी असतील तर आणि १ नांण असेल तर कोड्यात बरीच उलाढाल होईल.)
जेंव्हा १ नाणं/हिरा असेल तेंव्हा ४थ्या ला तो हिरा ६ व्यालाच द्यावा लागेल. कारण जर तो ५ ल्या दिला तर ५वा नकार देउ शकतो--
कारण - ४ मेल्यावर तशीही तेवढीच रक्कम ५ल्या मिळणार आहे म्हणून तो ४ ला मारयचं प्रेफर करेल.
म्हणून ४ थ्या ला तो हिरा ६ ला द्यावा लागेल.
>> याचा अर्थ फक्त चौघे शिल्लक रहायला चौथ्याचा विरोध असेल, इतकंच नव्हे तर पाच व सहा यांना झक मारत तिसरा जे देईल ते स्वीकारावं लागेल.
नाही वरील स्प्ष्टीकरणात हे सिद्ध झाले आहे की ४,५,६ शिल्लक असतील तर ६चा फायदा आहे. म्हणून ३र्याला मारायचा ६ प्रयत्न करेल.
आपला प्रयत्न नेहमीप्रमाणे उत्तम आहे. अजून थोडाफार बदल केल्यात करेक्ट उत्तर नक्कीच मिळेल.
---------------------
-धनंजय कुलकर्णी
तो युक्तिवाद
शंभर नाण्यांसाठी होता. एक हिऱ्या साठी चा युक्तिवाद पहिल्या ओळीत दिलेला आहे.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
होय की..
नीट पहिलेच नाही मी.
अभिनंदन. आपण तिथे त्याचं स्पष्टीकरण न दिल्या मुळे असं झालं.
---------------------
-धनंजय कुलकर्णी