१ रूपया

गावाकडून मित्राचा फोन आला काल.
"एक हजार एक ची शर्यत लावली आहे राव.. मदत कर".
"कसली शर्यत लावतोस अरे? पेरणीला पैसे नाहीत असे म्हणून मागेच पैसे घेतलेस ना.. आणी शर्यती काय लावतोस ?"

"अरे ऐकूण तरी घे , कोड्यातील गफलत कोठे आहे हे ओळखून दाखवल्यास मला १००१ रू मिळणार आहेत".

"अच्छा, कसले रे कोडे ? "

मी ते कोडे ऐकले आणी लहानपणी आइकलेल्या कोड्याची आठवन झाली.त्या कोड्यातील गफलत मला तेंव्हा कळाली नव्हती,
माझ्या दादाने ती गफलत सांगीतली होती पण ती समजण्यासारखी नवती.

बर्‍याच दिवसानंतर हे कोडे सोडवायची संधी मिळाली काल. कोडे सोडवले पण आता त्याला ती गफलत समजून सांगताना नाकी नऊ आले
आमच्या.

बघू उपक्रमींना गफलत समजून सांगता येते काय ?

--------------------
तीन मित्र एका हॉटेलात जातात. प्रत्येकी २५रू त्यांना बिल येते. एकूण रक्कम = ७५
वेटर ते पैसे घेउन मालकाकडे जातो. मालक ५ रू वापस देतो.

वेटर स्वता:कडे २ रू ठेवतो आणि तीघांना प्रत्येकी १ रू देतो.

आता इथे : १ रू वापस मिळाल्यामूळे तिघांनी खरे पाहता २४ रूं च दिले आहेत.
म्हणजेच २४ x 3 = 72 + त्या वेटर कडे २ रू. = ७४ .. ??? कसे काय.

ह्या लोकांनी तर ७५ दिले होते ना ? मग इथली बेरीज ७४ कशी होतेय ?

१ रू कुठे गेला ?
---------------------

उत्तराबरोबर अशा प्रकारची गफलत होण्यामागची मुख्य कारणे काय असावीत हे जर नमूद केले तर आणखीणच बरे.

लेखनविषय: दुवे:

Comments

चुका

कोड्यात काही चुका असाव्यात. त्या विसरून. त्यांचे बिल ७० रु झाले होते व त्यांनी २५ रु प्रत्येकी दिले (म्हणून मालकाने ५ रु परत केले).

मुळात बिल ७०/३ झाले होते= २३.३३३३ पैसे (२५ नव्हे)

त्या ऐवजी त्यांनी २४ रु दिले म्हणून तिघांनी प्रत्येकी ६६.६६ पैसे जास्त दिले म्हणजे ६६.६६ गुणिले ३ = २०० पैसे (२ रु) जास्त दिले ते वेटरने खाल्ले.

२४ गुणिले ३ या गुणाकारात वेटरकडचे २ रु इन्क्लूडेड आहेत.

नितिन थत्ते

कुठल्या?

>>कोड्यात काही चुका असाव्यात.

काय चुका?
---------------------
-धनंजय कुलकर्णी

२ रु

२४ गुणिले ३ या गुणाकारात वेटरकडचे २ रु इन्क्लूडेड आहेत.
>> +१

८ वी पास

हेच तुम्ही ८ वी पास मुलाला कसे सम्जावताल ?
---------------------
-धनंजय कुलकर्णी

बिल ७०च रुपये.

बिल ७०च रु झाले होते हे आठवीतल्या मुलाला समजेलच
तेवढेच समजले की बाकी सरळसोट आहे.

मग ते २ रु ७२ रुपयांत आहेतच.

नितिन थत्ते

:)

छान ...
---------------------
-धनंजय कुलकर्णी

शब्द

दुसर्‍या शब्दात....

तिघांनी प्रत्येकी २४ रु प्रमाणे ७२ रु खर्च केले त्यातले ७० हॉटेल मालकाने घेतले आणि २रु वेटरने घेतले. म्हणजे वेटरने घेतलेले २ रु ७२ मध्ये आहेतच.

नितिन थत्ते

हा हिशेब..

हा हिशेब सर्वजन करतात. पण जेंव्हा त्यांना वरील कोडे विचारले जाते तेंव्हा त्याचे उत्तर सापडत नाही.

---------------------
-धनंजय कुलकर्णी

वेटर कडचे २ रू बिलात आहेत

गणित करतांना आपण चुकतो.

तीन मित्र एका हॉटेलात जातात. प्रत्येकी २५रू त्यांना बिल येते. एकूण रक्कम = ७५
वेटर ते पैसे घेउन मालकाकडे जातो. मालक ५ रू वापस देतो.

वेटर स्वता:कडे २ रू ठेवतो आणि तीघांना प्रत्येकी १ रू देतो.

आता इथे : १ रू वापस मिळाल्यामूळे तिघांनी खरे पाहता २४ रूं च दिले आहेत.
म्हणजेच २४ x 3 = 72 + त्या वेटर कडे २ रू. = ७४ .. ??? कसे काय.

उत्तर

वेटर कडचे २ रू बिलात आहेत

तेव्हा
२४ x 3 = 72 (त्या वेटर कडे २ रू. धरुन)+ परत मिळालेले ३ रू=७५

ह्या लोकांनी तर ७५ दिले होते..( ३/- परत मिळालेले ७५-३=७२ ) बिल ७२/-

१००० रूपये

थत्ते यांना १००० रुपये द्यावेत अशी धक्का यांना विनंती केल्या जावी.

विनंती फॉर्म भरा :)

फॉर्म कि. १००१ :-)

असो.. श्रीयुत थत्ते यांचे १००१ वेळेस अभिनंदन !!

---------------------
-धनंजय कुलकर्णी

:)

पांढर्‍यात -
२४ गुणिले ३ या गुणाकारात वेटरकडचे २ रु इन्क्लूडेड आहेत... हे छान उत्तर.

श्री. नितीन यांना प्रतिसाद होता हा.
---------------------
-धनंजय कुलकर्णी

वेटर कडचे २ रू बिलात आहेत.

गणित करतांना आपण चुकतो.

तीन मित्र एका हॉटेलात जातात. प्रत्येकी २५रू त्यांना बिल येते. एकूण रक्कम = ७५
वेटर ते पैसे घेउन मालकाकडे जातो. मालक ५ रू वापस देतो.

वेटर स्वता:कडे २ रू ठेवतो आणि तीघांना प्रत्येकी १ रू देतो.

आता इथे : १ रू वापस मिळाल्यामूळे तिघांनी खरे पाहता २४ रूं च दिले आहेत.
म्हणजेच २४ x 3 = 72 + त्या वेटर कडे २ रू. = ७४ .. ??? कसे काय.

उत्तर

वेटर कडचे २ रू बिलात आहेत

तेव्हा
२४ x 3 = 72 (त्या वेटर कडे २ रू. धरुन)+ परत मिळालेले ३ रू=७५

ह्या लोकांनी तर ७५ दिले होते..( ३/- परत मिळालेले ७५-३=७२ ) बिल ७२/-

छान...

कसे सांगाल ८ पास ला हेच ? २४*३ मधे वेटरचे २ रू आहेत् हे त्याला कसे पटावून द्यायचे ? :)

---------------------
-धनंजय कुलकर्णी

क्रेडिट आणि डेबिट एन्ट्रीज

कॉमर्सचे प्राथमिक ज्ञान असलेला मुलगा कोणाचे पैसे गेले आणि कोणाला पैसे मिळाले याचा बरोबर हिशेब ठेवेल आणि त्यात अशी गल्लत करणार नाही
पैसे गेले = २४ गुणिले ३ = ७२
पैसे मिळाले : मालकाला ७० + वेटरला २ = ७२
हिशोब संपला.
७५ हा आकडा अप्रस्तुत आहे.

त्याचा हिशोब मांडायचाच झाला तर असा होईल
एकंदर बिल : ७५
मालकाला मिळाले : ७० + मालकाने दिलेली सूट : ५ = ७५
यात नोकराचा संबंध येत नाही

कुणाला?

आता इथे : १ रू वापस मिळाल्यामूळे तिघांनी खरे पाहता २४ रूं च दिले आहेत.

इथे, 'तिघांनी २४ रुपये कुणाला दिले आहेत?' असा प्रश्न विचारुन पाहिला आणि त्याचे उत्तर शोधताना कोडे सुटले.

पांढर्‍या शाईमधे उत्तर न लिहिता ठळकपणे लिहिण्याच्या आगाऊपणा बद्दल थत्त्यांचा सौम्य निषेध.

माझे उत्तर!

तीन मित्र एका हॉटेलात जातात. प्रत्येकी २५रू त्यांना बिल येते. बिलाची एकूण रक्कम = ७५ होते. मित्रातील एक जण ८० रुपये बीलाच्या ताटलीत ठेवतो.
वेटर ते पैसे घेउन मालकाकडे जातो. मालक ५ रू वापस देतो.
इथ पर्यंत सगळे ठिक वाटते. पण..

वेटर स्वता:कडे २ रू ठेवतो आणि तीघांना प्रत्येकी १ रू देतो.
मला ह्या वाक्यात चूक दिसते. वेटर स्वतःकडे आधीच कसे काय पैसे ठेवतो? बडीशेपच्या ताटलीत २ रुपये ठेवले असे मानले तर ३ रुपये परत मिळत आहेत. मग बाकीची डोकेफोड कशासाठी आहे? हे कळले नाही.

गमतीदार फसवेगिरी

ही शब्दांशब्दांतली फसवेगिरी मोठी गमतीदार आहे. उत्तर सोपे असल्याकारणाने पुन्हा देत नाही. पण या कोड्याने आपण कधीकधी कसे काय फसतो याचे संभाव्य कारण बघूया.

हॉटेलात बिलाकरिता ३ मित्र पंचवीस-पंचवीस असे ७५ रुपये नोकराला देतात. मालक नोकराला २५ रुपये परत करतो. नोकर १०रुपये खिशात ठेवतो, आणि मित्रांना पाच-पाच रुपये देतो.
आता इथे : ५ रू वापस मिळाल्यामूळे तिघांनी खरे पाहता २० रूं च दिले आहेत.
म्हणजेच २० x ३ = ६० + त्या वेटर कडे १० रू. = ७० .. ??? कसे काय.

हॉटेलात बिलाकरिता ३ मित्र पंचवीस-पंचवीस असे ७५ रुपये नोकराला देतात. मालक मित्रांचा आप्त असतो, आणि त्या दिवशी त्यांना फुकटाची पार्टी द्यायचे मालक ठरवतो. नोकराला ७५ रुपये परत करतो. नोकर ७५रुपये खिशात ठेवतो, आणि मित्रांना शून्य-शून्य रुपये देतो.
आता इथे : ० रू वापस मिळाल्यामूळे तिघांनी खरे पाहता २५ रूं च दिले आहेत.
म्हणजेच २५ x ३ = ७५ + त्या वेटर कडे ७५ रू. = १५० .. ??? कसे काय.

वरील पहिल्या उदाहरणात आपण फसल्यास क्षणभरच फसू, आणि शेवटच्या उदाहरणात बहुतेक कोणीच फसणार नाही.
यावरून लेखामध्ये लिहिलेल्या उदाहरणात आपल्याला फसवणारी बाब काय आहे, हे चटकन लक्षात यावे.

छान ... एकदम मस्त

एकदम अपेक्षित उत्तर.

गफलतीचं मुख्य कारण म्हणजे ७५ आणि ७४ हा आकडा होयं. जर इथे तुम्ही सांगीतल्या प्रमाणे ७५ आणि १५० असं असत तर कदाचीत
सर्वांना लगेच कळलं असत गफलत कुठे होते ते.

अवांतर : मी हेच त्या मित्राला सांगीतल होतं शेवटी.

---------------------
-धनंजय कुलकर्णी

गफलत बिफलत काही नाही.

गफलत बिफलत काही नाही. मला तरी वाटते. तीघे मित्र पैशाला चिकट होते, मनाने दळीद्री होते. एकमेकांचे मित्र म्हणवत एकत्र खावून झाल्यानंतर बील देताना सगळ्यांनी आप-आपले पैसे द्यायचे ठरले असावे म्हणजे प्रत्येकी २५/-. देताना एकाच मित्राने ८० रुपये देय म्हणून दिले. ५ रुपये परत आल्यानंतर वेटरला कमीत-कमी टिप कीती द्यायची? हे सुचले नसल्यामुळे सगळ्यात दळीद्री असलेल्या व्यक्तीच्या मनात हे कोडे जन्माला आले.

नाही हो ..

असं काहीही झालेलं नाहीये .

---------------------
-धनंजय कुलकर्णी

 
^ वर