उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
पारितोषिके सन्मान इत्यादि
रज
April 9, 2011 - 12:47 pm
सध्या क्रिकेट फारच लोकप्रिय झाले आहे.
समाजातिल इतर अनेक व्यवसाइक अधिक उपयुक्त व सातत्याने योगदान करीत असतिल.पण् क्रिकेटवीराना पैसे मान तसेच सरकारी
बक्षिसे अव्वा च्या सव्वा मिळतात असे वाटते.त्या मानाने कारगिल योध्दे २६/११ कमान्डो याना जवळ् जवळ् दुर्लक्षित् केले जाते.
तसेच भारत रत्न हे देशासाठि त्याग केल्याशिवाय एखाद्यास देणे अयोग्य वाटते.
सवन्ग लोकप्रियता उन्माद हेच निकष ठरु पहात आहेत
कृपया मते माण्डावीत.
दुवे:
Comments
असहमत
सध्या? माझ्या लहानपणीही क्रिकेटच लोकप्रिय होते.
कमांडो आणि क्रिकेटर्स यांचा भारतीय नागरिक हा एकमेव बांधणारा दुवा सोडला तर कोणताही संबंध नाही.
भारतरत्न हा नागरी पुरस्कार आहे. त्या त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत गुणांसाठी तो पुरस्कार दिला जातो. त्याग-बिग या भावनांशी त्याचा संबंध नाही. लता मंगेशकर, भीमसेन जोशी, बिसमिल्ला खान, रविशंकर, अमर्त्य सेन आणि इतर लोकांनी भारतासाठी त्याग वगैरे केलेले नसण्याची शक्यता आहे. भारतीय सैन्याला अशोकचक्र, परमवीरचक्र वगैरे सैन्याशी /शौर्याशी/ त्यागाशी संबंधित पुरस्कार दिले जातात.
सवंग चर्चा ही उपक्रमाचा निकष बनू नये एवढीच तूर्तास इच्छा आहे.
क्रिकेट
क्रिकेट हा सध्या अतिरेक होउ पाहेत हे खरे आहे. ह्यात सवंग काय हे कळले नाही.