तर्कक्रीडा १२:शाब्दिक

तर्कक्रीडा १२ : यावेळी गणिती कोडे नाही. केवळ शाब्दिक आहे. इथे शोधसूत्रे(क्ल्यूज) दिली आहेत.प्रत्येक सूत्रानुसार शब्द शोधायचा आहे.कंसस्थ संख्या शब्दातील अक्षरे किती ते दर्शविते.इंग्रजीतील गूढ शब्दकोडी (क्रिप्टिक क्रॉसवर्डस् )ज्यांनी सोडविली असतील त्यांना हे अपरिचित आणि विचित्र वाटणार नाही.
*******
.....१.वेगवान मेघ कोणता?...(३)
.....२.किरकोळ नसलेली मारपीट कोणती?...(२)
.....३.हा पक्षी ध्यानात रहातो.....(३)
.....४.व्याकरणाशी संबंधित असे श्रीरामाचे गुणविशेषण....(५)
.....५.अज्ञातवासी भीमाचे हे कृत्य नाट्यमय आहे....(५)
.....६.या शब्दाचा अर्थ सोपा आहे....(३)
.....७.साप टाकून देतात तर माणसे चावतात अशी ही गोष्ट....(२)
.....८.हा शब्द म्हणजे इंग्रजीत भवन तर मराठीत हवन......(२)
.....९.विश्रांतीचा क्रमांक कितवा?......(३)
.....१०.अंतकाळी राम जवळ असूनही याने लक्ष्मणाचाच धावा केला.....(३)
.....११.देवांसाठी मादक पेय तर माणसांसाठी घातक शस्त्र......(२)
......१२.कवितेत अशा प्रकारची संक्या कोणती?......(२)
......१३.गर्धभाशी बरोबरी केली जाते तो विधी.....(३)
.....१४.शून्यावस्थेतील आदर कोणता?.....(४)
.....१५.या येरझार्‍यां साठी बदल कराच!....(३)
......१६.नावास वेगळे रूप द्यावे अशी इच्छा....(३)
.......१७. औषधी वनस्पती साठी ही परंपरागत रूढ पद्धती आहे.....(४)
.......१८.बालकाला बोलका करता येईल असे चिह्न आहे....(२)
......१९.हे दृश्य प्रेक्षणीय दिसले तरी ते अधःपतनच! .....(४)
......२०.एका अर्थी दान करतो तर दुसर्‍या अर्थी यांत्रिक गुंतवणूक करतो तो कोण?.....(२)

****क्र.२चे उत्तर ....ठोक. तर क्र.३चे ...बगळा आहे.

..........यनावाला.

लेखनविषय: दुवे:

Comments

माझे उत्तर!

१ पांढरा
४ एकवचनी
५ कीचकवध
६ सुलभ, सहज
७ कात
८ होम
११ सुरा
१७ आयुर्वेद

अजून काही उत्तरे!

१० मारिच
१३ विवाह
१४ श्रध्दांजली
१९ खोल दरी

अरे हो !

तो कुटील रावण बंधू मारिचच होता :)
धन्यवाद. उत्तर मिळाले !

राज जैन

काहीतरी करावे हा विचार मनात असणे म्हणजेच तुम्ही जिवंत आहात ह्याचे लक्षण आहे !!! काय म्हणता !

उत्तरे !

३. कावळा
५. कीचकवध (अत्यानंद रावानी उत्तर दीले आहे)
६.अत्यानंद रावानी उत्तर दीले आहे
७. अत्यानंद रावानी उत्तर दीले आहे
८.अत्यानंद रावानी उत्तर दीले आहे
१०. उत्तर मला ही हवे आहे :)
११.अत्यानंद रावानी उत्तर दीले आहे
१८. ओठ
१९. सुर्यास्त (त वेगळा पकडला आहे सोयी नुसार) / पराजय बरोबर आहे का ? (विजेत्याला प्रेक्षणीय )

उत्तर तीन बगळा च का ? कावळा का नाही ? कावळ्याने मला खुप त्रास दिला आहे एकेकाळी ;)

आमच्या अल्पबुध्दीनूसार आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे ..पहीलाच प्रयत्न आहे असे काही लिहण्याचा.

एक सुचना : अशी उत्तरे प्रतिसादातून न मागता व्य. नी. तून ह्यावीत जेणे करुन सर्वानाच समान सहभाग घेता येईल... जसे आज अत्यानंद रावांनी लवकरच काही उत्तरे दिली त्यामुळे माझ्या सारखे अल्पबुध्दीधारी व्यक्ती असे लिहूनच मोकळे होणार "अत्यानंद रावानी उत्तर दीले आहे " आपले डोके चालवणार नाहीत असे वाटते... पाहा सुचना उपयोगी आहे वापरुन पाहा एकदा ;)

राज जैन

काहीतरी करावे हा विचार मनात असणे म्हणजेच तुम्ही जिवंत आहात ह्याचे लक्षण आहे !!! काय म्हणता !

तर्क.१२.शाब्दिक

श्री.राज जैन यांची
एक सूचना : अशी उत्तरे प्रतिसादातून न मागता व्य. नी. तून ह्यावीत जेणे करुन सर्वानाच समान सहभाग घेता येईल. ही अगदी योग्य आहे असे वाटते. तरी सर्वांनी विचार करावा.
......यनावाला.

चालेल चालेल

नाहीतरी आपल्या आधी दुस-यानी सोडवलं कोडं, की मूड थोडा जातोच !!

धन्यवाद.

आपल्या सारख्या व्यक्तिना माझे बीनमोलाचे शब्द उपयोगपुर्ण वाटले हेच महत्वाचे !

धन्यवाद,

राज जैन

माझी (काही) उत्तरे

१. जलद
२. ठोक
३. बगळा
४. एकवचनी
५. किचकवध
६. सहज
७. कात
८. होम
९. विसावा
१०. मारिच (हे चुकतयं असं असं राहून राहून का वाटतय?)
११. सुरा
१२. ऐशी
१३.
१४. पूज्य
१५. चकरा
१६. वासना
१७
१८. मात्रा
१९. धबधबा ???
२०

बाकिचे सुचतील तसतसे -----

आणखी काही

६. सुलभ (?)
१३. कायदा
२०. दाता

सहमत

१३ च्या उत्तराशी सहमत !!

आत्तापर्यंत

जलद, ठोक, बगळा, , कीचकवध, , कात, होम, विसावा, मारिच, सुरा, ऐशी, , पूज्य, चकरा, वासना, , मात्रा, , दाता

१३व्याचे कायदा हे उत्तर आवडले. (अमित)
४थ्याचे एकवचनी असे सुचत होते, पण एकवचनी श्रीराम म्हणजे काय? हे सुचले, पटले नाही.
६व्याची अनेक उत्तरे आहेत. तिथे अर्थावर नि सोप्यावर श्लेष आहे अशी शंका आहे.
१७व्याचे उत्तर एखाद्या वनस्पतीचे नाव, 'वसा' ने संपणारे असावे असा अंदाज.
१९व्याचे धबधबा हे उत्तर छानच. (आवडाबाई) काहीतरी 'पात' असावे असे मला वाटले होते.

दाता?

यांत्रिक गुंतवणुकीशी संबंध नाही समजला :-(

दातेरी चाक

गिअर म्हणजे मराठीत दातेरी चाक. त्याचा एक दात, टूथ म्हणजे दाता.

एकवचनी

मृदुला यांस,

श्रीराम हा एकपत्‍नी, एकबाणी,एकवचनी होता असे रामायणात म्हटले आहे.
......रामो द्विर्नाभिभाषते । . एकदा शब्द दिला की दिला. मग अन्यथा होणे नाही.
२/..शोधसूत्र ६ विषयींचा तुमचा तर्क अगदी बरोबर आहे. त्याचे उत्तर 'ओसरी' असे आहे. (सोपा--->घरापुढील ओसरी.) पण त्याचे शोधसूत्र देताना मात्र चूक झाली एवढे खरे.ते असे हवे होते:
....... हे नाम असून या शब्दाचा अर्थ सोपा आहे.. मग 'सुलभ'इ.विशे षणे टळली असती.

शब्द पाळलात

मागच्या कोड्याच्या वेळी दिलेला शब्द पाळलात हं, यनावाला !! (....आता अधिक अवघड कोड्यांचा विचार करायला हवा.)
सकाळपासून विचार करायला सुरुवात केली ते अजूनही चालूच आहे (अजूनही एक-दोन गोष्टी आल्या नाहियेत)
आता अजून अवघड येऊ द्या !!

उत्तर

सब्स्टिट्यूट यनावाला,

उत्तर टाकले आहे.

तर्क.१२ उत्तर

या कोड्याला अत्त्यानंद,राज जैन,आवडाबाई,अमित आणि मृदुला यांचा प्रतिसाद लाभला.
बहुतेकांनी योग्यशब्द शोधले. मृदुला यांना अशा तर्‍हेच्या कोड्याचे मर्मच समजले आहे.( कदाचित अशा प्रकारच्या इंग्रजी कोड्याशी त्यांचा परिचय असावा.) कारण त्यांनी 'दाता' शब्द् शोधला.तसेच 'सोपा'(ओसरी) या विषयी रास्त शंका काढली.एकच सूत्र अनुत्तरित राहिले. ते असे:
***औषधी वनस्पती साठी ही परंपरा आहे. ...याचे उत्तर 'परिपाठ' असे आहे. परिपाठ हे एक औषधी झुडुप आहे.(परिपाठादि काढा) .परिपाठाचा दुसरा अर्थ बहुपरिचित आहे.
असो. आणखी शाब्दिक कोडी पुन्हा कधीतरी.
........यनावाला.

तर्कक्रीडा

मोहन पाठक
११.सुरा
१७ आयुर्वेद

 
^ वर