दूध का दूध, पानी का पानी...
आपल्या देशातील जनता जनार्दनांचे साक्षरतेचे प्रमाण जसजसे वाढत आहे त्याच प्रमाणात समाजातील अंधश्रद्धाही वाढत आहेत, असे विधान केल्यास गैर होणार नाही. साक्षरांची (सुशिक्षितांची नव्हे!) संख्या जशी वाढत आहे त्याच अनुषंगाने वाचनाची भूकही वाढत आहे. परंतु या नवसाक्षरांच्या हातात योग्य प्रकारचे वाचनीय साहित्य पडत नसल्यामुळे ते काहीबाही वाचून आपली भूक मिटवतात. अशा साहित्यात बहुतांश वेळा अंधश्रद्धेला खत पाणी घालणारे साहित्यच जास्त प्रमाणात असते. वाचनाची भूक भागविण्यासाठी मुद्रित माध्यमं आटोकाट प्रयत्न करत असून त्यात वृत्तपत्रं आघाडीवर आहेत. कमीत कमी पैशात भरपूर काहीतरी वाचायला मिळते हा एवढाच निकष वृत्तपत्राच्या प्रचंड खपाला कारणीभूत ठरत आहे. भरपूर काही देण्याच्या भरात वृत्तपत्रं, जाहिरातींची जागा संपल्यानंतर उरलेल्या जागेतील रकान्यात काहीबाही लिहून रकाने भरत आहेत. वाचणारे मात्र मुद्रित झालेल्या सर्व गोष्टी प्रमाण मानून आकलन करून घेतात. रकान्यांच्या भरतीसाठी अनेक सदरं लिहिली जात असतात. त्या सदरांपैकी भविष्य विषय हा सर्वात आवडता व सर्वांना आवडणारा विषय ठरत आहे. दैनंदिन, साप्ताहिक, मासिक वा वार्षिक भविष्य असे रतीब घातले जात असते. जगातील मानव सृष्टीला जन्मलेल्या वेळेवरून बारा राशीत विभागून यानंतर काय घडणार आहे, कशामुळे घडणार आहे, चांगले का होणार, वाईट काय होणार, यांचा आकाशस्थ ग्रह - तार्यांच्या आधारे केलेली विधानं वाचताना या घटना आपल्या आयुष्यात नक्कीच घडणार यावर विश्वास ठेवणारे लाखोनी - नव्हे, करोडोनी - असतील. यात केवळ मानसिक समाधान, उत्सुकतेपोटी वा विरंगुळा हा प्रकार नसून त्यातील प्रत्येक शब्दाला अत्यंत गंभीरपणाने घेणारे, ज्या होरारत्नाने हे लिहिले आहे त्याचा (किंवा आणखी कुठल्यातरी फलजोतिषीचा) मागोवा घेऊन आणखी विस्तृतपणे भविष्य जाणून घेणारे महाभाग कमी नसावेत. (म्हणूनच या धंद्याला बरकत आलेली दिसते!) दैववाद खोटा आहे, आकाशातील ग्रह - तार्यांचा वैयक्तिक जीवनावर परिणाम होत नसतो, असे कितीही ओरडून सांगितले तरीही फलजोतिषावर विश्वास (श्रद्धा!) ठेवणार्यांच्या संख्येत लक्षणीय प्रमाणात वाढ झालेली आहे. याविषयी भरपूर सैद्धांतिक पुरावे देवूनसुद्धा ग्रह - तार्यांची कुंडली मांडून तुमच्या आयुष्याला कलाटणी देण्याची भाषा करणारे तसूभरही मागे हटायला तयार नाहीत. याबाबतीत तरी मागणी तसा पुरवठा हे तत्व सिद्ध होत आहे. हे होरारत्न फलजोतिष्य व तत्सम गोष्टी नैसर्गिक शास्त्र (?) आहेत, या गणितीय सूत्रांच्या आधारे सिद्ध करता येतात, यांच्यामागे 4000 वर्षांची उज्वल परंपरा आहे, त्यामागे ऋषी-मुनींची तपस्या आहे, जरी आमच्यातल्या एखाद्याचे निदान चुकले तरी शास्त्र खोटे ठरत नाही, असे काहीबाही सांगत, वितंडवाद घालत समोरच्याचे तोंड बंद करत असतात. (निखिल वागळेसुद्धा यांच्या मुलुख मैदानी तोफेपुढे टिकेल की नाही याबद्दल शंका आहेत.) संख्याशास्त्रीय नियमाप्रमाणे 10-12 विधानांपैकी 50 टक्के विधानं चुकून खर्या ठरल्यातरी खर्या ठरलेल्या विधानांमागे फार मोठा शास्त्रीय आधार असून ते फक्त आम्हीच जाणतो असे म्हणत स्वत:ची पाठ थोपटवून घेणार्यांची संख्या कमी नाही. व यांना मूकसंमती देणार्यांचीसुद्धा!
याचबरोबर या भविष्यवेत्त्यांचा आग्रह असतो की जी काही चाचणी, प्रयोग वा सत्यशोधन करायचे असतील ते तुम्ही, तुमच्या पैशाने व श्रमाने करा. (अनुभव घ्या!) कारण आमचे विधान दगडावरील रेघ आहे. कदाचित तुमच्या चाचणीचे निष्कर्ष आमच्या विरोधात गेल्यास 'तुमची चाचणीच चुकीची होती' असे म्हणण्यास व निष्कर्ष आमच्या विधानांशी जुळत असल्यास 'बघा, आम्ही सांगत नव्हतो का? 'असे म्हणावयास आम्ही मोकळे! खरे पाहता कुठलेही धाडसी विधान करणार्यानी आपल्या विधानाची सत्यासत्यता स्वत: तपासून शंका घेणार्यांचे समाधान करून त्याची जबाबदारी घेणे अपेक्षित असते. येथे मात्र चोराच्या उलट्या बोंबा! म्हणूनच कदाचित शहाणी माणसं या लोकांच्या फंदात पडत नसावेत!
तरीसुद्धा काही चिकित्सक वा वैज्ञानिक वेळोवेळी, काही कारणानिमित्त फलजोतिष्याच्या विश्वासार्हतेविषयी शंका घेत, आपला श्रम, वेळ व पैसा वाया घालवत काही प्रयोग वा चाचण्या सुचवत असतात. अशा शंकेखोरापैकी रिचर्ड वाइजमन हा मनोवैज्ञानिकही आहे. रिचर्ड वाइजमन आपल्या दैनंदिन जीवनामागील विज्ञानाचा शोध घेण्याच्या प्रयत्नात असताना
- मानवी व्यवहारावर जन्म वेळ वा जन्म तारखेचा काही परिणाम होतो का,
- जुगार खेळताना काही अज्ञात शक्ती जिंकणार्याला मदत करत असतात का,
- अशक्यातल्या अशक्य वाटणार्या गोष्टींवर चटकन विश्वास ठेवण्याइतपत आपली मजल का जाते,
- आपण घेत असलेल्या प्रत्येक छोट्या मोठ्या निर्णयामागे वैचारिक वा वैज्ञानिक आधार असू शकतो की केवळ उत्स्फूर्तपणा,
- माणसाच्या विनोदबुद्धीमागील मनोवैज्ञानिकता काय असेल.
इत्यादीविषयी संशोधन करून त्याने Quirkology (चक्रमशास्त्र) हे पुस्तक लिहिले आहे. फलजोतिषामुळे खरोखरच जीवनात उलथापालथ होऊ शकते का याविषयी त्याला आलेले मजेशीर अनुभव सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच!
वृत्तपत्रातील अनेक (निरुपयोगी!) सदरांपैकी गुंतवणूक सल्लागारांचे सदरही फलजोतिषाएवढेच लोकप्रिय ठरत आहे. दुर्बोध शब्द वापरून अगम्य भाषेतील गुंतवणुकीच्या सल्ल्याविषयी वाचत असताना आपण गुंतविलेल्या पैशाचे नेमके काय होणार हे शेवटपर्यंत कळत नाही. यांच्याच जोडीला आजकाल गुंतवणूक फलजोतिषी (Investment astrologer) अशी एक नवीन जात निर्माण झाली आहे. कंपनीच्या ताळेबंदाऐवजी कंपनी स्थापन झालेली वेळ, कंपनीच्या नावातील अक्षरं, कंपनीच्या दरवाज्याची दिशा, .. इ.इ. वरून हे जोतिषी कुंडली मांडून कंपनीच्या आर्थिक स्थितीगतीविषयी ठोकताळे बांधून सल्ला देतात. माणसांने कितीही नाकारले तरी त्याच्या श्रद्धा व विश्वास पैशाच्या व्यवहाराशीच निगडित असतात, हे मात्र खरे. जो कुणी त्याला अधिक आर्थिक लाभ करून देतो तो त्याच्या गळ्यातला ताइत बनतो. (व त्या 'सिद्धांता'वर वा त्या 'शास्त्रा'वर त्याचा विश्वासही बसतो!) मग तो गुंतवणूक सल्लागार असो की, गुंतवणूक फलजोतिषी असो की, कुडबुड्या जोतिषी, फुटपाथवरचा पोपटवाला, मटक्याचे आकडे देणारा वेडा, वा रेसचा घोडा.... सब घोडे बारा टके!
गुंतवणूक फलजोतिषी व गुंतवणूक सल्लागार यांच्या सल्ल्यानुसार आपण काही रक्कम शेअरबाजारात गुंतवल्यास आठवड्याच्या शेवटी जो जास्त कमाई करून देतो त्याच्या शास्त्राला वा अभ्यासाला काही आधार आहे असे म्हणावयास हरकत नसावी या गृहितकाची सत्यासत्यता तपासण्यासाठी वाइजमन प्रयोगाच्या तयारीला लागतो. मुळात आपल्या (अ) ज्ञानाची चाचणी करून घेण्यास सहसा कुठलाही जोतिषी सहजासहजी तयार होत नाही, हा बहुतेकांचा अनुभव आहे. तसाच अनुभव वाइजमनलासुद्धा आला. शेवटी अथक प्रयत्नानंतर गुंतवणुकीच्या क्षेत्रातील एक महिला जोतिषी चाचणीला तयार झाल्या. त्या तुलनेने स्वयंघोषित गुंतवणूक सल्लागारांचा तुटवडा भासला नाही. ते नेहमीच एका पायावर (योग्य फी दिल्यानंतर!) सल्ला द्यायला तयार असतात. वृत्तपत्रात सदर लिहिणार्या अशाच एका गुंतवणूक सल्लागाराशी वाइजमनने संपर्क साधला.
वाइजमनला या गुंतवणुकीच्या व्यवहारात केवळ अभ्यास वा तथाकथित शास्त्र यांच्या ठोकताळ्यापेक्षा randomnessला (यदृच्छता) जास्त वाव आहे असे वाटत होते. म्हणूनच randomnessची चाचणी घेण्याच्या दृष्टीने आपल्या मित्राच्या चार वर्षाच्या थिया या मुलीला भरपूर चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून प्रयोगात सामील करून घेतले.
दीड लाख ब्रिटिश पौंडपैकी प्रत्येकी 50 हजार ब्रिटिश पौंडप्रमाणे आपापले हिशोब मांडून कुठल्याही कंपनीच्या समभागात notionally पैसे गुंतविण्याची मुभा त्या दोघांना दिली होती. खरेदी दराप्रमाणे विकत घेतलेले समभाग आठवड्याच्या शेवटी त्या दिवसाच्या विक्री दराप्रमाणे विकून किती पैसे मिळतात या हिशोबावरून क्रमवारी ठरवायचे यावर प्रत्येकाचे एकमत झाले. जास्तीत जास्त फायदा वा कमीत कमी नुकसान करणारा क्रमांक एकवर असेल, याबद्दल कुणाचेही दुमत नव्हते. स्टॉक एक्स्चेंजवरील आघाडीच्या शंभर कंपन्यांच्या (व त्यांच्या CEOच्यां!) कुंडल्यांचा अभ्यास करून, शेअर्सच्या खरेदीची मुहुर्ताची वेळ ठरवून गुंतवणूक फलजोतिषीने आयटी, औषधी, स्टील व काही बॅंका यांचे 50 हजाराचे समभाग घेतले. आर्थिक सल्लागारानेसुद्धा आपल्या पूर्वानुभवाच्या जोरावर व कंपन्यांचा मागील कामगिरीनुसार काही आघाडीच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली.
वाइजमनला या चार वर्षे वयाच्या थियाद्वारे randomly कंपन्या निवडून त्यांचे समभाग विकत घ्यायचे होते. चाचणीत सहभागी झालेल्या या सल्लागाराबरोबरच इतर काही मित्रांच्या समोर एकेका चिठ्ठीवर शंभरेक कंपऩ्यांची नावे लिहून तो एका उंच शिडीवर चढला. एका हाताने शिडी पकडून दुसर्या हातातील चिठ्ठ्या एकेक करून खाली टाकू लागला. थियाने त्यातील पाच चिठ्ठ्या हवेतच पकडून वाइजमनच्या हातात दिले. चॉकलेट खात खात ती खेळायला गेली. थियाने उचललेल्या चिठ्ठीत बँक, शीतपेयाची कंपनी, म्युच्युअल फंड, सुपरमार्केट व विमा कंपनी यांची नावे होती. समप्रमाणात या पाची कंपन्यामध्ये त्यानी 50 हजाराची गुंतवणूक केली. वाटल्यास पुढील 2-3 दिवसात कंपन्या बदलण्याची मुभा सल्लागारांना दिली होती. त्याप्रमाणे गुंतवणूक फलजोतिषीने पुन्हा एकदा कुंडल्या मांडून काही शेअर्स विकले व काही विकत घेतले. आर्थिक सल्लागाराने मात्र काही बदल केला नाही. वाइजमनला (वा थियाला) त्याची गरज वाटली नाही.
एका आठवड्यानंतर सर्व जण एकत्र आले. त्या दिवशीच्या शेअरबाजाराच्या विक्री दराप्रमाणे सर्व समभागांची notionally विक्री केली. खरे पाहता शेअरबाजाराला हा आठवडा फारच वाइट गेला होता. निर्देशांक 6 टक्क्यानी घसरला होता. शेअर्सचे भाव कोसळले होते. अनेक गुंतवणूकदारांचे लाखोनी नुकसान झाले होते. अशा वेळी कोण किती कमी नुकसान करणार यावर क्रम देण्याचे ठरविले. सगळ्यात जास्त नुकसान (10.1%) गुंतवणूक फलजोतिषीच्या व्यवहारात झाले होते. त्यानंतरचा क्रमांक गुंतवणूक सल्लागाराचा होता (7.1%). सर्वात कमी नुकसान चारवर्षाच्या थियाने निवडलेल्या कंपन्यातील समभागामुळे झाले होते (4.6%). पत्रकार परिषदेत नेहमीप्रमाणे गुंतवणूक सल्लागाराने कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. (Other people's money!) गुंतवणूक फलजोतिषी मात्र मकर राशीतील थियाशी माझी स्पर्धा आहे हे अगोदरच माहित असते तर कदाचित मी या चाचणीत भागच घेतले नसते असे काही तरी बोलून सावरण्याचा प्रयत्न केला. थियाला या कुठल्याही गोष्टीशी काहीही देणेघेणे नव्हते.
चाचणीचे निष्कर्ष दुसर्या दिवशीच्या वृत्तपत्रांमध्ये ठळक मथळ्यात प्रसिद्ध झाले. अर्धपान भरून बातमी आली. टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज म्हणून प्रसिद्धी मिळाली. टीव्हीवरील तथाकथित तज्ञमंडळी विश्लेषण करू लागले. सर्वांच्या तोंडी थियाचे नाव होते. ती मात्र अंथरुणात लोळत होती.
कदाचित गुंतवणुकीचे सकारात्मक परिणामासाठी एक आठवडा हा वेळ नक्कीच कमी असावा. म्हणून notional गुंतवणुकीच्या या प्रयोगाचे निष्कर्ष एका वर्षानंतर काढण्याचे ठरविले. सल्लागाराची वा फलजोतिषीची याला हरकत नव्हती. वर्षाच्या शेवटी शेअरबाजार यथातथाच होता. जागतिक मंदीमुळे घसरण थांबली नव्हती. परंतु वर्षभरात समभागाची ट्रेडिंग न केल्यामुळे पुन्हा एकदा त्यांचे बाजारमूल्य काढण्यात आले. या वेळी मात्र जो फरक होता, तो धक्कादायक ठरला. गुंतवणूक सल्लागाराने मूळ गुंतवणुकीवर 46.2 टक्के नुकसान केले होते. त्यातुलनेने फलजोतिषीने केलेले नुकसान फक्त 6.2 टक्के होते. परंतु random रीतीने मुलीच्या सांगण्यावरून घेतलेल्या समभागातील गुंतवणुकीमुळे मंदीच्या काळातसुद्धा चक्क 5.8 टक्के फायदा झाला होता!
यावरून दूध कुठले व पाणी कुठले हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
या चाचणीचे निष्कर्ष केवळ अपवाद म्हणून बघण्यातही हशील नाही. अशाच प्रकारची स्पर्धा सर्कशीतील चिंपांझी व गुंतवणूक सल्लागार यांच्यात स्टॉकहोम स्टॉक एक्स्चेंज मध्ये ठेवली होती. एका फळ्यावर चिकटवलेल्या कंपन्यांच्या नावावर चिंपांझी मनाला येईल तसे डार्ट टाकत होता. डार्ट टाकलेल्या काही कंपन्यातील गुंतवणुकीमुळे झालेला फायदा सल्लागाराच्या व्यवहारापेक्षा कित्येक पटीत जास्त होता. म्हणूनच कदाचित सुसंगत नसलेल्या व यदृच्छतेच्या अशा गुंतवणुकीच्या व्यवहाराला Dartboard Portfolio असे म्हणत असावेत!
Comments
??
'योगायोगापेक्षा अधिक' हे कसे समजले?
समजले नाही.
उलट
अरे हो उलट - संख्यीकीपेक्षा थोडे अधिक आणि योगायोगापेक्षा थोडे कमी असे म्हणायचे होते. (गुंतवणूक सल्लादारपेक्षा अधिक फायदा आणि थिया पेक्षा कमी फायदा.)
बाकी, अवान्तर आहे. उगाच.
घ्या..
माझ्या ओळखीचे खगोल-भौतिकशास्त्रातले प्राध्यापक आहेत (ऍस्ट्रोफिजिसिस्ट) जे फावल्या वेळात फल जोतिष्य/ सनातन धर्म ह्यावर लोकांना बोर मारतात. आता ते केवळ ऍस्ट्रोफिजिसिस्ट आहेत म्हणून त्यांना विज्ञान विरोधी म्हणता येणार नाही हे विधान उपक्रमावर तरी खपायचे नाही. (शुद्धलेखनाच्या प्राथमिक चुका करणारे मराठीचे प्राध्यापक आहेत अशी अनेक उदाहरणे देता येतील.)
थोडक्यात, तुम्ही चरितार्थासाठी रसायनशास्त्रात संशोधन करता म्हणून विज्ञान विरोधी असुच शकत नाही हा मुद्दा पोकळ आहे.
आत्मा ह्या शब्दाची व्याख्या काय ह्यावर तो विज्ञानात घ्यायचा का तत्वज्ञानात की अंधश्रद्धेत फेकायचा हे ठरू शकते. माणसाचा आत्मा शरीर मेले तरी जिवंत असतो आणि नविन शरीर घेऊन पुन्हा जन्माला येतो हे जर तुमच्या आत्म्याच्या व्याख्येत बसत असेल तर ती ते अवैज्ञानिक आहे. आत्मा पुनर्जन्म घेतो ह्या दाव्यास कसलाही वैज्ञानिक पुरावा नाही. त्यामूळे अशा प्रकारच्या गोष्टी 'आत्मा' ह्या संकल्पेनत घुसडल्या गेल्यास त्याला अवैज्ञानिकच म्हंटले जावे.
आत्मा ही एक केवळ ऍब्स्ट्रॅक्ट कल्पना म्हणून वापरायची असेल तर तो तत्त्वज्ञानात घालणे योग्य.
बाकी धनंजय आक्रमक प्रतिसाद देतात आणि यनावाला बिनडोक पद्धतीने मुद्दे लिहितात हे शोध मात्र मजेदारच आहेत :)
ठीक आहे
डार्क मॅटर आणि प्रमोद सहस्रबुद्धे मी वैज्ञानिक आहे म्हणून विज्ञानविरोधी नाही हा दावा मान्य करायला तयार नाहीत. पण मी विज्ञानविरोधी आहे हे सिद्ध करण्यासाठी वेगळे पुरावे लागतील.
बाकी आपण आत्मा ही तत्त्वज्ञानातील ऍब्स्ट्रक्ट कल्पना मान्य करता हेही कमी नाही. त्याबद्दल रिटे यांना लिहिलेली खरड वाचावी.
बाकी धनंजय आणि यनावाला यांच्याबद्दलही आधी सांगितले तेच - वाचन वाढवा.
प्रति
जे तुम्हालाही मान्य असेलच.
तुम्ही फल जोतिष्यावर विश्वास ठेवता इतका पुरावा पुरेसा आहे. (तुम्ही फल जोतिष्यात तथ्य मानता असे तुमच्या लिखाणातुन दिसले आहे.)
ती यनावालांनीही रिजेक्ट केली नसावी.
ओके!
आत्मा
कदाचित् उद्या किंवा काही हजार वर्षांनी विज्ञानाला आत्म्याच्या अस्तित्त्वाबद्दल पुरावा मिळेल किंवा आत्म्याचे अस्तित्त्व असणे शक्य नाही असे सिद्ध होईल (तसे आजच विज्ञानाने सिद्ध केले आहे याबद्दल मला शंका आहे). थोडक्यात आत्म्याचे अस्तित्त्व आज सिद्धही नाही आणि असिद्धही नाही अश्या स्थितीत असताना एखाद्याने तो तसा मानल्यास मला ते मानणे "विज्ञानविरोधी" आहे या मुद्द्यावर विरोध करता येणार नाही.
आत्मा शब्दाचे वेगवेगळे अर्थ लोक लावतात. ख्रिश्चनांसाठी तो मनुष्य आणि जनावर यातला भेद स्पष्ट करणारा असतो. असा आत्मा विकता येतो, आणि आत्मा विकलेला माणूस जनावरासारखा जगू शकतो. हिंदूंसाठी तो चैतन्याचे स्वरूप असतो. अगदी जनावरात आत्मा असतो. काही अतिरेकी सर्व चराचरात त्याला भरतात.
ज्या आत्म्याचा पुरावा मिळू शकेल असे म्हणता तो यातील कुठला आत्मा? तुम्ही आत्मा शब्द कुठल्या अर्थाने वापरता हे त्यावेळेला स्पष्ट करणे जरूरी असते.
सिद्ध ही नाही आणि असिद्धही नाही: या कॅटेगरीत अनेक वस्तु बसतात. त्यांच्या बद्दल तुमचे काय मत आहे. (उदा सशाचे शिंग, वाळूचे तेल)
तुम्ही संशोधन करता म्हणून तुम्ही विज्ञानविरोधी नाहीत हा मुद्दा तकलादू आहे. तुमच्या संशोधनात तुम्ही विज्ञानवादी असाल (किंवा नसालही) पण त्यामुळे इतर विषयातही तुम्ही तीच दृष्टी बाळगता हे सांगता येत नाही. फ्क्त त्यातून विज्ञानवादी असू शकण्याची शक्यता बळावते एवढेच.
प्रमोद
चैतन्य
हिंदूंसाठी तो चैतन्याचे स्वरूप असतो. अगदी जनावरात आत्मा असतो. काही अतिरेकी सर्व चराचरात त्याला भरतात.
साधारण ही व्याख्या मान्य आहे. उपनिषदांमध्ये (केन आणि कठ) व्याख्येबद्दल लिहावे असे रिटे यांनी सुचवले आहे. त्याला थोडा वेळ लागेल.
अतिरेकी शब्दाचे प्रयोजन समजले नाही.
अतिरेकी
काही जण मानवात आत्मा मानतात तर काही जिवंत प्राण्यात. मग अगदी एकपेशीप प्राणी धरून. मग व्हायरस राहतात. त्यांनाही आत्मे असतात असे काहींचे म्हणणे आहे. त्यानंतर अचेतन वस्तुंमध्ये हालचाल असते म्हणून त्यातही आत्मे असतात ह्या गोष्टीला मी अतिरेकी म्हटले. कारण मग प्रत्येक अणू आत्मायुक्त असतो असे त्यांचे म्हणण असेल. त्यातही जेवढे भाग कराल तेवढे. असे म्हणणारी माणसे भेटतात. तत्वाचा अतिरेक करतात म्हणून अतिरेकी.
इतर प्रश्नांची उत्तरे अजून अपेक्षित.
'आत्मा म्हणजे चैतन्याचे स्वरूप' या व्याख्येत चैतन्य वेगळे आत्मा वेगळा असे असते का चैतन्य म्हणजेच आत्मा?
प्रमोद
देताय ना उत्तर?
तीन प्रतिसाद आले आहेत तुमच्या 'सो कॉल्ड अवघड' मुद्यावर चर्चा करायला. आता माघार घेऊ नका. नाहीतर निव्वळ विज्ञानवाद्यांना शिवीगाळ करायला तुम्ही इथे येता असं सिद्ध होईल.
शिवीगाळ?
यनावालांच्या लेखाबद्दल जे लिहिले आहे आणि जे संपादकांनी अजून इथे ठेवले आहे ते सभ्य भाषेत आहे. यात शिवीगाळ असती तर संपादकांनी उडवली नसती का? तरीही तुम्हाला तसे वाटत असेल तर त्यांच्याकडे तक्रार करा. हवे तर "पुरोगाम्यांना नडणार्या विनायक गोरे यांचे सदस्यत्व रद्द करावे का?" अशी चर्चा टाका.
संपादकांनी उडवली नसती का?
असा शेरा तुमच्या प्रतिसादावर आहे.
सामोसचा आरिस्तार्कोस
मला वाटते संदर्भ असा आहे : "सामोस येथील आरिस्तार्कोस् याने सूर्यमध्येसिद्धांत मांडला होता" ही बाब श्री. विनायक गोरे उभी करत आणि निष्कर्ष काढत की तर्काशिवाय किंवा वैज्ञानिक विचाराशिवाय कधीकधी सत्यापाशी पोचता येते. वेगवेगळ्या अतार्किक रूढींबाबत किंवा समजांबाबत चर्चा चालू असताना श्री. विनायक गोरे हा मुद्दा उपस्थित करत असत.
१. आरिस्तार्कोस् याने मुळात तर्क दिला होता, हे आपल्याला आर्किमिडीसने सांगितल्याप्रमाणे ठाऊक आहे. तर "तर्काविना सत्यप्राप्ती"बाबत हा ऐतिहासिक दाखला चुकलेला आहे.
२. आरिस्तार्कोस् याने प्रामादिक आकडे वापरले म्हणून त्याचा सूर्यसिद्धांत त्या प्रमाणात प्रामादिक आहे. (त्याच्या गणिताने सूर्य-पृथ्वी-अंतर हे चंद्र-पृथ्वी-अंतराच्या १७-२०पट आहे. अधिक सूक्ष्म निरीक्षणानंतर असे दिसते की हे गुणोत्तर ४००पट इतके आहे.) त्यामुळे अद्ययावत् तर्क उपलब्ध असताना पुरातन तर्कानुसार सत्यप्राप्ती होऊ शकते, याबाबतीत श्री. विनायक गोरे यांचा हा दाखला चुकलेला आहे.
३. आरिस्तार्कोस् म्हणतो की सूर्य हा विश्वाचा अचल मध्यबिंदू आहे. हे आज सत्य कसे काय मानावे? जेथवर आकाशगंगेच्या गतीचा संदर्भ आहे, तेथवर अन्य तारे आणि सूर्यही आकाशगंगेच्या केंद्राभोवती परिभ्रमण करीत आहेत.
त्यांचा दाखला कुठल्या बाबतीत बरोबर आहे? "उदाहरणात काहीही चुकलेले नाही" हे श्री. विनायक गोरे यांनी कसे सिद्ध केले? काहीतरी उत्तर दिले म्हणून सिद्धता होत नाही. जेव्हा सूर्य-पृथ्वी-अंतर चंद्र-पृथ्वी-अंतराच्या १८-२०पट मानून आणि सूर्य अचल मानून यशस्वी रीत्या उपग्रह-अग्निबाण सोडले जातील तेव्हा प्रायोगिक सिद्धता मानायला हरकत नाही. हे होत नाही. मग श्री. विनायक गोरे यांनी कुठलीही सिद्धता केल्याचे काय म्हणून मानावे, आणि चर्चा काय म्हणून वाढवावी?
हल्ली श्री. विनायक गोरे हा आरिस्तार्कोस्-सूर्यसिद्धांताबद्दल दाखला फारसा वापरत नाहीत. हे चांगले झाले. पण आपण काही सिद्ध केल्याचे पुन्हापुन्हा काय बरे सांगतात?
वाचन वाढवा
इतकेच सांगतो. दुसर्यांना स्पून फीडिंग करणे सोडले आहे. यनावालांचे पुरोगामी लेख शोधणे अवघड नाही. इतकेही जमत नसेल तर थोडे थांबा. सध्या कोहमवर चर्चा सुरू आहे. ती झाली की मी आणि रिटे दुसरी चर्चा घेऊ.
विवेचनप्रयत्न
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
*माझ्या प्रतिसादातील विधाने साधी,वास्तववादी आहेत.कॉमनसेन्सला धरून (धादान्तवादी) आहेत.सत्य आहेत.याला कोणी पुरोगामी लेखन म्हणत असतील तर त्यासंबंधी माझा कोणताही आक्षेप नाही.
*विवेकवादी लेखनावर आक्षेप का घेतले जातात त्याविषयींच्या विवेचनाचा प्रयत्न पूर्वी केला आहे.श्री.विनायक गोरे यांच्या प्रतिसादांवरून त्या आक्षेप प्रकाराचा पुनःप्रत्यय आला.
सखेद विनंती
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.विनायकराव गोरे यांना यनावालाचे लेख/प्रतिसाद वाचून त्रास होतो,त्रागा करावा लागतो असे दिसते.यास्तव विनंती की त्यांनी यनावालाचे लेखन दुर्लक्षित करावे.खरे तर असे लिहिताना खेद वाटतो. कारण आपले लेखन इतरांनी वाचावे अशी लिहिणार्याची इच्छा असते.पण त्या वाचनाने कुणाला त्रास होऊ नये अशी त्याहून प्रबळ इच्छा(माझी तरी) असते.
उत्तरदायित्व
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"असल्याचा पुरावा नसणे हाच नसल्याचा पुरावा असतो" असे एक तर्कशास्त्रीय वचन आहे.
एखादी गोष्टीच्या (समजा आत्मा) अस्तित्वावर ज्यांची श्रद्धा असते त्यांच्यावरच त्या गोष्टीचे अस्तित्व सिद्ध करण्याचे उत्तरदायित्व असते.ते अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जर कोणताच पुरावा देता येत नसेल तसेच त्या अस्तित्वाची संभवनीयता तर्कशुद्ध युक्तिवादाने दाखवून देता येत नसेल तर हीच असमर्थता ती गोष्ट (इथे आत्मा) अस्तित्वात नसल्याचा पुरावा मानणे क्रमप्राप्त आहे.
:)
कॉलिंग आरागॉर्न...
उत्तरदायित्त्व.
उत्तरदायित्त्व.
...त्याच न्यायाने, "नसल्याचा पुरावा नसणे हाच असल्याचा पुरावा असतो." तर्कशास्त्रास उत्तरदायित्त्व हे एकांगी असणे अजिबात अपेक्षित नाही. अशांसारख्या उदाहरणांत उत्तरदायित्त्व हे दोहों पक्षांचे, समसमान आहे - कोण्या एकाचे नाही..!
--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले
हैयो हैयैयो!
एकांगीच
तर्क किंवा न्याय या विषयांमध्ये सममिती नाही. गुन्हा केल्याचा पुरावा नसणे (absence of evidence) हा निरपराधित्वाचा आधार (evidence of absence) असतो परंतु ऍलिबाय नसणे (lack of evidence of absence) हा अपराधीपणाचा पुरावा (evidence of presence) नसतो.
कदाचित, असेही शक्य आहे की पृथ्वीवरील सर्व सजीवसृष्टी एखाद्या दुसर्या सजीवांनी सुरू करून दिली. परंतु, तसा पुरावा मिळत नाही (absence of evidence) तोवर तो अभ्युपगम तर्काने नाकारण्यात आलेला आहे (evidence of absence). "जगात निळ्या मेंढ्या नाहीत" या विधानाचा पुरावा आपल्याकडे नसेल (lack of evidence of absence) तरीही त्याचा तर्कशास्त्रीय अर्थ "जगात निळ्या मेंढ्या असतात" असा (evidence of presence) होत नाही.
--
तुमचे नाडीचे दुकान नसल्याचे जाहीर करा ना! वारंवार विनंती करूनही तुम्ही दुर्लक्ष करता याला evidence of presence मानणे तर्कशुद्ध आहे.
'पुरावा नसणे'
'पुरावा नसणे'
'पुरावा नसणे' (absence of evidence) हे एकप्रकारे संशोधनकार्यातील अथवा ज्ञानातील त्रुटी दर्शविते. ह्या त्रुटींकडे सर्वसकट दुर्लक्ष करून केवळ 'पुरावा नाही' म्हणून अस्तित्त्व नाही असे हट्ट-बळजबरीने सिद्ध करू पाहणार्या वितर्कास argumentum ad ignorantiam (निर्बुद्ध वितर्क) असे संबोधितात. असे त्रुटीपूर्ण, निर्बुद्ध वितर्क अनेकदा वरचढ ठरू पाहतात. अशा वेळेस वितर्कशास्त्राची एक पद्धती साध्यवतांतील निर्णेतृत्त्वाची धुरा बदलण्यास सुचविते.
त्रयस्थ, तटस्थ आणि निष्पक्ष परीक्षक असतांनाच्या परिस्थितीमध्ये ही धुरा बदलणे शक्य आहे. ज्या चर्चेमध्ये निर्णयासाठी तटस्थ निष्पक्ष परीक्षक असू शकत नाहीत, त्या ठिकाणी साध्यवतांसाठी उत्तरदायित्त्व समानच असणे तर्कास अपेक्षित आहे.
--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले
हैयो हैयैयो!
त्रुटीच, परंतु ती आमची नाही
विज्ञान परिपूर्णतेचा दावा कधीच करीत नाही. पुरावा शोधण्याची जवाबदारी अभ्युपगमाच्या पाठिराख्यांची असते.
जेव्हाजेव्हा न्यायाधीश 'पुरावा नाही' म्हणून आरोपीला सोडतील तेव्हा त्यांना 'वितर्क करणारे निर्बुद्ध' असे संबोधणार आहात काय? आधीच्या प्रतिसादात न्याय, तर्क वगैरे बडबड केलीत. त्यावर मी मत व्यक्त केले होते: "गुन्हा केल्याचा पुरावा नसणे (absence of evidence) हा निरपराधित्वाचा आधार (evidence of absence) असतो परंतु ऍलिबाय नसणे (lack of evidence of absence) हा अपराधीपणाचा पुरावा (evidence of presence) नसतो.". हे विधान तुमच्या डोक्यात शिरले नसेल तर तसे सांगा, सविस्तर समजावून सांगेन.
'उपलब्ध पुरावा तपासणे' इतकीच परीक्षकांची जवाबदारी असते. पुरावा जमविण्याची जवाबदारी तुमची आहे, परीक्षकांची नाही. तुम्हाला जवाबदारी नको असेल तर गप्प बसा आणि त्या अभ्युपगमला दुर्लक्षाच्या गर्तेत खितपतू द्या. आम्हाला तुमच्या अभ्युपगमाविषयी शष्पही प्रेम नाही.
तुम्हाला नेमकी कोणत्या अभ्युपगमाची चर्चा करावयाची आहे? 'त्या अभ्युपगमासापेक्ष तटस्थ निष्पक्ष असे परीक्षक असू शकत नाहीत' हे विधान सिद्ध करा. भविष्य वर्तविता येते इतकाच तुमचा अभ्युपगम असेल तर तटस्थ निष्पक्ष परीक्षक मिळतील असे साधे प्रयोग आयोजित करता येतील. प्रयोग करण्याची जवाबदारी तुम्हाला नको असेल तर गप्प बसा.
प्रतिसाद
प्रतिसाद
विज्ञान परिपूर्णत्त्वाचा दावा करीत नाही हे खरे, परंतु 'जेवढे आपणास ठावूक आहे / कळते तेवढेच परिपूर्ण आहे' असा दावा विज्ञानप्रेमी करतात ना, मुळात तो दावाच अर्धवट आहे. विज्ञानप्रेमींच्या परिपूर्णत्त्वाच्या भावनिक दाव्यांमुळेच विज्ञानास मर्य्यादा आहे असे चित्र तुमच्या विरोधी पक्षाकडून निर्माण केले जावू शकते, हे खरेतर तुम्हां स्वघोषित विज्ञानप्रेमींच्या लक्षात यावे. असो. असे असले तरीही, तटस्थाभ्यासासाठी ह्या सार्यातील काय घ्यावे काय सोडावे हा विचार निराळा आहे..!
श्री. रिकामराव, आतापावेतो मी आपणास भला अभ्यासू समजे; अजूनही समजतो. वितर्कशास्त्राचे मूलभूत नियम तुम्ही जाणत नाही असे दाखविता हे आश्चर्यजनक वाटते. असो! वितर्कशास्त्राच्या मूलभूत नियमांनुसार न्यायाधीशाने स्वत: वितर्कामध्ये उतरणे हे निषिद्ध आहे हे जाणून असा. न्यायाधीशाने दोहों पक्षांचे वितर्क समजावून घेवून त्यानुसार स्वत: तर्काने योग्य आणि दोन्ही पक्षांस मान्य असा निर्णय करणे इतकेच अपेक्षित आहे. ह्याउपर नियम मोडून न्यायाधीश स्वत: वितर्क करू पाहू लागले, तर अधिवक्ते त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यास मागे पाहत नाहीत. (अरे, परंतु तुम्ही स्वत:ला न्यायाधीश समजता आहात काय? नका हं, उगाचच स्वत:विषयी काही विचित्र समज करून घेवू नका..!) खरेतर तुम्ही बुद्धीमान आहात ह्याकारणे तुम्ही परीक्षक असता तर मला निश्चित आवडते. परंतु न्यायाधीश, परीक्षक इत्यादि होण्यासाठी अंगी मुदलांत तटस्थपणा नामक पात्रता बाळगणे क्रमप्राप्त ठरते. येथे "अमुकतमुक विषयी आम्हांस प्रेम नाही" असे म्हटल्याने तटस्थपणा सिद्ध होतो असे तुम्हांस वाटत असेल, तर ते तसे नाही. तुमच्या प्रतिसादांतील आक्रमकतेवर तुमचा चाहतावर्ग खुष होत असेल तर होवो, परंतु कोणत्याही अभ्युपगमाची परीक्षा करताना न्यायाधीशपद मिळविण्यास अशा आक्रमकतेचा काही उपयोग नाही.
-
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले
हैयो हैयैयो!
असहमत
नाही, असा दावा आम्ही केलेला नाही.
तटस्थ अभ्यास म्हणजे काय? तटस्थ अभ्यासकांच्या नावाखाली तुम्हाला अक्कल गहाण टाकणारी गिर्हाईके हवी आहेत काय?
आधीही मी प्रश्न केला होता की "तुम्हाला नेमकी कोणत्या अभ्युपगमाची चर्चा करावयाची आहे?". आता, तुम्ही खुलासा करीत नाहीत तोवर मी असे गृहीत धरतो आहे की "नाडीवाचनाने भूत/वर्तमान/भविष्य समजते" या अभ्युपगमाचीच जाहिरात तुम्ही करीत आहात.
तुमच्या प्रमाणपत्राची मला आवश्यकता नाही.
मी नियम जाणत नसल्याचा आभास तुम्हाला माझ्या कोणत्या विधानामुळे झाला?
मी न्यायाधीश असल्याचा माझा दावा असल्याचा तुमचा समज का झाला?
शब्दखेळ
'जेवढे आपणास ठावूक आहे / कळते तेवढेच परिपूर्ण आहे' म्हणजेच परिपूर्णत्वाचा दावा झाला ना? मग विज्ञान विज्ञान परिपूर्णत्त्वाचा दावा करीत नाही हे ही तुम्हीच म्हणता ते कसे काय?
उत्तरदायित्व
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"त्याच न्यायाने, "नसल्याचा पुरावा नसणे हाच असल्याचा पुरावा असतो." तर्कशास्त्रास उत्तरदायित्त्व हे एकांगी असणे अजिबात अपेक्षित नाही. अशांसारख्या उदाहरणांत उत्तरदायित्त्व हे दोहों पक्षांचे, समसमान आहे - कोण्या एकाचे नाही..!"
--
असे श्री.हैयो हैहैयो म्हणतात त्याचे आश्चर्य वाटते.
समजा पोलीसांनी एका अभियुक्तावर(आरोपी) अपराधाचा आरोप ठेवला.तो आरोप साधार सिद्ध करण्याचे उत्तरदायित्व पोलीसांचेच असते."तुझे निरपराधित्व सिद्ध् कर. अन्यथा तू अपराधी ठरशील."असे म्हणणे योग्य होईल का? अपराध सिद्ध होण्यासाठी पर्याप्त पुरावा नसेल तर अभियुक्त निरपराधी ठरतो आणि सुटतो.
इथे तो अपराधी असल्याचा पुरावा नसणे हाच अपराधी नसल्याचा पुरावा मानला जातो.
हेच "असल्याचा पुरावा नसणे हा नसल्याचा पुरावा असतो" असे मित शब्दांत म्हटले आहे.
कित्येक गोष्टी अशा असतात की त्या अस्तित्वात नाहीत हे कॉमनसेन्सने कळते.पंअ त्यांचे अनास्तित्व सिद्ध करता येत नाही. (उदा.कार्ल सेगन यांच्या गराज मधील ड्रॅगन,पृथ्वी भोवती फेर्या घालणारी बर्टरॅण्ड रसेल यांची किटली) म्हणून त्यांचे अस्तित्व मानायचे का? काही वेळां अज्ञेयवाद स्वीकारणे भाग असते.पण तारतम्य वापरून.
प्रतिसाद
प्रतिसाद
श्री. यनावाला, आता कसे बोललात..! आपण मांडलेले उदाहरण एका वेगळ्या प्रकारे अगदी चपखल ठरावे.
अभियुक्तावर अपराधाचा आरोप ठेवण्यापूर्वी पोलीसांनी काही अभ्यासकार्य करणे आवश्यक आहे. कोठल्याही कारणमीमांसेशिवाय आरोप ठेवल्यास अभियुक्तास तो कसाकाय मान्य होणार? ह्यासारख्या उदाहरणांमध्ये आरोप खरा असो वा खोटा, तो साधार सिद्ध करावयाचे उत्तरदायित्त्व पोलीसांचे आहेच. परंतु अभियुक्त हा अपराधी नसल्याचा पुरावा नाही असे पोलीसांस म्हणावयाचे असेल, तर हे म्हणणे पोलीसांच्या संशोधनकार्यातील त्रुटी दर्शविते. स्वत:च्या संशोधनकार्यातील त्रुटींकडे सर्वसकट दुर्लक्ष करून केवळ ’अपराधी नसल्याचा पुरावा नसण्या’मुळे हट्ट-बळजबरीने अपराध सिद्ध करू पाहणार असतील तर अशा वेळी पोलीसांचे आरोप कसे चुकीचे आहेत हे निर्विवाद दाखविण्याचे उत्तरदायित्त्व अभियुक्तावर येते - ह्या अर्थाने उत्तरदायित्त्व समान असल्याचे मी म्हणतो आहे. येथे अपराधी ’असल्याचा’ पुरावा ’नसणे’ ह्यास न्यायालये अपराधी नसल्याचा 'पुरावा' मानतील तर ती चूक ठरेल. अशा घटनांमध्ये न्यायालये "संशयाचा लाभ" अशाप्रकारची शब्दयोजना करून त्याआधारे अभियुक्तांस निर्दोष सोडतात.
असो. आपले उदाहरण वेगळ्या प्रकारे चपखल ठरावे असे मी म्हणतो ते असे: "समजा विरोधकांनी एका विशिष्ट अभ्युपगमप्रेमीवर खोटारडेपणाचा आरोप ठेवला. तो आरोप साधार खरा म्हणून सिद्ध करण्याचे उत्तरदायित्व विरोधकांचेच असते. "तुझा खरेपणा सिद्ध् कर. अन्यथा तू खोटारडा ठरशील" असे म्हणणे योग्य होईल कां?"
अभ्युपगमप्रेमींच्या दाव्यांप्रमाणे मुळातच त्यांच्याकडे नसलेला 'खोटेपणा’ सिद्ध होण्यासाठी विरोधकांकडे पर्याप्त 'पुरावा'च नसेल, तर संशोधनकार्यातील त्रुटींमुळे "संशयाचा लाभ" अशाप्रकारची शब्दयोजना करून त्याआधारे अभ्युपगमप्रेमीस निर्दोष सोडावे लागेल ना?...!
--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले
हैयो हैयैयो!
असहमत
या रूपकात, अंधश्रद्धांचे समर्थक हे फिर्यादी असतात आणि बिनडोक गिर्हाईकांना न्यायाधीश बनण्याची गळ ते घालतात. त्यांचा आरोप असतो की, "अंधश्रद्धांच्या (उदा., नाडीवाचनाच्या) उपयुक्ततेविरुद्ध विज्ञानाकडे पुरावा नाही आणि त्यामुळे, नाडी'शास्त्रा'विरुद्ध आडमुठेपणा केल्याचा गुन्हा मान्य करून विज्ञानाने नाडीशास्त्र स्वीकारावे". त्यावर, absence of evidence is evidence of absence हा युक्तिवाद आम्ही आरोपीच्या बाजूने देतो. तुम्ही फिर्यादी नसाल तर रडगाणे गाऊ नका.
विज्ञानावर (नाडी'शास्त्रा'विरुद्ध आडमुठेपणा केल्याच्या) अपराधाचा आरोप ठेवण्यापूर्वी तुम्ही (फिर्यादींनी) काही अभ्यासकार्य करणे आवश्यक आहे. कोठल्याही कारणमीमांसेशिवाय आरोप ठेवल्यास विज्ञानास तो कसाकाय मान्य होणार? यासारख्या उदाहरणांमध्ये आरोप खरा असो वा खोटा, तो साधार सिद्ध करावयाचे उत्तरदायित्त्व तुमचेच आहे. विज्ञान नाडीशास्त्राकडे दुर्लक्ष करीत नसल्याचा पुरावा नाही असे तुम्हाला म्हणावयाचे असेल, तर हे म्हणणे तुमच्या संशोधनकार्यातील त्रुटी दर्शविते.
ह्यॅ!
पोलिसांनी केलेले आरोप साधार असल्याचे पुरावे पोलिसांनी दिले नाहीत की ऑपॉपच ते आरोप निराधार ठरतात. आरोपीला त्यासाठी काहीही निर्विवाद पुरावा सादर करावा लागत नाही.
शब्दयोजना वाट्टेल ती चालेल, आरोपीला शिक्षा होऊ नये. म्हणजेच, नाडी'शास्त्रा'कडे दुर्लक्ष करणे चूक असल्याचे विज्ञानाला मान्य करावे लागू नये.
होय, अभ्युपगमप्रेमी हे फिर्यादी असतात. त्यांनी केलेल्या दाव्यांची सत्यता त्यांनीच सिद्ध करावयाची असते. तसे न केल्यास त्यांच्यावर केलेला खोटारडेपणाचा आरोप स्वयंसिद्ध असतो.
नाही, अभ्युपगमप्रेमी हे फिर्यादी असतात, त्यांनी पुरावे न दिल्यास त्यांच्यावर केलेला खोटारडेपणाचा आरोप स्वयंसिद्ध असतो.
--
संपादकांना विनंती:
'मप्' ही अक्षरे एका ओघात टाईप केल्यावर येणारा
हा त्रास दुरुस्त करा.